Home >> Maharashtra >> North Maharashtra

North Maharashtra News

 • जायखेडा -सटाणा तालुक्यातील मळगाव भामेरच्या पोहाणे शिवारात रात्री एक-दीडच्या सुमारास वनविभागाच्या जंगलात दहा जणांच्या टोळीने काळवीटाची शिकार केल्याचे समोर आले आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश आले असून मृत काळवीटही मिळाले आहे. इतर सात ते आठ शिकारी दुचाकी सोडून अंधारात फरार झाले आहेत. मळगाव ते पोहाणे या रस्त्याचे काम वर्षभरापासून सुरू आहे. या कामासाठी गुजरातमधील काही मजूर आलेले आहेत. ते मजूर अहवा (गुजरात राज्य) येथील सहकाऱ्यांना बोलावून परिसरात रात्री...
  November 12, 06:18 PM
 • धुळे-शहराचा अागामी महापाैर मीच अाहे, अशी घाेषणा अामदार अनिल गाेटे यांनी मेळाव्यात केली. त्याचवेळी अामचाच भाजप प्युअर अाहे. अाेरिजनल अाहे. ते तर हायब्रीड बीजेपीवाले अाहेत. त्यात डांबरचाेर, डंपरचाेर, माेबाइलचाेरांची भरती झाली अाहे, अशी खरमरीत टीकाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर केली. भाजपच्या नेतृत्वाला थेट अाव्हान देत अामदार गाेटे यांनी रविवारी बंडाचा झेंडा उभारला. अाम्ही देऊ तेच भाजपचे उमेदवार असतील, असा पवित्राही घेतला. त्याचवेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरेंवर चाैफेर...
  November 12, 11:48 AM
 • नाशिक - एसटी महामंडळाच्या शिवशाही बस आणि अपघात यामध्ये पाठशिवणीचा खेळ सुरूच असून नाशिकहून इंदूरला जाणाऱ्या शिवशाही या स्लीपर कोच बसच्या इन्व्हर्टरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत शिवशाही बस जळून खाक झाली. रविवारी (दि. ११) रात्री आठला ओझर महामार्गावरील गरवारे पॉईंटवर हा अपघात घडला. चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्व बारा प्रवासी बचावले. चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करुन तत्काळ अग्निशामक दलास कळवले; मात्र बंब येईपर्यंत बस खाक झाली हाेती. पोलिसांनी दिलेल्या...
  November 12, 11:48 AM
 • सिन्नर-पाकिस्तान लष्कराकडून युद्धबंदीचे उल्लंघन सुरुच अाहे. रविवारी दुपारी पाक लष्कराने केलेल्या गोळीबारात काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये तैनात असलेला केशव सोमगीर गोसावी (२९) हे शहीद झाले. ते मुळ नाशिक जिल्ह्यातील श्रीरामपूर - शिंदेवाडी (ता. सिन्नर) येथील रहिवाशी हाेते. गाेसावी यांचे पार्थिव सोमवारी (ता. १२) दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ओझरच्या विमानतळावर तर त्यानंतर ३ वाजेपर्यंत शिंदेवाडी येथे आणण्यात येईल. केशव हे मराठा बटालियनचे जवान हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, वडील, दोन...
  November 12, 07:37 AM
 • धुळे- महानगरपालिका निवडणुकीला अद्याप प्रारंभही झालेला नाही. तरीही हाणामारी, धमकवण्याचे प्रकार सुरू झाले अाहेत. विद्यमान नगरसेविका मनीषा अग्रवाल याचे पती प्रवीण महावीर अग्रवाल यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी करीत धमकावण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. शहरात महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना हा प्रकार घडला. हा प्रकार गुरुवारी (दि. ८) सकाळी साडेअाठ तर शुक्रवारी (दि.९)रात्री ९.३० वाजेच्या सुमारात घडला. प्रवीण...
  November 11, 11:59 AM
 • जळगाव- दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागात एकाने रिक्षाचालकाच्या पोटात चाकूने वार करून भररस्त्यावर खून केला. गुरुवारी (८ नोव्हेंबर) सायंकाळी ५.१५ वाजता रेल्वेस्थानकाच्या बाहेर हा थरार घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. इस्माईलशहा गुलाबशहा (वय ३६, रा.गेंदालाल मिल) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर नितीन जगन पाटील उर्फ पपई (वय २३, रा. सरुताईनगर, आव्हाणे, ता. जळगाव) याने शहा यांचा खून केला आहे. नितीन हा देखील रिक्षाचालक आहे....
  November 11, 11:36 AM
 • भुसावळ- भाजपने आमचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसेंवर अन्याय केला, तर आमच्यासारख्या सर्वसामान्यांचे काय, असा सवाल रावेर लोकसभा मतदारसंघातील खडसे समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना केला. शनिवारी शहरातील आयएमए सभागृहात रावेर लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुख, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक आढावा बैठक झाली. या वेळी खडसेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून कार्यकर्त्यांनी गदारोळ केला. यानंतर प्रदेशाध्यक्ष दानवेंनी केवळ चार वाक्यांचे अध्यक्षीय मनोगत...
  November 11, 10:22 AM
 • भुसावळ- ऐन सण उत्सवाच्या काळात महानिर्मितीच्या केंद्रांतून होणाऱ्या वीजनिर्मितीमध्ये तब्बल अडीच हजार मेगावॅटने घट झाली आहे. राज्य विज नियामक आयोगाने मेरिट ऑर्डर डिस्पॅच अर्थात एमओडीची (प्रथम मागणी करणाऱ्यांना वितरण) संकल्पना मांडल्याने आता महानिर्मितीच्या वीजनिर्मिती केंद्रांना घरघर लागली आहे. कोळशाच्या वाहतुकीचे दर वाढल्याने राज्यातील नाशिक, परळी, पारस आणि भुसावळ या कोळसा खाणींपासून दूर अंतरावर असलेल्या वीजनिर्मिती केंद्रांचे भवितव्य धोक्यात आहे. नवरात्रोत्सवाच्या...
  November 10, 09:29 AM
 • नाशिक-भारतीय लष्कराची क्षमता आणि सामर्थ्य वाढवण्यात मैलाचा दगड ठरणाऱ्या M777 A2 अल्ट्रा लाईट हॉविट्झर, K-9 वज्र स्वचलित बंदुका आणि 6X6 युद्धभूमीवरील दारुगोळा ट्रॅक्टर्स शुक्रवारी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी राष्ट्र सेवेत समर्पित केल्या. नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली येथे झालेल्या सोहळ्याला संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, लष्करी तसेच संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, उत्पादन उद्योगांचे प्रतिनिधी तसेच अमेरिका आणि दक्षिण कोरिया सरकारांचे...
  November 10, 07:30 AM
 • यावल- चिंचोली येथे लहान मुलीस बकरीच्या पिलाने धक्का दिल्याने झालेल्या वादात एका महिलेचा विनयभंग तसेच तिच्या सासूला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी यावल पोलिस स्टेशनमध्ये तीन जणांविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचोली (ता. यावल) येथील पीडित विवाहितेने सांगितले की, 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी घराबाहेर खेळत होती. आरोपी भूषण भानुदास कोळी, रेखा भूषण कोळी, मंगलाबाई भानुदास कोळी यांच्या...
  November 9, 12:59 PM
 • यावल- शहरातील विस्तारित भागामध्ये कुलूप लावून बंद असलेली घरे पुन्हा चोरट्यांच्या रडारवर आली आहेत. विस्तारित भागातील आयशा नगरमध्ये लक्ष्मीपूजनाच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी एका घराला टार्गेट करीत 40 हजाराच्या रोकडसह सुमारे सोने-चांदीची दागिने लांबविली. जवळपास एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. घरफोडी गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. आयेशा नगरमध्ये जमील खान रुस्तम खान उर्फ गोंडू पेंटर हे राहातात. बुधवारी सायंकाळी सावदा येथील त्यांच्या एका नातेवाइकाचे अपघाती निधन झाले....
  November 8, 02:05 PM
 • धुळे-शहरात सायंकाळी सहा ते साडेअाठ वाजेच्या सुमारास मुहूर्त साधत घराेघरी लक्ष्मीपूजन झाले. त्याचवेळी फटाक्यांची एकच बरसात झाली. लाखाे अाकाशकंदिलांच्या सान्निध्यात फटाक्यांची अातषबाजी झाल्याने शहर प्रकाशाने उजळून निघाले. दहा वाजेच्या अात शहरभरात फटाक्यांची अातषबाजी झाली. दरम्यान भाऊबीजेसाठी जाणाऱ्यांची गर्दी वाढली असून, एसटी बसेस लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही फुल्ल झाल्या होत्या. दीपावली पर्वात लक्ष्मीपूजनाला शहरात सायंकाळी आग्रा रोडवरील दुकान, शोरूम, सोन्या-चांदीच्या...
  November 8, 11:52 AM
 • जळगाव- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या तीन दिवसांपासून शहरातील हवा व ध्वनी प्रदूषण तपासणीसाठी पाच ठिकाणी स्वयंचलित मशिन लावले अाहेत. यात १५ दिवस हवेची तर तीन दिवस ध्वनी प्रदूषणाची तपासणी केली जाणार अाहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा तीन दिवसांत फटाक्यांची अातषबाजी कमी असली तरी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने त्याची भर भरून काढण्यात अाली. दिवाळी म्हटली की दिवे, फराळ अाणि फटाक्यांची अातषबाजी हे समिकरण ठरलेले अाहे. वसुबारसपासून सुरू झालेल्या दीपाेत्सवात...
  November 8, 11:38 AM
 • जळगाव- जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी यंदाची दिवाळी आदिवासी लोकांसोबत साजरी केली. महाजन यांनी सपत्नीक चोपडा तालुक्यातील तांबडी पाडा या आदिवासी गावाला भेट दिली. लोकांची भेट घेऊन त्यांना मिठाई वाटप केली. मंत्र्यांनी आपल्यासोबत दिवाळी साजरी केल्यानंतर आदिवासींमधून आनंद व्यक्त केला जात आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...
  November 7, 02:46 PM
 • यावल- शहरातील बुरुज चौकात अतिक्रमणाने एका वयोवृद्ध महिलेचा बळी घेतला आहे. रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला ट्रकने जोरदार धडक दिली. यात महिला गंभीर जखमी झाली. उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. मात्र, वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जिजाबाई शांताराम पाटील (वय-75, रा. सुंदर नगरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ऐन दिवाळी पाटील कुटुंबावर शोककळा पसरली आहे यावल शहरातून बुरूज चौकातून चोपड्याकेडे केळीने भरलेला ट्रक (यू.पी. 76 के. 9245) जात होता. दुपारी एक वाजेच्या...
  November 6, 04:51 PM
 • जळगाव- एटीएम केंद्रात शरद खडके यांचे लक्ष विचलित करून त्यांचे एटीएम कार्ड अदलाबदल करून भामट्यांनी नंतर चार दिवसांत वृद्धाच्या खात्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसे काढले. सोने खरेदी केले, गाडीत पेट्रोल भरले. यात वृद्धाची भामट्यांनी चक्क पाच लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या भामट्यांनी अखेरची खरेदी मध्य प्रदेशात केली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. खडके यांचे स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत खाते आहे. ते २८ ऑक्टोबर रोजी बँकेच्या परिसरात असलेल्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी...
  November 6, 12:20 PM
 • जळगाव- एटीएम केंद्रात शरद खडके यांचे लक्ष विचलित करून त्यांचे एटीएम कार्ड अदलाबदल करून भामट्यांनी नंतर चार दिवसांत वृद्धाच्या खात्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसे काढले. सोने खरेदी केले, गाडीत पेट्रोल भरले. यात वृद्धाची भामट्यांनी चक्क पाच लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या भामट्यांनी अखेरची खरेदी मध्य प्रदेशात केली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. खडके यांचे स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत खाते आहे. ते २८ ऑक्टोबर रोजी बँकेच्या परिसरात असलेल्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी...
  November 6, 12:06 PM
 • नाशिक-काबाडकष्ट करत पै-पै जमवून घेतलेले सोने.... सौभाग्याचं लेणं समजले जाणारे मंगळसूत्र किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर करत घेतलेली दुचाकी असो या वस्तू चोरी गेल्याने सर्वसामान्यांना त्या परत मिळण्याची आशादेखील नसते. मात्र, नाशिक पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या पुढाकारातून सोमवारी (दि. ५) धनत्रयोदशीच्या मुहूर्त साधत फिर्यादींना तब्बल एक कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. चोरी झालेली लक्ष्मी घरी परत येणार असल्याने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड...
  November 6, 08:26 AM
 • नाशिक विरुद्ध मराठवाडा, अहमदनगर अथवा जळगाव यांच्यामध्ये पाण्याच्या प्रश्नावरून भडकणारा वाद नवीन राहिलेला नाही. या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय धरणातून थेट जलवाहिनी टाकणे हाच आहे. मान्सूनच्या हंगामात पर्जन्यमानाचे चक्र थोडे जरी उलटसुलट फिरले तरी टंचाईची स्थिती निर्माण होऊन वितंडवाद सुरू होतो. त्याची दाहकता एवढी असते की पाणी वाचवण्यासाठी धरणांच्या प्रभावक्षेत्रातील दुखावलेली मंडळी मागचापुढचा विचार न करता तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतात. त्यातून मग कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न...
  November 6, 06:39 AM
 • धानोरा- बर्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावरील धानोर्याजवळ सोमवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटून अपघात झाला. या अपघात दोन जण जखमी झाले. ट्रकचे स्टेअरींग जाम झाल्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. अपघातात गाजन सिंग (चालक) आणि सूरज सिंग (क्लिनर) हे दोघे किरकोळ जखमी झशले. यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने मोठी हानी टळली.. ट्रकचे स्टेअरिंग जाम झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्या ट्रक...
  November 5, 07:43 PM
 
जाहिरात

RECOMMENDED