Home >> Maharashtra >> North Maharashtra

North Maharashtra News

 • धानोरा- चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे ईद-ए-मिलादनिमित्त काढण्यात आलेल्या संदलमध्ये झेंडा फिरवण्यावरुन झालेल्या वादातून दंगल उसळली. दरम्यान जमावाने एका महिलेसह तिच्या पतीला घरात घुसून बेदम मारहाण केली. मिळालेली माहिती अशी की, ईद-ए-मिलादनिमित्त बुधवारी बिडगावात तडवी बांधवांनी संदल काढली होती.त्या मिरवणुकीत झेंडा फिरवला जात होता.लहान मुलगा हा झेंडा फिरवत असताना गावातील कैलास बोमटू पाटील यांना डोक्याला तो लागला. त्यावर कैलास पाटील यांनी झेंडा व्यवस्थित फिरविण्याच्या सुचना संबंधित...
  November 21, 04:45 PM
 • नाशिक- केंद्र सरकारच्या उडे देश का अाम नागरिक (उडान) या याेजनेचा महाराष्ट्रात बट्ट्याबाेळ केल्याने एअर डेक्कन या विमान कंपनीशी केलेला करार रद्द करत त्यांची अनामत रक्कमही जप्त करण्याचे अादेश भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिले अाहेत. नाशिक, साेलापूर, काेल्हापूर, जळगाव, अाैैरंगाबाद या शहरांना नियाेजित विमानसेवा मिळावी यासाठी २६ डिसेंबर राेजी पुन्हा बाेली प्रक्रिया राबवली जाईल. विमानतळ प्राधिकरणाकडून एअर डेक्कन चार्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने महाराष्ट्रातील...
  November 21, 03:38 PM
 • नवापूर- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनीकाँग्रेस पक्षाच्या दोन नगरसेवकांचे पद रद्द केले आहे. निकालानंतर दोन्ही उमेदवार व काँग्रेस पक्षाची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा अ मधील ओबीसी महिला पदासाठी सारिका मनिषकुमार पाटील यांनी उमेदवारी दाखल केली...
  November 21, 03:05 PM
 • यावल- शहरातील फैजपूर मार्गावरील आदिवासी वस्तीत घराच्या अंगणात खेळत असलेल्या नऊ वर्षीय मुलाला ट्रॅक्टरने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. शिवलाल बुधा बारेला असे मृत मुलाचे नाव आहे. हरिओम नगरच्या शेजारी माजी नगरसेवक देवराम राणे यांच्या शेताजवळ मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली. मिळालेली माहिती अशी की, फैजपूर मार्गावर आदिवासी पावरा समाजाची छोटीशी वस्ती आहे वस्तीत एक ट्रॅक्टर उभे होते. ट्रॅक्टरजवळशिवलालसह वस्तीतील काही मुले खेळत होती....
  November 21, 12:58 PM
 • भुसावळ- महानिर्मितीच्या ३ x ६६० मेगावाट क्षमतेच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राची पर्यावरणीय पुढाकारासाठी ग्रीन पेटल-२०१८ या पुरस्कारासाठी ग्रीन मॅपल फाउंडेशनने निवड केली आहे. पर्यावरण संवर्धन विषयक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्याचे काम ग्रीन मॅपल फाउंडेशन करीत असते. २ डिसेंबर २०१८ रोजी या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणार आहे. महानिर्मितीने नागपुरातील भांडेवाडी येथे सांडपाण्यावर पुन:प्रक्रिया प्रकल्प उभारला असून प्रक्रिया केलेले पाणी वीज केंद्राला...
  November 21, 12:27 PM
 • नाशिक - येथील येवला-मनमाड महामार्गावर अनकाई बारी येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांमध्ये सगळेच अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी होते. घटनास्थळावरून आलेल्या छायाचित्रांवरून अपघात किती गंभीर होता हे दिसून येते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भल्या पहाटे हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनकाई बारी येथे येवला-मनमाड मार्गावर...
  November 21, 12:18 PM
 • जळगाव-जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम रथोत्सवात सहभागी झालेल्या भाविकांच्या खिशावर चोरट्यांनी डल्ला मारला. यात तब्बल २४ मोबाइल व चार पाकिटे, एक मंगळसूत्र आणि रोख ३० हजार रुपये ठेवलेली पर्स लंपास केली. १५० पोलिसांच्या बंदोबस्तातही चाेरट्यांनी सुमारे ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सोमवारी दुपारी १ वाजेपासून रथाचौकातून रथ सुरू झाला. यात लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हातसफाई केली. रथ आंबेडकरनगर, चौधरीवाडा, भोईटेगढी, तेलीगल्ली,...
  November 21, 12:10 PM
 • सिन्नर - पहाटे ४ च्या सुमारास पहिलवान रामदास (३९) फ्लाॅवरला पाणी भरण्यासाठी मळ्यात निघाले तेव्हा सुटीवर घरी अालेला सैन्यदलातील भाऊ विजय (३४) हाही मदतीला साेबत अाला. किर्रर्र अंधारात विजेरीच्या प्रकाशात त्यांचे काम सुरू झाले. १०० फुटांवर असलेल्या वाफ्याच्या टाेकाला पाणी पाेहाेचले की नाही हे पाहण्यासाठी गेलेल्या विजयने वाफा भरल्याचे सांगितले तसे रामदासने फावड्याने बारे देऊन पाणी वळवले अाणि जरा वेळ बसावे म्हणून ताे खाली टेकला ताेच.. पाठीमागून गुरगुर अावाज अाणि दंडावर जाेरकस फटका बसला....
  November 21, 10:15 AM
 • धुळे- भाजप महापालिका निवडणुकीचे सूत्र आपल्या हाती देत नसल्याच्या कारणावरून नाराज व पक्षाने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देऊ केल्याने बंडांचा झेंडा उगारणारे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी मंगळवारी नाट्यमयरीत्या नवीन पक्षाची घोषणा केली. शिवाय, या पक्षाकडून धुळे महापालिका निवडणुकीत सर्व ७४ जागांवर उमेदवार उभे करून भाजपलाच खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अाता ही निवडणूक चांगलीच चुरशीची हाेणार अाहे. धुलष महापालिकेची निवडणूक अामदार गाेटेंच्या नेतृत्वाखाली लढली जाईल,...
  November 21, 08:49 AM
 • मालेगाव-कंधाणे शिवारात बेशुद्धावस्थेत सापडलेल्या बिबट्यावर विषप्रयाेग करण्यात अाल्याचे तपासात उघड झाले अाहे. वासरू मारल्यानंतर त्याचे मांस खाण्यासाठी बिबट्या येणार हे जाणून त्यावर विष टाकून बिबट्याला ठार करणाऱ्या संशयितास वनविभागाने अटक केली अाहे. विक्रम रामदास थाेरेकर त्याचे नाव असून, त्याला ३० नाेव्हेंबरपर्यंत न्यायालयीन काेठडी ठाेठावली. धनदाईदेवी मंदिराजवळ नाल्यात शनिवारी मादी बिबट्या बेशुद्धावस्थेत अाढळली हाेती. वन कर्मचाऱ्यांनी नेट जाळीच्या सहाय्याने बिबट्याला...
  November 21, 08:32 AM
 • जळगाव शहरातून जाणाऱ्या सुरत-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे समांतर रस्ता कृती समितीने नरभक्षक महामार्ग असे नामकरण केले आहे. कृती समितीने गेल्या आठवडाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १०० दिवसांचे साखळी उपोषण सुरू केले आहे. यादरम्यान हे नामकरण करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला फलक लावण्यात आले आहेत. साडेपाच लाख जळगावकरांच्या जीविताशी संबंध असलेल्या या महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम तातडीने सुरू व्हावे म्हणून हे उपोषण सुरू आहे. शहरातील विविध ५४ संघटनांनी पाठिंबा दर्शवत...
  November 21, 06:25 AM
 • नाशिक- नाशिक महापालिकेच्या एका माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली असून फूटेज समोर आले आहेत. हातात धारदार शस्त्र घेतलेले तीन जण माजी नगरसेवक सुरेश दळोद यांच्यावर हल्ला करताना सीसीटीव्ह फूटेजमध्ये दिसत आहेत. या हल्ल्यात सुरेश दळोद गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या हल्ल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी तिन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे. हल्ला झाला तेव्हा सुरेश दळोद हे नाशिकमधील द्वारका...
  November 20, 07:30 PM
 • यावल- पत्नीला माहेराहून परत आणण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरा येथे गेलेला यावलच्या तरूणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले. संतोष सुरेश भोई (30) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो शनिवारी पत्नीला घेण्यासाठी सासरी गेला होता. परंतु पत्नीला न घेता तो रविवारी एकटाच नांदूर्याहून निघाला. परंतु दोन दिवस उलटले तरी तो घरी (यावल) पोहोचला नाही. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. पोलिसांत संतोष हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तपासादरम्यान सोमवारी सांयकाळी संतोषचा मृतदेह...
  November 20, 05:29 PM
 • जळगाव-शहरातील ममुराबाद नाका परिसरातील लेंडी नाल्यावरील १५ फूट उंच लोखंडी पुलावरून अंत्ययात्रा जात असताना अचानक हा पूल कोसळला. यात १३ नागरिक थेट नाल्यात पडल्याने जखमी झाले.सोमवारी दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली. खांद्यावरील मृतदेहसुद्धा या वेळी नाल्यात पडला. चिखलाने माखलेल्या नागरिकांनी शेजारील हातपंपावर अंघाेळ करून दफनविधी पार पाडला. शनिपेठेत राहणारे नारायण हरी घुगरे (५४) यांचे रविवारी निधन झाले. सोमवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा ममुराबाद नाक्यावरील लिंगायत गवळी समाजाच्या...
  November 20, 01:08 PM
 • धुळे-तालुक्यातील रावेर बारी येथे अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्यामुळे बेशुद्ध दुचाकीचालक व मृत असे दोघे ११ तास पडून होते. सोमवारी सकाळी गावकरी व पोलिस आल्यानंतर बेशुद्ध व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. मध्य प्रदेशातील सेंधव्यापासून जवळ असलेल्या असली या गावातील कादऱ्या गाेविंदा पावरा व समकाऱ्या गोट्या पावरा हे दोघे मोटारसायकलने शहरात आले होते. रावेर बारीजवळ असलेल्या एका स्ट्रोन क्रशरवर त्यांचा नातलग कामाला आहे. त्याची भेट घेतल्यानंतर रविवारी सायंकाळी दोघेही परतीच्या...
  November 20, 12:53 PM
 • धुळे -अाॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे इच्छुकांची प्रचंड तारांबळ उडाली. सर्व्हर डाऊनचा त्रास साेसावा लागला. साेमवारी अखेर या इच्छुक उमेदवारांच्या संतापाचा स्फाेट झाला. सगळ्याच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अायुक्त देशमुख यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर निवडणूक अायाेगाशी बाेलून अाॅफलाइन अर्ज देण्याचा ताेडगा काढण्यात अाला. यामुळे त्रस्त उमेदवारांना दिलासा मिळाला. साेमवारी दुपारपासून अाॅफलाइन अर्ज भरायला प्रारंभ करण्यात अाला. उद्या मंगळवारी उमेदवारी दाखल करण्याचा...
  November 20, 12:46 PM
 • जळगाव- जळगावचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त रथाेत्सव काढण्यात अाला. या उत्सवाला १४६ वर्षांची परंपरा अाहे. साेमवारी सकाळी ११ वाजेला श्रीरामांच्या रथाची विधिवत पूजा सुरू करण्यात आली. या वेळी नगारे, झांज, सनई, चौघडे व ढोल-ताशांच्या गजराने वातावरण भारावून गेले. रथावर लाकडी घोडे, सारथी म्हणून अर्जुन, गरुड, मारुतीची लाकडी मूर्ती, तसेच अप्पा महाराजांना मिळालेली प्रासादिक प्रभू श्रीरामांची उत्सवमूर्ती सजवून स्थापित करण्यात आली. त्यानंतर...
  November 20, 09:59 AM
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकारचा नारा देत सेनेच्या मावळ्यांसह अयोध्येकडे कूच करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. हवाई मार्गे तसेच उपलब्ध सोयी-सुविधांनुसार ज्यांना शक्य आहे ती मंडळी खासगी वाहनांनी प्रमुखांच्या मागे मागे प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीत टप्याटप्प्याने दाखल होणार आहेत. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून केवळ सभास्थानी जमलेल्या सैनिकांना इशारा करायचे शिल्लक राहिले आहे. अयोध्येतील या तालमीची खासी जबाबदारी यंदा नाशिककडे...
  November 20, 07:08 AM
 • बुलडाणा- डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आलेल्या एका ट्रकने अचानक पेट घेतला. आग एवढी झपाट्याने पसरली की ती विझवणे कोणालाही शक्य झाले नाही. ट्रक क्षणात जळून खाक झाला. ही घटना खामगाव तालुक्यात टेंभुर्णा गावाजवळील अग्रवाल पेट्रोल पंपावर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
  November 19, 09:24 PM
 • तळोदा- किराणा घेण्यासाठी गेलेल्या दोन मुलींची डुंगी अर्थात छोटी होडी सरदार सरोवराच्या पाण्यात उलटली. यात बारा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला तर एक मुलगी थोडक्यात बचावली. सपना वादऱ्या पावरा असे मृत मुलीचे नाव असून ती सावऱ्या दिगर येथील राहाणारी होती. सावर्या दिगर या गावाला रस्ता नसल्याने साधा किराणा घेण्यासाठी या भागातील लोकांना डुंगीचा वापर करावा लागतो. अशातच डुंगी उलटून झालेल्या अपघातात सपनाचा बुडून मृत्यू झाला. अन्य एका मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात गावकर्यांना यश मिळाले...
  November 19, 05:34 PM
 
जाहिरात

RECOMMENDED