Home >> Maharashtra >> North Maharashtra

North Maharashtra News

 • जळगाव - औद्योगिक वसाहत परिसरातील रासायनिक द्रव्यमिश्रीत दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्यामुळे रामेश्वर कॉलनी वासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रामेश्वर कॉलनीत सोडले जाणारे दुर्गंधीयुक्त पाणी बंद न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे. रामेश्वर कॉलनी परिसरात एमआयडीसीतील अनेक कारखान्यांचे दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्याबाबत मनसेने महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्चाची दखल घेवून महापालिकेने 1 जून रोजी प्रदुषण नियंत्रण...
  June 20, 04:05 PM
 • जामनेर - गेल्या हंगामात देशात झालेले लक्षणीय कापूस उत्पादन व येत्या हंगामासाठी कापूस लागवडीत 40 टक्के झालेली वाढ पहाता कापूसगाठी निर्यातीचा कोटा पुन्हा वाढविण्याचा विचार केंद्र सरकार करू शकते असे संकेत केंद्रीय कृषीमंत्री ना.शरद पवार यांनी दिले आहेत. कापूसगाठी निर्यातीस लवकर मंजूरी मिळाल्यास जवळपास 30 टक्के शेतकर्यांच्या घरात पडलेल्या कापसाला पुन्हा चांगला भाव मिळण्याची शक्यता वाटू लागली आहे.
  June 20, 04:00 PM
 • नव्याने या पदावर विराजमान होणा-या टिळे यांना सुद्धा आता गटबाजीचा सामना अपरिहार्यपणे करावा लागणार, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. वास्तविक पाहता, अन्य प्रतिस्पर्धी महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीस लागले असताना सत्ताधारी शिवसेना मात्र अजून चाचपडतच असल्याचे हे निदर्शक म्हणावे लागेल. मनसेमुळे शिवसेनेची नाशिकमध्ये मोठी पिछेहाट सुरु आहे. शहरातली एक नव्हे तर तीन आमदारपदे पटकावून मनसेने त्याची चुणूकही दाखविली आहे. अशास्थितीत महानगरप्रमुखपदाचा खांदेपालट करुन शिवसेना...
  June 20, 03:38 AM
 • अकोला: पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याने अकोला महापालिकेतील कर्मचा-यांनी गेल्या नऊ दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे शहराला अक्षरश: गटाराचे स्वरूप आले आहे. शहराला निर्जळीलाही तोंड द्यावे लागत आहे. कर्मचा-यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचाच प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. १ आॅक्टोबर २००१ रोजी...
  June 20, 01:48 AM
 • नाशिक: मुलीच्या सासरच्या मंडळीला धडा शिकविण्यासाठी आईने पोलिस ठाण्याच्या आवारात पेटवून दिलेल्या कविता टाकचा रविवारी अखेर मृत्यू झाला. या प्रकरणी कविताच्या आई संगीता चावरिया हिच्याविरोधात खुनाचा गुन्हा भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. कविताचे (वय २२) दुपारी उपचारादरम्यानच निधन झाले. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास कविताने पतीसोबत भांडण झाल्याचा राग आल्याने स्वत:च्या अंगावर घासलेट ओतून घेतले. औरंगाबादहून आलेली तिची आई सौ. चावरिया या वेळी कविताच्या घरीच होत्या. त्यांनी...
  June 20, 01:29 AM
 • जळगाव - खादगाव तालुक्यातील मनावा या गावातील तरुण राहुल भाऊराव सोनाळे यास आमदारांना धमकीचा एसएमएस पाठविल्याप्रकरणी हिंगोली पोलिसांनी अटक केली आहे.जळगाव जिल्ह्यातील आमदारा राजीव देशमुख व आमदारा जगदीश वळवी यांना धमकी देवून पैशांची मागणी करणारा एसएमएस राहुल भाऊराव सोनाळे याने केला होता. सोनाळे याने राज्यातील सुमारे सहा आमदारांना अशा प्रकारचे एसएमएस पाठविल्याचे निष्पन्न झाले आहे.त्याच्याकडे राज्यातील 156 आमदारांची यादी देखील आहे.हिंगोलीतील आमदार भाऊराव पाटील यांनाही अशीच धमकी...
  June 19, 04:32 PM
 • नाशिक - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गंत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यासाठी ७ लाख ३० हजार ७६९ कि. तर इयत्ता ६ वी ते ८ वी ६ लाख १७ हजार ६१३ कि. तांदळाचा पुरवठा करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय अन्नधान्य उपभोक्ता विभागाकडे नोंदविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
  June 19, 04:14 PM
 • नाशिक - जुलै महिन्यापासून जिल्हा पुरवठा विभागाचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. यासाठी शासनाचा एक रुपयाही न घेता जिल्हा पुरवठा विभागाने सॉफ्टवेअर तयार करून स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू झाले असून पुढच्या महिन्यात पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.
  June 19, 04:12 PM
 • नाशिक - देशाबाहेरील काही बौद्ध धर्मगुरू धम्मप्रसाराऐवजी विनाकारण राजकारण करीत असून, ते बौद्ध धम्मापेक्षा स्वत:चाच अधिक विचार करतात. उच्चनीचतेच्या माध्यमातून ते धम्मात फूट पाडत आहेत, असा आरोप बुद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय मुख्य महासचिव भदन्त प्रज्ञाशील यांनी सातव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत केला.दादासाहेब गायकवाड सभागृहातील या परिषदेला महापौर नयना घोलप, भदन्त आनंद बोधी, विश्वास देवकर, माजी न्यायाधीश एन. जी. घोटेकर, स्थायी समितीचे माजी सभापती...
  June 19, 05:43 AM
 • नाशिक: सासरच्या छळाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून घेत पोलिस ठाणे गाठणा-या विवाहितेस सासरच्या लोकांनी नव्हे, तर आईनेच पेटवून दिल्याचा प्रकार शनिवारी दुपारी उघडकीस आला. कविताला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 70 टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे.या प्रकरणी पोलिसांनी औरंगाबादच्या संगीता चावरियाला ताब्यात घेतले आहे.जुन्या नाशकातील महालक्ष्मी चाळीत राहणाया सौ. कविता सिद्धराम टाक या विवाहितेने पतीकडून वारंवार छळ होत असल्याचे सांगत आई सौ. संगीता चावरिया यांना औरंगाबादहून...
  June 19, 05:37 AM
 • नाशिक: पंचवटीतील सप्तशृंगी अपार्टमेंटची इमारत गेल्या आठवड्यात फटाक्यांच्या शक्तिशाली स्फोटाने खिळखिळी झाली. त्यामुळे या इमारतीतील १२ रहिवाशांची तात्पुरती निवासव्यवस्था मेरीच्या सदनिकांमध्ये करण्यात आली आहे. मात्र, तेथील प्रशासनानेही या रहिवाशांना २४ जूनपर्यंत जागा रिकामी करण्याचे आदेश बजावले आहेत. अशा परिस्थितीत रहिवाशांनी थेट जिल्हाधिकायांना साकडे घालून आमच्या निवासाचा प्रश्न काही काळापुरता तरी सोडवावा, अशी मागणी केली. या प्रकरणात लक्ष घालून अखेर जिल्हाधिकायांनी आणखी चार...
  June 19, 02:09 AM
 • शहादा : गांडूळ खत प्रकरणात ९७ लाखांच्या घोटाळयाप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील शहादा पालिकेच्या २५ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले असून, त्यांना पुढील पाच वर्षासाठी कुठलीही निवडणुक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. २६ पैकी २५ नगरसेवकांवर कारवाई झाल्याने ही पालिकाच बरखास्त झाली आहे. शहादा पालिकेतील २००५ पासून गांडूळ खत घोटाळ्याचे प्रकरण राज्यभर गाजले होते. तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च करुन तयार होणाया गांडूळ खत प्रकरणात अगदी सुरुवातीपासूनच भष्टाचाराला सुरुवात झाली होती. तत्कालीन...
  June 19, 01:49 AM
 • जळगाव: शहरातील नटराज थिएटर येथे येत्या 23 ते 26 जून दरम्यान किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष अशोक जैन व सचिव राजेंद्र नन्नवरे यांनी दिली.महोत्सवाचे उद्घाटन वन अभ्यासक किरण पुरंदरे यांच्या हस्ते होणार आहे. मंतरलेली वाट या कार्यक्रमाने महोत्सवाला सुरुवात होणार असून या महोत्सवादरम्यान पर्यावरणावर आधारीत 25 माहितीपट सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमातंर्गत सतीश पाटील यांनी वसुंधरा सन्मान तर गणेश सोनार, पी. आर. परदेशी व अनिल...
  June 18, 11:57 PM
 • नाशिक - ही धक्कादायक घटना घडली आहे नाशिकच्या भद्रकाली पोलिस स्टेशन परिसरात. भद्रकाली पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महालक्ष्मी चाळ परिसरात राहणाऱया कविता टाक (२२) या विवाहितेला तिची आई संगिता चावरिया (रा.औरंगाबाद) हिने पेटवून दिले. यात कविता भाजली असून, तिला उपचारांसाठी शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. कविताला तिच्या सासरचे लोक त्रास देताहेत. ते तिचा छळ करतात असे भासविण्यासाठी कविताने शनिवारी अंगावर रॉकेल ओतून पोलिस स्टेशनात धाव घेतली. त्याचवेळी तिच्या आईने तिच्या...
  June 18, 04:50 PM
 • जळवाग - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा ८६.३७ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातून परीक्षेला बसलेल्या ५४ हजार ६२३ विद्यार्थ्यांपैकी ४७ हजार १७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. येथील आर. आर. विद्यालयाचा सोमेश रवींद्र चौधरी व गितांजली नरेंद्र अत्तरदे यांनी प्रत्येकी ९६.९१ टक्के गुण मिळविले.नाशिक विभागाचा निकाल ८२.६९ टक्के लागला आहे. जळगाव जिल्ह्यातून ४७ हजार १७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात २० हजार ९९५...
  June 18, 11:48 AM
 • पाचोरा: पांडववाड्यातील सहावीची विद्यार्थिनी मयूरी वसंत पाटील हिने शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमाराला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयूरीची आई तिच्या लहान भावाला शिकवणीसाठी घेऊन गेली होती. बीएसएफ जवान वसंत पाटील यांची मुलगी असलेली मयूरी प्रवरानगरात शिकत होती.
  June 18, 02:29 AM
 • पाचोरा: पांडववाड्यातील सहावीची विद्यार्थिनी मयूरी वसंत पाटील हिने शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमाराला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयूरीची आई तिच्या लहान भावाला शिकवणीसाठी घेऊन गेली होती. बीएसएफ जवान वसंत पाटील यांची मुलगी असलेली मयूरी प्रवरानगरात शिकत होती.
  June 18, 02:13 AM
 • धुळे: येथील महानगरपालिकेच्या वसुली विभागाला गुरुवारी मध्यरात्रीनंतर आग लागून अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे खाक झाली आहेत. सध्या पालिकेचा वसुली विभाग एका शाळेच्या परिसरात आहे. प्रवेशद्वार अरुंद असल्याने अग्निशामक दलाचा बंब आत जाऊ शकत नव्हता. अखेर जेसीबीने दरवाजा तोडून आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीचे कारण स्पष्ट झाले नसून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.
  June 18, 01:54 AM
 • नाशिक: महापालिका आयुक्तपदाच्या नाट्यावर अद्यापही पडदा पडलेला नसल्याने प्रशासनाची चांगलीच कोंडी होत आहे. कॅटने बी. डी. सानप यांच्या बदलीला स्थगिती दिली, तरीही जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी शुक्रवारी पालिकेचे उपायुक्त आणि आरोग्य अधिकायांना फर्मान धाडून बैठकीला बोलावून घेतले. त्यामुळे ऐकावे कोणाचे? असा पेच कर्मचारी-अधिकायांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा फैसला आता २० जूनला होणार असल्याचे कॅटने जाहीर केले आहे. महापालिकेचे आयुक्त बी. डी. सानप यांची शासनाने बदली केल्यानंतर...
  June 18, 01:41 AM
 • नाशिक: क्षयरोग (टीबी) असलेल्या रुग्णांसाठी एक चांगली बातमी आहे. या आजारावर आणखी प्रभावी उपचार करणारी डॉट प्लस उपचार पद्धती विकसित झाली असून, राज्यात नागपूर, औरंगाबाद, पुणे, अमरावती व मुंबई या विभागात ही उपचार पद्धती कार्यान्वित करण्यात आली आहेसध्या नाशिक जिल्हय़ात क्षयरोगाचे 1680 रुग्ण आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हय़ात सूक्ष्मदर्शक केंद्रे आहेत, तर अकरा ठिकाणी क्षयरोग उपचार पथके कार्यान्वित आहेत. यापूर्वी या आजाराचे निदान एक्स-रे काढून केले जायचे, परंतु त्यात शंभर टक्के योग्य...
  June 17, 05:37 AM
 
जाहिरात

RECOMMENDED