Home >> Maharashtra >> North Maharashtra

North Maharashtra News

 • धानोरा- बर्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावरील धानोर्याजवळ सोमवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटून अपघात झाला. या अपघात दोन जण जखमी झाले. ट्रकचे स्टेअरींग जाम झाल्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. अपघातात गाजन सिंग (चालक) आणि सूरज सिंग (क्लिनर) हे दोघे किरकोळ जखमी झशले. यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने मोठी हानी टळली.. ट्रकचे स्टेअरिंग जाम झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्या ट्रक...
  November 5, 07:43 PM
 • यावल- तालुक्यातील दुसखेडा येथे सार्वजनिक नळाचे पाणी भरताना तोल जावून इलेक्ट्रिक मोटरवर पडल्याने एका 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आकाश राजेंद्र धायडे, असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. दिवाळीच्या तोंडावर गावात शॉक लागूनतरुणाला मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुसखेडा येथे सार्वजनिक नळाला पाणी आले होते. आकाश हा...
  November 5, 06:53 PM
 • नाशिक- महिला व बालविकास विभागाच्या मान्यतेने काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी राज्यात अनुदान तत्वावर स्वयंसेवी संस्थांची हजारावर बालगृहे आहेत. मात्र चार वर्षापासून बाल कल्याण समित्यांनी प्रवेश प्रक्रीया खडतर केल्याने सुमारे साठ हजार मुलामुलींची दिवाळी सलग चौथ्या वर्षीही अंधारात जात अाहे. या बालकांचे संगोपन करणाऱ्या संस्थांचे अनुदान रखडल्याने ते कर्जबाजारी झाले असून त्यांचंही दिवाळं निघाल्याचे विदारक चित्र अाहे. सन २०१५-१६ पर्यंत राज्यातील बालगृहात सत्तर हजार...
  November 5, 11:54 AM
 • जळगाव- एटीएम केंद्रात वृद्धाचे लक्ष विचलित करून त्याचे एटीएम कार्ड अदलाबदली करून भामट्यांनी नंतर चार दिवसांत वृद्धाच्या खात्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसे काढले, सोने खरेदी केले, गाडीत पेट्रोल भरले. यात वृद्धाची भामट्यांनी चक्क पाच लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. खरेदी केल्याचा संदेश (मेसेज) वृद्धाच्या मोबाइलवर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रविवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद दामोदर खडके (वय ६०, रा. श्री प्लाझा, लीला पार्क) यांची...
  November 5, 11:46 AM
 • भुसावळ-ऐन सण उत्सवाच्या काळात महानिर्मितीच्या केंद्रांतून होणाऱ्या वीजनिर्मितीमध्ये तब्बल अडीच हजार मेगावॅटने घट झाली आहे. राज्य विज नियामक आयोगाने मेरिट ऑर्डर डिस्पॅच अर्थात एमओडीची (प्रथम मागणी करणाऱ्यांना वितरण) संकल्पना मांडल्याने आता महानिर्मितीच्या वीजनिर्मिती केंद्रांना घरघर लागली आहे. कोळशाच्या वाहतुकीचे दर वाढल्याने राज्यातील नाशिक, परळी, पारस आणि भुसावळ या कोळसा खाणींपासून दूर अंतरावर असलेल्या वीजनिर्मिती केंद्रांचे भवितव्य धोक्यात आहे. नवरात्रोत्सवाच्या...
  November 5, 11:40 AM
 • नाशिक-शिर्डी -श्री साईबाबांच्या समाधीवर अर्पण झालेल्या फूल, पुष्पहारातील साेनचाफ्याच्या फुलांचा अर्क काढून त्यातून निर्मित सुगंधी तेलाचा वापर करून यंदा साई मंदिर परिसरात हजारो पणत्या यंदा झगमगणार अाहेत. साईबाबा समाधी शताब्दी वर्षाची नुकतीच सांगता झाली. या महत्त्वपूर्ण वर्षात जनसेवा फाउंडेशन अाणि मंदिर विश्वस्त मंडळाने करार करून साई समाधीवर अर्पण हाेणाऱ्या फूल, पुष्पहार यांच्यावर प्रक्रिया करून अगरबत्ती बनवणे सुरू केले. गुलाब, झेंडू अाणि साेनचाफ्याची फुले यांचा समाधीवर अर्पण...
  November 5, 08:48 AM
 • नाशिक-आई -वडिलांवर नाराज झालेल्या कोलकात्यातील १५ आणि १३ वर्षाच्या दोन मुली घर सोडण्याचा विचार करतात.. अशा नैराश्याच्या वेळेत एकीचा फेसबुक मित्र तिच्याशी आपुलकीने बोलतो.. दोघींना मुंबईत पळून येण्याचे निमंत्रण देतो... जन्मदात्यांचा विचार न करता अनोळखी मित्राच्या एका शब्दावर दोघी घर सोडतात आणि मुंबईची रेल्वे वाट धरतात... सुदैवाने इगतपुरी स्टेशनवर पोलिसांची नजर दोघींवर पडते आणि चाईल्ड लाईनच्या सहकार्याने मुलींच्या पालकांशी संपर्क साधत गाठभेट घालून दिली. दहावीत असलेल्या १५ वर्षाच्या...
  November 5, 08:07 AM
 • अमळणेर - येथील प्रताप महाविद्यालयातील भरती प्रकरणी अटींच्या आधारावर बिंदू नामावलीची नोंद करून मंजुरी देण्यात आली. परंतु, या अटींचा भंग केल्याची तक्रार शुभांगी डीगंबर चव्हाण यांनी मागासवर्गीय कक्ष नाशिक यांच्याकडे केली आहे. येथील प्रताप महाविद्यालयात 2016 मध्ये सहाय्यक प्राध्यापकाच्या 15 पैकी 5 पदांवर महिला भरणे गरजेचे होते. परंतु, असे न करता आपल्या मर्जीतील पुरुष उमेदवारांची भरती करण्यात आली. तसेच 122 पदांची मंजुरी मागासवर्गीय कक्ष नाशिक यांनी दिलेली आहे. आरक्षणाप्रमाणे 122 पैकी 89 पदे...
  November 4, 07:22 PM
 • धुळे-करवतीने फाउंडेशन कापून चाेरट्यांनी २३ लाखांच्या रकमेसह चक्क एटीएम मशीनच चाेरून नेले. भररस्त्यावरील अायसीअायसीअाय बंॅकेला यामुळे जबर झटका बसला. रामवाडीतील भररस्त्यावरील एटीएम सेंटरमधून पैशांसह यंत्रच चाेरीला गेल्याने खळबळ उडाली अाहे. या बंॅकेच्या सीसीटीव्हीची यंत्रणा थेट मुंबईत जाेडली अाहे. त्यामुळे चाेरट्यांनी नेमके काय केले, हे कळायला पाेलिसांना मार्गच उरला नाही. श्वान पथकालाही बाेलावण्यात अाल. तिथे सापडलेल्या रुमालसह करवत श्वानाला हुंगवण्यात अाली. मात्र त्याचाही...
  November 4, 11:47 AM
 • पिंपळगाव (जि. नाशिक)-पिंपळगाव बसवंत भागात चार वर्षांमध्ये सरकारने चांगली कामे केली अाहेत. राज्यभरात सरकारने केलेल्या चांगल्या कामांमध्ये मी कधीच त्रुटी काढल्या नाहीत. चांगल्याला चांगलेच म्हटलाे अाहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नातून साकारल्या जाणाऱ्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने ते बोलत होते. पिंपळगाव बसवंत येथील पिंपळगाव हायस्कूलच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. तत्पूर्वी भारतरत्न डॉ....
  November 4, 10:17 AM
 • जळगाव - दुष्काळाचे सावट असूनही यंदा जळगावकरांनी खरेदीचा मुहूर्त साधत वाहने खरेदीचा धडाका लावला अाहे. पेट्राेलच्या दरात महिनाभरात सात रुपयांची वाढ झाली असली तरी धनत्रयाेदशीच्या मुहूर्तसाठी जळगाव शहरात ५५० चारचाकी व ७०० ते १००० दुचाकींची बुकींग झाली अाहे. गणेशाेत्सव, नवरात्राेत्सवानंतर अाॅटाेमाेबाइल मार्केटमध्ये दिवाळी हा शेवटचा सिजन असल्याने कंपन्यांसह विक्रेत्यांनी मार्केटमध्ये नव-नव्या अाॅफर्सची उधळण केली अाहे. कॅश डिस्काउंट, फ्री इन्शुरन्ससह दिवाळी गिफ्टची धूम असल्याने...
  November 3, 09:32 AM
 • नाशिक - दिवाळीच्या गोडवा फराळाच्या विविध पदार्थांच्या माध्यमातून अधिकच वाढत असताे. दीपाेत्सवात या बचतगटांकडून तयार फराळाची विक्री केली जाते. या बचतगटांना मदत व्हावी यासाठी एस.टी.च्या वतीने दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान योजनेच्या माध्यमातून बसस्थानक परिसरात फराळ विक्रीसाठी केवळ एक रुपयांत जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या पुढाकारातूनही ही योजना राबविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकीचे भान राखत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये एसटी महामंडळाच्या वतीने...
  November 3, 09:26 AM
 • यावल- ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारीच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून शहर शिवसेनेने शुक्रवारी आंदोलन केले. राज्यात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खाते शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेलाच हा घरचा आहेर असल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. ग्रामीण रूग्णालयात कायम वैद्यकिय अधिकारी मिळावा, यासाठी शिवसेनेकडून निवेदन देवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मंत्री आपल्या पक्षाचा, पण तालुका कार्यकर्त्यांचे काही चालेना!, अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. दरम्यान, ग्रामीण...
  November 2, 07:57 PM
 • जळगाव - महापालिका अायुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर चंद्रकांत डांगे यांनी गाळेकारवाईची घाेषणा केली हाेती. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी पुन्हा अायुक्तांनी दिवाळीनंतर गाळे जप्तीचे संकेत दिले अाहेत. यासंदर्भात दिवाळीची गजबज असताना अायुक्तांनी थेट फुले मार्केटची पाहणी करून वस्तुस्थिती तपासून पाहिली. याशिवाय नुकत्याच झालेल्या महासभेतील गाळेसंदर्भातील समिती गठित करण्याचा ठराव विखंडनासाठी पाठवणार असल्याचे स्पष्ट केले. मार्केटमधील अधिकाऱ्यांचा ताफा पाहून गाळेधारक व हाॅकर्सची...
  November 2, 11:51 AM
 • जळगाव - चारचाकीत गॅस भरण्यासाठी थांबवलेल्या तरुणाच्या चारचाकीतून एक मिनीटात ६० हजार रुपये लांबवल्याची घटना गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी येथील पेट्रोलपंपावर घडली. सुट-बूट घातलेल्या चोरट्याने पाळत ठेऊन हातसफाई केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाेपडा तालुक्यातील खेडी-भाेकरी येथील रणछोड सुभाष पाटील (वय ३६) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. पाटील यांचा ठिबक नळ्या विक्रीचा व्यवसाय आहे. ते नळ्यांची ने-आण करण्यासाठी चारचाकीचा वापर...
  November 2, 11:48 AM
 • नाशिक - एकीकडे महापालिकेची अार्थिक परिस्थिती नाजूक अाहे, नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांसाठी निधी नसल्याचे चित्र असताना २०१६ मध्ये बहुचर्चित ठरलेल्या सर्व्हे क्रमांक ७०५ मधील प्रसाद मंगल कार्यालयाशेजारील क्रीडांगणासाठी अारक्षित जमिनीचे संपादन करण्यासाठी शिल्लक निवाडा रकमेतील राेख २१ काेटी रुपये देण्याच्या प्रकारावर सत्ताधारी भाजपने लेखी पत्राद्वारे अाक्षेप घेत संशय व्यक्त केला अाहे. अार्थिक खडखडाटामुळे टीडीअारद्वारे जमीन संपादन का झाले नाही, दाेन वर्षांनंतर अचानक घाईत ही...
  November 2, 11:18 AM
 • नाशिक - शहरातील ५७५ धार्मिकस्थळे हटविण्याच्या कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती देताना चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण, त्यानंतर अनधिकृत ठरलेल्या धार्मिकस्थळांबाबत हरकती व सूचना मागवण्याची प्रक्रियाही सदाेष झाल्याची फटकारणी केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केला. ५७५ धार्मिकस्थळांचे फेरसर्वेक्षण करून त्यानंतर नियमितीकरणासाठी हरकती व सूचना मागवण्याचे अादेशही न्यायालयाने दिल्याची माहिती याचिकाकर्ते विनाेद थाेरात व सहकाऱ्यांनी दिली. पालिका क्षेत्रातील...
  November 2, 11:06 AM
 • धुळे - शहरापासून जवळ असलेल्या हिरे रुग्णालयात वयोवृद्ध आईला उपचारासाठी दाखल केल्यानंतर मुलाने काढता पाय घेतला. अखेरच्या क्षणीही या वृद्धेजवळ त्यांचा मुलगा व इतर नातलग आले नाहीत. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हिरे रुग्णालयात दहा दिवसांपूर्वी सुमनबाई रामदास पाटील या ७२ वर्षीय वृद्ध महिलेला दाखल करण्यात आले. आजाराने त्यांची प्रकृती खालावली होती. या वेळी संबंधित तरुणाने आपण सुमनबाई यांचा मुलगा असल्याचे सांगितले होते. सुमनबाई यांना रुग्णालयात दाखल करताच तो वॉर्डातून बाहेर पडला....
  November 2, 10:20 AM
 • यावल- जळगाव येथे वैद्यकिय तपासणीदरम्यान पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झालेल्या आरोपीला अखेर १० दिवसांनी यावल पोलिसांनी सोलापुरात बेड्या ठोकल्या. आरोपीचे नाव मुकूंद विलास सपकाळे (वय-२२, रा.वड्री) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारासह अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या गुन्ह्यात त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. वैद्यकिय तपासणी वेळी तो २३ ऑक्टोबरला फरार झाला होता. पोलिसांनी त्याला सोलापूरात अटक केली आहे. यावल तालुक्यातील वड्री...
  November 1, 07:11 PM
 • मुंबई- धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ डिसेंबर रोजी मतदान होईल; तर १० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. या दोन्ही मनपांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी गुरुवारी दिली. सहारिया यांनी सांगितले की, धुळे मनपातील १९ प्रभागांतील ७४ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३७ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ६, अनुसूचित जमातीसाठी ५, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २० जागा राखीव आहेत....
  November 1, 06:33 PM
 
जाहिरात

RECOMMENDED