जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra

North Maharashtra News

 • नाशिक- डोंगराच्या माथ्यावर घनदाट जंगलात ७० ते ७५ चुलींचे गाव... पावसाळ्यात चारही महिने संततधार.. तांदूळ, वरई व नागली हे प्रमुख पीक... एकदा पावसाळा संपला की शेतीसाठी सोडाच, पण दिवाळीपासून ते जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याचीही भ्रांत... हे दरवर्षीचेच चित्र पण यंदाची दाहकता अतिभीषणच. थेंबभर पाण्यासाठी येथील महिलांना रात्रभर जागे राहावे लागते. सकाळी ९ ते १० वाजता नंबर लावला की थेट मध्यरात्रीच पाणी मिळते. पेन्सिलीऐवजी लहान मुलं हातात टेंभा धरतात अन् त्या उजेडात आई-वडील पाणी भरतात. साधा हंडा भरायला...
  May 5, 10:24 AM
 • नाशिक- शहरापासून सुमारे १०० किमी अंतरावर घनदाट जंगलातील म्हैसमाळ गावात ८० आदिवासी कुटुंबे राहतात. गावात पाण्याचे स्रोत नाहीत. एक किलोमीटर अंतरावर एक विहीर आहे. ती आता कोरडी पडली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांनी ही विहीर आणखी ६ फूट खोदली आहे. तेथील झऱ्यातून हळूहळू पाणी येते. एक घागर भरण्यासाठी एक तास लागतो. त्यामुळे येथे ग्रामस्थांना नंबर लावावा लागतो. ज्याचा नंबर येतो त्याला दोन घागरी पाणी मिळते. दिवस-रात्र पाणी भरण्याचे काम चालते. येथे पाणी भरण्यासाठी आलेल्या निर्मला यांनी सांगितले,...
  May 5, 08:30 AM
 • चांदवड - तालुक्यातील मत्तेवाडी शिवारातील वन विभागाच्या हद्दीत पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांवर सुमारे १०० ते १५० आदिवासींच्या जमावाने गोफण, गलोलचा वापर करत व दगडफेक करून केलेल्या हल्ल्यात ११ ग्रामस्थ जखमी झाले. या वेळी आदिवासींच्या जमावाने सात दुचाकी पेटवून दिल्या. दोन दुचाकी व पोकलेनची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. आदिवासींच्या ताब्यातील वन जमिनीत पाणी फाउंडेशनचे हे काम सुरू हाेते. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव...
  May 4, 08:42 AM
 • मनमाड- नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये पानी पाउंडेशनतर्फे श्रमदान करणाऱ्यांवर आदिवासी जमावाने हल्ला चढवला आहे. हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत, त्यांना चांदवडच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आदिवाशांनी हल्ल्यासोबतच गावकऱ्यांच्या गाड्याही जाळल्या आहेत. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी चांदवडमध्ये पानी फाउंडेशनचे श्रमदान सुरू होते. पानी फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत चांदवड तालुक्यातील 72 गावांचा सहभाग आहे. त्यासाठी आज मतेवाडीमधील गावकऱ्यांनी डोंगरउतारावर चर खोदण्याचे...
  May 3, 03:02 PM
 • यावल - तालुक्यातील कुंड्यापाणी येथील लग्नाचे मूळ घेऊन परतणाऱ्या वऱ्हाडी मंडळीच्या वाहनाला अपघात झाला. वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या कठड्यावर जाऊन चढले. बुधवारी संध्याकाळी झालेल्या या अपघातात सहा आदिवासी गंभीर जखमी झाले आहेत. यावल तालुक्यातील नावरे फाट्यावर ही घडली. सर्वच जखमी भातखेडा तालुका रावेर येथील रहीवाशी आहेत. रावेर येथील आदिवासी तडवी समाजाचे लग्नानंतरचे मूळ घेण्यासाठी वऱ्हाडी मंडळी कुंड्यापाणी येथून गेली होती. संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास एमएच 12 सीएच 4767 या...
  May 2, 09:48 AM
 • नंदुरबार - अन्नपदार्थ थोडा तिखट झाला तर दोन्ही डोळ्यांतून पाणी येते. मिरच्या चिरल्यानंतर हाताची आग कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. मात्र, मिरचीच्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या सुनीता, रूपाली आणि त्यांच्यासारख्या १० हजार महिला दिवसभर मिरच्यांमध्ये बसून राहतात आणि हाताने मिरच्या ताेडल्यानंतही त्यांना त्रास हाेत नाही. ४५ अंश तापमानात या सर्व तिखट मिरच्यांमध्ये राहतात. सर्व कामगार केवळ महिला असलेले असे अनेक कारखाने महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात आहेत. शुद्धतेसाठी...
  May 1, 10:15 AM
 • नाशिक -नाशिक मतदारसंघात यंदाही लोकांना मतदार यादीतील घोळाला सामोरे जावे लागले. याचा फटका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनाही बसला. मतदान केंद्रावर प्रचंड शोधाशोध करूनही भुजबळांचे नाव यादीत सापडत नव्हते. अखेरीस महत्प्रयासाने त्यांच्या पत्नी मीनाताई यांचे नाव सापडले आणि त्यावरुन छगन भुजबळांच्याही नावाचा शोध लागला. या वेळी अनेकांनीही याद्यांमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी भुजबळ यांच्याकडे व्यक्त केल्या. दरम्यान, येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ...
  April 30, 09:53 AM
 • नवापूर -देशविदेशात सीमांवरून अनेक वाद होतात. परंतु महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील नवापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गुजराती आणि मराठी भाषिक मतदार एकत्रित होऊन मतदान करतात. शाळेवरील हे मतदान केंद्र महाराष्ट्राच्या सीमेत आहे. परंतु, शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर गुजरात राज्याची सीमा लागते. सोमवारी या ठिकाणी लोकसभेचे मतदान पार पडले. परंतु, तापमान जास्त असल्याने मतदारांनी सायंकाळच्या वेळेत गर्दी केली. त्यामुळे त्यांची रांग थेट प्रवेशद्वाराबाहेर गेली. या मतदान केंद्राची...
  April 30, 09:13 AM
 • नवापूर - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशासह राज्यात सुद्धा मतदान सुरू आहे. जास्तीत-जास्त लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. अशात नंदुरबार जिल्ह्यात एक अभिनव प्रयोग दिसून आला. जो मतदान करणार नाही त्याची दाढी कटिंग करणार नाही असा संकल्प नवापूर येथील एका हेअर कटिंग सलून संचालकाने घेतला आहे. लोकांना मतदानाचे महत्व कळायला हवे आणि मतदानाचा टक्का वाढावा हा यामागचा हेतू आहे. मतदारांना 50 टक्के डिस्काउंट नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील डॉ. बाबा...
  April 29, 12:02 PM
 • नंदुरबार- महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील सापुतारा येथे एका वळणावर खासगी बस अनियंत्रित झाल्याने बस घाटात पडताना थोडक्यात बचावली आहे. बस दरीच्या वरच्याच बाजुला थांबल्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली आहे. या अपघातात 12 जण जखमी झाले आहेत पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. बस सुरतवरून सापुतारा येथे जात असतांना अपघात घडला आहे. बस चालकाचे बसवरील निंयत्रण सुटल्याने बस दरीत पडली, पण ती खाली न जाता वरच अडून बसली त्यामुळे या अपघातात कुठल्याही प्रकाराची जीवितहानी झालेली...
  April 28, 04:01 PM
 • ग्राउंड रिपोर्ट- नंदुरबार लोकसभा मतदारसंघात फिरलात तर कुठेही निवडणुकीचे वातावरण दिसत नाही. नेत्यांच्या सभा, रॅली एवढ्यापुरताच प्रचार दिसतो. यंदा प्रथमच गांधी, नेहरू घराण्यातील व्यक्तीची इथे सभा झाली नाही. भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावितांसाठी मोदींनी सभा घेतली. गत निवडणुकीत मोदी लाटेवर आदिवासीही स्वार झाले होते. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळे भाजपला २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळाला होता. डॉ....
  April 26, 09:09 AM
 • यावल - निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्याला चक्कर येऊन पडल्याने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पंकज गोपाळ चोपडे वय 35 रा. न्हावी ता. यावल असे या कर्मचाऱ्याचे नाव असून सोमवारी भुसावळ येथे तहसिल कार्यालयात त्यांना भुरळ आली होती. ते जमिनीवर कोसळला होते तर मंगळवारी मध्यरात्री त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे न्हावी ता. यावल येथील रहिवासी पंकज गोपाळ चोपडे वय 35 हे जे.टि. महाजन पॉलीटेक्निक महाविद्यालयात लिपिक पदावर कामाला होते. त्यांची भुसावळ येथे...
  April 24, 02:15 PM
 • मुक्ताईनगर -माझ्यावर नुकतीच एक मोठी शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये २० दिवस उपचार घेत होतो. डाॅक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने रक्षा खडसे यांची उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी उपस्थित राहता आले नाही. आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलो असून २४ किंवा २५ एप्रिलला पुन्हा रुग्णालयात दाखल होणार आहे. यामुळे पुढील टप्प्यातील प्रचारात सहभागी होता येणार नाही, असे भाजपचे स्टार प्रचारक एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. अमळनेर मारामारीप्रकरणी कारवाई होईल...
  April 24, 10:30 AM
 • भाजप जिल्हाध्यक्षांनी त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदाराला मंत्र्यांसमोर बदडल्यामुळे या निवडणुकीच्या रणधुमाळीत उत्तर महाराष्ट्र चर्चेत आला, या निवडणुकीत भाजपला पक्षांतर्गत बंडखोरीने ग्रासले आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, नाशिक, दिंडोरी असे सहा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रात येतात. जळगाव आणि रावेरमध्ये २३ एप्रिलला, तर नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक येथे २९ एप्रिलला मतदान आहे. गेल्या निवडणुकीत हे सर्व मतदारसंघ भाजप- शिवसेनेसोबत होते. या वेळी मात्र हे गड राखण्यासाठी त्यांना...
  April 23, 09:18 AM
 • नाशिक/ नंदुरबार - महाराष्ट्रात आजवर झालेल्या प्रत्येक प्रचारसभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शरसंधान साधणारे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आता निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मात्र पवारविराेधाची तलवार म्यान केली. साेमवारी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत व नंदुरबार या ठिकाणी माेदींच्या दाेन प्रचारसभा झाल्या. त्यात त्यांचा भर विकासकामे आणि शेतकऱ्यांच्या याेजनांवरच दिसला. वार्षिक सहा हजार रुपये अर्थसाहाय्य देणारी शेतकरी सन्मान योजनेतील पाच एकरची अट आता काढून...
  April 23, 08:39 AM
 • नाशिक - लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी येथील पिंपळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी सभा घेतली. यामध्ये मोदींनी काँग्रेस आणि आघाडीचा दहशतवादी हल्ल्यांवरून खरपूस समाचार घेतला. काँग्रेस आणि आघाडीच्या सरकारमध्ये देशात अनेक दहशतवादी हल्ले झाले. परंतु, आमच्या (भाजप) सरकारने दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर कारवाई केली. सोबतच, नाशिकच्या कांदा प्रश्नावर अप्रत्यक्षपणे बोलताना मोदी सरकार दलालांचे राज्य संपवण्यासाठी आग्रही आहे असे मोदींनी सांगितले आहे. हा मोदी...
  April 22, 03:18 PM
 • यावल - यावल ते भुसावळ रस्त्यावर दुचाकीच्या समोरील टायरचा अचानक स्फोट झाला. यानंतर गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन आदळली. या विचित्र अपघातात एका व्यक्कतीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. यातील मृताचे नाव शेख अजीम शेख सैफुद्दीन (25) असे होते. तर इतर दोन्ही जखमींना तात्काळ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. भुसावळ नाक्याच्या पुणे महाराष्ट्र धाब्याच्या समोर...
  April 22, 12:20 PM
 • नाशिक -नोटबंंदीचा सर्वात मोठा फटका आम्हाला बसला. व्यापारी रोख देईनात, बँका चेक वटवेनात. हाल झाले. तेव्हापासून धंंदा बसला तो कायमचाच, सावरगावचा विठ्ठल कुशारे सांगत होता. अवकाळी पावसानं आभाळ भरून आलं होतं. त्याच्या शेतातला २५ क्विंटल कांदा घेऊन तो पिंपळगाव बाजार समितीत आला होता. पाऊस पडण्याआधी मिळेल त्या भावात कांदा विकून परत जाणं भाग होतं. ट्रॅक्टरवर ताडपत्री घालता घालता तो म्हणाला, मोदींनी गरिबांसाठी खूप योजना आणल्या, श्रीमंतांना सवलती दिल्या. पण आमच्यासारख्या मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची...
  April 22, 10:45 AM
 • नाशिक -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साेमवारी नाशिक व नंदुरबार जिल्ह्यात प्रचारसभा हाेत अाहे. नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये ते मतदारांना संबोधित करीत असतील तेव्हा येथून जवळच असलेल्या तहाराबादच्या बाळू अहिररावांच्या घरी त्यांचं तेरावं सुरू असेल. कांद्याला शंभर रुपयेही भाव न मिळाल्याने कर्जफेडीची आशा संपलेल्या अहिररावांनी ११ एप्रिल राेजी कांदा चाळीतच गळफास घेतला होता. त्यांच्या पश्चात ३६ वर्षांच्या पत्नीच्या पुढे मजुरीवर दिवस काढण्याशिवाय पर्याय नाही. अाता शेतीचं १५ लाखांचं...
  April 22, 09:03 AM
 • नाशिक -शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची वेळ मिळावी, असे पत्र नैताळे येथील कांदा उत्पादक संजय साठे यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. येत्या २२ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा घेणार आहेत. कांद्याला मातीमोल भाव मिळाल्याने साठे यांनी मोदींना कांदा विकून आलेल्या १ हजार ६४ रुपयांची मनिऑर्डर केली होती. त्यांच्या कांद्याला तेव्हा अवघा १ रुपया ४० पैसे भाव मिळाला होता. गेल्या पाच वर्षांत कांद्याचे भाव...
  April 21, 09:52 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात