Home >> Maharashtra >> North Maharashtra

North Maharashtra News

 • जळगाव- माजी खासदार यशवंत गिरधर महाजन (वाय. जी. महाजन सर) यांचे सोमवारी दुपारी अडीच वाजता निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात महाजन सरांवर उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालविली. सायंकाळी साडेपाच वाजता नशिराबाद येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मागील काही दिवसांपूर्वी महाजन यांची प्रकृती खालावली होती. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. पुणे विद्यापीठातून बी.एड. केलेले महाजन सर हे...
  October 29, 05:20 PM
 • नवापूर- पिंपळनेर रस्त्यावर रायपूर जाम तलावादरम्यान रिव्हाॅल्वरचा धाक दाखवत व्यापार्याकडून 2 कोटी 41 लाख 50 हजारांची लूटले होते. प्रमुख आरोपी मेघराज दरबार (वय- 27) याच्या नवापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणातील प्रमुख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ गाव वडनगर (जि. मैहसाणा) येथील आहे. नंदुरबारच्या पोलिसांनी आरोपीला गुजरात राज्यातील मैहसाना जिल्ह्यातील वीसनगरमधून अटक केले. तो बसने अहमदाबादकडे जात होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नंदुरबार जिल्हा...
  October 29, 04:04 PM
 • पिंपळनेर- मोरया सोसायटीत रविवारी (ता. 28) रात्री पुन्हा धाडसी चोरी झाली. एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी 5 तोळे सोने व 70 हजार रोख रक्कम चोरून नेली. मोरया सोसायटीत मोठ्या प्रमाणात नोकरदारवर्ग वास्तव्यास आहे. दरम्यान या नागरी वस्तीत गेल्या काही दिवसांपासून कुलूपबंद घरांना लक्ष्य करीत चोरांनी शनिवारी रात्री एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोडी करून खळबळ माजवली होती. त्यात फारसे नुकसान झाले नव्हते. परंतु रविवारी रात्री पुन्हा धाडसी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण...
  October 29, 02:25 PM
 • नाशिक- दिवाळीच्या तयारीमध्ये धावपळीच्या काळात घरच्या घरी मिष्ठान्न तयार करण्यासाठी वेळ मिळत नाही. मग नाईलाजाने विकत घेतल्या जाणाऱ्या मिठाई आणि गोड पदार्थांचा पर्याय निवडला जातो. मात्र, या मिठाईचा दर्जा चांगला आहे की नाही हे तपासले जात नाही. विकतचे दुखणे ठरणाऱ्या या मिठाईतील भेसळ नक्की कशी ओळखावी यासाठी काही सोपे उपाय आजमावले जाऊ शकतात. मिठाई घेताना दुकान मोठे असो किंवा लहान, दुकानातून घेतलेल्या खाद्यपदार्थामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. फक्त भेसळच नाही तर खाद्यपदार्थांना अधिक...
  October 29, 10:22 AM
 • नाशिक -नगर- नाशिककरांचा विराेध डावलून गाेदावरी व पालखेड धरण समूहातून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणाला पाणी साेडण्याच्या हालचाली पाटबंधारे विभागाने सुरू केल्या अाहेत. त्यासाठी संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची ठिकाणेही निश्चित केली आली असून सोमवारपासून (दि. २९) त्यांना संबंधित ठिकाणी तैनात राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर साेमवारी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी अाणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक हाेणार अाहे. पाणी...
  October 29, 08:18 AM
 • नाशिक-दिवाळीत फटके उडवताना लहान मुलांना इजा होणार नाही, दिवाळी दुर्घटनामुक्त व्हावी, यासाठी सेफ किड्स फाउंडेशन इंडियाच्या वतीने (एसकेएफआय) पुढाकार घेऊन फटाक्यांच्या वापराबाबत जनजागृती सुरू केली आहे. त्यासाठी सध्या पुणे अाणि पिंपरी चिंचवडमधील शाळा, महाविद्यालये, वसाहतींत या संस्थेतर्फे अग्निसुरक्षेबाबत माहिती दिली जात असून लवकरच नाशिकमधेही हा उपक्रम सुरू करण्यात येणार अाहे. दिवाळीत फटाक्यांच्या अागीमुळे अपघात होण्याचा धोका जास्त असतो. या अागीत भाजून जखम झाल्यास काेणते...
  October 29, 07:20 AM
 • नाशिक-अाजवरच्या सर्वच राजकीय पक्षांना मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांबाबत ठाेस निर्णय घेता अाला नाही. त्यामुळे मराठा समाजात असलेल्या असंताेषाला वाट करून देण्यासाठी अाता नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. या पक्षाची अधिकृत घाेषणा दिवाळीच्या पाडव्याला पुणे जिल्ह्यातील भाेर तालुक्यातील रायरेश्वर मंदिरात करण्यात येणार अाहे. तसेच नव्या पक्षाच्या वतीने पाच लाेकसभा मतदारसंघात अाणि ५०...
  October 29, 07:16 AM
 • नाशिक- मनुस्मृती ग्रंथ, संभाजी भिडेंविरोधात बोलले तर पानसरे, दाभोलकर यांच्या प्रमाणे तुमची हत्या करण्यात येईल, असे धमकीचे पत्र पाठवणाऱ्यांना राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी चाेख प्रत्युत्तर दिले अाहे. आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक पत्र प्राप्त झाले. अशा धमक्यांना मी घाबरत नाही. आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या विचारावर चालणाऱ्या समाजाचे चक्र उलटे फिरवणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करणारच, असा इशाराही त्यांनी दिला. नाशिकमध्ये अायाेजित आॅल इंडिया माळी सैनी...
  October 29, 07:00 AM
 • धुळे- येथील महापालिकेच्या निवडणुकीसाठी २१ अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करण्यात अाली. त्यात तब्बल १० अधिकारी जळगावचे अाहेत. यामुळे शहरातील राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या अाहेत. यावर अामदार अनिल गाेटे यांनी तर थेट मंत्री गिरीश महाजनांकडे संशयाची सुई दाखवत निवडणूक अायोगाकडे दाद मागणार मागण्याची तयारी केली अाहे. तिथेही दखल घेतली नाही तर उच्च न्यायालयात जाऊ, असे त्यांनी म्हटले अाहे. जळगावचे अधिकारी हा याेगायाेग समजावा का, असा प्रश्नही त्यांनी केला अाहे. शहराचे...
  October 28, 10:39 AM
 • जळगाव- दारूच्या नशेत असलेल्या दोन तरुणांनी शनिवारी दुपारी २.१५ वाजता बेंडाळे महाविद्यालयासमोर एका मुलीची छेड काढली. या मुलीच्या वडिलांनी एका तरुणास मारहाण करून ते तेथून निघून गेले. यानंतर तरुणांनी एका चहा विक्रेत्यासोबत वाद घालुन हाणामारी केली. या वेळी झालेल्या गर्दीत कोणीतरी एकाने तरुणाच्या मांडीत चॉपर खुपसला. दरम्यान, जखमी अवस्थेत रुग्णालयात गेलेल्या तरुणांनी पोलिसांची दिशाभूल करीत दुचाकी अपघातातून हा वाद झाल्याचे सांगितले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर खरा...
  October 28, 10:06 AM
 • नाशिक- महापालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांच्या एककल्ली कारभाराचे पडसाद नागपूर येथील महापाैर परिषदेतही उमटले. मुंढे यांना राज्यातील कुठल्याही महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती न देण्याचा ठराव परिषदेत एकमताने मंजूर करण्यात अाला. याबराेबरच महापौरांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार असावेत, सत्तेची सर्व सूत्रे आयुक्तांच्या हाती नसावीत, अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जावे, अशा मागण्याही राज्य शासनाकडे सादर करण्यात अाल्या. राज्यातील १९ शहरांच्या महापौरांच्या या परिषदेला उपस्थित...
  October 28, 09:52 AM
 • नाशिक- मुख्यमंत्र्यांचा स्वप्नातील प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम दिवाळीनंतर सुरू केले जाणार आहे. आवश्यक असलेल्या एकूण जमिनीपैकी ९० टक्के जमीन महामंडळाच्या ताब्यात असून, आता ती कंत्राटदारांकडे हस्तांतरित करण्यास सुरुवात झाली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता महत्त्वाचे प्रकल्प डिसेंबरपूर्वीच उदघाटन करण्याचे धोरण शासनाने ठेवले आहे. त्यामुळेच अनेक अडथळे पार केलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामास आता दिवाळीनंतरचा मुहूर्त जवळपास निश्चित झाला आहे....
  October 28, 09:16 AM
 • यावल - तालुक्यातील दहिगाव येथे राहत्या घरात एका 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडीस आली मयतचे नाव अक्षय धनराज महाजन (वय 20) असे आहे त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दहिगाव ता यावल येथील महाजन गल्लीतील रहिवासी अक्षय धनराज महाजन (वय 20) हा शनिवारी घरात एकटा होता त्याचे कुटुंबीय दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरी परतले असता त्यांना स्वयंपाकघरात छताला दोर बांधून तो गळफास घेऊन मृतावस्थेत आढळून आला तेव्हा...
  October 27, 08:51 PM
 • नाशिक-सर्वसामान्यांना वरदान ठरणाऱ्या महात्मा फुले जीवनदायी अाराेग्य योजनेलाच उदासीनतेचा आजार जडल्याच्या तक्रारी अाहेत. गोरगरिबांना माेफत उपचारासाठी शासनाकडून ही योजना सुरू करण्यात अाली असली तरी प्रत्यक्षात मात्र तिच्या अंमलबजावणीसाठी संबंधित रुग्णालये तयार नसल्याची धक्कादायक समोर आली आहे. योजनेंतर्गत मंजूर झालेल्या उपचारानुसार रुग्णाला दीड लाखापर्यंत मोफत औषोधोपचार आणि तपासण्यादेखील करून देण्याच्या सूचना असताना काही रुग्णालये रुग्णांकडून तपासण्यांसाठी बक्कळ पैसे उकळत...
  October 27, 09:22 AM
 • ओझर/ नाशिक-भारतीय वायूदलाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे देशातील पहिले नूतनीकरण केलेले सुखोई-30 एमकेआय हे लढाऊ विमान शुक्रवारी भारतीय वायूदलाच्या अधिकाऱ्यांना हस्तांतर करण्यात आले. ओझर येथील 11 बेस रिपेअर डेपोत झालेल्या एका औपचारिक सोहळ्यात वायू सेनेच्या अधिकाऱ्यांचा उपस्थितीत हे विमान वायूदलाकडे सुपूर्द करण्यात आले. भारतीय वायूदलाची मुख्य ताकद म्हणून सुखोई-30 विमान ओळखले जाते. या सुखोई विमानाच्या नूतनीकरणाचे काम ओझर येथील 11 बेस रिपेअर डेपोमध्ये करण्यात येत होते. भारतीय...
  October 26, 09:13 PM
 • यावल- तालुक्यातील दहिगाव येथे शुक्रवारी दुपारी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई केली. चिनावल येथील राहाणार्या एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. हा तरुण त्याच्या मामाकडे आला होता. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी साकळीमध्ये, नंतर रावेर तालुक्यातील चिनावल आणि आता पुन्हा दहीगावात कारवाई झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी की, दहिगाव येथे शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास एटीएस पथक दाखल झाले. अधिकार्यांनी गावातील रहिवासी शेख रफिक शेख सुलेमान...
  October 26, 08:18 PM
 • नाशिक - मुंबई-अाग्रा महामार्गावरील गाेंदे ते पिंपळगाव बसवंत या ६० किलाेमीटर अंतराच्या हरित महामार्गाचे लाेकार्पण बुधवारी (दि. २४) केंद्रीय मार्ग परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात अाले. सीएसअार निधीमधून झालेला देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच हरित महामार्ग असून येस बंॅकेच्या सीएसअार निधीतून ताे साकारला अाहे. नाशिक परिसरातील उद्याेग अाणि काॅर्पाेरेट कंपन्यांनी पुढे येत पाच-पाच किलाेमीटरची जबाबदारी घेऊन महामार्ग पूर्णपणे हरित करावा, असे अावाहनही गडकरी यांनी...
  October 25, 12:12 PM
 • नाशिक - दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत म्हणजे दोन तास परवानगी दिल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नाशिक आयुक्तालयात पोलिस ठाणेनिहाय ध्वनिमापक यंत्र वाटप करण्यात आले असून जास्त डेसिबल फटाके फोडणाऱ्यांवर मुंबई पोलिस कायदा कलम ३३ प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत फक्त दोन तासच फटाके फोडण्यास...
  October 25, 12:11 PM
 • जळगाव - भादली हत्याकांड प्रकरणात ऑगस्ट महिन्यात दोन संशयिताना जामीन झाला आहे. या दोघांनी नऊ दिवसांच्या पोलिस कोठडीत घटनेबद्दलची ठोस माहिती दिली नाही. त्यानंतर भादली हत्याकांड एक मर्डर मिस्ट्री होण्याची शक्यता असतानाही फाइल पुन्हा उघडण्यात आली आहे. बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांनी दोन महिलांचे जबाब नोंदवले आहेत. भादली गावात राहणारे प्रदीप सुरेश भोळे (वय ४५), त्यांच्या पत्नी संगीता (वय ३०), मुलगी दिव्या (वय ७) व मुलगा चेतन (वय ३) यांचा १९ मार्च २०१७च्या...
  October 25, 12:10 PM
 • जळगाव - जळगाव शहरासह जिल्हाभरात डेंग्यूने गेल्या तीन महिन्यांपासून पाय पसरले अाहेत. खासगी रुग्णालयात शेकडाेंच्या संख्येने डेंग्यूसदृश रुग्ण उपचार घेत अाहेत. त्यापैकी घाटी रुग्णालयाने अातापर्यंत २६८ पैकी ९२ नमुने पाॅझिटीव्ह ठरवले अाहेत. एकीकडे डेंग्यूची समस्या असताना अाता त्यात स्वाइन फ्लूची भर पडली अाहे. जिल्हाभरात अातापर्यंत १५ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून त्यापैकी ८ जणांचा मृत्यू अाेढवला अाहे. जळगाव शहरात चाैघांपैकी दाेघांचा मृत्यू झाला अाहे. संसर्गजन्य अाजारापासून...
  October 25, 12:10 PM
 
जाहिरात

RECOMMENDED