जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra

North Maharashtra News

 • भुसावळ - जबलपूर येथून मुंबई येथे ४० लाख रुपयांची राेकड बॅगेमध्ये घेऊन जाताना इतर प्रवाशांनी बॅग उचलून नेल्याचे संबंधित प्रवाशाच्या लक्षात अाल्यावर येथील जीअारपी पाेलिसांना माहिती देताच पाेलिसांनी स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून अवघ्या पाच तासांत अनवधानाने शहरातील एका लग्नाच्या वऱ्हाडाने नेलेली बॅग पाेलिसांनी त्याच्या घरी जाऊन जप्त केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दरम्यान, ही राेकड हवालाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. पाेलिस निरीक्षक दिलीप गढरी म्हणाले, १७ मे...
  May 22, 09:38 AM
 • वणी -सप्तशृंग गडावरून नवस फेडून नाशिककडे जाणारा भाविकांचा टेम्पो कृष्णगाव येथील गतिरोधकावर नादुरुस्त झाल्याने उभा होता. त्याला नाशिककडे जाणाऱ्या कांद्याने भरलेल्या ट्रकने पाठीमागून जोडदार धडक दिली. त्यात आयशरमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर सहा जण जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. आशिष माणिकसिंग ठाकूर (२७, रा. त्र्यंबकेश्वर), सागर अशोक ठाकूर ( २२, रा. नाशिक), कुणाल कैलास ठाकूर(१९ नाशिक) आणि गणेश भगवती प्रसाद ठाकूर (३८, रा. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. आयशरमधील भाविक हे...
  May 21, 10:15 AM
 • नाशिक - नातेवाइकांकडे आलेल्या शिर्डी येथील तरुणीला लग्नाचे आमिष देत मुंबई येथे नेऊन एका घरात डांबून ठेवत प्रियकर आणि त्याच्या मित्राने पंधरा दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित प्रियकर अविनाश धनराज माकुणे (रा.श्रीरामपूर) यास अटक करण्यात आली आहे. मित्र संतोष खरात फरार आहे. पीडितेने सुटका केल्यानंतर नातेवाइकांना हा प्रकार सांगितला. संशयितांच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित तरुणीने...
  May 21, 09:40 AM
 • नाशिक - खासगी विमा कंपनीच्या पाॅलिसीवर तब्बल ११० टक्के व्याज देत भरलेल्या रकमेवर बोनस आणि रक्कम परत देण्याचे आमिष देत सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याला तब्बल ७८ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात रिलायन्स विमा कंपनीच्या चार ते पाच एजंटच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि सेवा निवृत्त बँक अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त...
  May 20, 11:42 AM
 • मनमाड -नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड शहराचं वैशिष्ट्य आहे तिथलं हवामान. जास्त तापमान नाही व जास्त थंडीही नाही. आर्द्रताही बेताचीच. हेच कारण होते की ज्यामुळे ब्रिटिशांनी या भागात सैन्याची छावणी उभारली. इथे लोखंडाला लवकर गंज लागत नाही म्हणून रेल्वेने इथे ब्रिज वर्कशाॅप सुरू केले. धान्याला कीड लागत नाही म्हणून फूड काॅर्पोरेशन आॅफ इंडियाने आपले देशातले सर्वात मोठे गोदाम इथेच उभारले. हेच कारण आहे ज्यामुळे भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने इथे इंधनाचा डेपो उभारला. या...
  May 19, 10:54 AM
 • जळगाव -पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दुष्काळी दौऱ्यात सहभागी होण्यासाठी जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील मुंबईहून जळगाव येथे येण्यासाठी निघाल्या असता शनिवारी पहाटे ३ वाजता नाशिकजवळील ओझर गावाजवळ त्यांच्या इनोव्हा कारला ट्रकने पाठीमागून धडक दिली. सुदैवाने यात पाटील यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, कारचे नुकसान झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी जिल्ह्यात दुष्काळी दौरा असल्यामुळे जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, पती माजी जि. प. उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील हे मुंबईहून...
  May 19, 10:44 AM
 • अमळनेर -जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी जिल्हा दाैऱ्यावर आलेले महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने हैराण झाले. अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे फक्त २० मिनिटेच थांबले तर अनोरे या गावात भजनाच्या कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी मन हलके केले. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात केवळ भाजपचे दोन-चार कार्यकर्ते वगळले तर आमदार शिरीष चौधरी व आमदार स्मिता वाघ हे दोन्ही आमदार गैरहजर होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास...
  May 19, 10:39 AM
 • जळगाव -महाराष्ट्रात १९७२ पासून आतापर्यंतचा सर्वात भीषण दुष्काळ पडला आहे. पाणीटंचाई एवढी की गावांतील लोकांना नाइलाजाने चिखलाचे पाणी कपड्यानेे गाळून प्यावे लागत आहे. राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत. १३ हजारपेक्षा जास्त गावे-वाड्या संकटात आहेत. स्थिती एवढी वाईट आहे की राज्याच्या जलाशयांत १४% पाणी उरले आहे. तेही आता आपत्कालीन स्तरावर आहे. १८ मे रोजी २६ धरणांतील पाणीपातळी शून्यावर गेली. गेल्या वर्षी हा आकडा २६% होता. राज्याने कर्नाटककडून तीन टीएमसी फूट...
  May 19, 08:41 AM
 • नाशिक - आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा आॅलिम्पिक राेंइंगपटू दत्तू भाेकनळच्या विरोधात पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यासोबत वैदिक पद्धतीने लग्न करत जाहीर लग्न करण्यास नकार दिल्याप्रकरणी आडगाव पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाेन वर्षांपूर्वी वैदिक पद्धतीने लग्न केल्यानंतर आता मात्र दाेन वेळा ठरवूनही लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप पीडित महिला कर्मचाऱ्याने करत आपला शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. आगामी आॅलिम्पिक...
  May 18, 09:50 AM
 • मालेगाव - राष्ट्रीय तपास संस्था एनआयएच्या विशेष कोर्टाने 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना दणका दिला आहे. यातील आरोपींना आठवड्यातून एकदा कोर्टात हजेरी लावावीच लागेल. या आरोपींमध्ये भाजपकडून खासदारकी लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतरांचा समावेश आहे. सुनावणीच्या वेळी आरोपी कोर्टात हजर झाले नाही, त्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 मे रोजी घेतली जाणार आहे. वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत साध्वी प्रज्ञा...
  May 17, 02:59 PM
 • जळगाव -प्रिय रूपाली, तुझ्या इच्छेप्रमाणे मी आणि माझे आई-वडील आम्ही हे घर सोडून जात आहोत. तुझी इच्छा पूर्ण हाेवो ही सदिच्छा. तुझा आणि फक्त तुझाच दीपक. कृपया आमचा तपास करू नकोस, आम्ही मेलो तुला सोडून. पत्नीच्या नावाने असा मजकूर लिहून एक तरुण आपल्या आई-वडिलांसह घर सोडून निघून गेला. १३ मे रोजी जळगावातील श्रीधरनगरात ही घटना घडली असून १५ रोजी उघडकीस आली. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या माहितीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. दीपक आत्माराम सोनगिरे (३६) त्यांचे वडील आत्माराम...
  May 17, 11:13 AM
 • नाशिक - एकतर्फी प्रेमातून कोण काय करेल याचा नेम नाही. असाच एक प्रकार नाशकातील आडगाव परिसरात उघडकीस आला. प्रेयसीच्या भावी पतीच्या घरावर दगड फेकत दुचाकी पेटवून देण्यात आली. याप्रकरणी संशयिताच्या विरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पाच महिन्यांपूर्वी मुलाचे सिडको परिसरात राहणाऱ्या एका मुलीसोबत लग्न ठरले आहे. मेअखेर मुलाचे लग्न होणार आहे. मात्र, जेव्हापासून लग्न ठरले तेव्हापासून घराच्या समोर अनोळखी व्यक्ती पाकिटमध्ये...
  May 17, 09:59 AM
 • नाशिक - विविध कंपनीचे ऑनलाइन प्राॅडक्टची ग्राहकांना कॅश ऑन डिलिव्हरी दिल्याचे भासवत तेच प्राॅडक्ट परस्पर ग्राहकांना विक्री करत लाॅजेस्टिक कंपनीची फसवणूक केल्या प्रकरणी कुरिअर कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित निखील राजाराम आहिरे, विशाल रामदास माळेकर, अक्षय राजाराम आहिरे या तीघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पेखम सिस्टिम लाॅजिस्टिक प्रा.लि. गुडगाव...
  May 17, 09:43 AM
 • अंमळेनर-नांदेडहून पुण्याला निघालेल्या कारच्या चालकाचा ताबा सुटून कार उलटल्याने कारमधील पांडूरंग दासराव पांडे व उदया पांडुरंग पांडे (रा. नांदेड) या पती-पत्नीचा मृत्यू झाला. तर अन्य तिघे जखमी झाले. बीड-नगर मार्गावरील अंमळनेरजवळ दौलतवाडी भागात गुरुवारी दुपारी दोन वाजता हा अपघात झाला. पांडूरंग पांडे हे नांदेडच्या सा. बां. विभागातील निवृत्त कनिष्ठ अभियंता आहेत. पांडे दांपत्य मुलगा श्रेयस पांडे, चुलत भाऊ व इतर दाेघांसह नांदेडहून गुरुवारी सकाळी कारने पुण्याला निघाले होते. श्रेयस कार चालवत...
  May 17, 09:13 AM
 • साक्री (धुळे) -समस्येचे निराकरण करण्याची इच्छाशक्ती असली आणि त्यात स्वार्थ आडवा आला नाही तर काय बदल घडू शकतो, याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर पाहायला मिळते. दोन राज्यांतल्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन गावांतील दुष्काळाच्या चित्रात त्यामुळे जमीन-अस्मानचा फरक पडला आहे. गुजरातमधील गावात प्रत्येकाच्या दाराशी पाण्याच्या टाक्या भरलेल्या आहेत, तर महाराष्ट्रातल्या गावात ठिकठिकाणी पाण्यासाठी बसवलेल्या टाक्यांमध्ये दीड वर्षात अजून थेंबभरही पाणी पडलेले नाही....
  May 17, 08:18 AM
 • नाशिक - राष्ट्रीय रोइंगपटू निखिल सोनावणे याला गुंडांनी अडवून बेदम मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री नाशिक शहरातील चाेपडा लाॅन्स परिसरात घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या निखिलला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, हाताला दुखापत झाल्याने निखिलला पुण्यात हाेणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत मुकावे लागणार असल्याने त्याच्या दाेन वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. राेइंगच्या अनेक स्पर्धांमध्ये पदक मिळवणारा निखिल पुणे येथे हाेणाऱ्या राज्यस्तरीय...
  May 16, 09:36 AM
 • नाशिक - दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये रोजगार हमीअंतर्गत तातडीने जलसंधारण आणि मृदसंधारणाच्या २८ कामांना मान्यता दिल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सरपंचांशी संवाद साधत असताना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील अस्वली गावातील मजूर त्यांचे कोरे जॉबकार्ड दाखवत होते. या गावातून १०० जणांनी गेल्या सहा महिन्यांपासून कामाची मागणी नोंदवूूनही गावात रोजगार हमीची कामे सुरू झाली नसल्याच्या तक्रारी सांगत होते. विशेष म्हणजे, २४ जानेवारीच्या बैठकीत रोहयो...
  May 15, 10:36 AM
 • नंदुरबार | सिंचनाचा अभाव, आदिवासी भागांतील प्रचंड वृक्षतोड, खडतर मार्गामुळे वाहतुकीची व्यवस्था नसल्याने नंदुरबारच्या ६ तालुक्यांना पाणीप्रश्नाने ग्रासले आहे. शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार, धडगाव तालुके यात सर्वाधिक होरपळून निघत आहेत. दुर्गम रस्त्यांमुळे नंदुरबारमध्ये दोन आदिवासी पाड्यांवर केवळ एकच टँकर सुरू आहे. वैयक्तिक बोअर व हातपंपांच्या माध्यमातून येथील नागरिक तहान भागवत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून ५३ किलोमीटरचा प्रवास करून नर्मदा वाहते. याचा फारसा फायदा येथील आदिवासी...
  May 15, 10:34 AM
 • सिन्नर - केवळ शाळेतील विद्यार्थ्यांना भूतदयेचे धडे न देता स्वत:ही पशु-पक्ष्यांच्या चारा-पाण्याची सोय करण्यासाठी सिन्नर येथील वाजे विद्यालयातील क्रीडा शिक्षक तथा शेतकरी ज्ञानदेव नवले यांनी पुढाकार घेतला आहे. शेतातील कणीस भरलेली हिरवीगार १५ गुंठे ज्वारी त्यांनी पाखरांसाठी खुली केली आहे. विशेष म्हणजे शेतातील विहिरीजवळील दगडी कुंडात पाखरांसाठी पाण्याचीही व्यवस्था केली आहे. हजारो रुपये किमतीच्या चाऱ्यावर पाणी सोडत त्यांनी समाजापुढे आदर्श उभा केला आहे. दाणा-पाण्याअभावी पक्ष्यांचे...
  May 15, 10:30 AM
 • जळगाव -आम्ही आता हरलो, असे समजून रोज थोडाथोडा मृत्यू पीत आहोत. किडनीचा आजार जडून केव्हा मरण येईल सांगता येत नाही, असे म्हणून हताश झालेले गुलाबवाडीतील (ता. रावेर) शेतकरी नंदलाल राठोड यांनी गावाला ८ वर्षांपासून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याची माहिती देत आपबीती सांगितली. सातपुड्यातील पालपासून ५ किमीवरील गुलाबवाडीत पाणीपुरवठा करणाऱ्या ट्यूबवेलमधून दूषित व अतिक्षारयुक्त पाण्याने किडनी विकाराने ६ वर्षांत १० मृत्यू, तर ७० रुग्ण बाधित आहेत. ३ रुग्ण गंभीर आहेत. ४९० लोकसंख्येच्या गावात २०११...
  May 14, 09:40 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात