जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra

North Maharashtra News

 • चिमलखेडी, अक्कलकुवा (जि. नंदुरबार) -महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या ३ राज्यांना जोडणारे चिमलखेडी पाडा (ता. अक्कलकुवा) हे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील टोकावरचे पहिले गाव. पायथ्याशीच नर्मदेचे विस्तीर्ण पात्र असूनही गावकऱ्यांना बारमाही भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात नर्मदेची जलपातळी वाढल्याने तसेच हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने गावकऱ्यांना घराच्या कौलांवरच पाणी साठवून ते प्यावे लागते, तर उन्हाळ्यात जीव धोक्यात घालत उभ्या डोंगरावरून १०० फूट खाली उतरून नर्मदेचे पाणी वर...
  May 14, 08:25 AM
 • नाशिक - अमेरिकेतील नॅशनल एराेनाॅटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राेव्हर चॅलेंज या जागतिक स्पर्धेत मुंबईतील मुकेश पटेल स्कूल आॅफ टेक्नाॅलाॅजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. स्पर्धेच्या निमित्ताने नासाकडून प्रथमच महाराष्ट्राला फ्रॅन्क जाे सेक्टन मेमाेरियल पीट क्रू या टेक्निकल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासाेबतच सिस्टिम सेफ्टी चॅलेंज पुरस्कारही देण्यात आला. स्पर्धेत जगातील ११७ महाविद्यालयांच्या...
  May 13, 10:15 AM
 • जळगाव - चोपडा तालुक्यातील काजीपुरा फाट्यावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात घडला आहे. अपघात इतका भयंकर होता की कारचा चेंदामेंदा झाला. तसेच तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सर्वच तिघे शिरपूर तालुक्यातील रहिवासी होते. प्रहार शेतकरी संघटनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष व मांजरोद ग्रामपंचायतचे सदस्य नामदेव कोळी, भाटपुरा येथील किशोर गजानन बिऱ्हाडे, बभळाज येथील अनिल दशरथ जाधव अशी मृतांची नावे आहेत. यासोबत दुर्घटनेत आणखी एक जण सागर नरेश पाटील यात गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर...
  May 12, 10:18 AM
 • मुंबई -मंत्रालयाच्या सांस्कृतिक विभागात कार्यरत प्रीती दुर्वे या आजारी असतानाही त्यांना निवडणूक ड्यूटी दिल्याने त्यांचा आजार बळावला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. मात्र जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी या आरोपाचे खंडन करत दुर्वे यांनी आजारपणाबाबत कळवले नव्हते, असे म्हटले आहे. प्रीती दुर्वे शिवडी विधानसभा मतदारसंघात मतदान अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. निवडणुकीच्या ड्यूटीवर असताना त्यांची तब्येत खालावली होती. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना कावीळ झाल्याचे...
  May 12, 09:19 AM
 • जळगाव -आजोबाच्या अंत्यसंस्कारावेळी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने मद्यधुंद नातवाने पिस्तुलाने हवेत दोन फैरी झाडल्या. तिसरी गाेळी झाडताना पिस्तूल लॉक झाले. ते दुरुस्त करताना गोळी सुटली व एका वृद्धाच्या छातीत घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी पिंप्री येथे ही घटना घडली. तुकाराम वना बडगुजर (६०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विठ्ठल बडगुजर यांचे वडील श्रावण बारकू बडगुजर (८७) यांचे शनिवारी निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात...
  May 12, 09:09 AM
 • जळगाव -शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरने प्रसूतीसाठी आलेल्या महिला रुग्णांना अर्वाच्य भाषेत बोलून दमदाटी केली. तसेच गर्भवती महिलेला चापट मारल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. यामुळे संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. वरणगाव येथील गायत्री राजेश कोळी (२१) शुक्रवारी सकाळी डॉ. स्वाती बाजेड यांच्याकडे तपासणीसाठी गेल्या असताना त्यांनी संताप व्यक्त करत चापट मारली. त्यामुळे कोळी या रडत कक्षाबाहेर आल्या. यामुळे नातेवाईक संतप्त झाले....
  May 11, 10:04 AM
 • भुसावळ -गेल्या उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्यात २४ हजार मेगावॅटवर पोहोचलेली उच्चांकी वीजमागणी यंदा उन्हाच्या झळा वाढल्यावरही आवाक्यात आहे. राज्यातील दुष्काळी स्थितीत भूजल आटल्याने उन्हाळ्यातच वीज पंप बंद असल्याने राज्यातील कृषी क्षेत्राकडून होणारी वीजमागणी दीड हजार मेगावॅटने घसरली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोल इंडियासह आयात कोळसा वाढवला आहे. शुक्रवारी महावितरणची वीजमागणी १८,२०० तर राज्याची वीजमागणी अवघी २१,३०० मेगावॅट होती. यंदा राज्यात अल्प पाऊस झाला....
  May 11, 10:00 AM
 • यावल-तालुक्यात शुक्रवारी दोन अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुभाष गेंदू सोळुंके (रा.चिंचोली) यांचा समावेश असुन त्यांच्यासह सर्व जखमींवर यावल ग्रामिण रूग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव येथे हलवण्यात आले आहे. रूग्णालयात 108 वाहन असुन त्यावर डॉक्टर नसल्याने भुसावळ येथुन वाहन बोलवण्यात आले त्यात अर्धातास जखमींना नेण्यास विलंब झाल्याने जखमींच्या नातलगांनी संताप व्यक्त केला. शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यावल-सातोद रस्त्यावर वळनाचा...
  May 10, 05:17 PM
 • यावल-व्ही.डी.पाटीलाचा सरकारी बंगल्यात बेकायदा रहिवासअसलेले माजी राज्य माहिती आयुक्त तथा जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता वसंत दत्तात्रय पाटील यांना जळगांव येथील शासकीय निवासस्थानाचे एकुण भाडे 4 लाख २२ हजार ५९ रूपये भरावे लागले. याबाबत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे जळगांव जिल्हयातील संघटक सुरेश जगन्नाथ पाटील (रा.यावल) यांनी (दि.09/07/2018) रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगांव यांच्याकडे तक्रार केली होती व आहे. तसेच माहितीच्या अधिकारा अंतर्गत दिनांक 02...
  May 9, 03:00 PM
 • जळगाव जामोद - साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ बुद्रुक येथील प्रसिद्ध घट मांडणीचे भाकीत बुधवारी कथन करण्यात आले. त्यानुसार, राजाची गादी यंदा कायम राहील, पण राजकीय अस्थिरतेत कलह किंवा घोडेबाजारही संभवतो, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. यंदा जूनमध्ये साधारणु तर जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. तसेच पिके सर्वसाधारण राहतील, ज्वारी, बाजरी व तुरीचे भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे. घट मांडणीत राष्ट्रीय मुद्द्यांवरही अंदाज वर्तवण्यात...
  May 9, 08:51 AM
 • नाशिक -दुष्काळाच्या निवारणासाठी पालकमंत्र्यांना दाैरे करण्याचे आदेश देणारे, सुमारे २ हजार काेटींची मदत करणाऱ्या एनडीअारएफचे आभार मानणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळाच्या मुद्द्यावर त्यांच्याच अध्यक्षतेखालील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (एसडीअारएफ) बैठक घेण्याबाबत मात्र गंभीर नसल्याचे दिसते. गेल्या वर्षभरात त्यांनी या विषयावर प्राधिकरणाची एकही बैठक घेतली नसल्याची धक्कादायक माहिती दिव्य मराठीच्या हाती लागली आहे. तसेच केंद्रीय कायद्याला १२ वर्षे उलटून...
  May 9, 08:45 AM
 • राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यावर भीषण दुष्काळाची छाया आहे. जिल्ह्यातगावागावातील विहिरी, कूपनलिका, तलाव, जलसिंचन प्रकल्प आटल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी कामधंदा साेडून रानावनात भटकंती करावी लागत आहे. तरीही पाणी मिळत नसल्याने ५० रुपयांत २०० लिटर पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत असल्याचे चित्र आहे. विकतचे पाणी परवडत नसल्याने चक्क लग्नसोहळा लांबणीवर टाकण्याची वेळ जिल्ह्यातील नेरी दिगर या गावातील नागरिकांवर आली आहे. जेथे...
  May 8, 10:10 AM
 • नाशिक - अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना तिला मैत्री करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार शनिवारी (दि.४) रात्री आठ वाजता गंगावाडी रविवार कारंजा येथे उघडकीस आला. पीडीत मुलीची आई रात्री कामावरून घरी आल्यानंतर मुलीची सुटका केली. अवधू्त सुनील जाधव (१९) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सरकारवाडा पोलिसांनी संशयिताला अटक केली. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, सतरा वर्षाची...
  May 7, 09:32 AM
 • नाशिक- डोंगराच्या माथ्यावर घनदाट जंगलात ७० ते ७५ चुलींचे गाव... पावसाळ्यात चारही महिने संततधार.. तांदूळ, वरई व नागली हे प्रमुख पीक... एकदा पावसाळा संपला की शेतीसाठी सोडाच, पण दिवाळीपासून ते जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याचीही भ्रांत... हे दरवर्षीचेच चित्र पण यंदाची दाहकता अतिभीषणच. थेंबभर पाण्यासाठी येथील महिलांना रात्रभर जागे राहावे लागते. सकाळी ९ ते १० वाजता नंबर लावला की थेट मध्यरात्रीच पाणी मिळते. पेन्सिलीऐवजी लहान मुलं हातात टेंभा धरतात अन् त्या उजेडात आई-वडील पाणी भरतात. साधा हंडा भरायला...
  May 5, 10:24 AM
 • नाशिक- शहरापासून सुमारे १०० किमी अंतरावर घनदाट जंगलातील म्हैसमाळ गावात ८० आदिवासी कुटुंबे राहतात. गावात पाण्याचे स्रोत नाहीत. एक किलोमीटर अंतरावर एक विहीर आहे. ती आता कोरडी पडली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांनी ही विहीर आणखी ६ फूट खोदली आहे. तेथील झऱ्यातून हळूहळू पाणी येते. एक घागर भरण्यासाठी एक तास लागतो. त्यामुळे येथे ग्रामस्थांना नंबर लावावा लागतो. ज्याचा नंबर येतो त्याला दोन घागरी पाणी मिळते. दिवस-रात्र पाणी भरण्याचे काम चालते. येथे पाणी भरण्यासाठी आलेल्या निर्मला यांनी सांगितले,...
  May 5, 08:30 AM
 • चांदवड - तालुक्यातील मत्तेवाडी शिवारातील वन विभागाच्या हद्दीत पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांवर सुमारे १०० ते १५० आदिवासींच्या जमावाने गोफण, गलोलचा वापर करत व दगडफेक करून केलेल्या हल्ल्यात ११ ग्रामस्थ जखमी झाले. या वेळी आदिवासींच्या जमावाने सात दुचाकी पेटवून दिल्या. दोन दुचाकी व पोकलेनची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. आदिवासींच्या ताब्यातील वन जमिनीत पाणी फाउंडेशनचे हे काम सुरू हाेते. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव...
  May 4, 08:42 AM
 • मनमाड- नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये पानी पाउंडेशनतर्फे श्रमदान करणाऱ्यांवर आदिवासी जमावाने हल्ला चढवला आहे. हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत, त्यांना चांदवडच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आदिवाशांनी हल्ल्यासोबतच गावकऱ्यांच्या गाड्याही जाळल्या आहेत. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी चांदवडमध्ये पानी फाउंडेशनचे श्रमदान सुरू होते. पानी फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत चांदवड तालुक्यातील 72 गावांचा सहभाग आहे. त्यासाठी आज मतेवाडीमधील गावकऱ्यांनी डोंगरउतारावर चर खोदण्याचे...
  May 3, 03:02 PM
 • यावल - तालुक्यातील कुंड्यापाणी येथील लग्नाचे मूळ घेऊन परतणाऱ्या वऱ्हाडी मंडळीच्या वाहनाला अपघात झाला. वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या कठड्यावर जाऊन चढले. बुधवारी संध्याकाळी झालेल्या या अपघातात सहा आदिवासी गंभीर जखमी झाले आहेत. यावल तालुक्यातील नावरे फाट्यावर ही घडली. सर्वच जखमी भातखेडा तालुका रावेर येथील रहीवाशी आहेत. रावेर येथील आदिवासी तडवी समाजाचे लग्नानंतरचे मूळ घेण्यासाठी वऱ्हाडी मंडळी कुंड्यापाणी येथून गेली होती. संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास एमएच 12 सीएच 4767 या...
  May 2, 09:48 AM
 • नंदुरबार - अन्नपदार्थ थोडा तिखट झाला तर दोन्ही डोळ्यांतून पाणी येते. मिरच्या चिरल्यानंतर हाताची आग कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. मात्र, मिरचीच्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या सुनीता, रूपाली आणि त्यांच्यासारख्या १० हजार महिला दिवसभर मिरच्यांमध्ये बसून राहतात आणि हाताने मिरच्या ताेडल्यानंतही त्यांना त्रास हाेत नाही. ४५ अंश तापमानात या सर्व तिखट मिरच्यांमध्ये राहतात. सर्व कामगार केवळ महिला असलेले असे अनेक कारखाने महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात आहेत. शुद्धतेसाठी...
  May 1, 10:15 AM
 • नाशिक -नाशिक मतदारसंघात यंदाही लोकांना मतदार यादीतील घोळाला सामोरे जावे लागले. याचा फटका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनाही बसला. मतदान केंद्रावर प्रचंड शोधाशोध करूनही भुजबळांचे नाव यादीत सापडत नव्हते. अखेरीस महत्प्रयासाने त्यांच्या पत्नी मीनाताई यांचे नाव सापडले आणि त्यावरुन छगन भुजबळांच्याही नावाचा शोध लागला. या वेळी अनेकांनीही याद्यांमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी भुजबळ यांच्याकडे व्यक्त केल्या. दरम्यान, येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ...
  April 30, 09:53 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात