Home >> Maharashtra >> North Maharashtra

North Maharashtra News

 • इंदिरानगर - पहाटे साडेतीनच्या सुमारास कालिका देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या सात लहान मुलांना भरधाव जाणाऱ्या कारने चिरडल्याने झालेल्या अपघातात अकरा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेली दोन मुले गंभीर जखमी झाली अाहेत. रविवारी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते साईनाथ चौफुली या रस्त्यावर हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर कारचालक फरार झाला असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयित कार चालकाच्या विरोधात हिट अँड रन चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त...
  October 15, 11:29 AM
 • नाशिक - पर्यावरणपूरक उत्तम पर्याय ठरलेल्या म्हणून साैर ऊर्जेतून शहरातील सर्व म्हणजे ४८१ उद्यानातील पथदीप लखाखणार अाहेत. यामुळे वर्षाला ९ लाख २१ हजार ६२५ युनिट, म्हणजेच ४४ लाख ९ हजार ८५ रुपये किंमतीच्या विजेची बचत हाेणार अाहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने स्मार्ट सिटीच्या संकल्पनेत साैर ऊर्जेच्या प्रकल्पांना प्राेत्साहन देण्याचे धाेरण अवलंबिले अाहे. याअंतर्गत शहरातील सर्वच उद्यानांत साैर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात येणार अाहेत. उद्यानांना सुरक्षा कुंपण असल्यामुळे साैर...
  October 15, 11:14 AM
 • यावल - शेतात गुरे शिरत असल्याच्या वादातून एका गुराख्याने 70 वर्षांच्या शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडाने वार केले. यावलच्या शिरागड येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. या हल्ल्यात शेतकरी पंडित राजाराम साळुंखे (वडोदा) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. - पंडित राजाराम सोळुंखे शिरागड येथील आपल्या शेतात रविवारी सकाळी काम करत होते. त्याच दरम्यान पुंडलिक नावाचा एक गुराखी आपली गुरं घेऊन शेतात शिरला. आपल्या पिकांचे नुकसान...
  October 14, 05:54 PM
 • जायखेडा (नाशिक) - बागलाण तालुक्यातील भडाणे येथे मक्याच्या शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. भडाणे येथील शरद शांताराम भामरे यांच्या शेतात मजूर मक्याची कापणी करत होते. त्याचवेळी मजुरांना उग्र दुर्गध आला. वेळीच त्या दुर्गंधीचा शोध घेतला असता अंदाजे साठ सत्तर वर्षे वय असलेल्या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला आढळून आला. हा प्रकार पाहताच मजुरांची एकच भांबेरी उडाली. या बाबत शेत मालक व पाठोपाठ स्थानिक पोलिस पाटील महेंद्र सिताराम भामरे यांना कळविण्यात आले....
  October 14, 02:26 PM
 • नाशिक - देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या मुलांना भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने उडवल्याने झालेल्या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकमध्ये कालिकादेवीच्या दर्शनासाठी ही सर्व मुले जात असताना त्यांना या अज्ञात वाहनाने उडवल्याची माहिती मिळाली आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने नाशिकच्या वडाळे गावातील 7 मुले कालिकादेवीच्या दर्शनासाठी पहाटेच घरातून निघाली होती. ही सर्व मुले पायी देवीच्या मंदिराकडे जात होती. पण...
  October 14, 10:11 AM
 • यावल- तालुक्यातील किनगाव येथे मुख्य चौकातील साईबाबा किराणा दुकानाला भीषण आग लागून सुमारे 10 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री नंतर लागलेल्या या आगीमुळे गावात एकच खळबळ उडाली होती. नागरीकांनी समयसुचकता दाखवता काही तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी हानी टळली. साईबाबा किराणा दुकानात शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. दुकानाचे संचालक आकाश देशमुख यांनी शुक्रवारी दिवसभराचा...
  October 13, 05:06 PM
 • नवापूर- पिंपळनेर रस्त्यावरील नवापूर तालुक्यातील रायपूर जामतलाव दरम्यान गुरूवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास रिव्हॉल्व्हर व चाकू धाक दाखवून धाक दाखवत 2 कोटी 41 लाख 50 हजारांची लुट झाल्याची घटना घडली होती. अवघ्या 12 तासात पोलिस अधीक्षक संजय पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या पथकाने गुजरात राज्यातील म्हैसाना शहरातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून एक कोटी 22 लाख 27 हजार 500 रूपये जप्त केले. पोलिसांनी पाच आरोपी...
  October 12, 09:32 PM
 • नाशिक- आजची देशाची वाईट स्थिती पाहता आणि संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता त्यांच्यावर केलेली सडकून टीका म्हणजे 2019 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचा बळीचा बकरा ठरणार आहेत, अशी टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. आंबेडकर म्हणाले, 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांत भाजपची सत्ता येणार नसल्याची संघाची खात्री झाल्याचे स्पष्ट होते. भय्या जोशींच्या वक्तव्याने मला हिटलरची आठवण झाली. हिटलरच्या सहकाऱ्यांनीसुद्धा हिटलरवर अविश्वास...
  October 12, 09:12 PM
 • यावल- व्हीप झुगारल्याप्रकरणी यावलमधील अपात्र ठरलेल्या दोन्ही नगरसेवकांना वेळेत नगर विकास मंत्रालयाकडे अपील दाखल करणे शक्य झाले नाही. शुक्रवारी दुपारी तक्रारदार दोन्ही गटाकडून कॅव्हेट मात्र दाखल झालेला आहे. कॅव्हेट दाखल झाल्यामुळे आता यात दोन्ही नगरसेवकांवर झालेली अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे एकूण प्रकारामुळे यावल नगरपालिकेचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. हेही वाचा.. यावल नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांना पक्षादेश झुगारल्याने...
  October 12, 09:05 PM
 • नवापूर - नवापूर तालुक्यातील पिंपळनेर रस्त्यावरील रायपूर जामतलाव दरम्यान गुरूवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास रिव्हॉल्वर व चाकूचा धाक दाखवून 2 कोटी 41 लाख 50 हजारांची लुट करण्यात आली आहे. भरदिवसा पडलेल्या या दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. व्यापारी जळगावहून गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कंपनीचा पैसा घेऊन जात असताना ही लूट करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक...
  October 12, 12:15 PM
 • नाशिक- जिल्हा न्यायालयात गुन्हेगारांना समर्थन देण्यासाठी आलेल्या समर्थकांची पोलिसांनी धरपकड केल्याच्या कारवाईनंतर तीनच दिवसात गुरुवारीही (दि. ११) पोलिसांनी अचानक न्यायालय परिसरात दिवसा कोम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांच्या २१ समर्थकांना अटक केली. सोमवारी अशाच प्रकारे धडक कारवाई करत सुमारे ६० समर्थकांना अटक करण्यात आली होती. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गणेशोत्सवामध्ये पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सर्व सूत्रे हाती घेत गुन्हेगारांवर जरब निर्माण करण्यासाठी...
  October 12, 10:39 AM
 • नाशिकरोड- उन्हाळ कांद्याची साठवणूक क्षमता संपली असल्याने बहुतांश कांद्यांना आता कोंब येत आहेत. दक्षिण भारतातही कांदा आवक कमी असून तेथून जो कांदा येत आहे तो सुद्धा खराब प्रतीचाच असल्याने नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याचे भाव क्विंटलमागे ४०० रुपयांनी वाढून किमान १२०० ते तर कमाल १,४५० रुपयांपर्यंत गेले होते. पावसाने यंदा अवकृपा केल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून अनेक तालुक्यांमध्ये पिण्यासाठी पाणी...
  October 12, 10:27 AM
 • नाशिक- गुजरात विधानसभा निवडणुकीत उदयास आलेल्या भारतीय ट्रायबल पार्टीने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही शिरकाव केला असून आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनी येत्या १५ नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील नांदूर येथे या पक्षाचा स्थापना मेळावा होत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आदिवासी मतदारसंघांमधून ही पार्टी स्वतंत्र आदिवासी उमेदवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात आले. २०१७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीआधी...
  October 12, 09:13 AM
 • जळगाव- आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांनी ठाेस आश्वासन दिल्यानुसार मागण्या पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. जळगाव शहरातील आदिवासी मुला-मुलींचे शासकीय आदिवासी वसतिगृह आदिवासी विकास विभागाकडून चालवण्यात येते. या विभागाकडून सन २०१६-१७ या वर्षी ६०० विद्यार्थ्यांना...
  October 12, 08:10 AM
 • नाशिक- राज्यात साथीच्या अाजारांबराेबरच स्वाइन फ्लूचे संकट दिवसेंदिवस गडद हाेत असून, या अाजाराची लागण झालेल्या १६१० रुग्णांवर उपचार करण्यात अाले अाहेत. यातील १८४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण अाहे. विशेष म्हणजे, थंड हवामान असलेल्या पुणे अाणि नाशिकमध्ये सर्वाधिक स्वाइन फ्लूची साथ पसरली अाहे. नाशिकमध्ये मृत्यूचा अाकडा ४३ वर पाेहाेचला अाहे. सरकारी यंत्रणेकडून स्वाइन फ्लू अाटाेक्यात अाणण्यासाठी विविध उपाय याेजले जात असताना त्यात यश...
  October 12, 08:01 AM
 • जळगाव- वर्षभरापूर्वी सचखंड एक्स्प्रेसने अाैरंगाबाद ते ग्वालियर दरम्यान प्रवास करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा माेबाइल चाेरट्यांपासून बचाव करताना रेल्वेतून खाली पडून जागीच मृत्यू झाला हाेता. ही घटना जळगाव रेल्वेस्थानक साेडल्यानंतर घडली हाेती. या प्रकरणी मृत तरुणांच्या वारसांना रेल्वेने ८ रु. लाखांची भरपाई द्यावी, असे अादेश देण्यात अाले अाहेत. अाैरंगाबाद शहरातील अंगुरीबाग येथील रहिवासी असलेला नरेशकुमार चंद्रप्रकाश जैस्वाल (वय २२) हा तरुण ५ मार्च २०१७ राेजी सचखंड एक्स्प्रेसने...
  October 12, 07:35 AM
 • नाशिक/ नांदेड- इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाले असून कर्यकर्त्यांनी गुरुवारी पेट्रोल पंपावर आंदोलन केले. नाशिकमध्ये त्र्यंबकनाका येथे पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टर काळे फासण्यात आले. नांदेडमध्येही मोदींच्या बॅनरवर शाईफेक करण्यात आली. तसेच पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना चॉकलेट देऊन इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला. दुसरीकडे, संगमनेरमध्येही नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळे फासण्यात आले आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते सत्यजित तांबेंविरोधात...
  October 11, 07:33 PM
 • विषय समित्याच्या निवडीबाबत सत्ताधाऱ्यांच्या अपूर्ण ज्ञानाचे दोघे बळी.. यावल- यावल नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांनी पक्षादेश झुगारल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सुधाकर धनगर आणि रेखा युवराज चौधरी यांचा यात समावेश आहे. शहर विकास आघाडीचे गटनेते व माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या दिनांक 15 जानेवारी 2018 रोजी झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत सुधाकर धनगर यांना देवयानी महाजन यांना पाणीपुरवठा सभापती पदासाठी सुचक किंवा अनुमोदक...
  October 11, 02:33 PM
 • जळगाव- भुसावळ आणि जळगाव तालुक्यातील २ हजार २८८ एकर वनजमीनींचे बनावट ७/१२ उतारे तयार करुन परस्पर विक्री करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी चाैकशीसाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीनेे केलेल्या चौकशीत वनजमिनींची परस्पर विक्री करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज समितीच्या अध्यक्षांनी व्यक्त केला. निवडक गटांच्या केलेल्या पडताळणीत ही जमीन वनविभागाच्याच नावावर...
  October 11, 10:57 AM
 • जळगाव- महापालिकेत उमेदवारी देताना काही चुका झाल्याने जामनेरप्रमाणे जळगावात १०० टक्के यश अाले नाही. जळगावातील सर्वच क्षेत्रात ८० टक्के सत्ता भाजपची अाहे. ती १०० टक्के करण्यासाठी येत्या काळात काम करायचे अाहे. जिल्ह्यात अाता शिवसेनेचे तीन अाणि राष्ट्रवादीचा एकच अामदार उरला अाहे. काँग्रेस संपलेलीच असल्याने त्यांचा विषयच नाही; परंतु येत्या निवडणुकीत शिवसेना अाणि राष्ट्रवादीच्या अामदारांचे नाव घेत त्यापैकी एकही अामदार निवडून येऊ देणार नाही, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी...
  October 11, 10:41 AM
 
जाहिरात

RECOMMENDED