जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Dhule

Dhule News

 • नंदुरबार - अन्नपदार्थ थोडा तिखट झाला तर दोन्ही डोळ्यांतून पाणी येते. मिरच्या चिरल्यानंतर हाताची आग कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. मात्र, मिरचीच्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या सुनीता, रूपाली आणि त्यांच्यासारख्या १० हजार महिला दिवसभर मिरच्यांमध्ये बसून राहतात आणि हाताने मिरच्या ताेडल्यानंतही त्यांना त्रास हाेत नाही. ४५ अंश तापमानात या सर्व तिखट मिरच्यांमध्ये राहतात. सर्व कामगार केवळ महिला असलेले असे अनेक कारखाने महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात आहेत. शुद्धतेसाठी...
  May 1, 10:15 AM
 • ग्राउंड रिपोर्ट- नंदुरबार लोकसभा मतदारसंघात फिरलात तर कुठेही निवडणुकीचे वातावरण दिसत नाही. नेत्यांच्या सभा, रॅली एवढ्यापुरताच प्रचार दिसतो. यंदा प्रथमच गांधी, नेहरू घराण्यातील व्यक्तीची इथे सभा झाली नाही. भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावितांसाठी मोदींनी सभा घेतली. गत निवडणुकीत मोदी लाटेवर आदिवासीही स्वार झाले होते. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळे भाजपला २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळाला होता. डॉ....
  April 26, 09:09 AM
 • धुळे : शहरापासून जवळ असलेल्या महिंदळे शिवारातील तरुणीला दोन महिन्यांपूर्वी पळवून नेणाऱ्या प्रेम उर्फ विकास पाटील याला पुणे जिल्ह्यातील पारेगाव येथून पोलिसांनी अटक केली. परंतु न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांच्या कोठडीत असताना त्याने स्वेटरप्रमाणे असलेल्या उबदार कपड्याच्या लेसने गळफास घेतला. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. संजनाचा प्रेमविरह व भावनिक असलेल्या संजनाच्या चिंतेतून त्याने पाऊल उचलल्याचे पोलिसांना सांगितले. जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी असलेला प्रेम उर्फ विकास...
  January 30, 12:11 PM
 • धुळे :शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी देशोधडीला लागले आहे. शेतकरी व शेतमजुरांची अवस्था बिकट झाली आहे. शेतकऱ्यांच्या शासनाकडून फार अपेक्षा नाही. फक्त शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळावा. तसे झाल्यास शेतकरी सदन होतील. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन निवडणुका जिंकल्या जातात. कर्जमाफी हा निवडणुका जिंकण्याचा फंडा झाल्याचे प्रतिपादन विजय जावधिया यांनी केले. येथील मूव्हमेंट फॉर पीस अॅण्ड जस्टीस फॉर वेल्फेअर जनआंदोलनातर्फे शनिवारी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मेळावा झाला....
  December 23, 11:04 AM
 • धुळे :शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून बुधवारी सायंकाळी अर्ध्या तासात चोरट्यांनी पाच प्रवाशांचे मोबाइल लांबवले. या घटनेनंतर प्रवाशांनी बसस्थानकातील पोलिस चौकीत तक्रार केली. उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात चोऱ्या वाढल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी पोलिस चौकी करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिस कर्मचारी थांबत नसल्याचे वृत्त दिव्य मराठीने दिले होते. त्यानंतर आता कर्मचारी चौकीत दिसून येतात. त्याचबरोबर...
  December 20, 12:51 PM
 • धुळे :शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचापासून जवळ असलेल्या मांडळ येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत दाऊळ येथूनही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. या मुलीच्या पालकांनी एकावर संशय व्यक्त केला आहे. दोन्ही घटनांविषयी दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांडळ गावातील तरुणी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. याबाबत दोंडाईचा पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली होती. या विषयी पीडित मुलीच्या वडिलांनी...
  December 20, 12:45 PM
 • धुळे - पोलिस दल निवडणुकीच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याचे पाहून शहरातील साक्री रोडवर असलेल्या गरुड व्यापारी संकुलातील औषध दुकान चोरट्यांनी फोडले. या दुकानातून पावणेपाच लाखांची रोकड लांबवण्यात आली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यानंतर दुकानाबाहेरील सीसीटीव्ही तपासल्यानंतर चोरट्यांचा चेहरा समोर आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील मोगलाई परिसरातील रहिवाशी असलेले सचिन दिलीप बडगुजर यांचे गरुड व्यापारी संकुलातील एफ ५८ येथे साईसिद्धी हे औषधांचे दुकान आहे....
  December 10, 10:26 AM
 • धुळे - निवडणुक आयोगाने तृतीयपंथी मतदारांची स्वतंत्र नोंदणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे त्यांना मतदान करण्याचा हक्क मिळाला. त्यानुसार महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच शहरातील आठ तृतीयपंथींनी प्रभाग क्रमांक ११ मधील मतदान केंद्रात मतदान केले. धुळे शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत इतरांमध्ये १३ मतदारांची नोंद आहे. त्यात बहुतांश मतदार तृतीयपंथी आहे. यापूर्वी मतदार यादीत स्त्री आणि पुरुष या दोन गटातच मतदारांची नोंदणी होत होती. त्यामुळे तृतीयपंथींना मतदानाच्या हक्कापासून...
  December 10, 10:18 AM
 • धुळे -शहरातील प्रभाग एकमध्ये गाेंदूर राेडवरील जिल्हा परिषदेच्या शाळेतील केंद्रावर दुपारी ३ वाजता उमेदवारांच्या समर्थकांचे दाेन गट समाेरासमाेर अाले. त्यानंतर तुफान हाणामारी झाली. पाेलिसांनी समजावण्याची भूमिका घेतली. मात्र दाेन्ही गटांमधील तरुण एेकत नव्हते. त्यामुळे तणाव वाढला. परिणामी पाेलिसांनी साैम्य लाठीमार केला. त्यानंतर तरुणांचा हा जमाव वस्त्यांमध्ये पळाला. तेव्हा पाेलिसांनी थेट वस्त्यांमध्ये जावून जमावाला दूरवर पळवून लावले. त्यानंतर सायंकाळपर्यंत शांततेत मतदान झाले....
  December 10, 10:07 AM
 • अहमदनगर आणि धुळे महापालिका निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. यात नगरमध्ये ६७, तर धुळ्यात ६० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (१० डिसेंबर) सकाळी दहापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नगरमध्ये दुपारनंतर प्रतिसाद : नगरमहापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत १७ प्रभागांतील ६८ जागांसाठी रविवारी शहरातील ३३७ केंद्रांवर सुमारेे ६७ टक्के मतदान झाले. सकाळी साडेअकरापर्यंत मतदानाला कमी प्रतिसाद होता. दुपारनंतर मात्र मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. जिल्हाधिकारी...
  December 10, 09:43 AM
 • धुळे - निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरताना राजकीय नेते मुहूर्ताला प्राधान्य देतात, काही उमेदवार त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवतेचे पूजन केल्याशिवाय निवडणुकीच्या कामासाठी बाहेर पडत नाही. हा श्रद्धेेचा भाग आहे. मात्र, महापालिका निवडणुकीच्या आखाड्यातील एका उमेदवाराच्या दारासमोर अज्ञात व्यक्तीने काळी बाहुली, मिरची, लिंबू ठेवल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. अंधश्रद्धेेच्या केविलवाण्या प्रयत्नाविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली. महापालिका निवडणूक आरोप-प्रत्यारोपांमुळे...
  December 9, 10:00 AM
 • धुळे - महापालिकेसाठी उद्या रविवारी मतदान होणार आहे. त्यापूर्वी शनिवारी शहरात ५० हजारांची रोकड पकडण्यात आली. त्यात एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याचबराेबर आचारसंहिता भंगापासून हाणामाऱ्या, प्राणघातक हल्ला करणे, विनयभंगाचे गुन्हेही दोन दिवसांत दाखल करण्यात आले. केस क्र.१ : भाजप उमेदवाराचा विनयभंग, तिघांविरुद्ध गुन्हा शहरातील शासकीय दूधडेअरी परिसरात भाजपच्या महिला उमेदवाराला अडवून तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
  December 9, 09:51 AM
 • धुळे-शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या शेतकऱ्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी नापिकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. बाम्हणे गावातील पंढरीनाथ रामदास रगडे-पाटील (वय ५३) यांनी शेतात झाडाला गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर काही वेळात पाेलिस निरीक्षक भगवान मथुरे यांचे पथक दाखल झाले. हा प्रकार काल गुरुवारी घडला....
  December 8, 09:31 AM
 • धुळे - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल काॅरिडाॅरमध्ये महत्त्वाचा भाग असलेल्या धुळे शहरातून दाेन राष्ट्रीय महामार्ग जातात. भाैगाेलिक स्थान, उद्याेगासाठीची अनुकूलता, दिग्गज राजकारण्यांचे केंद्र असूनही शहराचा पाहिजे तसा विकास झाला नाही. शहरातील प्राथमिक सुविधा, विस्तारलेल्या उपनगरांचा विकास अाणि बेराेजगारी राेखण्यासाठी उद्याेगांना चालणारे देणारे धाेरण असावे, याकडे लक्ष देणारे लाेकप्रतिनिधी महापालिकेत असावे, असा सूर धुळेकरांमध्ये उमटला अाहे. या विषयी दिव्य मराठीने नागरिकांच्या भावना...
  December 6, 10:46 AM
 • धुळे - महापालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान हाेणार अाहे. निवडणुकीपूर्वी ४८ तास अगाेदर प्रचार थांबणार अाहे. शुक्रवारी (दि.७) सायंकाळी ७ वाजता प्रचाराच्या ताेफा थंडावणार अाहेत. त्यामुळे उमेदवारांकडे अाता प्रचारासाठी केवळ ४८ तास शिल्लक अाहेत. या ४८ तासांत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पाेहाेचण्याचे नियाेजन सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून करण्यात अाले अाहे. त्यासाठी या दाेन दिवसात प्रचारफेरी, काेपरा सभांसह माेठ्या नेत्यांच्या सभा हाेणार अाहेत. महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष...
  December 6, 10:43 AM
 • धुळे -धुळे शहरातील प्रभाग क्रमांक १५मध्ये राजकारणाचा अनुभव असलेल्या उमेदवारांच्या विरोधात उच्चशिक्षित, तरुण उमेदवार रिंगणात आहेत. प्रभागातून १८ उमेदवार नगरसेवक पदाच्या शर्यतीत आहेत. तरुण उमेदवारांनी मातब्बर उमेदवारांसमोर कडवे आव्हान उभे केले असल्याने या लढतीत कोण बाजी मारतो याकडे प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. प्रभाग क्रमांक १५मध्ये साक्री रोडवरील भीमनगर ते फाशीपूल या परिसराचा समावेश होतो. प्रभागात सुमारे १५ हजार ४२९ मतदार असून, १८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात बहुतांश...
  December 6, 10:37 AM
 • धुळे - शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये विकासाचा मोठा अनुशेष आहे. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, बहुजन समाज पार्टी, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, लोकसंग्रामचे उमेदवार रिंगणात आहेत. महापालिकेची हद्दवाढ झाल्याने या प्रभागात चितोड गावाचा समावेश झाला असून, गावातील नागरिक प्रथमच महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करतील. त्यामुळे त्यांचा कौल निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे. या प्रभागात चितोड गावासह मोतीनाला परिसर, कालिकानगर, अजबेनगर, कृषीनगर,...
  December 6, 10:24 AM
 • धुळे-महापालिका निवडणुकीत मंगळवारी चिन्ह वाटप करण्यात आले आहे. या वेळी महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षासह अपक्ष उमेदवारही मोठ्या प्रमाणात रिंगणात उतरले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षासह अपक्षांना निवडणूक अधिकारीनी चिन्हाचे वाटप केले आहे. या वेळी आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्या लोकसंग्राम पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आलेल्या उमदेवारांना शिट्टी या चिन्हाची मागणी केली होती. मात्र, त्यांनी अर्ज भरताना एबी फॉर्म न दिल्याने त्यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले नाही. याकरिता आमदार अनिल...
  November 28, 12:24 PM
 • धुळे -शहरातील महिलेवर शेजारच्यांनी प्राणघातक हल्ला करीत मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेनंतर जवळपास महिना उलटला तरी अद्यापपर्यंत आझाद नगर पोलिस ठाण्यात पीडित महिलेची साधी फिर्याद दाखल करण्यात येत नाही.यासंदर्भात महिला आयोगाच्या दामिनी अन्याय अत्याचार केंद्राचा दरवाजा खटकावून न्यायाची अपेक्षा केली आहे.या प्रकरणी राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयकासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कैफियत मांडली आहे. शहरातील सुभाषनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या नूतन भदाणे या महिलेला १५...
  November 28, 12:19 PM
 • धुळे- महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची काल गुरुवारी छाननी झाली. ही प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. छाननीत ७३७ उमेदवारी अर्जापैकी ४६६ अर्ज वैध ठरले. तसेच ४५ उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाल्याने हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर गेले आहेत. भाजपचे उमेदवार शीतल नवले, दीपक खोपडे व माजी महापौर मोहन नवले यांच्या उमेदवारी अर्जावरील हरकत फेटाळण्यात आली. महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे सहा कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या...
  November 24, 12:58 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात