Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • यावल- तालुक्यातील डांभुर्णी गावाजवळ जळगाव मार्गावर दुचाकी व रुग्णवाहिकेची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. शुक्रवारी दुपारी 3 वाजता हा अपघात झाला. समाधान भावलाल कोळी व अंकुश शाम कोळी (दोघे रा. चांदसर, बुद्रुक ता. धरणगाव) अाी मृत तरुणांची नावे आहेत. रूग्णवाहिका गरोदर महिलेला घेऊन जळगावकडे जात होती. मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील विदगाव- जळगाव रस्त्यावर डांभुर्णीकोळन्हावी गावाच्या दरम्यान पेट्रोलपंप आहे. या पेट्रोल पंपाच्या पुढील वळनावर शुक्रवारी दुपारी...
  November 16, 08:44 PM
 • नवापूर- नगरपालिकेमधील काँग्रेसच्या दोन नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार आली आहे. दोघांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. काँग्रेस मागील वर्षी झालेल्या नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा अ मधून ओबीसी महिला पदासाठी काँग्रेसच्या उमदेवार सारिका मनोहर पाटील या निवडून आल्या होत्या. तर दुसरे नगरसेवक प्रभाग क्रमांक सात अ मध्ये ओबीसी पुरूष म्हणून दर्शन प्रताप पाटील हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. खोटे जातप्रमाणपत्र दाखवून लढवली निवडणूक दोन्ही...
  November 16, 04:38 PM
 • बुलडाणा- एका शेतकरी महिलेने स्वत:च सरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिखली तालुक्यातील धोत्राभांगोजी या गावात14 नोव्हेंबरला रात्री ही घटना घडली आहे. आशाबाई दिलीप इंगळे असे मृत महिलेचे नाव आहे. आशाबाई यांनी गायीच्या गोठ्यात लाकडे रचून त्यावर पांघरुण टाकून त्यांनी स्वतःला पेटवून घेतले. सततची नापिकी आणि दुष्काळामुळे आशाबाई यांनी जीवनयात्रा संपविल्याचे बोलले जात आहे. शेजारच्यांनी वाचविण्याचा केला प्रयत्न.. पण, आशाबाई इंगळे 14 नोव्हेंबरच्या रात्री गोठ्यात...
  November 16, 02:48 PM
 • जळगाव- अमळनेर येथील व्यापाऱ्याकडून घेतलेला सुगम, धनाडाळ, सिगारेट आदी ३ लाख १० हजार रुपयांचा माल सिंधी कॉलनीतील व्यापारी मायलेकांनी विकत घेतला. त्यानंतर तोतया पोलिसाने कारवाईदरम्यान माल जप्त केल्याचा बनाव करून अमळनेरच्या व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात बुधवारी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाेलिसांनी मायलेकास अटक केली आहे. दीपक आणि सिमरण चेतवाणी अशी दाेघांची नावे आहेत. अमळनेर येथील सिंधी कॉलनीत प्रकाश वरियलदास...
  November 16, 09:15 AM
 • यावल- तालुक्यातील शिरसाड येथे एका 52 वर्षीय शेतकर्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी घडली. गोकुळ काशिनाथ अलकरीराजपूत असे मृत शेतकर्याचे आहे. स्वत:च्या शेतात गवत कापताना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांना सर्पदंश झाला. शिरसाड येथील शेतशिवारात गोकुळ अलकरी यांची शेती आहे. त्या शेतात गुरूवारी सकाळी ते गुरा-ढोरांकरीता गवत आणण्याकरीता गेले होते. दरम्यान, गवत कापताना त्यांच्या हाताला सापने चावा घेतला. ते तत्काळ घरी परतले. साकळी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात...
  November 15, 03:52 PM
 • जळगाव- शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लाकडे नसल्याने दोन तास मृतदेहाला ताटकळत ठेवण्याची वेळ बुधवारी दुपारी आली. पहिल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होत नाही तोपर्यंत दुसरा मृतदेह आल्याने त्याही मृतदेहासाठीही लाकडांचा प्रश्न उद्भवला. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. नेरीनाका वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कारासाठी लाकडे पुरवणे महापालिकेने बंद केले आहे. यावर उपाय म्हणून शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी खासगी पातळीवर मक्तेदार नेमून ज्यांची आर्थिक परिस्थिती...
  November 15, 11:52 AM
 • यावल - तालुक्यातील किनगाव जवळ दोन दुचाकींची आपसात धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर एकाचा रुग्णालयात जाताना मृत्यू झाला. मृतांची नावे महेश पिंजरकर (रा. भुसावळ) आणि कुरबान महारु तडवी असे आहे. तो स्वराज ट्रॅक्टरचा सेल्समन होता. अपघात बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. इतर दोन जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास स्वराज ट्रॅक्टर पाडळसा येथील सेल्समन महेश पिंजरकर (40) हे दुचाकी क्रमांक एम.एच. 19 बी. एल. 7365 द्वारे किनगावला जात होते....
  November 14, 05:49 PM
 • जळगाव-श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थानतर्फे दिवाळीच्या पंचमीला सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता १००८ खाद्यपदार्थांचा अन्नकूटचा प्रसाद चढवण्यात आला. देवस्थानात ही परंपरा मंदिर निर्मितीपासून म्हणजे सन १९८८ पासून सुरू आहे. यात सिद्धी व्यंकटेशाला मोसंबीद्वारे तर माता लक्ष्मीला ५० ते ६० हजार बांगड्यांद्वारे सजवण्यात आले होते. या वेळी मंदिरात सायंकाळी ५.३० वाजेपासूनच भाविकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थानतर्फे दर वर्षी अन्नकूटचा कार्यक्रम घेण्यात येतो....
  November 13, 12:59 PM
 • जळगाव - दोन माथेफिरूंनी दुचाकीसह दुमजली घरावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना द्रौपदीनगरात रविवारी मध्यरात्री घडली. या घरात १४ दिवसांच्या बालकासह पाच जण झोपले असतानाही हा प्रयत्न झाल्याने कुटुंबीय हादरले. सुदैवाने धुरामुळे वेळीच जाग अाल्याने सर्वांचे प्राण वाचले असून ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. द्रौपदीनगरातील सुनंदा जालम चौधरी यांच्या घरी हा प्रकार घडला. रविवारी रात्री चौधरी कुटुंबीय झोपले असताना मध्यरात्री १२.१० ते १ वाजेदरम्यान विना...
  November 13, 12:51 PM
 • धुळे-शहराचा अागामी महापाैर मीच अाहे, अशी घाेषणा अामदार अनिल गाेटे यांनी मेळाव्यात केली. त्याचवेळी अामचाच भाजप प्युअर अाहे. अाेरिजनल अाहे. ते तर हायब्रीड बीजेपीवाले अाहेत. त्यात डांबरचाेर, डंपरचाेर, माेबाइलचाेरांची भरती झाली अाहे, अशी खरमरीत टीकाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर केली. भाजपच्या नेतृत्वाला थेट अाव्हान देत अामदार गाेटे यांनी रविवारी बंडाचा झेंडा उभारला. अाम्ही देऊ तेच भाजपचे उमेदवार असतील, असा पवित्राही घेतला. त्याचवेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरेंवर चाैफेर...
  November 12, 11:48 AM
 • जळगाव- दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागात एकाने रिक्षाचालकाच्या पोटात चाकूने वार करून भररस्त्यावर खून केला. गुरुवारी (८ नोव्हेंबर) सायंकाळी ५.१५ वाजता रेल्वेस्थानकाच्या बाहेर हा थरार घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. इस्माईलशहा गुलाबशहा (वय ३६, रा.गेंदालाल मिल) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर नितीन जगन पाटील उर्फ पपई (वय २३, रा. सरुताईनगर, आव्हाणे, ता. जळगाव) याने शहा यांचा खून केला आहे. नितीन हा देखील रिक्षाचालक आहे....
  November 11, 11:36 AM
 • भुसावळ- भाजपने आमचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसेंवर अन्याय केला, तर आमच्यासारख्या सर्वसामान्यांचे काय, असा सवाल रावेर लोकसभा मतदारसंघातील खडसे समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना केला. शनिवारी शहरातील आयएमए सभागृहात रावेर लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुख, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक आढावा बैठक झाली. या वेळी खडसेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून कार्यकर्त्यांनी गदारोळ केला. यानंतर प्रदेशाध्यक्ष दानवेंनी केवळ चार वाक्यांचे अध्यक्षीय मनोगत...
  November 11, 10:22 AM
 • भुसावळ- ऐन सण उत्सवाच्या काळात महानिर्मितीच्या केंद्रांतून होणाऱ्या वीजनिर्मितीमध्ये तब्बल अडीच हजार मेगावॅटने घट झाली आहे. राज्य विज नियामक आयोगाने मेरिट ऑर्डर डिस्पॅच अर्थात एमओडीची (प्रथम मागणी करणाऱ्यांना वितरण) संकल्पना मांडल्याने आता महानिर्मितीच्या वीजनिर्मिती केंद्रांना घरघर लागली आहे. कोळशाच्या वाहतुकीचे दर वाढल्याने राज्यातील नाशिक, परळी, पारस आणि भुसावळ या कोळसा खाणींपासून दूर अंतरावर असलेल्या वीजनिर्मिती केंद्रांचे भवितव्य धोक्यात आहे. नवरात्रोत्सवाच्या...
  November 10, 09:29 AM
 • यावल- चिंचोली येथे लहान मुलीस बकरीच्या पिलाने धक्का दिल्याने झालेल्या वादात एका महिलेचा विनयभंग तसेच तिच्या सासूला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी यावल पोलिस स्टेशनमध्ये तीन जणांविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचोली (ता. यावल) येथील पीडित विवाहितेने सांगितले की, 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी घराबाहेर खेळत होती. आरोपी भूषण भानुदास कोळी, रेखा भूषण कोळी, मंगलाबाई भानुदास कोळी यांच्या...
  November 9, 12:59 PM
 • यावल- शहरातील विस्तारित भागामध्ये कुलूप लावून बंद असलेली घरे पुन्हा चोरट्यांच्या रडारवर आली आहेत. विस्तारित भागातील आयशा नगरमध्ये लक्ष्मीपूजनाच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी एका घराला टार्गेट करीत 40 हजाराच्या रोकडसह सुमारे सोने-चांदीची दागिने लांबविली. जवळपास एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. घरफोडी गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. आयेशा नगरमध्ये जमील खान रुस्तम खान उर्फ गोंडू पेंटर हे राहातात. बुधवारी सायंकाळी सावदा येथील त्यांच्या एका नातेवाइकाचे अपघाती निधन झाले....
  November 8, 02:05 PM
 • धुळे-शहरात सायंकाळी सहा ते साडेअाठ वाजेच्या सुमारास मुहूर्त साधत घराेघरी लक्ष्मीपूजन झाले. त्याचवेळी फटाक्यांची एकच बरसात झाली. लाखाे अाकाशकंदिलांच्या सान्निध्यात फटाक्यांची अातषबाजी झाल्याने शहर प्रकाशाने उजळून निघाले. दहा वाजेच्या अात शहरभरात फटाक्यांची अातषबाजी झाली. दरम्यान भाऊबीजेसाठी जाणाऱ्यांची गर्दी वाढली असून, एसटी बसेस लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही फुल्ल झाल्या होत्या. दीपावली पर्वात लक्ष्मीपूजनाला शहरात सायंकाळी आग्रा रोडवरील दुकान, शोरूम, सोन्या-चांदीच्या...
  November 8, 11:52 AM
 • जळगाव- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या तीन दिवसांपासून शहरातील हवा व ध्वनी प्रदूषण तपासणीसाठी पाच ठिकाणी स्वयंचलित मशिन लावले अाहेत. यात १५ दिवस हवेची तर तीन दिवस ध्वनी प्रदूषणाची तपासणी केली जाणार अाहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा तीन दिवसांत फटाक्यांची अातषबाजी कमी असली तरी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने त्याची भर भरून काढण्यात अाली. दिवाळी म्हटली की दिवे, फराळ अाणि फटाक्यांची अातषबाजी हे समिकरण ठरलेले अाहे. वसुबारसपासून सुरू झालेल्या दीपाेत्सवात...
  November 8, 11:38 AM
 • जळगाव- जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी यंदाची दिवाळी आदिवासी लोकांसोबत साजरी केली. महाजन यांनी सपत्नीक चोपडा तालुक्यातील तांबडी पाडा या आदिवासी गावाला भेट दिली. लोकांची भेट घेऊन त्यांना मिठाई वाटप केली. मंत्र्यांनी आपल्यासोबत दिवाळी साजरी केल्यानंतर आदिवासींमधून आनंद व्यक्त केला जात आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...
  November 7, 02:46 PM
 • यावल- शहरातील बुरुज चौकात अतिक्रमणाने एका वयोवृद्ध महिलेचा बळी घेतला आहे. रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला ट्रकने जोरदार धडक दिली. यात महिला गंभीर जखमी झाली. उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. मात्र, वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जिजाबाई शांताराम पाटील (वय-75, रा. सुंदर नगरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ऐन दिवाळी पाटील कुटुंबावर शोककळा पसरली आहे यावल शहरातून बुरूज चौकातून चोपड्याकेडे केळीने भरलेला ट्रक (यू.पी. 76 के. 9245) जात होता. दुपारी एक वाजेच्या...
  November 6, 04:51 PM
 • जळगाव- एटीएम केंद्रात शरद खडके यांचे लक्ष विचलित करून त्यांचे एटीएम कार्ड अदलाबदल करून भामट्यांनी नंतर चार दिवसांत वृद्धाच्या खात्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसे काढले. सोने खरेदी केले, गाडीत पेट्रोल भरले. यात वृद्धाची भामट्यांनी चक्क पाच लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या भामट्यांनी अखेरची खरेदी मध्य प्रदेशात केली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. खडके यांचे स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत खाते आहे. ते २८ ऑक्टोबर रोजी बँकेच्या परिसरात असलेल्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी...
  November 6, 12:20 PM
 
जाहिरात

RECOMMENDED