Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • बुलडाणा- डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आलेल्या एका ट्रकने अचानक पेट घेतला. आग एवढी झपाट्याने पसरली की ती विझवणे कोणालाही शक्य झाले नाही. ट्रक क्षणात जळून खाक झाला. ही घटना खामगाव तालुक्यात टेंभुर्णा गावाजवळील अग्रवाल पेट्रोल पंपावर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
  09:24 PM
 • जळगाव- शहरातील ममुराबाद नाका परिसरातील लेंडी नाल्यावरील 15 फूट उंच लोखंडी पुलावरून अंत्ययात्रा जात असताना अचानक हा पूल कोसळला. मृतदेहासह 13 नागरिक थेट नाल्यात पडल्याने जखमी झाले. सोमवारी दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली. चिखलाने माखलेल्या नागरिकांनी शेजारील हातपंपावर अंघोळ करून दफनविधी पार पाडला. शनिपेठेत राहणारे नारायण हरी घुगरे (54) यांचे रविवारी निधन झाले. सोमवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा ममुराबाद नाक्यावरील लिंगायत गवळी समाजाच्या दफनभूमीत येत होती. या वेळी अंत्ययात्रा जात असताना...
  09:14 PM
 • तळोदा- किराणा घेण्यासाठी गेलेल्या दोन मुलींची डुंगी अर्थात छोटी होडी सरदार सरोवराच्या पाण्यात उलटली. यात बारा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला तर एक मुलगी थोडक्यात बचावली. सपना वादऱ्या पावरा असे मृत मुलीचे नाव असून ती सावऱ्या दिगर येथील राहाणारी होती. सावर्या दिगर या गावाला रस्ता नसल्याने साधा किराणा घेण्यासाठी या भागातील लोकांना डुंगीचा वापर करावा लागतो. अशातच डुंगी उलटून झालेल्या अपघातात सपनाचा बुडून मृत्यू झाला. अन्य एका मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात गावकर्यांना यश मिळाले...
  05:34 PM
 • नंदुरबार/जळगाव/बुलढाणा- राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यात सोमवारी नंदुरबारसह जळगाव, बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाचा पिकांना मोठा फटका बसणार आहे. नंदुरबार शहरासह परिसरात सोमवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरणात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक पाऊस झाल्याने मिरची व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली. या पावसामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरची काळी पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोल्हापूर शहराला सोमवारी मध्यरात्री दोन वाजता...
  04:59 PM
 • जळगाव - अाव्हाणे शिवारातील महापालिकेच्या मालकीचा डाेकेदुखी ठरलेला घनकचरा प्रकल्प लवकरच कार्यान्वित हाेणार अाहे. गेल्या पाच वर्षांपासून साठवण्यात येणाऱ्या कचऱ्यावर बायाे मायनिंग या शास्त्राेक्त पद्धतीने प्रक्रियेचा मार्ग माेकळा झाला अाहे. पालिकेने घनकचरा व्यवस्थापनाच्या डीपीअारमध्ये सुधारित तांत्रिक मान्यता घेतल्यावर पुढची कार्यवाही सुरू हाेईल. यामुळे अाव्हाणे गावासह निमखेडी व परिसरातील नागरिकांना हाेणाऱ्या त्रासावर इलाज केला जाणार अाहे. महापालिका क्षेत्रातील कचऱ्यावर...
  11:00 AM
 • जळगाव - शहरातील श्रीराम मंदिर संस्थानच्या रथाेत्सवाला सन १८७२मध्ये सुरुवात झाली. साग व तिवसाच्या २३० मण लाकडापासून यावलचे त्र्यंबक नारायण मिस्त्री यांच्या कलाकुसरीतून दाेन वर्षात हा रथ साकारला हाेता. रथाेत्सवाचा मार्ग गेल्या ७० वर्षांपूर्वी विस्तारला गेला. त्यापूर्वी रथाचा मार्ग हा जुने जळगाव पुरताच मर्यादित हाेता. जळगाव शहराचा मानबिंदू असलेला रथाेत्सव साेमवारी अाहे. यानिमित्ताने श्रीराम मंदिर संस्थान व अप्पा महाराज समाधीचे सातवे गादीपती मंगेश महाराज यांनी रविवारी (दि.१८) दिव्य...
  10:50 AM
 • जळगाव - कौटुुंबिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे प्रशांतला अार्थिक भार पेलावा लागला. यासाठी सातत्याने आई-वडिलांसोबत काम करावे लागते. शिक्षण घेत असतानाच तो माळरानावर बकऱ्या चारण्याचे काम करतो. हे काम करीत असतानाच मिळेल त्या वेळेत वेटलिफ्टिंगचा सराव करीत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांर्गत फैजपूर येथील डी.एन. कॉलेजच्या प्रशांत कोळी या विद्यार्थ्याने कालिकत, केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत वेटलिफ्टिंग या खेळात सुवर्णपदक प्राप्त...
  09:06 AM
 • यावल- तालुक्यात अपघाताची मालिका थांबता थांबत नाही आहे. शनिवारी सांयकाळी पिळोदा- थोरगव्हाण रस्त्यावर मालवाहू अॅपेरिक्षा रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. वना गोविंदा भिल (वय ५५, रा. दगडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अपघातानंतर रिक्षा चालक फरार झाला. मिळालेली माहिती अशी की, विना क्रमांकाच्या माल वाहतूक करणारी अॅपेरिक्षा थोरगव्हाणकडून मनवेलकडे येत होता. दरम्यान, मनवेलगावा जवळील पिळाेदा फाट्याजवळ अचानक रस्त्याच्या कडेला रिक्षा उलटला. अपघातात वना गोविंदा भिल...
  November 18, 07:25 PM
 • जळगाव - महापालिका हद्दीतील ३०० चाैरस मीटरपर्यंतच्या नवीन बांधकामांना मंजुरीचे अादेश पुन्हा सहायक नगररचना संचालकांकडे साेपवण्यात अाले अाहे. महापालिका अायुक्त चंद्रकांत डांगे यांनी हे अधिकार स्वत:कडे घेतले हाेते. पालिका नगररचना विभागात पूर्वीपासून तीनशे चौरस मीटरपेक्षा मोठे बांधकाम प्रकरणांना आयुक्तांकडून मंजुरी मिळत असे. यापेक्षा छोटी प्रकरणे सहायक नगररचनाकारांकडून मंजूर केली जात असत. मात्र, नगररचना विभागातील प्रचंड गाेंधळ, दुजाभावाचे अाराेप व तक्रारींमुळे आयुक्त चंद्रकांत...
  November 18, 11:22 AM
 • जळगाव - पाणवठ्याच्या शाेधासाठी रस्ता अाेलांडण्यासाठी नीलगायीने झेप घेताच लक्ष विचलित झाल्याने दाेन चारचाकी समाेरासमाेर धडकल्या. त्यात जळगावच्या एका युवकाचा मृत्यू झाला. तर दाेन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. दरम्यान, या अपघातात नीलगायीचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता कुसुंब्याजवळ घडली. गणेश सुभाष साेनार (वय ३५, रा. जाेशीपेठ, जळगाव) असे या अपघातातील मृत तरुणाचे नाव अाहे. तर जितेंद्र...
  November 18, 11:20 AM
 • जळगाव - दमणगंगा अाणि तापी नदी या देशातील अत्यंत महत्त्वाकांक्षी नदीजाेड प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली. महाराष्ट्राचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे बैठकीला उपस्थित होते. दमनगंगा अाणि तापी नदीद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी खान्देश अाणि मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात अाली. दमणगंगा, तापी नदीजोड प्रकल्पामुळे समुद्रात जाणारे पाणी अडवून...
  November 18, 08:55 AM
 • जळगाव- शहरातील मालमत्ताधारकाने बेटरमेंट चार्जेस भरल्यानंतरही काम न झाल्याने दाखल दाव्यात खंडपीठाने पैसे भरण्याचे अादेश दिले हाेते; परंतु मालमत्ताधारकाला फायदा व्हावा म्हणून थेट दाेन वर्ष फाइल दडपून ठेवल्यामुळे महापालिकेला तब्बल ५१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार थेट शासनाच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे करण्यात अाली अाहे. चाैकशी हाेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात अाली अाहे. याचसंदर्भात विराेधी पक्षनेत्यांनी अायुक्तांना पत्र देऊन चाैकशीची...
  November 17, 12:46 PM
 • यावल- तालुक्यातील डांभुर्णी गावाजवळ जळगाव मार्गावर दुचाकी व रुग्णवाहिकेची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. शुक्रवारी दुपारी 3 वाजता हा अपघात झाला. समाधान भावलाल कोळी व अंकुश शाम कोळी (दोघे रा. चांदसर, बुद्रुक ता. धरणगाव) अाी मृत तरुणांची नावे आहेत. रूग्णवाहिका गरोदर महिलेला घेऊन जळगावकडे जात होती. मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील विदगाव- जळगाव रस्त्यावर डांभुर्णीकोळन्हावी गावाच्या दरम्यान पेट्रोलपंप आहे. या पेट्रोल पंपाच्या पुढील वळनावर शुक्रवारी दुपारी...
  November 16, 08:44 PM
 • नवापूर- नगरपालिकेमधील काँग्रेसच्या दोन नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार आली आहे. दोघांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. काँग्रेस मागील वर्षी झालेल्या नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा अ मधून ओबीसी महिला पदासाठी काँग्रेसच्या उमदेवार सारिका मनोहर पाटील या निवडून आल्या होत्या. तर दुसरे नगरसेवक प्रभाग क्रमांक सात अ मध्ये ओबीसी पुरूष म्हणून दर्शन प्रताप पाटील हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. खोटे जातप्रमाणपत्र दाखवून लढवली निवडणूक दोन्ही...
  November 16, 04:38 PM
 • बुलडाणा- एका शेतकरी महिलेने स्वत:च सरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिखली तालुक्यातील धोत्राभांगोजी या गावात14 नोव्हेंबरला रात्री ही घटना घडली आहे. आशाबाई दिलीप इंगळे असे मृत महिलेचे नाव आहे. आशाबाई यांनी गायीच्या गोठ्यात लाकडे रचून त्यावर पांघरुण टाकून त्यांनी स्वतःला पेटवून घेतले. सततची नापिकी आणि दुष्काळामुळे आशाबाई यांनी जीवनयात्रा संपविल्याचे बोलले जात आहे. शेजारच्यांनी वाचविण्याचा केला प्रयत्न.. पण, आशाबाई इंगळे 14 नोव्हेंबरच्या रात्री गोठ्यात...
  November 16, 02:48 PM
 • जळगाव- अमळनेर येथील व्यापाऱ्याकडून घेतलेला सुगम, धनाडाळ, सिगारेट आदी ३ लाख १० हजार रुपयांचा माल सिंधी कॉलनीतील व्यापारी मायलेकांनी विकत घेतला. त्यानंतर तोतया पोलिसाने कारवाईदरम्यान माल जप्त केल्याचा बनाव करून अमळनेरच्या व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात बुधवारी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाेलिसांनी मायलेकास अटक केली आहे. दीपक आणि सिमरण चेतवाणी अशी दाेघांची नावे आहेत. अमळनेर येथील सिंधी कॉलनीत प्रकाश वरियलदास...
  November 16, 09:15 AM
 • यावल- तालुक्यातील शिरसाड येथे एका 52 वर्षीय शेतकर्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी घडली. गोकुळ काशिनाथ अलकरीराजपूत असे मृत शेतकर्याचे आहे. स्वत:च्या शेतात गवत कापताना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांना सर्पदंश झाला. शिरसाड येथील शेतशिवारात गोकुळ अलकरी यांची शेती आहे. त्या शेतात गुरूवारी सकाळी ते गुरा-ढोरांकरीता गवत आणण्याकरीता गेले होते. दरम्यान, गवत कापताना त्यांच्या हाताला सापने चावा घेतला. ते तत्काळ घरी परतले. साकळी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात...
  November 15, 03:52 PM
 • जळगाव- शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लाकडे नसल्याने दोन तास मृतदेहाला ताटकळत ठेवण्याची वेळ बुधवारी दुपारी आली. पहिल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होत नाही तोपर्यंत दुसरा मृतदेह आल्याने त्याही मृतदेहासाठीही लाकडांचा प्रश्न उद्भवला. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. नेरीनाका वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कारासाठी लाकडे पुरवणे महापालिकेने बंद केले आहे. यावर उपाय म्हणून शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी खासगी पातळीवर मक्तेदार नेमून ज्यांची आर्थिक परिस्थिती...
  November 15, 11:52 AM
 • यावल - तालुक्यातील किनगाव जवळ दोन दुचाकींची आपसात धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर एकाचा रुग्णालयात जाताना मृत्यू झाला. मृतांची नावे महेश पिंजरकर (रा. भुसावळ) आणि कुरबान महारु तडवी असे आहे. तो स्वराज ट्रॅक्टरचा सेल्समन होता. अपघात बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. इतर दोन जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास स्वराज ट्रॅक्टर पाडळसा येथील सेल्समन महेश पिंजरकर (40) हे दुचाकी क्रमांक एम.एच. 19 बी. एल. 7365 द्वारे किनगावला जात होते....
  November 14, 05:49 PM
 • जळगाव-श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थानतर्फे दिवाळीच्या पंचमीला सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता १००८ खाद्यपदार्थांचा अन्नकूटचा प्रसाद चढवण्यात आला. देवस्थानात ही परंपरा मंदिर निर्मितीपासून म्हणजे सन १९८८ पासून सुरू आहे. यात सिद्धी व्यंकटेशाला मोसंबीद्वारे तर माता लक्ष्मीला ५० ते ६० हजार बांगड्यांद्वारे सजवण्यात आले होते. या वेळी मंदिरात सायंकाळी ५.३० वाजेपासूनच भाविकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थानतर्फे दर वर्षी अन्नकूटचा कार्यक्रम घेण्यात येतो....
  November 13, 12:59 PM
 
जाहिरात

RECOMMENDED