जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • जळगाव - महाविद्यालयातील क्लास आटाेपून एक विद्यार्थिनी दाणाबाजारात घरगुती साहित्य खरेदीसाठी गेली हाेती. तेथून ती रिक्षेने परत येत असताना शेजारी बसलेल्या मद्यधुंद तरुणाने तिची छेडखानी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून या विद्यार्थिनीने आरडाआेरड केली. त्यानंतर धावून आलेला जमावाने या तरुणाला बदडून जिल्हापेठ पाेलिसांच्या ताब्यात दिले. जिल्हा पाेलिस अधीक्षक कार्यालयासमाेर बुधवारी दुपारी २.३० वाजता हा प्रकार घडला. संशयितावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नदीम...
  July 25, 10:45 AM
 • धुळे - सीमा तपासणी नाक्यावर नेमणुकीसाठी आरटीओ कार्यालयात निरीक्षकाकडून साडेचार लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) परवेज तडवी यास बुधवारी अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, दोन महिन्यांत तडवीला लाच प्रकरणात दुसऱ्यांदा अटक झाली. नियमानुसार चक्राकार पद्धतीने सीमा तपासणी नाक्यावर नेमणूक दिली जाते; परंतु त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज खुदायारखाँ तडवी (वय ५७) यांनी २ जुलैला साडेचार लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत आरटीओ कार्यालयात...
  July 25, 10:32 AM
 • धुळे - क्लासेससाठी सायकलवर जात असलेल्या विद्यार्थिनीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात विद्यार्थिनीचे दोन तुकडे झाले. गुरुवारी (25 जुलै) सकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. गुंजन देवीदास पाटील (वय 14 वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे. गुंजन सकाळी आपल्या घरातून क्लासेससाठी सायकलवर निघाली होती. दरम्यान शहरातील साक्री रोडवर सिंचन भवनानजीक GJ 01 CY0267 या भरधाव ट्रकने तिला चिरडले. यात सायकल आणि मुलीचे दोन तुकडे झाले. मृतदेहाची अवस्था पाहिल्यानंतर स्थानिकांना झाडाच्या पाल्याने मृतदेह झाकला होता....
  July 25, 09:44 AM
 • भुसावळ - पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन जाताच कुऱ्हा पानाचे (ता.भुसावळ) येथील मुख्य मार्गावरील रा. धो. हायस्कूल परिसरातील आयडीबीआय बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री दरोडा घातला. एटीएममध्ये शिरताच चोरांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. त्यानंतर गॅस कटरचा वापर करुन चोरांनी एटीएम मशीन फोडले. तब्बल दीड तास चोरटे आतमध्ये होते. यानंतर ते ६ लाख ४१ हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाले. सोमवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे चोरट्यांनी गुन्ह्यात...
  July 23, 11:25 AM
 • धुळे -दाेंडाइचा घरकुल घोटाळाप्रकरणी प्रमुख संशयित तथा माजी कामगार राज्य मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज व त्यावर स्थगिती असे दोन अर्ज सोमवारी धुळे न्यायालयाने फेटाळले. त्यानंतर सायंकाळी डॉ. देशमुख यांना अटक करण्यात आली. दोंडाईचा घरकुल घोटाळाप्रकरणी सोमवारी धुळे न्यायालयात कामकाज होते. त्यासाठी दोन्ही पक्ष उपस्थित होते. या खटल्यातील सरकारी व बचावपक्षाकडील युक्तिवाद गेल्या तारखेला झाला होता. सोमवारी दुपारी खटल्याचे कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी न्या. एच. आर. उगले यांनी डॉ...
  July 23, 09:03 AM
 • जळगाव-फोन व व्हिडिअो काॅल करून त्रस्त करणाऱ्या युुवकाला अाशाबाबा नगरातील महिलेने ट्रू काॅलरद्वारे त्याचा माग काढला. त्यानंतर फुले मार्केटमध्ये असलेल्या त्याच्या दुकानावर जाऊन चपलेने चोपत थेट शहर पोलिस ठाण्यात अाणले. त्यानंतर त्याला सायबर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. निहाल हमीद बागवान (वय ३०, रा.शाहूनगर) असे त्या युवकाचे नाव अाहे. तो त्याच्या मोबाइल क्रमांकावरून महिलेच्या मोबाइलवर मिस्ड काॅल देत होता. शुक्रवारी सकाळपासूनच तो मिस्ड काॅल करीत होता. एका कार्यक्रमानिमित्त...
  July 21, 12:21 PM
 • रावेर/वाघोड-रावेर तालुक्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेले चोरी आणि दरोड्यांचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. तामसवाडी गावाजवळ भोकरी शिवारात बंद असलेल्या दत्ता अॅग्रो फॅक्टरीवर शनिवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास दरोडा पडला. १० ते १२ दरोडेखोरांनी फॅक्टरीच्या आवारात प्रवेश करून तीन सुरक्षा रक्षकांना मारहाण केली. तसेच तिघांचे हातपाय बांधून ३६ हजार रुपयांची रोकड आणि अन्य साहित्य असा एकूण ३ लाखांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला. भोकरी शिवारात तामवाडी येथील ओंकारेश्वर मंदिराजवळील दत्ता...
  July 21, 09:43 AM
 • जळगाव-पिंप्राळ्यातील कुंभारवाड्यात राहणाऱ्या महिलेला मारहाण करीत चोरट्यांनी घरात घुसून १ लाख १० हजारांसह मोबाइल चोरून नेला होते. सीसीटीव्ही फुटेजच्या अाधारे पोलिसांनी दोघा चोरट्यांना अटक केली होती. मात्र, ते सीसीटीव्ही फुटेज प्रभाग क्रमांक १०चे भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी दिले असल्याच्या संशय दोघा अारोपींना होता. त्याचा बदला घेण्यासाठी शुक्रवारी रात्री ८ वाजता सोमाणी मार्केटमधील संपर्क कार्यालयात घुसून शिवीगाळ करीत दोघांनी मारहाण करून हल्ला चढवत पाटील यांना कुऱ्हाडीने...
  July 21, 09:32 AM
 • शहादा- तालुक्यातील प्रकाशा परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण आज(20 जुलै)सकाळी प्रकाशा शिवारातील भरत दशरथ पाटील यांच्या शेतात मृत बिबट्या आढळून आला. प्रकाशा परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्या फिरत होता. अनेक लोकांनी त्याला पाहिल्यानंतर परिसरात लोक प्रचंड भीतीत वावरत होते. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनालाही सूचना देण्यात आली होती. पण आता परिसरात भरत पाटील यांच्या शेतात...
  July 20, 02:39 PM
 • धुळे - शहरातील चाळीसगाव राेड परिसरातील प्रभागात स्वच्छता हाेत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. या भागातील गटारीही तुंबल्या हाेत्या. तसेच अस्वच्छता वाढली होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळी उपमहापाैर कल्याणी अंपळकर यांनी स्वत: हातात फावडी घेऊन गटारींची स्वच्छता केली. या वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच ज्या कामाचा पगार मिळताे ते काम प्रामाणिकपणे करा, अशा शब्दात कर्मचाऱ्यांना सुनावले. शहरातील चाळीसगाव राेड, लाेकमान्य हाॅस्पिटलचा परिसर उपमहापाैर कल्याणी अंपळकर...
  July 20, 10:48 AM
 • जळगाव - शहरात चाेरट्यांची धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी भरदिवसा चाेरीच्या घटना घडल्या हाेत्या. आता तर चाेरट्यांची हिमंत वाढली असून त्यांनी सद्गुरुनगरातील प्लॉट क्रमांक १९ मध्ये राहणारे सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाचे दहा दिवसांपासून बंद असलेल्या घरात घरफाेडी केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. घरफोडीत अकरा तोळे सोने, चांदीच्या वस्तू, रोख रक्कम, महागडे घड्याळ, साड्याही चोरट्यांनी चोरुन नेल्या आहे. निवृत्त डीवायएसपी प्रकाश नामदेव मेढे...
  July 20, 10:20 AM
 • धुळे -तो आला, त्याने पाहिले अन् जिंकून घेतले. सारे काही असाच प्रकार धुळ्यातील झेड.बी.पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात अनुभवायला मिळाला. आदित्य संवाद कार्यक्रमात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी आपल्याला शिक्षणमंत्री व्हायला आवडेल. शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. रोजगाराभिमुख शिक्षण व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, असे सांगितले. युवकांनी विचारलेल्या प्रश्नांना आदित्य यांनी दिलखुलास उत्तरे दिली. तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना...
  July 20, 08:58 AM
 • जळगाव - युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी शिवसैनिकांतून हाेत आहे. खासदार संजय राऊत यांनी तर आदित्य यांना थेट मुख्यमंत्रिपदाचे उमेदवारच जाहीर करून टाकले. या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करताना आदित्य म्हणाले, जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मी राज्याच्या कानाकाेपऱ्यात फिरणार आहे. तेथील जनतेचे आाशीर्वाद घेतल्यानंतरच निवडणूक लढायची की नाही हे ठरवू. दैनिक दिव्य मराठीशी विविध विषयांवर त्यांनी साधलेला संवाद... या यात्रेतून विधानसभेची तयारी सुरू...
  July 19, 10:42 AM
 • धुळे - महापालिकेच्या नवीन इमारतीत लिफ्ट नाही. तरीही दिव्यांग कर्मचाऱ्यांना दुसऱ्या मजल्यावर ड्यूटी देण्यात येत आहे. यासाठी या कर्मचाऱ्यांना जिन्यावरून कसरत करीत आपल्या कार्यालयात जावे लागते. या इमारतीत लिफ्टचे काम झाले आहे. केवळ परवाना नसल्यामुळे सुरू करता येत नाही, असे सूत्रांनी सांगितले. महापालिकेच्या इमारतीत सगळ्या सुविधा आहेत. केवळ लिफ्टची सुविधा नाही. त्यामुळे सगळ्याच कर्मचाऱ्यांना जिन्याचा वापर करावा लागताे. मात्र, यात दिव्यांग कर्मचारी व नागरिकांची माेठी दमछाक हाेते....
  July 19, 09:49 AM
 • जळगाव - शहरात चाेरट्यांनी धुमाकुळ सुरु केला आहे. बुधवारी मध्यरात्री दुचाकीवर आलेल्या चाेरट्यांनी बळीरामपेठेत आेम स्पोर्टस एनएक्स हे दुकान फाेडून दीड लाख रुपये चाेरुन नेले. तसेच यमुनानगरातील बंद घर फोडून चोरट्यांनी ६५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. तर गुरुवारी भरदुपारी बजरंग बोगदा परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीमध्ये अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी एक लाख रुपयांची रोकड व १० तोळे सोन्याचे दागिने लांबविले. तर दुसऱ्या फ्लॅटमध्ये त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले....
  July 19, 09:40 AM
 • जळगाव - आगामी विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर जनआशीर्वाद यात्रेवर निघालेले शिवसेना नेते तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील पाचाेरा येथील पहिल्याच मेळाव्यात उपस्थित जनसमुदायासमाेर अक्षरश: नतमस्तक हाेत मतदारांनी आजवर दिलेल्या प्रेमासाठी आभार मानले. यापूर्वी दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आैरंगाबाद, ठाण्याच्या मतदारांसमाेर तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत २०१४ च्या विधानसभा निवडणूक प्रचारात बीकेसी मैदानावर आदित्यसह...
  July 19, 08:02 AM
 • जळगाव -जुलै महिना उलटत असून जळगाव जिल्ह्यात अद्यापही म्हणावा तसा पाऊस झाला नाही. पावसाने तडी दिल्यानेजिल्ह्यातीलशेतकरी विवंचनेत अडकला आहे.योग्यवेळी पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याचीशक्यता आहे.शेतकऱ्यांवरचे दुबार पेरणीचे संकट टळो आणि लवकर पाऊस पडो, यासाठी जळगाव जिल्ह्यातील पारोळा बाजार समितीच्या हमाल मंडळींनी चक्क जिवंत माणसाची अंत्ययात्रा काढत वरुणराजाकडे पावसाचे साकडे घातले. विशेष म्हणजे यासाठी प्रत्यक्षातील अंत्ययात्रेप्रमाणेच संपूर्ण तयारी...
  July 18, 08:30 AM
 • जळगाव - मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजप युतीत काेणताच वाद नाही. जागा व सत्तावाटपदेखील समसमान हाेईल. लाटेत काेणी एखादी जागा जिंकली म्हणजे ताे मतदारसंघ त्याचा हाेत नाही. अशा अनेक जागांवर चर्चेतून मार्ग निघेल, असे सूताेवाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी जळगावातील पत्रकार परिषदेत केले. राज्याला नव्या उमद्या चेहऱ्याची गरज असून ती क्षमता आदित्य ठाकरेत आहे. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहताे, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत स्वबळावर...
  July 18, 08:26 AM
 • धुळे -अत्यल्प पगार, कुटुंबाच्या वाढत्या गरजांमुळे शिक्षक चक्क दुचाकी चोरीकडे वळल्याचा प्रकार समाेर अाला आहे. यात त्याला साथ देणाऱ्या पुतण्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षक विजय गवळी आणि हृषीकेश गवळी अशी या काका-पुतण्यांची नावे आहेत. धुळे परिसरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहर पोलिसांचे पथक चोरट्यांच्या मागावर होते. त्यातच नंदुरबार येथील शिक्षक गवळी हे पुतण्याच्या मदतीने जुन्या दुचाकी विक्री करतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, शंका आल्याने पोलिसांनी...
  July 18, 08:21 AM
 • जळगाव - जळगावच्या किशाेर सूर्यवंशी या तरुण खेळाडूच्या दाेन्ही किडन्या निकामी झाल्याने ताे १२ वर्षांपूर्वी मृत्यूंशी झुंज देत हाेता. त्याच्यावर अवयव प्रत्याराेपण शस्त्रक्रिया झाली आहे. आता यंदा ताे ब्रिटनमध्ये हाेणाऱ्या वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स या अवयव प्रत्याराेपण केलेल्या व्यक्तींसाठी हाेणाऱ्या जागतिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आॅलिम्पिकच्या धर्तीवर हाेणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतातून १५ खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यात किशोर महाराष्ट्रातून...
  July 15, 08:28 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात