जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • शिरपूर -अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्यामुळे प्रांताधिकाऱ्यांना ट्रॅक्टरवरून खाली फेकत मारहाण केल्याची घटना धुळे जिल्ह्यातील शिरपुरात घडली. मारेकरी घटनास्थळाजवळीलच एका हाॅटेलच्या सीसीटीव्ही कैद झाले असून ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आढावा बैठकीसाठी तहसील कार्यालयात जात होते. या वेळी शहादा-शिरपूर रस्त्यावर हॉटेल संस्कृतीसमोर त्यांना अवैधरीत्या वाळू...
  July 12, 09:41 AM
 • जळगाव -सात महिन्यांपूर्वी कुटुंबीयांनी विरोध पत्करून प्रेमविवाह केल्यानंतर तरुणीने सासरी येण्यास नकार दिल्याने पती तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार जळगावातील रायसोनीनगरात घडला. नीलेश ऊर्फ गोलू मधुकर सपकाळे (२२, रा. रायसोनीनगर) असे मृताचे नाव आहे. नीलेशच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीपर्यंत शिकलेला नीलेश हॉटेलात स्वयंपाकी होता. महाविद्यालयात शिकत असलेल्या रूपालीशी (नाव बदललेले) ७ वर्षांपूर्वी त्याचे सूत जुळले होते. दोघांनी २७ डिसेंबर २०१८ रोजी आळंदी येथे पळून जाऊन...
  July 11, 09:22 AM
 • मुक्ताईनगर (जि. जळगाव) - फडणवीस सरकारच्या अखेरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माझ्यावर झालेले आरोप घेऊन येथून मला जायचे नाही, माझ्याकडे अनेकांंची पुराव्यासह प्रकरणे आहेत, मात्र माझ्यासारखी गत इतरांची होऊ नये म्हणून गप्प आहे, अशी खदखद व्यक्त केली. तसेच रावेरच्या मेळाव्यात पक्षाकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो, जनता आपल्या पाठीशी आहे, असे ठणकावून सांगितल्याने खडसेंच्या उमेदवारीविषयी संभ्रम आहे. गेली ३० वर्षे मुक्ताईनगर विधानसभा...
  July 8, 09:04 AM
 • रावेर -पक्षाने मला तिकीट दिले किंवा नाही दिले, तरीही जनता जनार्दन माझ्या पाठीशी आहे. पक्षातील निष्ठावंतांची अवहेलना करून दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना मंत्रिपद दिले जाते. त्यामुळे झालेला अन्याय आपण महाराष्ट्रभर मांडू. मात्र, एवढे झाल्यावरही भाजपलाच निवडून द्या, असेच सांगतो. पण, सातत्याने अन्याय झाला तर कोणी कोणाचा बांधील नसतो, अशा सूचक शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मनातील खदखद व्यक्त केली. सदस्य नोंदणी अभियान व आगामी विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी जळगाव...
  July 6, 10:12 AM
 • भुसावळ - हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत तब्बल ३०७ मिमी पाऊस झाला. यापाठोपाठ बुधवारी सकाळी ९ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१ मिमी पावसाची भर पडल्याने धरणात पाण्याची आवक वाढली. यामुळे बुधवारी पहाटे हतनूरचे १२ दरवाजे पूर्ण उघडून प्रतिसेकंद ७७८ क्युसेक म्हणजेच २७ हजार ४७१ क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. या विसर्गामुळे तापी नदीला पूर आला असून तापी व पूर्णाकाठच्या रहिवाशांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील तापी व...
  July 4, 08:56 AM
 • धुळे- महाविद्यालयीन मुले-मुली सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात जात असतात. पण धुळ्यातील सिनेमागृहात अश्लील प्रकार घडला आहे. तरुण-तरुणी धुळ्यातील सिनेमागृहात अश्लील चाळे करताना पोलिसांना आढळले. पोलिस विभागातील दामिनी पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे. जोडप्यांकडून सिनेमागृहात अश्लील चाळे केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचून सिनेमागृहात प्रवेश केला आणि 10 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले, पण या कारवाई दरम्यान काहीजण पळून गेले. धुळ्यातील ज्योती...
  July 2, 06:25 PM
 • मालेगाव - शहरातील दरेगाव शिवारात असलेल्या मदरशात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या चार मुलींवर अत्याचार झाल्याने खळबळ उडाली आहे. अत्याचार करणाऱ्या माैलानासह तिघांना पाेलिसांनी अटक केली असून त्यांना ५ जुलैपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. दरेगाव शिवारात झैनब अख्तरूल नावाने मुलींचा धार्मिक मदरसा चालवला जाताे. या मदरशात ८ ते १६ वयाेगटातील ३९ मुली शिक्षण घेतात. मात्र, मदरशात देखरेखीचे काम करणारा माैलाना वकार अहमद जहीर हुसेन अन्सारी हा काही मुलींवर अत्याचार करत हाेता. हा प्रकार एप्रिल...
  July 2, 07:52 AM
 • जळगाव - येथील एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आज (रविवारी) संध्याकाळी ही घटना घडली आहे. केमिकल कंपनी असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. आगीला आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास जळगावच्या औद्योगिक वसाहतीतील रवी इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग लागली. रवी इंडस्ट्रीज केमिकलची कंपनी असल्यामुळे आतून स्फोटाचे आवाज येत होते. कंपनीत बरेच कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे स्वरूप लक्षात घेता मोठी...
  June 30, 07:43 PM
 • जळगाव - येथील एम.जे. महाविद्यालयात एका तरुणाचा भरदिवसा खून करण्यात आला आहे. पीडित युवक (23) आपल्या एका भावासह महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी आला होता. त्याचवेळी पार्किंगमध्ये ट्रिपल सीट आलेल्या तरुणांना धक्का लागला. यातून वाद इतका वाढला की आरोपींनी तरुणाचा चॉपरने वार करून खून केला. दरम्यान यावेळी झालेल्या भांडणात काही तरुण जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पोलिस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत. असोदा येथील मूकेश उर्फ बंटी मधुकर...
  June 29, 04:16 PM
 • जळगाव - तालुक्यातील भादली येथील तरुणीने प्रेमविवाह केल्याने मानसिक तणावात असलेल्या वडिलांनी गुरुवारी रात्री नशिराबाद-भादली रुळावर रेल्वेसमाेर उडी घेऊन आत्महत्या केली. नरेंद्र मुरलीधर नारखेडे (५२ रा. नारखेडेवाडा, भादली) असे मृताचे नाव आहे. नारखेडे यांच्या मुलीने तपत कठाेरा येथील तरुणाशी प्रेमविवाह केला आहे. मुलीने नारखेडे यांच्या मनाविरुध्द मुलाशी प्रेमविवाह केल्याने ते व्यथीत झाले हाेते. या प्रकाराने मानसिक तणावात असलेले नारखेडे गुरुवारी रात्री ८.३० वाजता घराबाहेर पडले. बऱ्याच...
  June 29, 09:14 AM
 • जळगाव -केवळ नॅचरोपॅथीचा डिप्लाेमा करून एका बाेगस डाॅक्टरने म्हसावद येथे बेकायदेशीरपणे दवाखाना चालवून रुग्णाच्या मूळव्याधवर शस्त्रक्रिया केली. या चुकीच्या उपचारामुळे रुग्णास कॅन्सर झाल्याचे निदान झाले. याप्रकरणी बोगस डॉक्टरविरुद्ध गुरुवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. जाकीर सत्तार खाटीक (३५, मूळ रा. नागदुली, ता. एरंडोल) असे अटक केलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. खाटीक याने नॅचरोपॅथीचा डिप्लोमा केला आहे. त्यानंतर त्याने म्हसावद येथे...
  June 28, 09:00 AM
 • यावल- राज्यातील शेतकऱ्यांना प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत अर्थ साहाय्य मिळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर त्री सदस्यीय समिती व्दारे कामकाज सुरू आहे. पण या कामी शासन निर्णयाला झुगारत चिखली (ता.यावल) येथिल ग्रामसेवक पी.व्ही. तळेले यांना फोनवरून अर्वाच्य भाषेत साल्या झकमार तुला घरीच बसवतो अशा शब्दात धमकी दिल्याने संपूर्ण ग्रामसेवक संवर्ग दडपणाखाली आला आहे. त्यामुळे राज्य ग्रामसेवक संघटनेने याबाबत राज्यभर काम बंद आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. काय आहे प्रकरण ? शासन...
  June 26, 05:17 PM
 • जळगाव -कायमस्वरूपी नोकरी, लग्नाचे आमिष देऊन जळगावच्या विशेष समाजकल्याण अधिकाऱ्याने बार्टीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणीवर सात महिन्यांपासून शहरातील गणपतीनगर भागातील राहत्या घरात अत्याचार केले. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी मध्यरात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात समाजकल्याण अधिकाऱ्यासह त्याची पत्नी व वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.पीडित तरुणी जून २०१५ पासून सामाजिक न्याय विभागाच्या बार्टीमध्ये कंत्राटी पद्धतीने समतादूत म्हणून काम...
  June 25, 09:18 AM
 • जळगाव / नागपूर -देशभरात मुझफ्फरपूर येथील बालमृत्यूंनी खळबळ उडाली अाहे. मात्र, यापेक्षा वेगळे चित्र नंदुरबार, मेळघाट तसेच गडचिरोली जिल्ह्यात नाही. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात कुपाेषणाने दरवर्षी शेकडाे बालकांचा मृत्यू हाेताे. राज्याचा बालमृत्युदर १७ टक्के, तर नंदुरबार जिल्ह्याचा २४ टक्के अाहे. मेळघाटात गेल्यावर्षी बालमृत्यूची ४०९ प्रकरणे उघडकीस आली, तर १९७ मृत्यू मातेच्या गर्भातच झाल्याची धक्कादायक आकडेवारी आहे. गडचिरोली जिल्ह्यात नवजात आणि बालमृत्यूची ६२...
  June 23, 10:02 AM
 • जळगाव- एकतर्फी प्रेमातून शिक्षकाने सोबत काम करणाऱ्या विवाहित शिक्षिकेवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार जळगावमध्ये घडला आहे. महिलेवर हल्ला केल्यानंतर शिक्षकाने स्वत:वरही चाकूने वार केले. या घटनेत जखमी दोन्ही शिक्षकांना जळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोन्ही शिक्षक बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत. चंदा उमेश गडकळ(वय 32) या नाडगावच्या आयटीआयमध्ये मागील दीड वर्षांपासून शिकवतात. याच महाविद्यालयात के. ई. पाटील हा शिक्षक...
  June 19, 07:33 PM
 • रावेर- जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या निंबोळी गावातील विजया बॅकेच्या शाखेवर सव्वादोन वाजेच्या सुमारास दोन हेल्मेटधारी चोरटयांनी सशस्त्र दरोडा टाकत गोळीबार केला. यावेळी दरोडेखोरांना विरोध केल्यामुळे शाखा व्यवस्थापकाच्या छातीत दरोडेखोरांनी 2 गोळ्या झाडल्या. यात उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. दरोड्यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी सायरन वाजवल्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी बँकेतून पळ काढला. निंबोळीच्या विजया बँकेत हेल्मेटवरून आलेल्या 2 दरोडेखोरांनी...
  June 19, 09:55 AM
 • जळगाव -जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथे दोन गटांत सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावरच जमावाने तुफान दगडफेक केली. दगडफेक करण्यात महिलांचाही सहभाग होता. यात एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी तर जमावातील दोन तरुण जखमी झाले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात २०० जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील १९ जणांना अटक करण्यात आली आहे. आसोदा येथील सरपंच नबाबाई दौलत बिऱ्हाडे यांचा मुलगा संजय हा शनिवारी सायंकाळी ७ वाजता पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल...
  June 17, 10:40 AM
 • जळगाव -३० वर्षांपासून वडील आईला त्रास देत असल्याच्या कारणाने दोन मुलींनी आई, भाऊ व एक दीड वर्षाच्या बालिकेसह सात दिवस बंगल्यात कोंडून घेतले. आठवडाभरात त्यांनी अन्नत्याग करून केवळ पाण्यावर उदरनिर्वाह केला. हा प्रकार वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीच न्यायालयात अर्ज करून हे प्रकरण उघडकीस आणले. न्यायालयाच्या आदेशानंतर कुटुंबातील सदस्यांना घराबाहेर काढून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शहरातील रणछोडदासनगर येथील ही घटना आहे. दिनकर रामदास पाटील (वय ६२) यांची रेणुका इंजिनिअर्स नावाची...
  June 14, 11:45 AM
 • यावल -मुलांच्या भांडणातून निर्माण झालेला वाद विकोपाला गेल्याने जळगाव जिल्ह्यातील आडगाव येथे बुधवारी रात्री दोन समुदायात दंगल उसळली. त्यात दगडफेक व मारहाण झाल्याने ९ जण जखमी झाले. काही माथेफिरूंनी दोन शेतकऱ्यांच्या केळी बागाही कापून टाकल्या. या प्रकरणी परस्परांविरुद्ध दंगल, ॲट्रॉसिटी, विनयभंग आदी कलमान्वये ८९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यापैकी २२ संशयितांना अटक झाली आहे. या वादानंतर दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलासह आडगावात बंदोबस्त वाढवण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे....
  June 14, 10:17 AM
 • धुळे - येथील मुंबई-आग्रा महामार्गावर दुभाजक तोडून उलट्या दिशेने येणाऱ्या ट्रकमुळे बुधवारी तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला आहे. या भीषण अपघातात अमळनेरहून मालेगावकडे जाणारे चार जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये एका सात वर्षांच्या मुलीचा देखील समावेश आहे. यासोबतच, 6 जण जखमी असून त्यांना ताततडीने उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी झालेले सगळेच सुरतचे रहिवासी आहेत. धुळेजवळ झालेल्या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. धुळे...
  June 12, 04:02 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात