जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • शिरपूर (जि. धुळे) -तालुक्यातील अनेर धरणाच्या पाण्यापासून वंचित असलेल्या मांजरोद येथील शेतकऱ्यांनी सोमवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, पाटचारीतून पाणी सोडले तर मोबदला न मिळालेले शेतकरी व पाणी सोडले नाही तर ज्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही ते शेतकरी आत्महत्या करण्याचा इशारा देत असल्याने पाटबंधारे विभाग कात्रीत सापडला आहे. अनेर धरणाच्या दहा नंबरच्या पाटचारीतील पाच नंबरच्या...
  June 11, 08:20 AM
 • धुळे -साक्री तालुक्यातील धोंगडेपाडा येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारातून जन्माला आलेल्या बालिकेची डीएनए चाचणी करण्यात आली. त्याचे नमुने तपासण्यासाठी नाशिकच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तसेच कथित जात पंचायतीला कायदेशीर समज दिली. धाेंगडेपाडा गावाने बहिष्कृत केल्यानंतरही पिंपळनेर ग्रामीण रुग्णालय व नंतर हिरे रुग्णालयात दाखल झालेल्या पीडित मुलीने बालिकेला जन्म दिला आहे, तर पीडितेवर बलात्कार करून मातृत्व लादणाऱ्या बाळा अब्राहम सहाने याला अटक केली आहे. हे प्रकरण...
  June 11, 07:12 AM
 • नंदुरबार -शहादा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. लोकसभा निवडणुकीत शहादा विधानसभा मतदारसंघात भाजपला कमी मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली तर भाजपला मेहनत घ्यावी लागेल. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत नवीन उमेदवार निवडून देण्याची परंपरा या मतदारसंघाची आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत उदेसिंग पाडवींना भाजपने तिकीट दिले. काँग्रेसतर्फे पद्माकर वळवी व राष्ट्रवादीच्या राजेंद्रकुमार गावित यांच्यात तिरंगी लढत...
  June 8, 09:07 AM
 • धुळे -धुळे जिल्ह्यातील धोंगडेपाडा (ता. साक्री) येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या बाळा सहाने या बलात्काऱ्याला पिंपळनेर पेालिसांनी अटक केली. बुधवारी न्यायालयाने त्याला दाेन दिवसांची काेठडीही सुनावली. त्याचबराेबरच गर्भपात करण्यासाठी या पीडितेला बहिष्कृत करणाऱ्या व पाेलिसात तक्रार दिली म्हणून दंड ठाेठावणाऱ्या जात पंचायतीच्या प्रमुखासह ५ जणांनाही बुधवारी पाेलिसांनी अटक केली. धाेंगडेपाड्यातील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतरही कथित...
  June 6, 10:01 AM
 • धुळे -महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील धोंडगीपाडा गाव सध्या चर्चेत आहे. कारण, या गावात जात पंचायतीने एका १५ वर्षीय अल्पवयीन बलात्कार पीडितेला कुटुंबासह वाळित टाकले आहे. या मुलीच्या गर्भात वाढणारे अर्भक गोळ्या घेऊन पाडावे, असा पंचायतीचा आदेश होता. परंतु, पीडितेसह तिच्या कुटुंबीयांनीही यास नकार दिला. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर या जात पंचायतीने पीडित कुटुंबावर ११ हजार रुपयांचा दंडही आकारला. यामुळे पीडितेचे हाल सुरू आहेत. साक्री तालुक्यात धोंडगीपाडा हे गाव आहे. पीडितेचे...
  June 4, 10:25 AM
 • जळगाव/नाशिक -उन्हाच्या तडाख्याने लाही लाही झालेल्या जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वादळी तडाख्याने आणखीच कवेत घेतले. सोमवारी नाशिक जिल्ह्यातील बालठाण तालुक्यात वादळामुळे घरांचे, शाळेचे छप्पर उडून गेले, तर दोन गायींचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि यावलमध्ये झालेल्या वादळी तडाख्याने १४ तालुक्यांंतील १२०० शेतकऱ्यांची ११०० हेक्टरवरील केळी व अन्य पिके नेस्तनाबूत झाली अाहेत. काही ठिकाणी सुपारीच्या आकाराच्या गारा पडल्या. यात धानोरा, मितावली, पारगाव, कमळगाव,...
  June 4, 06:55 AM
 • यावल -तालुक्यातील इचखेडा शिवारात मशागत करताना ट्रॅक्टर अनियंत्रीत होत कलंडले. या भीषण अपघातात चालक ट्रॅक्टरखाली दाबल्या गेला असून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे. पीडित व्यक्तीचे नाव प्रमोद देवराम तायडे असून ते 38 वर्षांचे होते. किनगाव खुर्द परिसरात राहणारे कांदा व्यापारी तसेच भाडे तत्त्वावर शेत मशागत करून देणारे प्रमोद सोमवारी इचखेडा शिवारात आले होते. ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. 19 -4719 ने ते दुपारी शेतविहीरीजवळ काम करत होते. याच दरम्यान त्यांचे...
  June 3, 05:38 PM
 • भुसावळ -मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील नांदगाव ते पिंपरखेड स्थानकादरम्यान बरौनी - लोकमान्य टिळक टर्मिनस समर हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसच्या ब्रेकर कोचच्या चाकाला तडा गेल्याची घटना रविवारी सकाळी घडली.अपघातग्रस्त कोच बाजूला करुन गाडी मुंबईकडे रवाना झाली. यामुळे सचखंड, महानगरी, गोवा, झेलम, दुरांतो, पटना सुपर, छपरा सुपरफास्ट, अलाहाबाद मुंबई, मंडूआहिड पुणे हॉलिडे स्पेशन या गाड्यांना ३ तासांचा विलंब झाला. ग्रीष्मकालीन विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेसचे रविवारी सकाळी ८:१० वाजता बी-१५ या कोचचे चाक...
  June 3, 09:30 AM
 • जामनेर -काँग्रेसला साेडचिठ्ठी देणारे औरंगाबाद जिल्ह्यातील माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी रविवारी दुपारी दोन वाजता भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची जामनेर येथील निवासस्थानी भेट घेऊन बंदद्वार चर्चा केली. सुमारे अर्धा तास झालेल्या या भेटीत सत्तार यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. अब्दूल सत्तार यांनी काँग्रेसाचा राजीनामा दिला असून, सन्माजनक पक्षात प्रवेश घेण्याचा त्यांचा मानस आहे, असे सांगत महाजन यांनीही सत्तार यांच्या भाजप प्रवेशाचे...
  June 3, 09:22 AM
 • जळगाव- भाजपने लोकसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याकडे देशाचे लक्ष लागून आहे. पण, जळगावमध्ये वेगलेच चित्र पाहायला मिळाले आहे. येथील लोकांमध्ये नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची नाही, तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या विषयाची जोरदार चर्चा सुरु आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर गिरीश महाजन हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचा दावा करत महाजन समर्थकांनी शहरातील अनेक...
  May 30, 03:21 PM
 • धुळे- येथील दोंडाई- सोनगीर मार्गावर गुजरातमधील हिरे व्यापाऱ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. दोंडार्इचा- सोनगीर मार्गावर गुरुवारी पहाटे (जी.जे.11के.इ.6095) या क्रमांकाच्या स्वीफ्ट कारनजीक अज्ञान व्यक्तीचा मृतदेह रक्बंबाळ अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी त्याची तपासणी केली तेव्हा तो गुजरातमधील हरे व्यापारी असल्याचे समजले. त्याच्याकडील रोख रक्कम लांबवून त्याचा खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला...
  May 30, 02:21 PM
 • जळगाव -लाेकसभा निवडणुकीनंतर राज्यातही खांदेपालटाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. मोदींच्या विश्वासातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांचे विश्वासू जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता त्यांचे कार्यकर्ते वर्तवत आहेत. किंबहुना, आता एकनाथ खडसेंपाठाेपाठ मंत्री महाजन जळगावात बॅनरवर मुख्यमंत्री म्हणून झळकले आहेत. पंतप्रधान मोदींना केंद्रात रिक्त हाेणाऱ्या...
  May 30, 08:56 AM
 • यावल-रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल सलमान तडवी या तरुणीने आत्महत्या केली आहे. घटना बुधवारी घडली आहे. मयत तरूणी ही आदिवासी तडवी समाजाची होती त्यामुळे तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांना तात्काळ अटक करावी व या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीकरिता आज(24 मे) यावलमध्ये तडवी डॉक्टर असोसिएशन तसेच आदिवासी तडवी समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने जळगावात आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले....
  May 24, 04:16 PM
 • जळगाव/एरंडोल -दोन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या २२ वर्षीय विवाहितेचा अचानक गर्भपात झाला. मानसिकदृष्ट्या खचलेल्या विवाहितेने पतीला मोबाइलवर संदेश पाठवून विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना मंगळवारी खेडी (ता.एरंडोल) येथे घडली. दरम्यान, विवाहितेस सासरच्या लोकांनी मारहाण करून ठार मारल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. खेडी येथील विवाहिता संगीता गणेश कोळी हिचा विवाह दोनवर्षांपूर्वी गणेश कोळी याच्याशी झाला होता. विवाहानंतर संगीता ही गरोदर राहिल्यामुळे कोळी...
  May 23, 09:33 AM
 • जळगाव -एका कामासाठी शहरातील अनेक लोकांकडून सुमारे पाच कोटी रुपये गोळा करून फरार झालेल्या एका तरुणाने बुधवारी स्वत:च्या फेसबुक वॉलवर एक पोस्ट शेअर केली. आपण जैश ए मोहंमद या आतंकवादी टोळीचे सदस्य असून लवकरच भारतातील पाच मोठ्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याचे त्याने वॉलवर लिहिले आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली असून तपासयंत्रणा त्याच्या शोधासाठी कामाला लागल्या आहेेत. दरम्यान, ही पोस्ट त्यानेच लिहिली आहे? की दुसऱ्या कोणी त्याचे अकाऊंट हॅक केले आहे का? या संशयावरून देखील सायबर पोलिस तपास...
  May 23, 09:22 AM
 • जळगाव -अन्न-पाण्याच्या शोधात थेट शहरात शिरलेली एक हरिणी मंगळवारी दुपारी १ वाजता जळगाव खोटेनगर परिसरातील खोल खदानीत पडली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकासह वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी तीन तास अथक प्रयत्न करून अखेर या हरिणीला बाहेर काढले. आधी पथकातील कर्मचाऱ्यांनी खदानीत शिडी टाकली. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खाली उतरून दलदलीत अडकून बसलेल्या हरिणीला दोरी बांधून वर खेचण्याचा प्रयत्न केला. सुमारे ३ तासांच्या प्रयत्नानंतर हरिणीला बाहेर...
  May 23, 09:10 AM
 • यावल-जळगाव हुन परत येत असताना शेळगाव बॅरेज जवळील पाण्यात बुडून एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुणाचे नाव निलेश सुरेश निबाळकर ( वय19 रा.लहान मारोती देशमुख वाडा) यावल असे आहे. घटना बुधवारी सांयकाळी घडली. या घटनेमुळे शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यावल शहरातील लहान मारुती परिसरातील रहिवासी असलेले तीन तरुण बुधवारी दुचाकीवरून जळगावला आल होते. संध्याकाळी ते यावलला शेळगाव बॅरेज मार्गे परत येत असताना शेळगाव बॅरेजच्या जवळील साचलेल्या पाण्याच्या डोहामध्ये निलेश सुरेश...
  May 22, 07:33 PM
 • जळगाव - अभ्यासासाठी वेळेत नोट्स न मिळाल्यामुळे एका उच्चशिक्षित तरुणीने रॅट किल (उंदीर मारण्याचे औषध) खाऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला. शुभांगी सीताराम सोनवणे (वय २५, रा. साळशिंगी, ता. बोदवड) असे मृत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, तरुणीने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आपण या कारणामुळे औषध खाल्ल्याचे कुटुंबीयांना सांगितले. शुभांगी ही साळशिंगी गावात एका शाळेत कंत्राटी पद्धतीने इंग्रजी शिकवण्याचे काम करीत होती. तसेच एमएचे...
  May 22, 10:19 AM
 • भुसावळ - जबलपूर येथून मुंबई येथे ४० लाख रुपयांची राेकड बॅगेमध्ये घेऊन जाताना इतर प्रवाशांनी बॅग उचलून नेल्याचे संबंधित प्रवाशाच्या लक्षात अाल्यावर येथील जीअारपी पाेलिसांना माहिती देताच पाेलिसांनी स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून अवघ्या पाच तासांत अनवधानाने शहरातील एका लग्नाच्या वऱ्हाडाने नेलेली बॅग पाेलिसांनी त्याच्या घरी जाऊन जप्त केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दरम्यान, ही राेकड हवालाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. पाेलिस निरीक्षक दिलीप गढरी म्हणाले, १७ मे...
  May 22, 09:38 AM
 • जळगाव -पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दुष्काळी दौऱ्यात सहभागी होण्यासाठी जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील मुंबईहून जळगाव येथे येण्यासाठी निघाल्या असता शनिवारी पहाटे ३ वाजता नाशिकजवळील ओझर गावाजवळ त्यांच्या इनोव्हा कारला ट्रकने पाठीमागून धडक दिली. सुदैवाने यात पाटील यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, कारचे नुकसान झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी जिल्ह्यात दुष्काळी दौरा असल्यामुळे जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, पती माजी जि. प. उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील हे मुंबईहून...
  May 19, 10:44 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात