जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • Delete
  April 8, 12:27 PM
 • यावल -यावलहून भुसावळला जाणाऱ्या एका एसटी बसमधून पडून प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. यावल आगारातून रविवारी निघालेल्या या बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. अशात भुसावळ येथील रहिवासी बंटी गुलाबचंद डोलतानी दाराजवळच थांबला होता. याचवेळी अचानक बसचे फाटक उघडले आणि बंटी धावत्या बसमधून पडला. त्याला उपचारासाठी रुग्णायलायतही नेण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावल आगारातून बस क्रमांक एम.एच. 20 बी.एल. 1641 ही बस रविवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास...
  April 8, 11:45 AM
 • यावल- तालुक्यातील वढोदे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल विठ्ठल सोनवणे हे मंगरूळ (ता. चोपडा) फाट्याजवळ झालेल्या अपघातात जागीच ठार झाले आहेत. अपघात रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडला. ते ज्या चारचाकी वाहनातून जात होते, यावेळी त्यांच्या गाडीसमोर अचानक दुचाकीस्वार आला आणि त्याला वाचवताना गाडी झाडाला आदळली तर मागुन दुसरा दुचाकी धारक थेट चारचाकीवर धडकत विचित्र अपघात घडला. या विचित्र अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. वढोदे येथील रहिवासी अनिल विठ्ठल सोनवणे(41) हे चोपडा तालुक्यातील कोळंबे...
  April 7, 06:06 PM
 • नवापुर : येथील माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री माणिकराव गावित यांचे स्वीय सहायक मुंबईहून बेपत्ता झाले होते. १ एप्रिल रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास नवापूर रेल्वे स्थानकावर आढळून आल्याने भगवान रामचंद्र गिरासे यांची सुखरूप घरी परतले होते. चार दिवसांपासून कोणाजवळ काही बोलत नव्हते परिवार सोबत देखील कमी बोलत होते. शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अचानक राहत्या घरात गळफास घेतला. घरातील सदस्यांनी लगेच त्यांना पकडले दोरी कापली आणि तात्काळ नवापूर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी...
  April 5, 12:17 PM
 • जळगाव | जळगाव लाेकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार बदलणार असल्याची चर्चा बुधवारी दिवसभर सुरू हाेती. यासंदर्भात मुंबईत झालेल्या घडामाेडीनंतर रात्री उमेदवार बदलण्यावर खल सुरू होता. आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असून, ते गुरुवारी उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. जळगावातील भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या उमेदवारी बदलाच्या हालचाली मंगळवारी सुरू झाल्या हाेत्या. बुधवारी जलसंपदा मंत्री गिरीश...
  April 4, 11:14 AM
 • यावल - तालुक्यातील भालशिव पिंप्रीसेकम या गाव शिवारात बिबट्या मुक्त संचार करताना दिसून आला आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या या बिबट्याचे फोटो समोर येताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भातील माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने परिसरातील जंगल-मळ्यांत पाहणी केली. मात्र, संध्याकाळपर्यंत बिबट्या हाती आला नाही. या संदर्भात वनविभाग पूर्वचे वनक्षेत्रपाल व्ही.एम. पाटील यांनी माहिती दिली, की पिंप्रीसेकम गाव शिवारात बिबटया दिसून आल्याची तक्रार फोनवरून...
  April 3, 05:21 PM
 • यावल - येथील फैजपूर रस्त्यावर प्रवाशांनी भरलेली अॅपे पिक्षा आणि कामरध्ये विचित्र अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अॅपे रिक्शाला एक भरधाव कार कट मारून निघाली. रिक्षा सांभाळण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटला आणि रिक्षा पलटली. यापैकी एका जखमीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे, त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयातून थेट जळगावला हलवण्यात आले आहे. नांदूरखेडा येथे...
  April 3, 04:12 PM
 • चाळीसगाव - शहरातील तेजस कोणार्क परिसरात असलेल्या शिक्षक कॉलनीत मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री सशस्त्र दरोडा घालण्यात आला. वना शेवरे यांच्या राहत्या घरी सुमारे 5 ते 6 दरोडेखोरांनी हल्ला करून शेवरे यांचा मुलगा मनोजच्या डोक्यावर टॉमीने वार केला. तसेच बचावासाठी आलेल्या इतर कुटुंबियांना देखील मारहाण केली. यानंतर घरातील जवळपास 5 तोळे सोने नाणे आणि ते 20 हजार रुपये रोख असा ऐवज चोरू नेला. या घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत मनोजला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहरातील...
  April 3, 10:49 AM
 • यावल- येथील अंकलेश्वर बुऱ्हानपूर मार्गावर दोन भरधाव ट्रक समोरा-समोर धडकले आहे. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये दोन्ही ट्रकचे समोरील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, दोन्ही जखमी चालकांना जळगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर यावल-किनगाव दरम्यान वाघोदा गाव आहे. या गावाजवळील...
  April 1, 05:08 PM
 • भडगाव (जि. जळगाव) -जळगाव जिल्ह्यातील भडगावमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी केलेल्या सामूहिक आत्महत्याप्रकरणी घरमालकासह त्याच्या जावयाला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना ३ एप्रिलपर्यंत पोलिस काेठडी मिळाली दिले आहे. मुलाच्या खुनाच्या तपासासाठी घरमालकाला १५ हजार रुपये दिल्यानंतही तो वारंवार पैशांची मागणी करत असल्याने सामूहिक आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. बब्बू सय्यद असे भाडेकरूचे तर इलियास बेग मालकाचे नाव आहे. साजिद हा इलियासचा जावाई आहे. २२ मार्च रोजी येथील टोणगाव भागातील रहिवासी...
  April 1, 10:39 AM
 • जळगाव -समतानगरातील धामणगाव वाडा भागात राहणाऱ्या ९ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून नंतर गळा आवळून तिचा खून केल्याप्रकरणी आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (६३, रा.समतानगर) याला न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप व १ लाख ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा शनिवारी ठोठावली. दरम्यान, त्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पीडित बालिकेचे कुटुंबीय उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. आदेशबाबा याने १२ जून २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास धामणगाव वाडा भागातील ९ वर्षीय बालिकेचे अपहरण केले. काही वेळातच...
  March 31, 10:41 AM
 • जळगाव -नऊ वर्षीय मुलाचा क्रूरपणे खून होऊन नऊ दिवस उलटले. तरी देखील पोलिसांनी त्याच्या मारेकऱ्याचा शोध घेतला नाही. त्यामुळे नैराश्य व संतापात मृत मुलाच्या आई-वडीलांसह बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे बालकाच्या खुनाचा तपास झाला नाही. त्यामुळे तिघांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईटनोटमधून हा गंभीर प्रकार समोर आला आहे. इसम बब्बू सय्यद या मुलाची आई पिंकी बब्बू सय्यद (३८), वडील बब्बू सय्यद ( ४२)...
  March 31, 08:46 AM
 • नंदुरबार - नवापूर काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा दादा. आगामी जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीवेळी सर्वात आधी गावित परिवाराला विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर माणिकराव गावित व भरत गावित यांच्या राग कमी झाला. माणिकराव गावित यांनी काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठीना आम्ही काँग्रेस पक्षासोबत राहू. आम्ही कुठेही जाणार नाही. पक्षासाठी काम करू. असे मत माणिकराव गावित व्यक्त केले. मी आदिवासी असल्यामुळे मला अशी वागणूक नंदुरबार लोकसभा मतदार संघात माजी केंद्रीय राज्य मंत्री माणिकराव...
  March 30, 08:23 PM
 • भडगाव- जळगाव जिल्ह्यातील भगडाव येथे मुलाच्या विरहात आई-वडील आणि मुलगी अशा तिघांनीही सामूहिक आत्महत्या केल्याची घटना आज(दि.30)घडली आहे. 9 वर्षीय इसम बाबू सय्यद याची 22 मार्चला हत्या करण्यात आली होती. या हत्या होऊ इतके दिवस झाले तरीदेखील आरोपींचा शोध लागला नव्हता. यामुळेच बाबू सय्यद खूप तणावात होते. मुलाचा विरह आणि यातूनच आलेला मानसिक तणाव यामुळे कुटुंबातील तिघांनीही सामूहिक आत्महत्या केली.
  March 30, 12:57 PM
 • पहूर/जामनेर- वाकडी ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणेचा मृतदेह गुरूवारी (ता. २८ रोजी) छातीवर दगड बांधलेल्या अवस्थेत पाचोरा तालुक्यातील मोहाडी शिवारात एका निर्जन विहिरीत आढळून आला. त्यानंतर याप्रकरणी प्रमुख संशयित चंद्रशेखर वाणी यास अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत समाजबांधवांनी जळगाव येथे आंदोलन केले. अखेर पोलिसांनी चंद्रशेखर वाणी याला पंढरपूर येथून गुरूवारी अटक केली. दरम्यान, याप्रकरणातील संशयित प्रदीप राजपूत फरार आहे. १९ मार्चपासून बेपत्ता...
  March 29, 12:45 PM
 • यावल/जळगाव- विदेशी बनावट दारु तयार करणाऱ्या डांभुर्णी (ता.यावल) येथील एका कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री छापा मारला. या ठिकाणाहून ३ लाख ४६ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल व बाटल्या सीलंबद करण्याचे मशीन जप्त करण्यात आले आहे. चार जणांना अटक करण्यात आली असून कारखान्याचा मुख्य सूत्रधार फरार आहे. या पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधीर आढाव यांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री डांभुर्णी (ता.यावल) येथील कपिल...
  March 29, 12:15 PM
 • नंदुरबार- सलग आठ वेळेस काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेले माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. 30 मार्च रोजी त्यांनी नवापूर येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचा विचारविनिमयासाठी खास मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये ते आपली भूमिका जाहीर करणार असून त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची डोकेदुखी देखील वाढणार आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲड. के. सी. पाडवी यांच्या...
  March 28, 02:14 PM
 • जळगाव- पाचोरा येथील शिवसेनेचे माजी आमदार तसेच निर्मल सिड्सचे कार्यकारी संचालक आर.ओ. तात्या पाटील यांचे मुंबईत आजाराने निधन झाले. आर.ओ. तात्या यांनी गुरुवारी पहाटे साडे चार वाजता अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी 5 वाजता पाचोरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
  March 28, 12:57 PM
 • जळगाव- काँग्रेसचे सरचिटणीस अजबराव पाटील यांच्यावर हल्ला करून त्यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना गुरुवारी घडली आहे. निलंबित महिला शहराध्यक्षा अरुणा पाटील यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. शिक्षक आमदार तांबे, जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी अध्यक्ष उदय पाटील, महानगर कार्याध्यक्ष राधेश्याम चौधरी, ए.जी. भंगाळे यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे. पुढील स्लाइड्सवर...
  March 28, 12:53 PM
 • यावल- तालुक्यातील अंजाळे येथे विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अंजाळे येथे घडली. मिळालेली माहिती अशी की, गावातील ट्रान्सफॉर्मरची फ्यूज कोणीतरी काढून टाकले होते. फ्यूज टाकण्यास उशिरा का आला, असा जाब एकाने वायरमनला विचारत त्याला मारहाण केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दत्तू कृष्णा कोळी याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण भोजू भालेराव...
  March 26, 06:08 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात