जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • यावल - यावल ते भुसावळ रस्त्यावर दुचाकीच्या समोरील टायरचा अचानक स्फोट झाला. यानंतर गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन आदळली. या विचित्र अपघातात एका व्यक्कतीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. यातील मृताचे नाव शेख अजीम शेख सैफुद्दीन (25) असे होते. तर इतर दोन्ही जखमींना तात्काळ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. भुसावळ नाक्याच्या पुणे महाराष्ट्र धाब्याच्या समोर...
  April 22, 12:20 PM
 • अमळनेर (जि.जळगाव) -सत्तेत येण्यापूर्वी दिलेले पाडळसरे धरण पूर्ण करण्याचे आश्वासन न पाळल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये लोकांच्या संतापाला सामाेरे जावे लागले. जनआंदोलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले व त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर िनदर्शने केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. याप्रकरणी १५ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी नाबार्डच्या...
  April 20, 10:48 AM
 • मेहकर -मध्य प्रदेशातील महू या डॉ. आंबेडकरांच्या जन्मस्थानी जयंती साजरी करून परत येणाऱ्या कुटुंबावर सोमवारी त्यांच्या गावापासून हाकेच्या अंतरावर काळाने झडप घातली. बुलडाण्यातील अंजनी बुद्रुक गावाजवळ त्यांच्या स्कॉर्पिओला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत कुटुंबातील दोन्हीही कर्त्या पुरुषांसोबत ५ जणांचा बळी गेला. ही घटना १४ एप्रिलच्या मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास घडली. मृतांत वर्षभराच्या मुलासह २ महिलांचा समावेश आहे. अपघातात स्काॅर्पिओचा समोरील भाग अक्षरश: चकनाचूर झाला होता, तर...
  April 16, 10:27 AM
 • भुसावळ -शहरातील लोणारी हॉल परिसरातील हुडको कॉलनीमध्ये घरकुलांजवळ रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास प्रेम प्रकरणातून एका तरुणीवर चाकूने सपासप वार केल्याने तिचा मृत्यू झाला. संशयित तरुणास पाेलिसांनी तातडीने अटक केली आहे. प्रीती ओंकार बांगर (वय २२) असे मृत तरुणीचे नाव आहे. नगर पालिकेने बांधलेल्या घरकुलात रहात असलेली प्रीती ओंकार बांगर (वय २२) या तरूणीवर रविवारी रात्री नऊला प्रवीण विष्णू इंगळे (वय २७. रा. राहुल नगर, भुसावळ) याने प्रेमप्रकरणातून चाकूने वार केले. अचानक वार झाल्यामुळे...
  April 15, 12:09 PM
 • भुसावळ -यावल तालुक्यातील बामणाेद येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय महिलेवर पाच जणांनी अत्याचार केल्याचा जबाब पीडीतेने जीआरपी पोलिसांना दिला. त्यानुसार जीआरपीत गुन्हा दाखल झाला आहे. बामणाेद येथील २२ वर्षीय महिला संतापाच्या भरात गुरुवारी (दि. ११) घरून निघून गेली होती. याबाबत फैजपूर पाेलिस ठाण्यात ती हरवल्याची नाेंद झाली अाहे. भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यानंतर संशयितांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर ८ ते १२ एप्रिल या काळात एका खोलीत डांबून ५ जणांनी तिच्यावर अत्याचार केला, असा जबाब पीडितेने...
  April 15, 11:02 AM
 • जळगाव - नरेंद्र मोदी हुकूमशहा असल्याचा आरोप विराेधक करतात. पण या देशाला दुबळ्या माणसापेक्षा डेडिकेटेड (समर्पित) हुकूमशहा माणूस पंतप्रधान म्हणून कधीही परवडणारा आहे, असे परखड मत संरक्षण राज्यमंत्री आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केले. डॉ. भामरे हे २०१४ मध्ये पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून गेले. उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना मोदींनी लगेच मंत्रिमंडळात स्थान दिले. महत्त्वाचे खातेही साेपवले. संघ आणि भाजपत कधीही नसलेले आणि ज्यांचा राजकीय वारसा...
  April 15, 09:04 AM
 • जळगाव -जळगाव तसं उन्हाळ्यात तापणारं शहर. एप्रिल-मे महिन्यात तर पारा ४१ अंशांच्या खाली येत नाही. एवढ्या कडक उन्हात या मतदारसंघात निवडणुकीचं वातावरण शांत असेल, लोक बाहेर निघत नसतील, असे कुणालाही वाटत असेल; पण लोकांच्या वाटण्याला इथे काहीही अर्थ नाही. जळगाव राजकीयदृष्ट्याही तितकंच तापतं. या वेळेस तर ते निवडणूक जाहीर होण्याआधीच तापलं होतं. त्याची सुरुवात अश्लील चित्रफितीने झाली. त्यानंतर थेट भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेत माजी आमदाराला लाथाबुक्क्यांनी तुडवल्याचे उभ्या महाराष्ट्राने...
  April 14, 10:14 AM
 • जळगाव -राज्यात ३३ जिल्ह्यांतील ८२ हजार ६३६ शाळांसाठी शिक्षण विभागाने २०१८ मध्ये निविदा काढलेल्या शालेय पाेषण आहार याेजनेत शासन, प्रशासन आणि ठेकेदार लाॅबीने करोडोंचा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सलग दुसऱ्या वर्षी संबंधित लाॅबीने १७० काेटी रुपयांत साकारणाऱ्या या याेजनेसाठी ३५० काेटी रुपयांची बिले काढली. त्यामुळे ही योजना म्हणजे विद्यार्थ्यांचे शोषण आणि ठेकेदारांचे पोषण यासाठीच सुरू असल्याचे स्पष्ट होते. आहार याेजनेत काेणत्याही एक किलो डाळीमागे ठेकेदार ३३ ते...
  April 13, 10:19 AM
 • अमळनेर - बुधवारी भाजपच्या मेळाव्यात दोन गटांत झालेल्या हाणामारीत जखमी झालेले भाजपचे माजी आमदार डॉ.बी. एस. पाटील यांच्या नाकाचे हाड मोडले असून त्यांच्या लिव्हरलाही सूज आली आहे. धुळ्यातील एका खासगी हाॅस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी सायंकाळी अमळनेरमध्ये भाजपचा मेळावा झाला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी आमदार डॉ.बी. एस. पाटील यांना भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व...
  April 12, 09:28 AM
 • अमळनेर - जळगावचे भाजप उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी आयाेजित सभेत पक्षातील दाेन गटांत तुंबळ हाणामारी झाली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमक्ष भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार डाॅ. बी. एस. पाटील यांच्या कानशिलात लगावली. त्यावर दाेन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर धाव घेत हाणामारी सुरू केली. यात महाजन यांनाही धक्काबुक्की झाली. पाटील यांच्यावर तर जमाव तुटूनच पडला. महाजन यांनी मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना...
  April 11, 08:35 AM
 • धुळे - पक्षातील काही नेत्यांवर नाराज असलेले भाजपचे नेते अनिल गाेटे यांनी साेमवारी आपल्या आमदारकीचा व पक्षसदस्यत्वाचा राजीनामा अनुक्रमे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे सुपूर्द केला. आता धुळे लाेकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांच्याविराेधात गाेटे उमेदवारी करणार आहेत. अनिल गोटे यांनी महापालिका निवडणुकीपासूनच पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपविरोधात आपल्याच...
  April 9, 09:16 AM
 • जळगाव -प्रेमविवाह करून न्यायालयात हजर झालेल्या जोडप्यामुळे सोमवारी जळगाव न्यायालयात तणाव निर्माण झाला. गर्दी व तणावामुळे दरवाजा बंद करून कामकाज करावे लागले. दोघेही सज्ञान असल्याने त्यांना सोबत राहण्याची परवानगी देत पोलिस बंदोबस्तात रवाना करण्यात आले. हे प्रेमीयुगुल २८ मार्चपासून बेपत्ता होते. मुलीला मुलाच्या कुटुंबीयांनी डांबून ठेवल्याचा अर्ज मुलीच्या आईने न्यायालयात केला होता. त्यानुसार न्यायालयाने मुलाच्या कुटुंबीयांना नोटीस बजावली होती. मुलाशी संपर्क करून दोघांना ८ एप्रिल...
  April 9, 08:59 AM
 • Delete
  April 8, 12:27 PM
 • यावल -यावलहून भुसावळला जाणाऱ्या एका एसटी बसमधून पडून प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. यावल आगारातून रविवारी निघालेल्या या बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. अशात भुसावळ येथील रहिवासी बंटी गुलाबचंद डोलतानी दाराजवळच थांबला होता. याचवेळी अचानक बसचे फाटक उघडले आणि बंटी धावत्या बसमधून पडला. त्याला उपचारासाठी रुग्णायलायतही नेण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावल आगारातून बस क्रमांक एम.एच. 20 बी.एल. 1641 ही बस रविवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास...
  April 8, 11:45 AM
 • यावल- तालुक्यातील वढोदे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल विठ्ठल सोनवणे हे मंगरूळ (ता. चोपडा) फाट्याजवळ झालेल्या अपघातात जागीच ठार झाले आहेत. अपघात रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडला. ते ज्या चारचाकी वाहनातून जात होते, यावेळी त्यांच्या गाडीसमोर अचानक दुचाकीस्वार आला आणि त्याला वाचवताना गाडी झाडाला आदळली तर मागुन दुसरा दुचाकी धारक थेट चारचाकीवर धडकत विचित्र अपघात घडला. या विचित्र अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. वढोदे येथील रहिवासी अनिल विठ्ठल सोनवणे(41) हे चोपडा तालुक्यातील कोळंबे...
  April 7, 06:06 PM
 • नवापुर : येथील माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री माणिकराव गावित यांचे स्वीय सहायक मुंबईहून बेपत्ता झाले होते. १ एप्रिल रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास नवापूर रेल्वे स्थानकावर आढळून आल्याने भगवान रामचंद्र गिरासे यांची सुखरूप घरी परतले होते. चार दिवसांपासून कोणाजवळ काही बोलत नव्हते परिवार सोबत देखील कमी बोलत होते. शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अचानक राहत्या घरात गळफास घेतला. घरातील सदस्यांनी लगेच त्यांना पकडले दोरी कापली आणि तात्काळ नवापूर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी...
  April 5, 12:17 PM
 • जळगाव | जळगाव लाेकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार बदलणार असल्याची चर्चा बुधवारी दिवसभर सुरू हाेती. यासंदर्भात मुंबईत झालेल्या घडामाेडीनंतर रात्री उमेदवार बदलण्यावर खल सुरू होता. आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असून, ते गुरुवारी उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. जळगावातील भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या उमेदवारी बदलाच्या हालचाली मंगळवारी सुरू झाल्या हाेत्या. बुधवारी जलसंपदा मंत्री गिरीश...
  April 4, 11:14 AM
 • यावल - तालुक्यातील भालशिव पिंप्रीसेकम या गाव शिवारात बिबट्या मुक्त संचार करताना दिसून आला आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या या बिबट्याचे फोटो समोर येताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भातील माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने परिसरातील जंगल-मळ्यांत पाहणी केली. मात्र, संध्याकाळपर्यंत बिबट्या हाती आला नाही. या संदर्भात वनविभाग पूर्वचे वनक्षेत्रपाल व्ही.एम. पाटील यांनी माहिती दिली, की पिंप्रीसेकम गाव शिवारात बिबटया दिसून आल्याची तक्रार फोनवरून...
  April 3, 05:21 PM
 • यावल - येथील फैजपूर रस्त्यावर प्रवाशांनी भरलेली अॅपे पिक्षा आणि कामरध्ये विचित्र अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अॅपे रिक्शाला एक भरधाव कार कट मारून निघाली. रिक्षा सांभाळण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटला आणि रिक्षा पलटली. यापैकी एका जखमीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे, त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयातून थेट जळगावला हलवण्यात आले आहे. नांदूरखेडा येथे...
  April 3, 04:12 PM
 • चाळीसगाव - शहरातील तेजस कोणार्क परिसरात असलेल्या शिक्षक कॉलनीत मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री सशस्त्र दरोडा घालण्यात आला. वना शेवरे यांच्या राहत्या घरी सुमारे 5 ते 6 दरोडेखोरांनी हल्ला करून शेवरे यांचा मुलगा मनोजच्या डोक्यावर टॉमीने वार केला. तसेच बचावासाठी आलेल्या इतर कुटुंबियांना देखील मारहाण केली. यानंतर घरातील जवळपास 5 तोळे सोने नाणे आणि ते 20 हजार रुपये रोख असा ऐवज चोरू नेला. या घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत मनोजला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहरातील...
  April 3, 10:49 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात