जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

  • धुळे- शेतातील झाडाला आईच्या साडीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील दलवाडे येथे शुक्रवारी उघडकीस आली.नारोत्तम गुलाब कापूरे (२५) असे तरुण शेतकऱ्याचे नाव असून तो अविवाहित होता. गुलाब कापूरे यांच्या नावाने तीन एकर शेती आहे. नारोत्तमच्या वडिलांनी बँकेतून १६ हजार रुपये पीक कर्ज घेतले होते. तसेच एका खासगी कंपनीकडे घर गहाण ठेऊन घर बांधण्यासह शेतीसाठी दीड लाख रुपये कर्ज घेतले होते. चांगले उत्पादन आल्यावर कर्ज फेडण्याचे नियोजन होते. मात्र, यंदा पुरेशा प्रमाणात पाऊस न...
    December 29, 08:04 AM
  • बुलडाणा- शाळेत जात असतांना मागून येऊन विदयार्थिनीचा हात धरुन विनयभंग करणाऱ्या तरुणास तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा येथील विशेष जिल्हा कोर्टाने सुनावली. स्थानिक आंबेडकर नगर मधील सचिन महादेव चिम याने 11 मार्च 2016 रोजी शहरातीलच एका विदयार्थिनीचा शाळेत जाऊन पाठलाग केला. या वेळी मागून येऊन तू मला आवडतेस तू माझ्याशी का बोलत नाहीस असे म्हणत तिचा उजवा हात पकडून ओढत विनयभंग केल्याची घटना घडली होती. या घटनेची तक्रार पीडीत युवतीने पोलिस स्टेशनला दाखल केली होती. त्यावरुन सचिन...
    December 29, 12:09 AM
  • जळगाव- बसमध्ये चढणाऱ्या महिलेचे दोन मंगळसूत्र अल्पवयीन मुलीने चोरले. ही घटना नवीन बसस्थानकात गुरुवारी सकाळी १०.१५ वाजता घडली. हरिओमनगरातील साईबाबा मंदिराजवळ राहणाऱ्या शारदा धनेश्वर कोळी (वय ३६) ही महिला गुरुवारी नवीन बसस्थानकातून पाचोरा बसमध्ये चढू लागल्या. या वेळी दहा वर्षांची गुलाबी रंगाचे स्वेटर व चॉकलेटी पॅन्ट घातलेली मुलगी गर्दीतून वाट काढत आली. तिने कोळी यांच्या गळ्यातील १० हजार किमतीचे दोन मंगळसूत्र चोरून पळ काढला. त्यांनी आरडाओरड केली. प्रवाशांसह बसस्थानकात नेमणुकीस असलेले...
    December 28, 11:13 AM
  • जळगाव- महापालिकेत अाधीच मक्तेदारांची काेट्यवधी रुपयांची देणी असल्याने नवीन कामांसाठी काेणी पुढे यायला तयार नाही. त्यात झालेल्या कामांच्या बिलासाठी अडवणुकीचा नवीन मुद्दा चर्चेचा ठरत अाहे. २५ कोटींतून मंजूर पुलाच्या कामाच्या बिलावर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ केल्याच्या कारणावरून गुरुवारी दुपारी १ वाजता मक्तेदाराचा शहर अभियंत्यासोबत वाद झाला. स्वाक्षरी न करताच अभियंता निघून गेल्याने मक्तेदाराने थेट जिन्यात फाइल फेकून दिल्याने वातावरण चांगलेच तापले हाेते. दाेन वर्षांपूर्वी...
    December 28, 11:06 AM
  • जळगाव- आदिवासी टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी व इतर आदिवासींवर होत असलेल्या अन्याला वाचा फोडण्यासाठी व सरकारने दिलेल्या आश्वासन पूर्ण करण्यासाठी आदिवासी वाल्मीकलव्य सेनेतर्फे बुधवारी दुपारी दोन वाजता मस्का मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस अन् राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांचे मुखवटे लावून स्नान करत मस्का लावण्यात आला. यात समाजातील महिला व पुरुषांचा मोठ्याप्रमाणात सहभाग होता. आंदोलनादरम्यान विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या....
    December 27, 03:16 PM
  • भुसावळ- कामावरून घरी पतरणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्याच्या दुचाकीला आयशरने मागून धडक दिल्याची घटना, बुधवारी दुपारी २.२० वाजेच्या सुमारा महामार्गावरील सुभाष गॅरेजजवळ घडली. दुचाकीला धडकल्यानंतर आयशरने समोरून येणाऱ्या इनोव्हालादेखील धडक दिली. अपघातात आयशर आणि इनोव्हाच्या या वाहनांच्या मध्ये सापडल्याने दुचाकीस्वार वायरमन राजेंद्र श्रावण धनगर (चिंचोले) (वय ४२ रा.वरणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे म्हसावद (ता.जळगाव) येथे नियुक्तीवर असलेल्या धनगर यांना जळगावात...
    December 27, 10:47 AM
  • जळगाव- महामार्गावरून दुचाकीने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या तीन भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी रात्री ९.४५ वाजता इच्छादेवी चौकाजवळ घडली. दुचाकीवर ट्रिपलसीट बसून सोनसाखळ्या, मोबाइल लांबवणाऱ्या भामट्यांनी १६ दिवसांत चारवेळा हातसफाई केली आहे; परंतु अद्याप हे भामटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या शिवाय शहरात चोरी, घरफोड्यांचेही प्रमाण वाढले आहे. हर्षा योगेश महाजन (वय ३७, रा.भूषण कॉलनी, गिरणा पाण्याची टाकी) यांच्या...
    December 27, 10:33 AM
  • धुळे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सायंकाळी मुख्यमंत्री रवाना झाल्यानंतर नरेंद्र पाटील यांना सोडण्यात आले. दोंडाईचापासून जवळ असलेल्या विखरण येथील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात हा विषय गाजला होता. बुधवारी मुख्यमंत्री...
    December 26, 06:30 PM
  • यावल- किनगाव येथे बँडच्या तालावर नाचताना, तोल जाऊन डोक्यावर पडल्याने तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे संबंधित तरुणाने जखमेकडे दुर्लक्ष केले. जखमी अवस्थेत रात्री झोपी गेलेला तरूण मंगळवारी सकाळी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. चेतन शरद पाटील (वय २८)असे मृताचे नाव आहे. किनगावात सोमवारी हजरत मलंगशाह बाबा यांचा संदल होता. संदल मिरवणुकीत बँड पथक सहभागी झाले होते. मिरवणुकीत चेतन पाटील हा तरुण मित्रांसोबत नाचत होता. नाचताना तोल गेल्याने तो...
    December 26, 10:50 AM
  • जळगाव- स्वत:जवळ दोन महागडे मोबाइल असूनदेखील आणखी एक मोबाइल खरेदी करून देण्यासाठी तरुणाने आईसोबत भांडण केले. आईने मोबाइल घेऊन देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात थेट धावत्या रेल्वेसमोर झोकून देत तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री ११ वाजता जळगावातील शिव कॉलनी पुलाखाली घडली. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता ओळख पटल्यानंतर त्याची आई व कुटुंबीयांनी रुग्णालयातच आक्रोश केला. सुमेध काकासाहेब भालेराव (खंबाळकर, २३, रा. हिराशिवा कॉलनी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुमेध हा...
    December 26, 09:06 AM
  • जळगाव- स्वत:जवळ दोन महागडे मोबाइल असूनही आणखी एक मोबाइल खरेदी करून देण्यासाठी तरुणाने आईसोबत भांडण केले. मात्र, आईने मोबाइल घेऊन देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात थेट धावत्या रेल्वेसमोर झोकून देत तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री 11 वाजता शिव कॉलनी पुलाखाली घडली. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता ओळख पटल्यानंतर त्याचे आईने व कुटुंबियांनी रुग्णालयातच आक्रोश केला. सुमेध काकासाहेब भालेराव (खंबाळकर, वय 23, रा.हिराशिवा कॉलनी, खोटेनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुमेध हा...
    December 25, 07:54 PM
  • यावल- किनगाव येथे बँडच्या तालावर बेभान होऊन थिरकताना तोल जाऊन डोक्यावर पडून एका तरुणाला मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. चेतन शरद पाटील (वय-28) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी (ता.24) रात्री गावातून संदलची मिरवणूक काढण्यात आली होती. चेतन हा त्याच्या मित्रासोबत मिरवणुकीत नाचत होता. नाचताना तोल जाऊन तो डोक्यावर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊ म्हणत तो घरी गेला. मात्र रात्रीच त्याचा मृत्यू झाला. किनगावात सोमवारी हजरत मलंगशाह बाबा यांचा संदल मिरवणूक काढण्यात...
    December 25, 06:14 PM
  • जळगाव- महिनाभरानंतर माथेफिरुंनी पुन्हा एकदा शहरात दोन वेगवेगळ्या परिसरांत चार दुचाकी जाळल्या. यात सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज अाहे. या घटना रविवारी मध्यरात्री घडल्या. कांचननगरात दुचाकी जाळत असल्याचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. शहर व शनिपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात थंडीचा कडाखा वाढत असल्याने रात्री १० वाजेनंतर लोकांची वर्दळ कमी होत आहे. याच संधीचा फायदा घेत माथेफिरुंनी शहरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी चार दुचाकींवर पेट्रोल टाकून...
    December 25, 11:56 AM
  • जळगाव- रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या भोईटेनगर रेल्वेगेट परिसरात रेल्वेची गती कमी असताना भामट्यांनी दरवाजात बसलेल्या तरुणाच्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यात तो तरुण रेल्वेतून खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाला. रविवारी सायंकाळी ४.४५ वाजता ही घटना घडली. पीयूष राजेश पाटील (वय २२, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीयूष हा धरणगाव येथे नातेवाइकांकडे आला होता. रविवारी सायंकाळी लष्कर एक्स्प्रेसने तो...
    December 25, 11:08 AM
  • जळगाव- उसनवारीचे पैसेे मागितल्याचा राग आल्याने एका तरुणावर चाकूहल्ला झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता तांबापुरा भागात घडली. जखमी तरुणावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आकाश रवींद्र बाविस्कर (वय २२, रा. तांबापुरा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. आकाश याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे सचिन भोई (पूर्ण नाव माहित नाही) याच्याकडे पैसे घेणे होते. सोमवारी आकाशने पैसे मागण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांमध्ये वाद झाले. सचिनने आकाशच्या डाव्या हाताच्या दंडावर चाकूने...
    December 25, 11:05 AM
  • जळगाव- वाहनांना ओव्हरटेक करीत राँग साइडने जळगावकडे येत असलेल्या भरधाव कारने महामार्गावर दादावाडीजवळ पाळधीकडे जात असलेल्या दुचाकीस्वारांना उडवले. या अपघातात रिंगणगावचा युवक घटनास्थळी ठार झाला तर दुसऱ्या युवकाचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. हा अपघात रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास झाला. भूषण जितेंद्र शिंदे (वय २३, रा. रिंगणगाव, ता. धरणगाव) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर प्रशांत सुरेश पाटील (वय २५, रा. एकलग्न) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी...
    December 24, 10:58 AM
  • भुसावळ- रेल्वे रुळांच्या देखभालीची जबाबदारी असणारे ट्रॅकमन रात्री किती तत्परतेने कर्तव्य बजावतात? याची पडताळणी डीअारएम अार.के. यादव यांनी केली. शुक्रवारी (दि.२२) रात्री ११ ते २.४५ दरम्यान भादली ते साकेगाव असे ७ किमी अंतर टॉर्चच्या प्रकाशात पायी चालून, त्यांनी रुळांची देखभाल करणाऱ्या चार ट्रॅकमनसोबत संवाद साधला. कामात अाळस करू नये, प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे, अशा सूचना त्यांनी गस्तीवरील ट्रॅकमनला (पेट्रोलमन) दिल्या. किमान १४ अंश तापमानामुळे कडाक्याच्या थंडीत त्यांनी स्वत:...
    December 23, 12:51 PM
  • यावल- शहरात ऑनर किलिंगच्या संशयावरून पोलिसांनी मृत तरूणीच्या कुटुंबीयांची शनिवारी रात्री उशीरापर्यंत कसून चौकशी केली. दरम्यान 22 वर्षीय या तरूणीचा मृत्यू गुरूवारी (ता.20) झाला होता. तरुणी घटस्फोटीत होती. तरुणीचा मृत्यू संशयास्पद असून तिच्या कुटुंबीयानेच घातपात केल्याची तक्रार एका तरूणाने पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर तरूणीच्या कुटुंबीयास चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते. शहरात गुरूवारी एका 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला होता. सायंकाळीच तिच्या कुटुंबीयांनी मयत...
    December 23, 12:36 PM
  • धुळे :महापालिका निवडणुकीच्या वादातून काल शुक्रवारी (दि.२१) रात्री मिल परिसरातील नारायण मास्तर चाळीत दाेन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दाेन्ही गटांनी एकमेकांवर गावठी कट्ट्यातून गाेळीबार केला. त्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव जखमी झाले. दुसऱ्या गटातील दीपक पुकळेही जखमी झाले. दाेन्ही गटांनी हाणामारीसाठी हाॅकी स्टिक, लाेखंडी राॅडसह इतर हत्याराचा सर्रास वापर केला. या वेळी परिसरातील चार ते पाच दुचाकींची तोडफोड करण्यात आली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहे....
    December 23, 12:18 PM
  • जळगाव :पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेच्या गळ्यातील ८५ हजार रुपयांची सोनसाखळी लांबवल्याच्या गुन्ह्यात बेपत्ता असलेल्या चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी तब्बल दीड वर्षानंतर अटक केली. या चोरट्यावर ठाण्याच्या सत्र न्यायालयाने मकोका कायद्यानुसार कारवाई केली आहे. सय्यद उर्फ सरफराज फिरोज जाफरी उर्फ सरफराज, फिरोज बेग उर्फ सय्यद, उर्फ इराणी, उर्फ सरफराज फिरोज इराणी (वय २८, रा.आंबावली, ता.कल्याण, जि.ठाणे व अजमेरनगर, राजस्थान) असे चोरट्याचे नाव आहे. सरफराज याने कासीम शहा गरीब शहा इराणी (वय २९,...
    December 23, 10:52 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात