Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • धुळे: येथील महानगरपालिकेच्या सर्वपल्ली राधाकृष्णन व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी तरतुदींचा भंग केल्याचा ठपका ठेवत आयुक्त हनुमंत भोंगळे यांनी ही सगळीच दुकाने ताब्यात घेण्याची कारवाई केली. २४ तासांच्या आत दुकाने रिकामी करण्याच्या नोटिसा हाती पडताच गाळेधारक हबकले. आज या सर्व दुकानदारांनी आयुक्त भोंगळे यांना लेखी निवेदन देऊन दुकाने ताब्यात न घेता सामंजस्याने तोडगा काढावा, अशी मागणी केली. दुकानदारांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू झाली आणि सायाच ४२ दुकानदारांमध्ये खळबळ उडाली. ४२...
  August 3, 05:17 PM
 • नंदुरबार: जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उर्वरित तीन सभापतींना खातेवाटप करण्यात आल्याने या विषयाला आज पूर्णविराम मिळाला.जि.प. सभागृहात जि.प. अध्यक्षा कुमुदिनी गावित यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा पार पडली. जि.प. उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांना शिक्षण व आरोग्य, डॉ. भगवान पाटील यांना कृषी व पशुसंवर्धन, तर एम. एस. गावित यांच्याकडे अर्थ व बांधकाम हे महत्त्वाचे खाते कायम राहिले.जि.प. उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या डॉ. भगवान पाटील यांना उपाध्यक्षपद न मिळाल्याने ते रुसले होते, परंतु...
  August 3, 05:14 PM
 • धुळे: येथील महापालिकेला ६४ कोटी २२ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना केवळ ५१ कोटी रुपयांत ठेका देण्याच्या प्रक्रियेवर आमदार अनिल गोटे यांनी घेतलेला आक्षेप सर्वपरिचित झाल्यानंतर जकातीसाठी पुढे सरसावलेल्या निरनिराळ्या इच्छुकांनी आता ६४ कोटीपेक्षाही जास्तीची रक्कम वसूल करण्याची तयारी दर्शविली आहे. सात ठेकेदारांनी भरलेल्या निविदांपैकी मॅपटोल प्रा.लि. या मुंबईस्थित कंपनीने तब्बल ७२ कोटी नऊ लाख रुपयांची वसुली देण्याची तयारी दाखविली आहे.गेल्या दीड वर्षांपासून निरनिराळ्या निविदा...
  August 3, 05:10 PM
 • जळगाव: भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सध्या चौधरी जिल्हा कारागृहात असून त्यांच्यावर भुसावळचे नगरसेवक हेमराज भोळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी खटला सुरु आहे. न्यायालयाच्या खटल्यास वारंवार गैरहजर राहिल्याने चौधरी यांना अटक करण्यात आली होती. त्यांंच्या न्यायालयीन कोठडीची बुधवारी मुदत संपत आल्याने त्यांना कडक पोलिस बंदोबस्तात न्यायालयात न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत पाच...
  August 3, 04:08 PM
 • जळगाव - भुसावळ-रावेरदरम्यानच्या वाघोड रेल्वे पूल खचल्याप्रकरणी रेल्वेचे सहायक विभागीय अभियंता एस. के. जैन यांना निलंबित करण्यात आले. तसेच कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवूून विभागीय अभियंता आर. के. यादव यांच्या बदलीचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.२८ जुलैला मध्य रेल्वेच्या मार्गावरील वाघोड पूल खचल्याचे उघडकीस आले होते. वाघोड रेल्वे पुलाचा खांब ढासळल्यामुळे पूल खचला, असा निष्कर्ष वरिष्ठ अधिकायांनी काढला आहे. वाघोड पूल खचल्याने मध्य रेल्वेची...
  August 3, 02:32 AM
 • जळगाव । हरियाणातील पानिपत येथील संन्याशी राजकुमार रघुवंशी (३१) याने माझ्या पत्नीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पती शिवाजी सोपान भदाणे (४२, रा. मोहननगर, जळगाव) यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात नोंदविल्याने पोलिसांनी त्या संन्याशाविरुद्ध गुन्हा दाखल केला. भदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, उत्तराखंडमधील शिवमंदिराच्या दर्शनाला गेलो असता तेथे संन्याशी राजकुमार रघुवंशी यांच्याशी ओळख झाली. यानंतर संन्याशी आमच्या घरी ये-जा करू लागले. याच दरम्यान पत्नी मंजिरी भदाणे (३७) बेपत्ता...
  August 3, 02:29 AM
 • नंदुरबार । मागास वर्ग क्षेत्र विकास निधी अंतर्गत नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाकरिता 30 कोटींच्या आराखड्याला केंद्रीय समितीच्या मुंबई येथील बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यातील 12 जिल्ह्यांच्या या निधीअंतर्गत नंदुरबार, धुळे व नगर या जिल्ह्यांचा समावेश होता. बुधवारी ग्रामविकास मंत्रालयात झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना मार्गदर्शक सूचना करण्यात आला. निधी मंजुरीचे हे तिसरे वर्ष आहे.
  August 2, 06:37 AM
 • नंदुरबार । भूसंपादन अधिग्रहण कायदा 1894 रद्द करण्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर 3 ते 5 ऑगस्टदरम्यान नॅशनल अलायन्स ऑफ पीपल मूव्हमेंट या राष्ट्रीय संघटनेतर्फे धरणे धरण्यात येणार आहे.या धरणे आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील दोनशे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे दिव्य मराठीला देण्यात आली. विनाजबरदस्तीने पुनर्वसन, न्यायपूर्ण पुनर्वसन व पुनस्र्थापना याबाबतच्या मागण्यांचा त्यात समावेश आहे. 15 राज्यांतील प्रतिनिधी दिल्लीत दाखल होणार असून...
  August 2, 06:34 AM
 • नंदुरबार । शहादा तालुक्यातील तर्हाडी येथील अनुदानित आर्शमशाळेच्या विदय़ार्थी मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांनी केली आहे. तर्हाडी येथील कै. मांगू दला सोनवणे प्राथमिक व माध्यमिक आर्शमशाळेतील विद्यार्थी नवलसिंग ओहल्या राहसे (8) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सामुद्रे यांनी मनसेच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत ही मागणी केली. यावेळी पवन गवळे, चिंधू धोबी, दीपक लोहार आदी उपस्थित होते.
  August 2, 06:33 AM
 • धुळे - धुळे शहरातील गल्ली क्रमांक चारमधील देना बॅँकेच्या शाखेत 15 लाखांची रोख रक्कम चोरट्याने दिवसाढवळ्या लांबविल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.याबाबत बॅँक यंत्रणेकडून पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी बॅँकेचे रोखपाल करुणा महाजन यांनी अनुभवी शिपाई बापू जगताप यांच्या मदतीने बॅँकेच्या तिजोरीवजा लॉकर रूममधून एकूण 17 लाख रूपये काढले. पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांची बंडले काढून ती रोखपालाच्या केबिनमध्ये ठेवण्यात...
  August 2, 02:17 AM
 • जळगाव - बिल्डरकडून १५ लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी अटकेत असलेले भुसावळचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी आमदार व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक संतोष चौधरी यांना जळगाव सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.भुसावळ येथील बिल्डर चंद्रशेखर अत्तरदे यांच्याकडून १५ लाखांची खंडणी वसूल केल्याच्या आरोपाखाली जळगाव गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने त्यांना अटक केली होती. चौधरी यांची नगरपपालिकेत सत्ता आहे. नवीन बांधकाम परवानगी व अकृषक प्रकरणी नगर परिषदेच्या...
  August 1, 01:34 AM
 • नंदुरबार - तहसीलदारांना संशयास्पद आढळून आलेल्या आयशर गाडीतून शहाद्यानजीक बनावट खताच्या दीडशे गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. तहसीलदार प्रमोद भामरे यांना ही गाडी आढळून आली. सारंगखेड्याकडून तहसीलदार भामरे हे शहाद्याकडे येत होते. या वेळी शहाद्यातून दोंडाईचाकडे जाणा-या आयशरचालकाने घाबरलेल्या स्थितीत ही गाडी समोरच्या शेतात घुसविली व शेतात गाडी तशीच सोडून पळ काढला. यामुळे संशय वाढल्याने तहसीलदारांनी पोलिसांना घटनास्थळावर बोलावून घेऊन वाहनाची तपासणी केली. या वेळी त्यांना किसान पोटॅश...
  August 1, 01:32 AM
 • जळगाव-भुसावळ शहरातील एका बिल्डरच्या जमिनीस अकृषक परवानगीसाठी भुसावळ नगरपालिकेची एनओसी मिळवून देण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँगे्रसचे माजी आमदार संतोष छबिलदास चौधरी यांच्यासह अन्य एका व्यक्तीला शुक्रवारी रात्री अटक करून त्यांच्या विरोधात जळगावच्या जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बिल्डर चंद्रशेखर अत्तरदे (रा. जळगाव) यांना त्यांचे प्लॉट एन.ए. परवानगीसाठी एन.ओ.सी. तसेच बांधकाम परवानगीसाठी चौधरी यांनी एक कोटी रुपयांच्या खंडणीची...
  July 31, 01:06 AM
 • धुळे:तालुक्यातील पुरमेपाडा शिवारातील हॉटेल शिवकृपाजवळ शुक्रवारी सकाळी थांबलेल्या संशयास्पद टॅँकरची तपासणी करण्यासाठी पोहोचलेल्या तहसीलदारांना पाहताच टॅँकरचालकाने टॅँकरसह मालेगावच्या दिशेने पलायन केले, परंतु तहसीलदारांनी ग्रामस्थ, पोलिस आणि सहकायांच्या मदतीने तो पकडला. टॅँकरमध्ये जवळपास सहा हजार लिटर रॉकेल असून ते भेसळीसाठीच आणले होते, असा संशय व्यक्त होत आहे.याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी मुंबई-आग्रा रस्त्यालगत पुरमेपाडा (ता. धुळे)...
  July 30, 03:00 PM
 • मनमाड: मनमाड शहराच्या पाणीप्रश्नासह इतर प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीच्या मागणीसाठी शुक्रवारी येथील एकात्मता चौकात मानवी साखळी करून जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनमाडमधील सर्व पक्ष व संघटना सहभागी झाल्या होत्या.मनमाडचा पाणीप्रश्न तीव्र झाला असून आगामी तीन दिवसांत मनमाडला पाण्याचे अतिरिक्त आवर्तन न मिळाल्यास मनमाड बंद व इतर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी दिला.मनमाडला पालखेड धरणातून पाण्याचे अतिरिक्त आवर्तन मिळाले पाहिजे,...
  July 30, 02:55 PM
 • धुळे: प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार निधीची तरतूद नसल्याचे कारण स्पष्ट करीत गुरुवारी येथील परिचर्या प्रशिक्षण केंद्रात कार्यरत २० कर्मचा-यांना सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश निघाले. राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून ही सर्व पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात आली होती.सन २०११-१२ या आर्थिक वर्षात प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार निधीची तरतूद झालेली नसल्याने २८ जुलैपासून या सर्व २० कर्मचायांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. या कर्मचा-यांत माळी, शिपाई,...
  July 30, 02:53 PM
 • जळगाव: जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला आघाडीत नवा, जुना असा वाद विकोपाला गेला असून माजी महिला पदाधिका-यांपुढे चक्क शरणागती पत्करून पक्षाने नव्याने नियुक्त केलेल्या जळगाव महानगर अध्यक्षपदाचा राजीनामा सौ. मीनल पाटील यांनी दिला आहे. पदाचा राजीनामा देऊन मीनल पाटील आता मुंबईत दाखल झाल्या असून पक्षाच्या प्रदेश पदाधिका-यांनीच हा वाद मिटवावा, अशी अपेक्षा महिला आघाडीच्या माजी पदाधिका-यांनी व्यक्त केली आहे.महिला पदाधिकारी नियुक्तीचा वाद गेल्या दहा दिवसांपासून रंगला आहे. मीनल...
  July 30, 02:49 PM
 • जळगाव: भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांना शुक्रवारी सुमारे 15 लाखांची खंडणी घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक प्रकाश मुत्याल यांनी दिली.या वृत्तामुळे भुसासळ शहरासह तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. जळगाव येथील गणेश कॉलनीत राहणारे बांधकाम व्यावसायिक चंद्रशेखर प्रकाश अत्ततरे यांना जमीन एन.ए. करण्यासाठी चौधरी यांनी सुमारे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यातील 15 लाख रुपयांचा हप्ता घेताना चौधरींना...
  July 29, 11:21 PM
 • जळगाव - श्रावणबाळ पेन्शन योजनेचे पैसे वृध्द महिलेने मुलास देण्यास नकार दिल्याने मुलाने जन्मदात्री आईची निर्घृण हत्या केली. मंजुळाबाई सिताराम नाथ (जाधव, वय ७०) असे महिलेचे नाव आहे. आईची हत्या करुन मृतदेह पोत्यात भरुन शेतात पुरून ठेवला होता.आठ दिवसानंतर सदर मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.याप्रकरणी आरोपी मुलगा कृष्णा सिताराम नाथ याचे विरुध्द नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. जन्मदात्री आईचा खून...
  July 29, 12:41 PM
 • नंदुरबार - संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गतत नंदुरबारसह जिल्ह्यातील चार पालिकांच्या कामकाजाची पाहणी जळगावच्या बारा जणांच्या पथकाने केली. नंदुरबारचे नगराध्यक्ष कुणाल वसावे यांच्यासह २३ नगरसेवक बालाजी यात्रेला गेल्याने पालिकेच्या कर्मचा-यांना पथकाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. यावरून स्वच्छता अभियानाबाबत किती गांभीर्य पाळले जाते ते दिसून आले असून जिल्ह्यात आता संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान नावालाच उरल्याचे चित्र आहे. पाहणी पथकानेही पाहणी दौयाचे सोपस्कार पार...
  July 29, 12:38 PM
 
जाहिरात

RECOMMENDED