Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • शहादा : गांडूळ खत प्रकरणात ९७ लाखांच्या घोटाळयाप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील शहादा पालिकेच्या २५ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले असून, त्यांना पुढील पाच वर्षासाठी कुठलीही निवडणुक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. २६ पैकी २५ नगरसेवकांवर कारवाई झाल्याने ही पालिकाच बरखास्त झाली आहे. शहादा पालिकेतील २००५ पासून गांडूळ खत घोटाळ्याचे प्रकरण राज्यभर गाजले होते. तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च करुन तयार होणाया गांडूळ खत प्रकरणात अगदी सुरुवातीपासूनच भष्टाचाराला सुरुवात झाली होती. तत्कालीन...
  June 19, 01:49 AM
 • जळगाव: शहरातील नटराज थिएटर येथे येत्या 23 ते 26 जून दरम्यान किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष अशोक जैन व सचिव राजेंद्र नन्नवरे यांनी दिली.महोत्सवाचे उद्घाटन वन अभ्यासक किरण पुरंदरे यांच्या हस्ते होणार आहे. मंतरलेली वाट या कार्यक्रमाने महोत्सवाला सुरुवात होणार असून या महोत्सवादरम्यान पर्यावरणावर आधारीत 25 माहितीपट सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमातंर्गत सतीश पाटील यांनी वसुंधरा सन्मान तर गणेश सोनार, पी. आर. परदेशी व अनिल...
  June 18, 11:57 PM
 • जळवाग - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा ८६.३७ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातून परीक्षेला बसलेल्या ५४ हजार ६२३ विद्यार्थ्यांपैकी ४७ हजार १७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. येथील आर. आर. विद्यालयाचा सोमेश रवींद्र चौधरी व गितांजली नरेंद्र अत्तरदे यांनी प्रत्येकी ९६.९१ टक्के गुण मिळविले.नाशिक विभागाचा निकाल ८२.६९ टक्के लागला आहे. जळगाव जिल्ह्यातून ४७ हजार १७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात २० हजार ९९५...
  June 18, 11:48 AM
 • पाचोरा: पांडववाड्यातील सहावीची विद्यार्थिनी मयूरी वसंत पाटील हिने शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमाराला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयूरीची आई तिच्या लहान भावाला शिकवणीसाठी घेऊन गेली होती. बीएसएफ जवान वसंत पाटील यांची मुलगी असलेली मयूरी प्रवरानगरात शिकत होती.
  June 18, 02:29 AM
 • पाचोरा: पांडववाड्यातील सहावीची विद्यार्थिनी मयूरी वसंत पाटील हिने शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमाराला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयूरीची आई तिच्या लहान भावाला शिकवणीसाठी घेऊन गेली होती. बीएसएफ जवान वसंत पाटील यांची मुलगी असलेली मयूरी प्रवरानगरात शिकत होती.
  June 18, 02:13 AM
 • धुळे: येथील महानगरपालिकेच्या वसुली विभागाला गुरुवारी मध्यरात्रीनंतर आग लागून अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे खाक झाली आहेत. सध्या पालिकेचा वसुली विभाग एका शाळेच्या परिसरात आहे. प्रवेशद्वार अरुंद असल्याने अग्निशामक दलाचा बंब आत जाऊ शकत नव्हता. अखेर जेसीबीने दरवाजा तोडून आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीचे कारण स्पष्ट झाले नसून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.
  June 18, 01:54 AM
 • जळगाव: सावरे येथील एकाने एक लाख रुपयांसाठी आपल्या बायकोचा गळा चिरुन निर्घृन हत्या केली आहे. धुडकू त्र्यंबक पाटील असे आरोपीचे नाव असून त्याला पारोळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सारवे येथील धुडकू त्र्यंबक पाटील याचा विवाह गेल्या दोन महिन्यांपूर्वी एरंडोल तालुक्यातील खडकेसीम येथील ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई पांडूरंग नारायण पाटील यांनी कन्या सुरेखा हिच्याशी उत्साहात पार पडला होता. लग्न...
  June 16, 11:21 PM
 • चाळीसगाव - आगामी निवडणुकीत कॉग्रेसला सत्तेवरुन खेचण्यासाठी मी शिवसेनेबरोबर गेलो, त्यांचेशी युती केली. दोन समाजातील तेढ, एकमेकांबद्दलचे गैरसमज दूर करुन राज्यातच नव्हे तर देशातही सामाजीक ऐक्य निर्माण करण्यासाठी मी शिवसेनेबरोबर गेलो व याचा अर्थ मी बौद्ध धर्म सोडून हिंदु धर्म स्विकारला असे नव्हे, माझ्यात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत मी डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करणार नाही गशी ग्वाही आर.पी.आय.पक्षाचे संस्थापक नेते श्री रामदास आठवले यांनी दिली. चाळीसगाव येथील विश्राम...
  June 16, 07:35 PM
 • जळगाव: चाळीसगाव नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीत कीटकनाशक टाकण्यासाठी गेलेल्या कर्मचा-याचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी सहा वाजता घडली. संभाजी धोंडू गवळी (वय ५७) असे या कर्मचा-याचे नाव आहे. ते नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी नगरपालिकेच्या टाकीत टीसीएल पावडर टाकण्यासाठी गेले होता. सदर टाकी सुमारे साठ फूट उंचावर आहे. वर गेल्यानंतर टाकीच्या बाजूचा कठडा तुटल्याने तोल जाऊन ते खाली पडले, यात मेंदुला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
  June 16, 03:31 AM
 • जळगाव - उन्हाळी सुटीनंतर सर्व शाळा गजबजणार असून शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक वर्षात प्राथमिक व माध्यमिक शाळांना बुधवारपासून सुरुवात होत आहे.जिल्ह्यातील 2400 प्राथमिक व 500 माध्यमिक शाळा 15 जून पासून सुरु होत आहे. यामुळे दोन महिन्याच्या पाल्याच्या शाळेच्या पहिल्या दिवसाची पालकांनी तयारी केली असून नवीन गणवेश, वह्या आदी शालेय साहित्याची खरेदी केली आहे.
  June 15, 05:19 PM
 • अयुब कल्याजी शेख उर्फ कलीअप्पा (वय 50, रा.गेंदालाल मिल) यांच्या गेंदालाल मिल मधील घराचे लोखंडी ग्रिलचा दरवाजा उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, 22 हजार रुपये रोख असा सुमारे 62 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. अयुब कल्याजी शेख यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात कलम 380 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक श्री.ब्राह्मणे करीत आहेत.
  June 15, 05:00 PM
 • जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या फेर तपासणीमध्ये जिल्ह्यातील चार वाळू ठेके बंद करण्यात आले आहे. उर्वरीत ठेक्यांची मुदत ३१ जुलै रोजी संपणार आहे.जिल्हा प्रशासनाने ४० गटांचे वाळू लिलाव केल्यानंतर या सर्व गटांची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले होते. यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक पथक नेमण्यात आले होते. या पथकाने जिल्ह्यातील सर्व वाळू ठेक्यांची फेरतपासणी करुन आपला अहवाल नुकताच प्रशासनाला सादर केला. यात पाचोरा तालुक्यातील पुनगाव, अंतुर्ली, ओझर येथील वाळू उत्खनन...
  June 15, 04:57 PM
 • धुळे - शहर परिसरात गेल्या काही दिवसात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याने पोलीस नागरिकांच्या टिकेचे लक्ष्य बनले होते. नव्याने बदलून आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी चोरटय़ांच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करून त्यांना पकडण्यासाठी साध्या गणवेशातील पोलिसांची गस्त वाढवली. गस्त घालत असतांना नंबर प्लेट नसलेल्या गाडय़ा, पल्सर किंवा तत्सम वेगवान दुचाकी गाडय़ांचा वापर करणाऱ्या १९ ते २५ वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. पोलिसांनी सावधगिरीने...
  June 14, 06:43 PM
 • भुसावळ - येथील विकास कॉलनी भागातील रहिवासी व माजी नगरसेवक गणेश बोहरा यांना रविवारी रात्री पिस्तूलचा धाक दाखवून लुबाडण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. माजी नगरसेवक गणेश बोहरा हे आपल्या वाहनाने बाहेर जात असताना चोरटय़ांनी पिस्तुलाचा धाक दाखवून गाडी चोरण्याचा प्रयत्न केला.
  June 14, 06:26 PM
 • जळगाव - भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विषयीच्या बातम्यांकडे आम्ही केवळ मनोरंजन म्हणून बघत आहोत. त्या बातम्यांची दखल घेण्याची गरज नसल्याचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते मुंडे यांच्या नाराजीबद्दल बोलत होते. खडसे म्हणाले, 'मुंडे यांनी आपली नाराजी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. एखाद्या नेत्याची किंवा कार्यकर्त्याची नाराजी ही पक्षांतर्गत बाब आहे. मुंडेनी पक्षातही त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे....
  June 13, 05:07 PM
 • धुळे - येथली जयशंकर कॉलनीतील एका घराच्या बेडरूममध्ये तब्बल १४ लाखांची बियाणे दडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्याची चौकशी सुरू झाली आहे. सलग आठवडय़ापासून कृषी विभागाच्या वतीने काळाबाजार रोखण्यासाठी बियाणांच्या दुकानांवर छापे टाकण्यात येत असतानाही हे प्रकार बंद होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.
  June 12, 07:44 PM
 • चाळीसगाव - मराठवाडय़ातील गौताळा अभयारण्याला लागूनच चाळीसगाव (जळगाव) जिल्ह्य़ातील पाटणादेवी अभयारण्य आहे. अभयारण्यात मृतावस्थेत आढळून आलेल्या बिबटय़ाचे पंजे कापण्यात आलेले असल्याने त्याला ठार मारण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वाघनखांना मिळणाऱ्या भरमसाठ किमतीमुळेच हे कृत्य करण्यात आल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. अलीकडच्या काळात या अभयारण्यातील बिबटय़ांच्या हल्ल्याची एकही घटना घडली नसताना किंवा तशा स्वरूपाच्या तक्रारी वन विभागाकडे आलेल्या नाहीत.वन विभागात वन्य...
  June 12, 07:31 PM
 • धुळे - महापालिकेने फतवा काढायचा आणि नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करायचे हे आता नित्याचेच झाले आहे. शहरातील विविध भागात नळांना तोट्या नाहीत, असे नळ बंदकरण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. आता या इशा-याला एक महिना उलटून गेल्यानंतरही नागरिकांनी नळाला तोट्या बसविलेल्या नाहित. शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा ही तर नेहमीचीच समस्या. यामुळे अनेकांनी नळाच्या तोट्या काढून घेतल्या आहेत. त्यामुळे नळाला पाईप लावून किंवा मोटर लावून पाणी ओढले जाते. मात्र हवे...
  June 12, 05:18 PM
 • भुसावळ - चाळीसगाव-भुसावळ-खांडवा या रल्वेमार्गावर चालत्या गाडीमधून प्रवाशांना लुटण्या-या टोळीतील दोन अट्टल चोरांना खांडवा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. जानेवारी ते एप्रिल महिन्यात खांडवा ते चाळीसगाव दरम्यानच्या लोहमार्गावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे खांडवा येथील लोहमार्ग पोलिसांचे एक पथक तब्बल चाळीस दिवसांपासून तपास करीत होते. त्यांच्या तपासाला यश आले असून श्याम सुभाष शिरसाठ ऊर्फ काल्या याला पकडण्यात आले आहे. खांडवा येथे त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला...
  June 11, 07:41 PM
 • भुसावळ - चाळीसगाव-भुसावळ-खांडवा या रल्वेमार्गावर चालत्या गाडीमधून प्रवाशांना लुटण्या-या टोळीतील दोन अट्टल चोरांना खांडवा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. जानेवारी ते एप्रिल महिन्यात खांडवा ते चाळीसगाव दरम्यानच्या लोहमार्गावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे खांडवा येथील लोहमार्ग पोलिसांचे एक पथक तब्बल चाळीस दिवसांपासून तपास करीत होते. त्यांच्या तपासाला यश आले असून श्याम सुभाष शिरसाठ ऊर्फ काल्या याला पकडण्यात आले आहे. खांडवा येथे त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला...
  June 11, 07:40 PM
 
जाहिरात

RECOMMENDED