जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • जळगाव - उन्हाळी सुटीनंतर सर्व शाळा गजबजणार असून शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक वर्षात प्राथमिक व माध्यमिक शाळांना बुधवारपासून सुरुवात होत आहे.जिल्ह्यातील 2400 प्राथमिक व 500 माध्यमिक शाळा 15 जून पासून सुरु होत आहे. यामुळे दोन महिन्याच्या पाल्याच्या शाळेच्या पहिल्या दिवसाची पालकांनी तयारी केली असून नवीन गणवेश, वह्या आदी शालेय साहित्याची खरेदी केली आहे.
  June 15, 05:19 PM
 • अयुब कल्याजी शेख उर्फ कलीअप्पा (वय 50, रा.गेंदालाल मिल) यांच्या गेंदालाल मिल मधील घराचे लोखंडी ग्रिलचा दरवाजा उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, 22 हजार रुपये रोख असा सुमारे 62 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. अयुब कल्याजी शेख यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात कलम 380 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक श्री.ब्राह्मणे करीत आहेत.
  June 15, 05:00 PM
 • जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या फेर तपासणीमध्ये जिल्ह्यातील चार वाळू ठेके बंद करण्यात आले आहे. उर्वरीत ठेक्यांची मुदत ३१ जुलै रोजी संपणार आहे.जिल्हा प्रशासनाने ४० गटांचे वाळू लिलाव केल्यानंतर या सर्व गटांची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले होते. यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक पथक नेमण्यात आले होते. या पथकाने जिल्ह्यातील सर्व वाळू ठेक्यांची फेरतपासणी करुन आपला अहवाल नुकताच प्रशासनाला सादर केला. यात पाचोरा तालुक्यातील पुनगाव, अंतुर्ली, ओझर येथील वाळू उत्खनन...
  June 15, 04:57 PM
 • धुळे - शहर परिसरात गेल्या काही दिवसात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याने पोलीस नागरिकांच्या टिकेचे लक्ष्य बनले होते. नव्याने बदलून आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी चोरटय़ांच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करून त्यांना पकडण्यासाठी साध्या गणवेशातील पोलिसांची गस्त वाढवली. गस्त घालत असतांना नंबर प्लेट नसलेल्या गाडय़ा, पल्सर किंवा तत्सम वेगवान दुचाकी गाडय़ांचा वापर करणाऱ्या १९ ते २५ वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. पोलिसांनी सावधगिरीने...
  June 14, 06:43 PM
 • भुसावळ - येथील विकास कॉलनी भागातील रहिवासी व माजी नगरसेवक गणेश बोहरा यांना रविवारी रात्री पिस्तूलचा धाक दाखवून लुबाडण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. माजी नगरसेवक गणेश बोहरा हे आपल्या वाहनाने बाहेर जात असताना चोरटय़ांनी पिस्तुलाचा धाक दाखवून गाडी चोरण्याचा प्रयत्न केला.
  June 14, 06:26 PM
 • जळगाव - भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विषयीच्या बातम्यांकडे आम्ही केवळ मनोरंजन म्हणून बघत आहोत. त्या बातम्यांची दखल घेण्याची गरज नसल्याचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते मुंडे यांच्या नाराजीबद्दल बोलत होते. खडसे म्हणाले, 'मुंडे यांनी आपली नाराजी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. एखाद्या नेत्याची किंवा कार्यकर्त्याची नाराजी ही पक्षांतर्गत बाब आहे. मुंडेनी पक्षातही त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे....
  June 13, 05:07 PM
 • धुळे - येथली जयशंकर कॉलनीतील एका घराच्या बेडरूममध्ये तब्बल १४ लाखांची बियाणे दडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्याची चौकशी सुरू झाली आहे. सलग आठवडय़ापासून कृषी विभागाच्या वतीने काळाबाजार रोखण्यासाठी बियाणांच्या दुकानांवर छापे टाकण्यात येत असतानाही हे प्रकार बंद होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.
  June 12, 07:44 PM
 • चाळीसगाव - मराठवाडय़ातील गौताळा अभयारण्याला लागूनच चाळीसगाव (जळगाव) जिल्ह्य़ातील पाटणादेवी अभयारण्य आहे. अभयारण्यात मृतावस्थेत आढळून आलेल्या बिबटय़ाचे पंजे कापण्यात आलेले असल्याने त्याला ठार मारण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वाघनखांना मिळणाऱ्या भरमसाठ किमतीमुळेच हे कृत्य करण्यात आल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. अलीकडच्या काळात या अभयारण्यातील बिबटय़ांच्या हल्ल्याची एकही घटना घडली नसताना किंवा तशा स्वरूपाच्या तक्रारी वन विभागाकडे आलेल्या नाहीत.वन विभागात वन्य...
  June 12, 07:31 PM
 • धुळे - महापालिकेने फतवा काढायचा आणि नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करायचे हे आता नित्याचेच झाले आहे. शहरातील विविध भागात नळांना तोट्या नाहीत, असे नळ बंदकरण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. आता या इशा-याला एक महिना उलटून गेल्यानंतरही नागरिकांनी नळाला तोट्या बसविलेल्या नाहित. शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा ही तर नेहमीचीच समस्या. यामुळे अनेकांनी नळाच्या तोट्या काढून घेतल्या आहेत. त्यामुळे नळाला पाईप लावून किंवा मोटर लावून पाणी ओढले जाते. मात्र हवे...
  June 12, 05:18 PM
 • भुसावळ - चाळीसगाव-भुसावळ-खांडवा या रल्वेमार्गावर चालत्या गाडीमधून प्रवाशांना लुटण्या-या टोळीतील दोन अट्टल चोरांना खांडवा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. जानेवारी ते एप्रिल महिन्यात खांडवा ते चाळीसगाव दरम्यानच्या लोहमार्गावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे खांडवा येथील लोहमार्ग पोलिसांचे एक पथक तब्बल चाळीस दिवसांपासून तपास करीत होते. त्यांच्या तपासाला यश आले असून श्याम सुभाष शिरसाठ ऊर्फ काल्या याला पकडण्यात आले आहे. खांडवा येथे त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला...
  June 11, 07:41 PM
 • भुसावळ - चाळीसगाव-भुसावळ-खांडवा या रल्वेमार्गावर चालत्या गाडीमधून प्रवाशांना लुटण्या-या टोळीतील दोन अट्टल चोरांना खांडवा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. जानेवारी ते एप्रिल महिन्यात खांडवा ते चाळीसगाव दरम्यानच्या लोहमार्गावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे खांडवा येथील लोहमार्ग पोलिसांचे एक पथक तब्बल चाळीस दिवसांपासून तपास करीत होते. त्यांच्या तपासाला यश आले असून श्याम सुभाष शिरसाठ ऊर्फ काल्या याला पकडण्यात आले आहे. खांडवा येथे त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला...
  June 11, 07:40 PM
 • जळगाव: खान्देशात गेल्या दोन दिवसांपासून सुरु झालेल्या वादळी वा-यासह पावसाचा जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील केळी पिकाला फटका बसला आहे. सुमारे 100 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पंचनाम्याचे काम सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये सार्वाधिक नुकसान झाले आहे. रावेरमधील 14 तर मुक्ताईगर तालुक्यातील 13 गावांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील 400 हेक्टर तर धुळे जिल्ह्यातील 400 हेक्टर केळी भुईसपाट झाली आहे. जळगावचे...
  June 10, 03:02 PM
 • धुळे: तालुक्यातील बाळापूर येथील एका घराच्या पाण्याच्या टाकीत महिलेसह मुलगा व मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. आज (गुरूवारी) दुपारी घटना उघडकीस आली. सरिता ईश्वर वाघ (28), नंदिनी (8), जयेश (6) अशी मृतांची नावे आहेत.दरम्यान, सरिताने आत्महत्या केली की तिचा खून करून पाण्याच्या टाकीत टाकले असावे, याचा पोलीस शोध घेत आहेत. तर सरिताच्या सासरच्या मंडळींना अटक केल्याशियाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका सरिताचे वडिल रामराव बाबूराव पाटील यांनी घेतली आहे.
  June 9, 07:07 PM
 • धुळे: जिल्ह्यात बियाण्यांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेता धुळे कृषी विभागाने जिल्ह्यात धाड सुत्र सुरू केले आहे. शहरातील जय शंकर कॉलनीत कृषी विभागाने बुधवारी रात्री उशीरा कृषी अधिकायांंनी धाड टाकून सुमारे 14 लाखाचे बियाणे कपाशी आणि मक्याचे जप्त केले. जुना आग्रा रोड वरील अग्रवाल बियाणे विक्री केंद्रावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. अग्रवाल यांनी हा साठा कुठून आणला, याची चौकशी सुरु आहे.
  June 9, 06:39 PM
 • धुळे: पाचकंदील चौकातील विलास टेक्सस्टाईलचे मालक धर्मेश तनेजा यांची लळिंग-लिखी रस्त्यावर अज्ञात इसमानी निर्घृण हत्या केली. त्यामुळे येथील व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. तनेजा हे स्वत: वसुलीचे काम करीत असत. वसुलीच्या कामानिमित्त ते मालेगाव तालुक्यातील उमराणे येथे जाणार होते. त्या आधीची अज्ञात मारेक-यांनी त्यांची हत्या केली. पोलीस पुढील तपास करीत आहे.
  June 9, 12:07 PM
 • धुळे: चाळीसगाव रोड परिसरातील जयशिवशंकर कॉलनीत एका घरातून बीटी कपाशीचे सुमारे दहा लाखाचे बियाणे जप्त करण्यात आले. कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. कपाशीच्या बियाणाला सर्वत्र वाढती मागणी असून काही जण बियाणांचा साठा करून काळाबाजारात जादा दराने विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे. कृषी विभागाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली असल्याचे कृषी अधिका-यांनी सांगितले. जिल्ह्यातील ही सगळ्यात मोठी कारवाई असल्याचे ही ते म्हणाले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, बियाणे...
  June 8, 08:11 PM
 • भुसावळ: भ्रष्टाचाराविरोधात रामदेव बाबांनी रामलीला मैदानावर सुरु केलेले उपोषण सरकारने मोडून काढले. त्याचा येथील पंतजली योगसमितीतर्फे शहरातून मूकमोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज (बुधवारी) दिल्लीत एक दिवसीय उपोषण केले. त्याला पाठिंबा म्हणून येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर अण्णांच्या समर्थकांनीही एकदिवसीय उपोषण केले. वाकोदमध्ये मशाल रॅली:जामनेर तालुक्यातील वाकोद येथील पंतजली योगसमितीचे संस्थापक शेषराव देशमुख यांच्या...
  June 8, 06:56 PM
 • जळगाव: जिल्ह्यातील भडगाव येथे रासायनिक खत घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पडकला. जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने हे खत शहराबाहेर नेण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ट्रकचालकासह संबंधित कृषी केंद्राच्या मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळ्या बाजारात जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने रासायनिक खत भरलेला ट्रक शहराबाहेर जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पाचोरा रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी हा ट्रक पकडला. युरियाच्या शंभर गोण्या,...
  June 8, 06:05 PM
 • जळगाव: चाळीसगाव येथील रहिवासी आणि पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपायाने पत्नी आणि पंधरा दिवसांच्या चिमुकल्याला विषारी द्रव्य पाजून स्वत: आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे घडली. पुरुषोत्तम प्रभाकर वाघ (38) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कौटुंबिक वादाचा कंटाळून पुरुषोत्तम वाघ यांनी पत्नी व मुलाला संपवून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
  June 8, 02:29 PM
 • जळगाव- रामदास आठवले यांनी पदाच्या हव्यासापोटी युतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्टीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मंगळवारी केली. आठवले सत्ता आणि पदापासून फार काळ दूर राहू शकत नाहीत. युतीसोबत जाण्याची त्यांची भूमिका संशायास्पद असून रिडालोसबरोबर आघाडी करत असताना ते सर्वात पुढे होते. त्यामुळे त्यातून बाहेर पडताना त्यांनी संयुक्त बैठकी घेऊन आपला निर्णय सांगणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. युतीसोबत गेल्यानंतर ते आरपीआयचा उल्लेख भीमशक्ती...
  June 8, 04:30 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात