जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

  • ग्रामीण भागातील पाणीपट्टी वाढीच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. जळगाव तालुक्यातील असोदा गावच्या सरदार वल्लभभाई पटेल मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवेळी घोषणाबाजी करत निदर्शने केली.जिल्हापरिषदेने 16 मार्चला पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत कोणाचीही तमा न बाळगता, व्यापारी दृष्टिकोन ठेवून सामूहिक योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांची पाणीपट्टी वाढविण्याचा ठराव मांडला.ग्रामीणभागांमध्ये आधीच पाणी योजना जीर्ण व कालबाह्य...
    June 5, 06:41 PM
  • अमळनेर: येथील रेल्वे स्टेशन परिसरातील एका नामवंत खासगी कोचिंग क्लासेच्या शिक्षकानेच आपल्या विद्यार्थिनीला पळविले असल्याची घटना उघडकीस आली आहे. याच परिसरातील 20 वर्षीय तरुणीस भूलथापा देऊन या शिक्षकाने पळवून नेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या पूर्वीही या शिक्षकाने दोन मुलींना असेच पळवून नेले होते. परंतु तत्कालीन डीवायएसपी खालीद यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटविण्यात आले होते.
    June 3, 05:57 PM
  • चाळीसगाव: येथून जवळच असलेल्या पाटणादेवी जंगलात एक बिबट्याचा मृतदेह आढळून आला असून त्याचा चारपैकी तीन पायांचे पंजे गायब आहेत. यावरुन परिसरात बिबट्याच्या नखांची तस्करी सुरु असल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. मात्र वनविभागाचे अधिकार्यांनी या गोष्टीचा इन्कार केला आहे. बिबट्याच्या नखासाठी त्याची शिकार झाली असावी, असा संशय परिसरातील नागरीकांकडून व्यक्त केला जात आहे.
    June 3, 10:50 AM
  • जळगावः जळगाव महानगरपालिकेच्या १९ कर्मचार्यांना सेवानिवृत्तनिमित्त मंगळवारी (ता. ३१ मे) एका छोटेखानी कार्यक्र्रमात निरोप देण्यात आला. गोकुळ पवार(आयुक्त स्वीय सहा.), यशवंत ठाकरे (उपलेखपाल), भिकचंद भुतडा(परिवहन अधीक्षक), अशोक सोनवणे (जकात निरीक्षक), अरुण जराड (नाकेदार), अशोक भावसार (चौकीदार), दामू सपकाळे (चौकीदार), लियाकत अली अजगर अली (क्लोरीन ऑपेरॅटर), सुरेश कुरकुरे (वायरमन), हसन अली कासमअली (वाहनचालक), हिरालाल यादव (वाहनचालक), परशुराम जोशी, (शिपाई), रमेश बनकर (मजूर), रामदास झुंझारवार(वाहनचालक), प्रकाश...
    June 1, 01:39 PM
  • जळगाव - निवडणुकांच्या तोंडावर सामान्य माणसांकडे मत मागायला जाता, तसेच निवडून आल्यानंतरही सामान्य माणसाच्या दारी जाऊन त्यांना सरकारच्या योजना समजावून द्या, असा आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला आहे.जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मुलाच्या शाही विवाहासाठी ते जळगाव येथे आले असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यर्कत्यांशी संवाद साधला. या सभेत निवेदने आणि तक्रारींचा पाऊस पडला. सामान्य कार्यकर्ता हा नेहमीच समाधानी असतो. पण जसजसा तो वरवर...
    May 27, 10:57 PM
  • जळगाव - गेल्या 14 महिन्यापासून जळगाव महापालिकेअंतर्गत स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी लागू झाला आहे. मात्र एलबीटी प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन झालेल्या समन्वय समितीचा मनपाला विसर पडला असून स्थापनेपासून एकही बैठक झाली नसल्याची माहिती महाराष्ट्र व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांनी दिली. व्यापारी एकता दिवसानिमित्त आयोजित या पत्रकार परिषदेला श्री. टावरी यांच्यासह व्यापार उद्योग आघाडीचे अध्यक्ष दिलीप गांधी, दाणा बाजार व्यापारी असोसिएशनचे प्रवीण पगारीया, गोलाणी...
    May 27, 09:58 PM
  • जळगाव - आगामी काळात होणार्या भुसावळ नगरपालिकेच्या निवडणूकीत प्रभाग रचनेत सत्ताधार्यांकडून दबावतंत्राचा वापर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून या संदर्भात भुसावळच्या भाजप व सेनेच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. भुसावळच्या नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2001 मध्ये भुसावळ न.पा.निवडणूक प्रभाग पध्दतीने झाली होती. त्यात निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर बसवून सोयीनुसार बेकायदेशीर...
    May 27, 09:53 PM
  • जळगाव - जळगावच्या मेहरूण तलावात एका महिलेने आपल्या दीड आणि पाच वर्षांच्या मुलांसह उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी महिलेला आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलीला वाचवण्यात लोकांना यश आले. मात्र या महिलेच्या दीड वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. या आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण समजू शकले नाही. मेहरूण तलाव परिसरातील संचार नगर भागात राहणाऱ्या कविता लोंधे ही विवाहित महिलेने आपल्या चेतन (दीड वर्ष) आणि लाजरी (५) या मुलांसह तलावात उडी घेतली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी हे...
    May 27, 09:41 PM
  • जळगाव - एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे मंगळवारी जादा भावाने बियाणांची विक्री केल्याप्रकरणी बुधवारी दुपारी पोलिसांनी प्रवीण हार्डवेअर ऍण्ड जनरल स्टोअर्सकडे तपासणी केली. या छाप्यात १० लाख ६७ हजार रुपयांचा बियाणांचा साठा सापडला. नाशिक विभाग भरारी पथक आणि कृषी उपसंचालक, जळगाव यांनी संयुक्तरित्या मंगळवारी धाड टाकून कासोदा येथे पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. अधिक तपासासाठी बुधवारी दुपारी पोलिसांनी धाड घातली असता ५८ खोक्यांत दडवलेला १० लाख ६७ हजार रुपये किमतीचा बियाणांचा साठा आढळला. हा...
    May 27, 09:32 PM
  • जळगाव - धुळे ते अमरावती या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला दीड वर्षात सुरुवात होईल , असी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी दिली . बांधकाम आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते.
    May 24, 05:32 PM
  • जळगाव - पक्षात कार्यकर्ता चांगला असतो; परंतु वरच्या स्तरावरील नेत्यांमध्येच बिघाड असतो. पदावरून ते असंतुष्ट असतात. याचे परिणाम मात्र निवडणुकीवर होतात. गोष्ट कुठपर्यंत ताणायची, याचा त्यांनी विचार केला पाहिजे. योग्य पद्धतीने हे वाद मिटविण्यात येतील. पक्षाच्या बळकटीसाठी त्यांनी कार्य करण्याची गरज आहे. हा इशारा त्यांच्यापर्यंत निश्चितच जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पक्षाच्या आकाशवाणी चौकातील...
    May 24, 05:25 PM
  • जळगाव - गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद बदल्यांची प्रक्रिया समुपदेशाने दि. 26 ते 31 मे दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबतचे वेळापत्रक जि.प. मुख्य कार्यकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया नियमानुसार करण्यासाठी जि.प.च्या शाहू महाराज सभागृहात नियोजनाची आखणी केली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दि. 26 रोजी ग्रामपंचायत व बालकल्याण विभाग, दि. 27- अर्थ...
    May 24, 05:23 PM
  • सामनेर (ता.पाचोरा) येथील नवरदेवाच्या लग्नाचे वर्हाड दिपनगर (ता.भुसावळ) येथे घेवुन जाणारी 709 मॉडेलची मिनीट्रक वराडसिम-कुर्हे(पानाचे) ता.भुसावळ रस्त्यावर वराडसिम गावानजीक पलटी होवुन झालेल्या अपघातात 45 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाला. तसेच 14 वर्षीय युवक गंभीर असुन 27 ते 28 वर्हाडी जखमी झाल्याची घटना घडली. माहिती अशी की, सामनेर ता.पाचोरा येथील रहिवासी संदिप सुपडू पाटील याचा शुभविवाह दि.22 मे 11 रोजी दिपनगर ता.भुसावळ येथील रहिवासी चि.सौ.का.सारीका पाटील हिच्याशी होता. लग्नासाठी एका गाडीत नवरदेवासह...
    May 24, 05:14 PM
  • जळगाव - तालुक्यातील वराडसिम येथे अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली होती. यातील मुख्य आरोपी अरूण लक्ष्मण कोळी याला जळगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी.अग्रवाल यांनी दि.21 मे 2011 रोजी 50 हजार रूपयाच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले. तसेच प्रत्येक बुधवारी तालुका पोलीस स्टेशनला हजेरी, मेहरूण शिवारात प्रवेश बंदी या शर्तीवर सशर्त जामीन मंजुर केला. आरोपीतर्फे सत्यनारायण आर.पाल सरकार पक्षातर्फे सरकारी वकील आशा शर्मा यांनी काम पाहिले.
    May 24, 05:12 PM
  • मुंबई - महानिर्मिती कंपनीकडून धुळे जिल्ह्यातील शिवाजीनगर येथे उभारण्यात येणा:या देशातील सर्वात मोठ्या अशा १५ मेगाव्ॉट क्षमतेच्या सौरउर्जा प्रकल्पास आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. तसेच या प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या २ टक्के म्हणजेच ३९७ कोटी रूपये गुंतवणुकीसही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या कारावाईवरून काँग्रेस आणि राष्टङ्खवादीत गेले काही सुंदोपसुदी सुरू होती....
    May 21, 02:52 PM
  • रावेर - तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीने उन्हाळ्या आधीच योग्य पध्दतीने पाणी योजनांच्या नियोजनाने गावात भर उन्हाळ्यातही ग्रामस्थांना पाणी दररोज मुबलक प्रमाणात मिळत आहे. चार पाच वर्षा आधी पाण्याची तीव्र टंचाई भासणार्या गावाला मागील एक ते दिड वर्षापासून पाणीपुरवठा विभागाच्या योग्य नियोजनाने व तत्परतेने दररोज भरपूर प्रामणात पाणी मिळत आहे. नुकत्याच येथे पूर्णत्वास आलेल्या 72 लाख रूपयांच्या भारत निर्माण योजनेतुन लोहारा व गौरखेडा शिवारात दोन जागी ट्युबवेल खोदून...
    May 20, 04:18 PM
  • जळगाव - उमविच्या तौलनिक भाषा व वाड.मय विभागाला बोलीभाषा अभ्यास व संशोधनासाठी नुकतेच सहा लाख 25 हजार रुपयाचे अनुदान प्राप्त झाले आहे. खान्देशात बोलल्या जाणार्या अहिराणी या मुख्य बोलीभाषेव्यतिरिक्त लेवा पाटीदार, कोकणी, मावची या भाषांचा समावेश अभ्यास व संशोधनासाठी केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या वतीने सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील चार विद्यापीठांना बोलीभाषांच्या अभ्यास व संशोधनासाठी हे अनुदान देण्यात आले आहे. उमविच्या...
    May 20, 04:15 PM
  • जळगाव - जिल्हा परिषद प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यासंदर्भात जि.प. अध्यक्षा ना. स्मिता वाघ यांच्या दालनात आज अधिकारी व पदाधिकार्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निरुपमा डांगे, अति मुकाअ दीपक चौधरी, उपमुकाअ प्रमोद पवार (प्रशासन), शिक्षण व आरोग्य सभापती कमलाकर रोटे उपस्थित होते. यावेळी सर्व विभागांनी जाहीर केलेल्या सेवाज्येष्ठतेनुसार पात्र ठरणार्या कर्मचार्यांच्या बदल्या पारदर्शकपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षी विनंती व...
    May 20, 04:12 PM
  • जळगाव - श्रध्दा कॉलनी भागात अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून 36 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना 16 मे रोजी रात्री घडली. विजय पुंजाजी पाटील (वय 55) यांच्या श्रध्दा कॉलनी येथील 12-ए या प्लॉटमध्ये अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून 15 हजार रुपये किंमतीचा एलसीडी टीव्ही व रोख रक्कम असा एकूण 36 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात भाग 5 गु.र.नं. 143/11 भादंवि 457, 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    May 20, 04:10 PM
  • जळगाव - मुंबईहून नागपूरकडे जाणा:या धावत्या रेल्वेेतून वीसवर्षीय विद्याथ्र्याला फेेकल्याची घटना नांदगाव रेल्वेस्थानकाजवळ घडली. या घटनेमध्ये गंभीर झालेल्या तरुणाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव रेल्वे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. मुंबईहून नागपूरकडे जाणार्या रेल्वेत स्वप्निल बाळासाहेब बोरसे हा विद्यार्थी नाशिक येथून जळगावकडे जाण्यासाठी बसला होता. रात्री अकराच्या सुमारास त्याला नांदगाव रेल्वेस्थानक येण्याअगोदर तिकीट चेकरने धक्का मारून धावत्या रेल्वेतून फेकून दिल्याची...
    May 19, 07:16 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात