जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक -खासगी विमा कंपन्यांना ठाकरी इशारा देत राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा कळवळा दाखवणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मोर्चा आग सोमेश्वरी अन् बंब रामेश्वरी ठरला आहे. मातोश्रीपासून सोयीच्या अंतरावर असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारती एक्सा जनरल इन्शुरन्स या खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर बुधवारी ठाकरेंनी मोर्चा काढून १५ दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यास पेकाटात लाथ घालण्याचा इशारा दिला आहे. परंंतु पीक विमा योजनेतील खरिपाच्या हंगामातील नुकसान भरपाई...
  July 19, 10:35 AM
 • ठाणगाव - ठाणगाव-सिन्नर मार्गावर ठाणगाव घाटातील देवीच्या खिंडीतील वळणावर ट्रॅक्टर उलटून त्याखाली दाबला गेल्याने एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १८) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात किरण नामदेव बिन्नर (१९, रा. हिवरे) हा जागीच ठार झाला. तर अन्य ४ जण किरकोळ जखमी झाले. सिन्नर तालुक्यातील हिवरे येथील किरण बिन्नर, दीपक मेंगाळ, पीयूष बिन्नर, तेजस सहाणे, विकास सहाणे हे विशीतले ५ मित्र गुरुवारी ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून बोरखिंड येथे वनविभागाच्या...
  July 19, 09:25 AM
 • नांदगाव (जिल्हा नाशिक) - सलग दोन वेळा निवडून न येण्याची नांदगाव मतदारसंघांची परंपरा माेडून माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ मागील दहा वर्षांपासून या भागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०१४ च्या निवडणुकीपर्यंत या मतदारसंघावर भुजबळांची घट्ट पकड होती. केंद्रात आणि राज्यात बदलेले सरकार, भुजबळ त्रिकुटाच्या मागे लागलेले ईडीचे शुक्लकाष्ठ यामुळे मधल्या काळात आमदार पंकज भुजबळ यांचा जनसंपर्क तुटला. त्याचाच फायदा घेत शिवसेनेचे सुहास कांदे यांनी येथील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा...
  July 19, 07:54 AM
 • नाशिक- मुंबई सीएसटीएमवरून गोरखपूरला जाणारी अंत्योदय एक्सप्रेस पटरीवरुन उतरल्याची घटना घडली. नाशिकजवळील कसारा आणि इगरपूरी स्टेशनदरम्यान हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाहीये. पाहाटे 3.50 वाजता हा अपघात झाला. तुर्तास तीन लाइनपैकी दोनवर वाहतूक सुरळीत सुरू आहे असे सेंट्रल रेल्वेने सांगितले आहे. अंत्योदय एक्सप्रेस रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सीएसटीवरून निघाली. कसारा घाटात ट्रेन आल्यावर अचानक जोरदार आवाज अला आणि ट्रेन थांबली. यावेळी झोपेत असलेले सर्व प्रवासी...
  July 18, 12:20 PM
 • नाशिक - चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या व्यक्तीने दीडवर्षीय मुलीची हत्या केल्याचा बनाव करणाऱ्या आईनेच तिची हत्या केल्याचा प्रकार नाशकात समोर आला आहे. पाेलिसंानी बुधवारी आई याेगिता मुकेश पवार हिला अटक केली. घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यावरून पाेलिसांनी ही अटक केली असली तरी हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेबाबत सीसीटव्ही फुटेज व कुटुंबातील सदस्यांचे काॅल रेकाॅर्डिंग तपासले जात असल्याची माहिती पाेलिस अधिकाऱ्यंानी दिली. आैरंगाबादराेड परिसरातील साई पॅराडाईज या...
  July 18, 08:38 AM
 • विधानसभा निवडणुकांच्या ताेंडावर काँग्रेसने माजी मंत्री व आमदार बाळासाहेब थाेरात यांची प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती केली. यानंतर प्रथमच नाशिक दाैऱ्यावर आलेल्या थाेरात यांनी रविवारी दिव्य मराठी कार्यालयास भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्नांना उत्तरे दिली... महाजनांनी काँग्रेसची नव्हे तर खेकड्यांची चिंता करावी काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नूतन प्रदेशाध्यक्षांनी विधानसभा निवडणुकीत सरकार स्थापन करणे तर साेडाच, पण...
  July 15, 09:18 AM
 • सिन्नर -अवघ्या साडेतीन महिन्याच्या कोवळ्या वयात शिकार करून पोट भरणे शक्य नाही. त्यातच १२ दिवसांपूर्वी एका दुर्घटनेत आईनेही प्राण गमावले. अशा प्रतिकूल परिस्थितीत अन्न न मिळाल्याने बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सोमठाणे- मेंढी शिवारात उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मादी बछड्याचा मृतदेह मोहदरी येथील वन उद्यानात आणल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हळकुंडे यांनी शवविच्छेदन केले. याच ठिकाणी त्याच्यावर...
  July 12, 09:55 AM
 • येवला (जि. नाशिक) -सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून विधानसभा मतदारसंघाचा इतिहास मोडीत काढणाऱ्या छगन भुजबळांसमोर चौथ्यांदा लढताना संकट गडद आहे. अडीच वर्षांनी तुरुंगाबाहेर आल्यावरही भुजबळांना सरकारशी लढताना मतदारसंघात विकासाची कामे म्हणावी तशी करताच आली नाहीत. त्यातच यंदा सेना भाजपची युती होऊ घातलेली असताना सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी तगडे आव्हान उभे केले आहे. सेनेकडून २०१४ मध्ये संभाजी पवारांनी भुजबळांना मोठे आव्हान दिले होते. भुजबळांकडून दुखावलेल्या माजी आमदार मारोतराव पवार यांनी...
  July 12, 09:36 AM
 • नाशिक -विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असताना त्यांची चौकशी करण्याऐवजी मोर्चा काढण्याचा देखावा करणाऱ्या शिवसेनेची कंपन्यांकडून फंड मिळवण्यासाठी स्टंटबाजी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. विमा कंपन्यांच्या नफ्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी हातमिळवणी करत उंबरठा उत्पन्न जास्त दाखवल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसल्याची तक्रार इर्डाकडे केल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात ९९ लाख शेतकऱ्यांनी २८८ कोटींचा प्रीमियम भरला# त्यात...
  July 12, 09:33 AM
 • नाशिक, पुणे -पुणे व नाशिक जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा गेल्या अाठवड्यापासून कायम अाहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात बुधवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्र्यंबक तालुक्यात रात्रीतून १२७ मिमी पाऊस पडल्याने माेखाडा गावाकडे जाणारा रस्ता खचून केला. वैतरणा धरणाजवळ वीजनिर्मिती केंद्रावर दरड काेसळल्याने या केंद्रामध्ये पाणी शिरले हाेते. दरम्यान, नाशिक शहराकडे मात्र गुरुवारी दिवसभर पावसाने पाठ फिरवली. त्र्यंबकेश्वर शहरातील रस्ते जलमय झाले हाेते....
  July 12, 09:25 AM
 • नाशिक - शनिवार - रविवारी जाेराने बरसलेला पाऊस सोमवारी काहीसा संथ झाला. धरणांच्या पाणलोटमध्येही कमीच बरसल्याने धरणांत आवकही घटली. त्यामुळे गंगापूर धरणातही सोमवारी सायंकाळी ६ वाजता ३५ टक्के तर दारणात ४१.४५ टक्के पाणी उपलब्ध झाले. गत १८ तासात गंगापूरमध्ये ४ टक्के तर दारणात सुमारे ६ टक्के पाण्याची वाढ झाली. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांवर तीन दिवसांपासून वरुणराजा मेहरबान झाला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. शनिवार-रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाचे प्रमाण...
  July 9, 09:16 AM
 • नाशिक -मालेगाव बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेली भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंहची एलएमएल फ्रीडम ही दुचाकी विशेष न्यायालयात पंचांनी ओळखली. खटल्यातील पंच शकील अहमद मोहंमद हनीफ खलिफा यांची साक्ष घेण्यासाठी २ दुचाकी आणि पाच सायकली असा मुद्देमाल न्यायालयात आणण्यात आला होता. ही वाहने कोर्टरूममध्ये नेणे शक्य नसल्याने न्यायालयाच्या इमारतीखाली टेम्पोतच ठेवण्यात आली होती. त्यामुळे न्यायाधीश विनोद पाडाळकर यांनी इमारतीखाली येऊन टेम्पोत शिरून मोबाइलच्या टॉर्चने त्यांची तपासणी केली आणि ही...
  July 9, 08:40 AM
 • नाशिक - उशिरा का हाेईना वरुणराजाने नाशिक शहर व जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखवली. शनिवारी रात्री परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे रविवारी सकाळपासूनच गाेदावरी नदीपात्राच्या पाणीपातळीत वाढ हाेऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. नदीपात्रातील दुताेंड्या मारुती मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागले हाेते. पावसाची संततधार तसेच धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे गाेदाघाटावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. परिसरातील दुकादार, नागरिकांनी तातडीने आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवले. पूर...
  July 8, 08:30 AM
 • नाशिक राेड -नाशिक परिसरात शनिवारी रात्रीपासून संततधार सुरू असून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, नाशिक तालूका जलमय झाला आहे. रविवारी सकाळी आठपासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नाशिकमध्ये ६२ मिमी तर तालुक्यात ९४ मिमी पाऊस झाला. यामुळे गोदावरी, दारणा, वालदेवी आणि नासर्डी नदीला पूर आला. गंगापूर, दारणा व वालदेवी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. या भागात आणखी पाऊस झाला आणि ही धरणे भरली तर हे पाणी मराठवाड्यात जायकवाडी धरणात दाखल होते. नाशिक जिल्ह्यात शनिवारपासून बहुतांश भागांत संततधार...
  July 8, 07:18 AM
 • नाशिक- मर्सिडीज कंपनीची कार जगातील सुरक्षितकारपैकी एक आहे. पण जर याच गाडीमध्ये काहीबिघाड झाल्यास काय होऊ शकते याचे उदाहरण नाशिकमध्ये पाहायला मिळाले. नाशिकमधील आडगाव नजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्सिडीज कारचे टायर अचानक लॉक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चालक गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. सर्वात सुरक्षित गाड्यांपैकी समजल्या जाणाऱ्या गाडीमध्ये अचानक बिघाड झाल्याने मर्सिडीजही सुरक्षित नाहीये का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पावसामुळे नाशिकमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे, तसेच...
  July 6, 05:43 PM
 • नाशिक -तिवरे धरणफुटीमुळे कोकणातील धरणांंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अँड पीपल या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या संशोधक परिणिता दांडेकरांनी २ वर्षांपूर्वीच कोकण खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील धरणांचा अभ्यास करून मांडलेल्या अहवालात धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. कोकणातील ९० धरणांपैकी फक्त १३ धरणांची कामे पूर्ण झाली. तर अनेकांची कामे रखडली असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. या निमित्ताने परिणिता दांडेकर यांच्याशी साधलेला हा संवाद....
  July 5, 01:57 PM
 • नाशिक - मुंबई, पुणे आणि विदर्भासह अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे अपघाताचे वृत्त समोर येत आहेत. त्यातच नाशिक जिल्ह्यात बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या एका दुर्घटनेत 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. येथील नियोजित बांधकामाच्या ठिकाणी मजुरांवर पाण्याची टाकी पडली. या टाकीखाली दबल्याने त्यापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. याच दुर्घटनेत आणखी 2 मजूर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विधानसभेत गाजला मुद्दा दरम्यान, नाशिक दुर्घटनेचामुद्दा विधानसभेत देखील गाजला....
  July 2, 02:11 PM
 • नाशिक -अध्यक्षपदी राहुल गांधी राहायला तयार नाहीत, सोनिया व्हायला तयार नाहीत, तिसरा माणूस सापडत नाही. विरोधक आता उरलेलेच नाहीत, काँग्रेसच्या चांगल्या पदाधिकाऱ्यांना तुमच्यात घ्या, असा सल्ला भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना शनिवारी दिला. नाशिकमध्ये सुरू असलेल्या महिला मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करण्यासाठी...
  June 30, 12:19 PM
 • नाशिक - मुथूट फायनान्सवर दराेडा टाकताना तेथील सॅम्युअलवर गोळ्या झाडणारा मुख्य संशयित परमिंदर सिंग याला उत्तर प्रदेशातील कलदोरा येथे अटक केली. मंगळवारी पहाटे पथकाने ही कारवाई केली. संशयिताच्या चौकशीत अलार्म वाजवल्याने एक नाही तर तीन गोळ्या झाडल्याची त्याने कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात सहा नाही तर तब्बल अकरा दरोडेखोरांचा समावेश असल्याची महिती संशयिताने दिली. विशेष म्हणजे तब्बल सहा पिस्तुले, ६० जिवंत काडतुसे, टेम्पो, कार, दुचाकीचा देखील या गुन्ह्यात वापर झाल्याची कबुली दिली. संशयिताला...
  June 26, 10:26 AM
 • ओझर - भारतीय वायुसेनेचा कणा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील विमाननिर्मिती कारखाना हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एच.ए.एल) आणिअखिल भारतीय एच.ए.एल ट्रेड यूनियन को-ऑर्डिनेशन कमिटी च्या अंतर्गत नाशिक कामगार संघटनेच्या वतीने रखडलेल्या वेतन करारासाठी दिनांक २५ जून ते ०२ जुलै या दरम्यान संघटनेच्या मुख्य प्रवेशद्वारावर साखळी उपोषण सुरु करण्यात आले.संघटनेच्या पदाधिकार्यांच्या वतीने कारखान्याच्या मुख्य प्रवेश द्वारावर हमारी मांगे पुरी करो अश्याजोरदार७ घोषणाबाजी करण्यात आली....
  June 25, 02:21 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात