Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे- पुणे पाेलिस दलातील कर्मचारी शैलेश जगताप यांचा भाऊ जितेंद्र जगताप यास अात्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक अाणि माजी उपमहापाैर दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने बुधवारी मानकर पोलिसांसमोर दोन महिन्यांनंतर शरण आले. दरम्यान, पोलिसांनी मानकरविरोधात मोक्का कलम लावल्याने मानकर यांना पुढे ९० दिवस जामीन मिळणे अवघड असल्याचे सांगण्यात येत आहे. सत्र न्यायालयाने मानकरला सहा ऑगस्टपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली...
  August 2, 07:00 AM
 • पुणे- पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर अखेर बुधवारी पुणे पोलिसांना शरण आले. त्यांना कोर्टासमोर उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसानी मोक्का कलम लावल्याने मानकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुप्रीम कोर्टाने मानकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळताना दहा दिवसांच्या आत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेशही दिले होते. मानकर यांनी आपली अटक टाळण्यासाठी सुरुवातीला...
  August 1, 07:54 PM
 • पुणे- शिक्रापूर येथे बुधवारी सकाळी हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने सव्वा वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे. बेल्हे गावात सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. श्रद्धा एकनाथ बिरगंटी (कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेल्हे येथील एका खासगी विद्यालयाची बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आली होती. श्रद्धाची आई श्रुती या मोठी मुलगी स्वराली हिला बसमध्ये बसविण्यासाठी आल्या होत्या. स्वराली बसमध्ये...
  August 1, 06:44 PM
 • पुणे- छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दुसरीकडे, बेल्हे गावात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. दोन तरूण थेट इलेक्ट्रीक टॉवरवर चढले आहेत. कैलास औटी आणि शरद औटी असे टॉवरवर चढलेल्या आंदोलकांची नावे आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तरुणांना खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, बुधवारी मराठा आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलनाची हाक...
  August 1, 04:28 PM
 • पुणे - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये सोमवारचा दिवस सर्वाधिक हिंसक ठरला. पुण्यामध्ये आणि प्रामुख्याने चाकणमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. याठिकाणी अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. बराच वेळ याठिकाणी राडा सुरू होता. पोलिसांना हे आंदोलन शांत करणे अत्यंत कठीण जात होते. पण राज्यात एक खास ओळख असलेले आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील याठिकाणी आले आणि त्यांनी अगदी सूज्ञपणे आंदोलकांना भावनिक साद घालत शांत केले. चाकणमध्ये सुरू...
  August 1, 10:06 AM
 • पुणे- रेल्वेच्या रुळाला तडा गेल्याचे लक्षात आल्याने कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवल्याने मुंबईहून पुण्याला येणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसचा अपघात मंगळवारी टळला. खंडाळा घाटात ठाकूरवाडी-मंकी हिल स्थानकादरम्यान लाेणावळ्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाला तडा गेल्याचे रेल्वे कर्मचारी सुनील कुमार बिहारी यांच्या लक्षात आले. दाेन रुळामध्ये सुमारे तीन ते चार इंचाचे अंतर पडले हाेते. त्यामुळे बिहारी यांनी लगेच रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधत इंटरसिटी थांबवण्यास सांगितली. त्यामुळे पुढील अनर्थ...
  August 1, 07:14 AM
 • पुणे- धनगरांचा समावेश अनुसूचित जमात (एसटी) प्रवर्गात केल्यास राज्यात लोकसभेच्या ४ ते ५ आणि विधानसभेच्या १५ ते २० जागा एसटींसाठी आरक्षित होतील. याच कारणामुळे आजवरच्या सर्व सरकारांनी धनगरांच्या एसटीतील समावेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. एसटीतील समावेशासाठी धनगर आता मात्र थांबणार नाहीत. सरकारने धनगरांचा अंत पाहू नये, असा इशारा धनगरांच्या राज्यस्तरीय बैठकीत देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतच धनगरांचा समावेश एसटी प्रवर्गात करून त्यांच्या आरक्षणाची तरतूद केली. मात्र,...
  August 1, 06:50 AM
 • पुणे- सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी साेमवारी खेड तालुका बंदचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या वेळी चाकण येथे अांदाेलन संपल्यानंतर काही जणांनी महामार्गावरील बस, ट्रक यांना अाग लावली. तसेच शेकडो गाड्यांची तोडफोड केली. मंगळवारी पाेलिसांनी मोर्चादरम्यान नुकसान झालेल्या गाड्यांचे पंचनामे केले असता २६ वाहनांची ताेडफाेड करण्यात अाली, तर २१ वाहने जाळण्यात अाली असून त्यात एसटीची संख्या अधिक अाहे. यादरम्यान सुमारे अाठ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच सुमारे पाच...
  August 1, 06:08 AM
 • पुणे- अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटे 3 वाजेपासून भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. फुलांची नयनरम्य अशी सजावट मंदिरात करण्यात आली आहे. या सजावटीत सर्व मंगल कलश वापरण्यात आले आहेत. गणरायाचा अशीर्वादाचा वर्षाव सर्व भक्तांवर व्हावा, या कल्पनेतून या सजावटीचा संकल्प करण्यात आला आहे. आज अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिरात गायक प्रथमेश लगाटे याने स्वराभिषेक सादर केला. अतिशय सुंदर अशी स्वरपूजा प्रथमेश लगाटे यांनी बाप्पाच्या चरणी सादर केली....
  July 31, 06:43 PM
 • पुणे- शहरातीलअभिरूची परिसर येथे खेळत असताना गरम दुधात पडल्याने एका चिमुरडीचा होरपळून मृत्यू झाला आहे. भार्गवी अक्षय कुलकर्णी असे चिमुरडीचे नाव अाहे. ती 1 वर्षाची होती. 26 जुलैरोजी ही घटना घडली. त्यानंतर चिमुरडीला ताबडतोब रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. दुर्लक्ष केल्याने मृत्यू मिळालेल्या माहितीनूसार, रविवारी, 26 जुलै रोजी भार्गवीच्या आईने गरम केलेले दुध थंड करण्यासाठी किचनमध्ये खाली ठेवले होते. यादरम्यान भार्गवीही तेथे खेळत होती. मात्र दुध खाली...
  July 31, 02:57 PM
 • पुणे-चाकण व खेड येथे सोमवारी हिंसक आंदोलन झाले. यात आंदोलकांनी सुमारे 10 ते 15 वाहने जाळली तर दगडफेक करून 50 वाहनांचे नुकसान केले. या हल्ल्यात काही पोलिसही जखमी झाले. आंदोलनात समाजकंटकांचा शिरकाव झाल्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान जाळपोळप्रकरणी पोलिसांनी 4 ते 5 हजार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमाव जमवणे, दंगल घडवणे आणि पोलिसांवर हल्ला केल्याचा ठपका आंदोलकांवर ठेवला आहे. आंदोलनात समाजकंटकांचा शिरकाव झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. आज...
  July 31, 02:22 PM
 • पुणे- पिंपरी-चिंचवड परीसरात तोडफडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या एका अल्पवयीन मुलाने भर घातली आहे. सायकल चोरीला गेल्याच्या रागातून त्याने पाच दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीच्या लिंक रोडवरील भाटनगर पत्राशेड भागात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. मिळालेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी आरोपी मुलाची सायकल चोरीला गेली होती. या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. पिंपरी परिसरातील...
  July 31, 01:20 PM
 • पुणे- मराठा अारक्षण मागणीसाठी पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण अाणि खेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साेमवारी शांततेत बंद पाळण्याचे अावाहन करण्यात अाले हाेते. मात्र ते अावाहन धुडकावून सकाळपासून चाकण-तळेगाव चाैकात सुरू असलेले अांदाेलन काही वेळातच हिंसक बनले. महामार्गावर ४ किलाेमीटर परिसरात एसटी, पीएमपीएमएल बसेस तसेच खासगी अशा सुमारे ४० ते ५० वाहनांवर तुफान दगडफेक केली. शिवाय, जमावाने एसटी बससह १० ते १५ वाहनांना अाग लावली. तर, खेड येथेही जमावाने महामार्गावरील ८ वाहनांच्या काचा फाेडून...
  July 31, 07:52 AM
 • पुणे- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने चाकणमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. चाकणमध्ये आंदोलकांनी अातापर्यंत 25 ते 30 वाहने जाळली असून 4 शिवशाही बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत एक डीवायएसपी अधिकारी व अनेक पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. पुण्यात चक्का जाम आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाने पुण्यात प्रचंड मोर्चा काढला. त्यामुळे पुण्यात चक्काजाम झाला होता....
  July 30, 05:16 PM
 • पुणे- हेडक्वार्टर ३ सिग्नल ग्रुपमधून बेपत्ता झालेल्या लष्करी जवानाचा मृतदेह रविवारी सकाळी घोरपडी रेल्वे रुळाच्या कडेला झुडपात आढळून आला. रमेश (२८, रा. घोरपडी) असे या लष्करी जवानाचे नाव आहे. रमेश हे २७ जुलै २०१८ पासून बेपत्ता होते. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी आत्महत्या करत असल्याबाबतची चिठ्ठी लिहिली होती. यापूर्वीच मुंढवा पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, मी मेल्यानंतर मला मिळणाऱ्या पैशातील ४० टक्के रक्कम ही छोटी...
  July 30, 06:37 AM
 • पुणे: महाबळेश्वर - पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात दरीत विखुरलेले ३० मृतदेह वर काढण्यात शोधपथकांना यश मिळाले आहे. अपघातस्थळाचा संपूर्ण शोध घेतल्यानंतर अखेर शोधकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून ओळख पटवण्याचे कामही पूर्ण झाले आहे. मृतदेह नातेवाइकांकडे सोपवण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. शनिवारी सकाळी साडेसहा वाजता दापोली कृषी विद्यापीठाचे ३१ कर्मचारी पावसाळी सहलीसाठी...
  July 30, 05:51 AM
 • पुणे - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या राज्यभरातील विविध आंदोलनांतर्गत आज पुण्यात ठोक मोर्चा काढण्यात आला. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकापासून मोर्चाची सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांची मोर्चामध्ये उपस्थितीती होती. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने उभारलेली आहेत. त्याठिकाणी केलेल्या आंदोलनांनंतर अनेक ठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर...
  July 29, 01:40 PM
 • पुणे - जोडून आलेल्या सुट्या घालवण्यासाठी महाबळेश्वरला जाणाऱ्या दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या ३३ कर्मचाऱ्यांसाठी शनिवारची सकाळ शेवटची ठरली. पोलादपूर गावाजवळ आंबेनळी घाटात सकाळी १०.३० वाजता वळणावर बस दरीत कोसळली. यात बसमधील ३४ पैकी ३३ कर्मचारी जागीच ठार झाले. १ हजार फूट खोल दरीत बस कोसळून ५०० फुटांवर अडकली. यामुळे काही मृतदेह थेट दरीत खाली फेकले गेले. भीषण अपघातात कृषी विद्यापीठातील सहायक अधीक्षक प्रकाश सावंत-देसाई हे एकमेव बचावले. बस दरीत कोसळण्यापूर्वी दरवाजाजवळ बसलेले...
  July 29, 08:55 AM
 • पुणे - जोडून आलेल्या सुट्या आनंदात घालवण्यासाठी दापोलीहून महाबळेश्वरला निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या ३३ कर्मचाऱ्यांसाठी शनिवारची सकाळ काळरात्र ठरली. आंबेनळी घाटात सकाळी साडेदहाला एका वळणावर बस सुमारे पाचशे फूट दरीत कोसळली. यात एका अधिकाऱ्याचा अपवाद वगळता, चालकासह बसमधील सर्व ३३ कर्मचारी जागीच ठार झाले. पावसाची संततधार धुके, निसरडे रस्ते आणि खोल दरीत उतरण्यास येणाऱ्या अडचणींमुळे मदतकार्यातही अडथळे येत असले तरी दोर लावून ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे आणि वर...
  July 29, 08:23 AM
 • मुंबई- दापोलीहून महाबळेश्वरला जाणारी मिनी बस शनिवारी सकाळी पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात 500 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात बसचालकासह 33 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. आश्चर्य म्हणजे या भीषण अपघातात एक कर्मचारी थोडक्यात बचावला. प्रकाश सावंत-देसाई असे या कर्मचार्याचे नाव आहे. बस दरी कोसळत असताना देसाई बाहेर फेकले गेले. दरीत एका झाडाची फांदी त्यांच्या हाताला लागली. नंतर ते खोल दरीतून वर आल्यानंतर या भीषण अपघाताची माहिती त्यांनी पोलिसांना दिली....
  July 28, 08:34 PM
 
जाहिरात

RECOMMENDED