Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या राज्यभरातील विविध आंदोलनांतर्गत आज पुण्यात ठोक मोर्चा काढण्यात आला. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकापासून मोर्चाची सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांची मोर्चामध्ये उपस्थितीती होती. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने उभारलेली आहेत. त्याठिकाणी केलेल्या आंदोलनांनंतर अनेक ठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर...
  July 29, 01:40 PM
 • पुणे - जोडून आलेल्या सुट्या घालवण्यासाठी महाबळेश्वरला जाणाऱ्या दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या ३३ कर्मचाऱ्यांसाठी शनिवारची सकाळ शेवटची ठरली. पोलादपूर गावाजवळ आंबेनळी घाटात सकाळी १०.३० वाजता वळणावर बस दरीत कोसळली. यात बसमधील ३४ पैकी ३३ कर्मचारी जागीच ठार झाले. १ हजार फूट खोल दरीत बस कोसळून ५०० फुटांवर अडकली. यामुळे काही मृतदेह थेट दरीत खाली फेकले गेले. भीषण अपघातात कृषी विद्यापीठातील सहायक अधीक्षक प्रकाश सावंत-देसाई हे एकमेव बचावले. बस दरीत कोसळण्यापूर्वी दरवाजाजवळ बसलेले...
  July 29, 08:55 AM
 • पुणे - जोडून आलेल्या सुट्या आनंदात घालवण्यासाठी दापोलीहून महाबळेश्वरला निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या ३३ कर्मचाऱ्यांसाठी शनिवारची सकाळ काळरात्र ठरली. आंबेनळी घाटात सकाळी साडेदहाला एका वळणावर बस सुमारे पाचशे फूट दरीत कोसळली. यात एका अधिकाऱ्याचा अपवाद वगळता, चालकासह बसमधील सर्व ३३ कर्मचारी जागीच ठार झाले. पावसाची संततधार धुके, निसरडे रस्ते आणि खोल दरीत उतरण्यास येणाऱ्या अडचणींमुळे मदतकार्यातही अडथळे येत असले तरी दोर लावून ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे आणि वर...
  July 29, 08:23 AM
 • मुंबई- दापोलीहून महाबळेश्वरला जाणारी मिनी बस शनिवारी सकाळी पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात 500 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात बसचालकासह 33 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. आश्चर्य म्हणजे या भीषण अपघातात एक कर्मचारी थोडक्यात बचावला. प्रकाश सावंत-देसाई असे या कर्मचार्याचे नाव आहे. बस दरी कोसळत असताना देसाई बाहेर फेकले गेले. दरीत एका झाडाची फांदी त्यांच्या हाताला लागली. नंतर ते खोल दरीतून वर आल्यानंतर या भीषण अपघाताची माहिती त्यांनी पोलिसांना दिली....
  July 28, 08:34 PM
 • मुंबई- कोकण कृषी विद्यापीठाच्या (दापोली, ता.रत्नागिरी) कर्मचार्यांची बस 500 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे. एक जण सुदैवाने बचावला आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता रायगडच्या पोलादपूर येथे हा मोठा भीषण अपघात झाला आहे. दापोली येथील कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वरला निघाले होते. प्रतापगडापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेनळी घाटात ही बस खोल दरीत कोसळली. बसमध्ये चालकासह 34 जण होते. दापोलीहून खासगी बस करून हे कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वरला...
  July 28, 04:33 PM
 • कोल्हापूर- वादग्रस्त विधाने करून नेहमी चर्चेत राहणारे चंद्रकांत पाटील हे अपघाताने मंत्री झाले आहेत. मी 14 वेळा निवडणुका लढवल्या. 7 वेळा थेट जनतेतून निवडणुकीला सामोरा गेलो. चंद्रकांत पाटील यांना निवडणुकाना कसे सामोरे जायचे हे अजून शिकायचे आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत लगावला. वादग्रस्त वक्तव्य करणे, हे मंत्री पाटील यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांची वक्तव्ये फारशी गांभीर्याने घेण्यासारखी नसतात. हीच बाब...
  July 28, 03:07 PM
 • पुणे- येथील एका मुस्लिम अनाथालायतील मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अनाथालयातील केअरटेकर मौलवीने हे कृत्या केल्याचा आरोप आहे. दोन मुलांनी केलेल्या खुलाशावरून पोलिसांनी शुक्रवारी या अनाथलायातील 36 मुलांची सुटका केली आहे. आरोपी मौलवीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. 21 वर्षीय आरोपी मौलवी हा मुळचा बिहार येथील रहिवाशी आहे. पोलिसांनी सांगितले की, अनाथालयात राहणारे बहुतांश मुले हे बिहार येथील आहेत. त्यांच्यातील 10 वर्षाचे दोन मुले काही...
  July 28, 09:25 AM
 • पुणे- कौनसी जात के हो, हे ज्याने-त्याने विचारले पाहिजे असली परिस्थिती आणायची आहे का? महाराष्ट्राचा युपी-बिहार करायचाय काय? सत्तेत बसलेले आणि विरोधातील हे सगळेच तुम्हाला वापरून घेतात. सतर्क राहा. बेसावध राहू नका. या महाराष्ट्रात पुन्हा काकासाहेब शिंदे घडता कामा नये. सत्ताधारी- विरोधकांसाठी माझ्या महाराष्ट्रात पुन्हा कोणाचा जीव जाता कामा नये, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यात केले. सरकारी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणासाठी आपण भांडतो आहोत. पण...
  July 28, 07:23 AM
 • पुणे- लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदाचा लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. कैलासावडीवू सिवन यांना जाहीर झाला आहे. एकाच प्रक्षेपकातून एकाच वेळी १०४ उपग्रह इस्रोने अवकाशात सोडले. डॉ. सिवन यांच्या नेतृत्वाखाली ही विक्रमी कामगिरी झाली. यामुळे जागतिक स्तरावर भारतीय अवकाश संशोधनाची कीर्ती पुन्हा एकदा दुमदुमली. या कार्याबद्दल डॉ. सिवन यांना सन्मानित करणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत...
  July 28, 07:02 AM
 • बारामती- राज्य सरकारने अलीकडेच मान्य केल्याप्रमाणे दूध दर न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी बारामती येथे दिला. दुग्धविकास आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये दूध पावडर निर्माते कारखानदार, खासगी व सहकारी दूध व्यावसायिक यांनी दुधासाठी पंचवीस रुपये प्रतिलिटर दर देण्याचे ठरवले आहे. एखादेवेळी दुधाची प्रत कमी जास्त झाल्यास दूध दर काही प्रमाणात कमी जास्त होऊ शकतो. या दूध दराची २१ जुलैपासून अंमलबजावणी होणार होते. परंतु, दूध...
  July 28, 06:50 AM
 • पुणे- प्रत्येकाने आपला धर्म घरात सांभाळावा. दुसऱ्या धर्माने तिसऱ्या धर्माला काही सांगू नये, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीशुक्रवारी पुण्यात सांगितले. मनसेच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. राज्यभरात मराठा आंदोलनाचा वणवा पेटला आहे, त्यावर राज यांनी भाष्य केले. तसेच शिवसेनासह भाजपवर कडाडून टीका केली. हेही वाचा..सत्ताधारी- विरोधक तुम्हाला वापरून घेत आहेत, सतर्क राहा; पुन्हा काकासाहेब शिंदे घडू नये- राज सतर्क राहा...सगळेच तुम्हाला वापरून...
  July 28, 06:16 AM
 • पिंपरी चिंचवड - पुढील महिन्यात 12 तारखेपासून श्रावण महिना सुरू होत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आखाड पार्टीची चाहूल सुरू झाली आहे. आणि यासाठी मटण विक्रेते देखील मोठ्या प्रमाणात शेळ्यांची आवक करत आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहरात काही ठिकाणी शेळ्या, मेंढ्या आणि बकऱ्या चोरीला जाण्याचे प्रकार समोर आले आहेत. भोसरी परिसर मध्ये दिनकर नामा काळे या व्यक्तीने 11 शेळ्या चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी शहरातील विविध भागातून चोरलेल्या तब्बल 32 शेळ्या आणि मेंढ्या ताब्यात...
  July 27, 04:25 PM
 • पुणे- छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गडाची उभारणी केली, जो गड स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून परिचित आहे आणि बेलाग बांधणीमुळे जो गड दुर्गप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्या राजगडाच्या बालेकिल्ल्याचे आजवरचे सर्वात जुने स्केच दुर्गप्रेमी संशोधकांना उपलब्ध झाले आहे. राजगडाचा मुकुटमणी असणारा बालेकिल्ला 18 व्या शतकात कसा दिसत होता याचा दृश्य पुरावा या स्केचच्या रूपाने मिळाला आहे. गडाच्या पुनर्बांधणीसंदर्भात हे स्केच त्यामुळे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दुर्गप्रेमी संशोधक प्रसाद...
  July 26, 08:05 PM
 • पिंपरी चिंचवड - राज्यात सुरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचा उद्रेक कमी होत नसल्याचं दिसून येत आहे. पुण्यातील मावळ परिसरात आज सकाळी पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. आंदोनकर्त्यानी महार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र महामार्ग पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना बाजूला केले आणि महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मावळ परिसरात जोरदार घोषणाबाजी करत पदयात्रा काढल्या आल्या आहेत. यामुळे...
  July 26, 04:30 PM
 • पुणे- सर्वच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्त्यांची विश्वासार्हता संपली आहे. मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिलेला नाही. अशा वेळी छत्रपतींचे वारसदार म्हणून खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी बुधवारी केले. उदयनराजेंना मी आताच भेटून आलो आहे. संभाजीराजेंशी फोनवरून बोलणे झाले आहे. त्यांनी भाजपकडून खासदारकी मिळवली हे जरी खरे असले तरी राजीनामा दिल्यास लोकांचा विश्वास त्यांच्यावर बसेल, अशीही...
  July 26, 08:23 AM
 • पुणे- गेल्या आठवड्यात विश्रांती घेतलेल्या मोसमी पावसाचा जोर या आठवड्यात मात्र पुन्हा वाढणार आहे. राज्याच्या विविध भागात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका तर कोकणात जोरदार पाऊस झाला. येत्या दोन दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असून कोकण तसेच मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण...
  July 25, 07:01 AM
 • सांगली- मराठा आरक्षणासाठी सरकारने जे करायला हवे होते ते केले. आता निर्णय न्यायालयाच्या कक्षेत आहे. तरीही मंत्र्यांच्या गाड्या फोडून जर आरक्षण मिळणार असेल तर खुशाल दगडफेक करा, असे उद्विग्न उद्गार महसूलमंत्री तथा मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी अांदाेलकांना दिला. हिंसक अांदाेलनाविषयी नाराजी व्यक्त करुन पाटील म्हणाले, आतापर्यंत शांततेत चाललेले हे आंदोलन हिंसा करून बदनाम करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. निवडणुकांच्या...
  July 25, 05:53 AM
 • पंढरपूर - आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो वैष्णवांनी एकादशीचा अनुपम सोहळा अनुभवत वारी पोहोच केली. पुढच्या वर्षी पुन्हा विठुरायाच्या भेटीला येण्याची मनोमन इच्छा व्यक्त करत जड अंत:करणाने वारकरी पंढरीचा निरोप घेत आहेत. परतीच्या प्रवासासाठी बस, रेल्वेस्थानकावर पहाटेपासूनच त्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, मराठा मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदमुळे भीतीने वारकऱ्यांची तारांबळ उडत होती. पहाटेपासूनच त्यांची परतीच्या प्रवासासाठी लगबग...
  July 24, 09:31 PM
 • पिंपरी चिंचवड - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसे आदेश होते, अशी माहिती आहे. तत्पुर्वी, उपमहापौर शैलजा मोरे यांनीदेखील आपला राजीनामा महापौरांकडे सुपूर्द केला. उपमहापौरांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर महापौर काळजे यांनी आपला राजीनामा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सुपूर्त केला. पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी पदांच्या हालचालींना काही दिवसांपासून वेग आला होता. शहरातील राजकीय हालचालींमुळे...
  July 24, 05:33 PM
 • पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारने अचानक पेट घेतला. ही घटना आज ( मंगळवार) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पिंपळे सौदागर परिसरात घडली आहे. सुदैवाने या गाडीमध्ये कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत कार जाळून खाक झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पिंपळे सौदागर परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या...
  July 24, 03:34 PM
 
जाहिरात

RECOMMENDED