जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे- पंचवीस हजार रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाला पार्टी देण्याचा बहाणा करून निर्जनस्थळी नेत त्याचा खून करून मृतदेह मित्राच्या मदतीने पुण्यातील दोडके फार्म हाऊस परिसरात पुरल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. नायब तहसीलदार संजय भोसले आणि सहायक पोलिस आयुक्त बाजीराव मोहिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेखा साळुंके यांच्या उपस्थितीत पंचनामा करून पुरण्यात आलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. निखिल अनंत अंग्रोळकर (१६, रा....
  January 18, 08:52 AM
 • पुणे,औरंगाबाद : पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा पावलावर पाऊल टाकत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही आता शिवसेनेबाबत पटक देंगेची भाषा करू लागले आहेत. राज्यातल्या ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा पूर्ण झाला आहे. त्यापैकी ४० ठिकाणी आम्ही युतीशिवाय जिंकू, असा दावाही त्यांनी गुरुवारी पुण्यात केला. जे येतील त्यांच्यासह व जे येणार नाहीत त्यांना सोडून निवडणूक लढवण्यास भाजप सज्ज झाला आहे, असे सांगताना त्यांनी युतीची शक्यताही कायम ठेवली. दुसरीकडे भाजपचे नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
  January 18, 08:01 AM
 • पुणे- नगर-कल्याण महामार्गावरील गायमुखवाडी (ता. जुन्नर, पुणे) गावाजवळ पिकअप गाडी आणि खासगी बसचा गुरुवारी रात्री ९.३० वाजता भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने दोन जण ठार तर २० गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये १२ विद्यार्थ्यांचा समावेश असून सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात बसचा क्लिनर आणि पिकअप गाडीचा चालक मृत झाले असून त्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले....
  January 18, 07:23 AM
 • पुणे- घटस्फोट मिळवण्यासाठी पत्नीच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडणाऱ्या डॉक्टर पतीचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी बुधवारी फेटाळला. पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव परिसरात हा प्रकार घडला होता. पिंपळे सौदागर भागातील २७ वर्षीय विवाहितेने वाकड पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी पडवळनगर येथे राहणारा डॉक्टर पती, सासरा व सासू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा डॉक्टरशी मे २०१५ मध्ये विवाह झाला. त्यानंतर सासरच्या मंडळीनी माहेरहून पैसे आणण्यासाठी...
  January 17, 07:49 AM
 • पुणे- पुण्यात इमारतीचे बांधकाम सुरु असताना अंगावर फरशी पडून दोन कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हॉस्पिटल हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांनी मृत्यू झाला. येरवडा परिसरात बुधवारी (ता.16) सकाळी 10 वाजता ही घटना घडली. गोविंद मिठाईलाल प्रजापती (वय- 22, रा.उत्तरप्रदेश) आणि लक्ष्मण रामरतन दुर्वे (वय-26, रा.छत्तीसगड) अशी मृतांची नावे आहेत. बोटक्लब रस्त्यावर बांधकाम सुरु आहे. कामगार फरशी ने-आण करण्याचे काम करत होते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस पोहोचले आहेत. पुढील स्लाइड्सवर...
  January 16, 01:55 PM
 • पुणे-डोक्यात दगड घालून मामाने भाच्याचा खून केल्याची घटना बुधवारी पहाटे पुण्यातील हडपसर परिसरातील फुरसुंगी रेल्वे गेटजवळ घटना आहे. संपतसिंग माणिकलाल (वय-52, रा दिंडोरी, मध्यप्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मंगलसिंग मोया व त्याची पत्नी इंदियाबाई मोया ( मूळ रा.अमरपूर मध्यप्रदेश) हे दाम्पत्यफुरसुंगी रेल्वे रुळाजवळील फडतरे वस्तीत राहात होते. मंगलसिंग याने संपतसिंग याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. नंतर मंगलसिंग पत्नीसह पसार झाला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची तीन पथके...
  January 16, 10:43 AM
 • पुणे- पैसे नाहीत, साखरेच्या दरात मंदी आहे, साखर विक्रीच्या निविदा काढल्या तर प्रतिसाद मिळत नाही, अशा कोणत्याही सबबी सांगण्याची सोय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता साखर कारखानदारांपुढे ठेवलेली नाही. कायद्याने बंधनकारक असलेली एफआरपी द्यायला पैसे नसतील तर त्या बदल्यात साखर द्या, असाच प्रस्ताव संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. हा प्रस्ताव राज्याचे नवे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडून पुढे आला आहे. त्यांनी सुचवलेल्या प्रस्तावानुसार एफआरपीच्या बदल्यात साखर...
  January 15, 08:26 AM
 • पुणे- फेसबुकवरुन संपर्कांत आलेल्या 18 वर्षांपूर्वीच्या प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार करत त्याची व्हिडिओ क्लिप सोशील मीडियावर टाकण्याची धमकी देत एक लाख रुपयांची मागणी केल्याची घटना चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रेयसीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. तो शिवाजी नगर अंबरनाथ ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे. विश्वनाथ वाल्हे अस प्रियकराचे नाव असून तो फरार आहे त्याचा शोध पोलिस घेत आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघे ही फेसबुक वरून संपर्कात आले होते....
  January 14, 07:34 PM
 • पुणे- कोरेगाव भीमा परिसरातएक जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळली. पोलिस तपासात हस्तक्षेप करणार नसल्याचे मत कोर्टाने व्यक्त केले. मात्र, तेलतुंबडे यांना अटकेपासून चार आठवड्यांचा अंतरिम दिलासा कोर्टाने दिला आहे. शहरी नक्षलवादाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा रद्द दाखल केला होता. हा गुन्हा रद्द...
  January 14, 01:15 PM
 • पुणे- सातारा महामार्गावर सोमवारी सकाळी धावत्या कारने अचानक पेट घेतला. हॉटेल पंचमीसमोर ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीत कार जळून खाक झाली आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात... पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...आगीचे संबंधित फोटो...
  January 14, 12:50 PM
 • पुणे- काश्मिरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर शशिधरन विजय नायर यांच्यावर रविवारी (ता. १३) पुण्यात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. २ जानेवारीला शशिधरन कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचा निरोप घेऊन कर्तव्य बजावण्यासाठी सेवेत हजर झाले होते. त्यानंतर अवघ्या दहाच दिवसांत शुक्रवारी (ता. ११) संध्याकाळी काश्मिरातील राजौरी येथे गस्त घालत असताना त्यांना मृत्यूने गाठले होते. काश्मिरात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात मेजर नायर शहीद झाले. हल्ल्याच्या दिवशी...
  January 14, 06:51 AM
 • पुणे- चाकणमध्ये एका दिव्यांग अल्पवयीन मुलीवर तिच्या मामानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेली माहिती अशी की, चाकणमध्ये 7 जानेवारीला ही घटना घडली. पीडित मुलीची आई मोलमजुरी करते. ती कामासाठी गेली होती. पीडित मुलगी घरी एकटी होती. याचा फायदा घेऊन आरोपीने मुलीवर अत्याचार केला. एवढेच नाही तर तिला याबाबत कुठे वाच्यता करायची नाही, असा दमही दिला. आई घरी आल्यानंतर पीडित मुलीने आपबिती...
  January 12, 08:43 PM
 • पुणे- जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ शुक्रवारी दहशतवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंग स्फाटोत पुण्याचे मेजर शशीधरन नायर (33) आणि पश्चिम बंगालचे जवान जीवन गुरुंग (24) हे शहीद झाले. गेल्या 11 वर्षांपासून ते लष्करात कार्यरत होते. शनिवारी सायंकाळी नायर यांचे पार्थिव लष्कराच्या विशेष विमानाने पुणे विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता लष्कराच्या वॉर मेमोरियल येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. या ठिकाणी लष्कराचे आजी-माजी...
  January 12, 06:22 PM
 • पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ११४ व्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी यंदाच्या वर्षी ब्रिटिशकालीन पोशाख बदलला आहे. या पोशाखात असणाऱ्या पुणेरी पगडीवरून काही राजकीय पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातला. त्यामुळे पदवी प्रदान सोहळ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विद्यार्थ्यांना पगडी महत्त्वाची वाटत नसून शिक्षण आणि नोकरी महत्त्वाची वाटत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी गोंधळाकडे दुर्लक्ष करत पदवी...
  January 12, 08:05 AM
 • पुणे- येरवडा परिसरात मांत्रिकाने एका विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आजारी पतीवर उपचार करतो असे सांगून नराधम मांत्रिकाने महिलेल्या आपल्या घरी बोलवले होते. विवाहितेला गुंगीचे औषध देऊन मांत्रिकाने 45 वर्षीव महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी मांत्रिक शब्बीर युनूस शेख याला अटक केलील आहे. मिळालेली माहिती अशी की, पीडितेचा पती मागील काही दिवसांपासून आजारी आहे. पीडितेने पतीवर उपचार करण्यासाठी मांत्रिकाला घरी नेले होते. मांत्रिकाने पतीवरुन...
  January 11, 04:51 PM
 • पुणे- विमाननगरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. थाई तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. विमाननगर पोलिसांनी गुरुवारी रात्री ली व्हिक्टोरीया स्पा अॅण्ड सलून सेंटरवर छापा टाकला. थाईलंडहून आलेल्या पाच तरुणींची पोलिसांनी सूटका केली. या प्रकरणी पोलिसांनी एक महिलेसह दोघांना अटक केली आहे. बंटीकुमार कांतीभाई पटेल (27) असे महिला दलालाचे नाव आहे. विमाननगरात ली व्हिक्टोरीया स्पा सेंटरमध्ये...
  January 11, 04:35 PM
 • पुणे- दुबईहून पुणे विमानतळावर आलेल्या स्पाइस जेटच्या एका विमानाच्या शाैचालयात कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान तब्बल चार हजार ग्रॅम वजनाचे १ काेटी २९ लाख चार हजार रुपयांची साेन्याची बिस्किटे सापडली आहेत. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी साेन्याची बिस्किटे ताब्यात घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून संशयिताचा शाेध सुरू केला आहे. गुरुवारी पहाटे चार वाजून २५ मिनिटांनी स्पाइस जेटचे हे विमान दुबईहून पुणे विमानतळावर लँड झाले. आंतरराष्ट्रीय विमान पुणे विमानतळावर...
  January 11, 10:02 AM
 • delete
  January 11, 10:00 AM
 • पुणे- राज्य मुक्त शिक्षण विद्यालय मंडळाच्या प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ गुरुवारी (ता. १०) पुण्यात शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मुक्त विद्यालयाचे प्रमाणपत्र इतर मंडळांच्या समकक्ष असेल. या मंडळांमुळे खेळाडू- कलाकारांना बहिस्थ पद्धतीने ५ वी ते १० वीचे शिक्षण घेता येईल. तसेच दिवसाचे ८ ते १० तासाला आपल्या कलेच्या, खेळाच्या सरावासाठी मिळू शकतील, अशी अपेक्षा तावडे यांनी व्यक्त केली. मुक्त विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या स्वराली जोगळेकर, पाखी जैन आणि तावडे यांनी मिळून...
  January 11, 07:43 AM
 • रायगड- आरक्षण द्यायचेच होते तर ते गरिबांना द्यायला हवे होते. आयकर भरणाऱ्याला आरक्षण व ज्याची एक वेळ चूलही पेटत नाही अशांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. रायगडावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा शुभारंभ झाला. त्यानंतर महाडच्या चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून पहिल्या सभेची सुरुवात झाली. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील...
  January 11, 07:41 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात