जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • जेजुरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे उद्योजक पती सदानंद सुळे यांनी आपल्या लग्नाचा २८ वा वाढदिवस साेमवारी (४ मार्च) देवदेव करत साजरा केला. जेजुरी गडावर जाऊन हे दांपत्य खंडोबाचरणी लीन झाले. नवदांपत्य दर्शनास आल्यानंतर पती नववधूला उचलून घेत जेजुरी गडाच्या किमान पाच पायऱ्या तरी चालताे, अशी प्रथा आहे. कार्यकर्त्यांनीही सदानंद सुळेंना तसा अाग्रह केला. त्याला मान देत सदानंद यांनी सुप्रियांना असे उचलले.
  March 5, 03:28 PM
 • पुणे - भारतीय हवाई दलाकडे असलेल्या वेगवेगळ्या देशी आणि परदेशी लढाऊ विमानांचे प्रशिक्षण वैमानिकांना घेण्यासाठी संबंधित लढाऊ विमानांचे सिम्युलेटर वापरून नेमके विमान कशाप्रकारे चालवयाचे याबाबत प्रशिक्षण घ्यावे लागते.त्यादृष्टीने सुखाेई, जग्वार, मिग, मिराज अशा विविध लढाऊ विमानांचे प्रशिक्षण एकाच काॅकपीट मधील सिम्युलेटवर घेण्यासाठी बंगळूरू येथील हिंदुस्थान एराेनाॅटिक्स लिमिटेड(एचएएल) द्वारे मेक इन इंडियाच्या धर्तीवर स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित स्पाेर्ट सुपरसाेनिक आेमिनी राेल...
  March 1, 02:30 PM
 • पुणे - खडकी परिसरातील बाेपाेडी येथील रविराज हाइट्स भाऊ पाटील रस्त्यावर गुरुवारी पहाटे चार वाजता वर्धमान ज्वेलर्स या सराफ दुकानावर दराेडा टाकत असलेल्या चाेरट्यांना पाेलिसांनी राेखण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी पाेलिसांवर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पाेलिस शिपाई माधव गाेपनर यांनी खडकी पाेलिस ठाण्यात कारमधील तीन अनाेळखी व्यक्तींविरोधात फिर्याद दिली आहे. पाेलिस कर्मचारी माधव गाेपनर हे त्यांचे सहकारी पाेलिस शिपाई एस.घाेलप यांच्यासह बाेपाेडी मार्शल ड्यूटी...
  March 1, 02:10 PM
 • पुणे - राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरुवात होत आहे. परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा पन्नास हजारांनी घट झाल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली. यावर्षी नऊ विभागीय मंडळांकडून १७ लाख ८१३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. त्यामध्ये पुनर्रचित अभ्यासक्रमाचे (नवा अभ्यासक्रम) १६ लाख, ४१ हजार, ५६८ विद्यार्थी असून, जुन्या अभ्यासक्रमाचे ५९ हजार २४५ विद्यार्थी...
  March 1, 09:32 AM
 • पुणे - राज्यातील सुमारे ७५ हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांना अर्थ विभागाने मान्यता दिल्याने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेत लागणार आहे. परीक्षेचे पेपर तपासण्यास कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी नकार दिल्याने सुमारे ३० लाख उत्तरपत्रिका पडून होत्या. उद्यापासून सर्व शिक्षक पेपर तपासण्यास सुरुवात करणार असल्याने बारावीचा निकाल वेळेत जाहीर करणे शक्य होणार आहे. वित्तमंत्री व शिक्षणमंत्र्यांबरोबर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक...
  February 27, 09:34 AM
 • पुणे - एकाच खोलीत राहत असलेल्या प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार झाल्याची घटना पुण्यातील नऱ्हे येथे सोमवारी घडली. घटनेनंतर आरोपी फरार आहे. त्याने चिठ्ठी लिहून ठेवत स्वत:ही आता आत्महत्या करणार असल्याचे नमूद केले आहे. सोनाली भिंगारदिवे असे मृत तरुणीचे नाव असून झील इन्स्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत होती, तर सोमेश घोडके असे प्रियकराचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघेही नऱ्हे येथे एकाच खोलीत राहत होते. सोमवारी कॉलेजजवळच्या एका खोलीतून दुर्गंधी येत...
  February 26, 09:14 AM
 • पुणे - देशाच्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेतील लोकनियुक्त प्रतिनिधीने मंतरलेल्या पुड्यांचे समर्थन करणे आणि विज्ञाननिष्ठ व्यासपीठांवर असल्या गोष्टींचा जाहीर उल्लेख करणे, हे देशाला एकविसाव्या नव्हे, तर सोळाव्या शतकात नेणारे बोलणे आहे, अशी टीका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विश्वस्त हमीद दाभोलकर यांनी सोमवारी दिव्य मराठीशी बोलताना केली. असे बोलणे हा गंभीर, शिक्षापात्र गुन्हा आहे, कायद्याचे हे उल्लंघन आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम मानव यांनीही औरंगाबादचे...
  February 26, 09:10 AM
 • पुणे - प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या राज्यभरातील कर्णबधिरांवर पोलिसांनी सोमवारी दुपारी लाठीचार्ज केला. यात अनेक तरुण जखमी झाले. दरम्यान, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन पण करायचे नाही का असा संतप्त सवाल कर्णबधिरांनी याप्रसंगी केला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून मंगळवारी अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले. कर्णबधिर असोसिएशनच्या वतीने समाजकल्याण आयुक्तालयासमोर सोमवारी ठिय्या आंदोलन...
  February 26, 08:58 AM
 • पुणे- पुण्यात एक महिलेने आपला इंजिनिअर पतीवर प्रेशर कुकर भिरकावल्याची घटना समोर आली आहे. पतीचा हात मोडल्याने हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचले आहे. दोघांचे म्हणजे ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने महिलेची चांगलीच कान उघाडणी केली. दुसर्यांदा अशी चूक नको, अशा शब्दात कोर्टाने महिलेला इशारा दिला आहे. मिळालेली माहिती अशी की, दाम्पत्य पुण्यातील कटराज परिसरात राहते. पीडित पतीने सांगितले की, 1998 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. सुरुवातीचे दिवस आनंदात गेले. नंतर मात्र, अत्यंत क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये...
  February 24, 02:23 PM
 • पुणे- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात काश्मीरी तरुणांना टार्गेट केले जात आहेत. पुण्यात शुक्रवारी रात्री इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकारावर काही लोकांनी हल्ला केला. पत्रकाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेली माहिती अशी की, पत्रकार जिबरान नझीर यांच्या काही तरुणांनी हल्ला केला. तुला काश्मीरमध्ये परत पाठवू, अशी धमकीही दिली. पुण्यातील टिळक रोडवर रात्री ही...
  February 24, 02:01 PM
 • पुणे- तुझा प्रायव्हेट फोटो माझ्याकडे आहे. मला ब्लॉक केलंस तर तो फोटो मुंबईच्या फेमस ग्रुपवर दिसेल., असा मेसेज पुण्यात एका 24 वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीला आल्याने खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर पीडित तरुणीकडे तिच्या विवस्र एक मिनिटाच्या व्हिडीओचीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांत अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे हे प्रकरण? एका तरुणाने पुण्यातील एका तरुणीला व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेज पाठवला. तुझा प्रायव्हेट फोटो माझ्याकडे आहे. मला ब्लॉक...
  February 23, 06:24 PM
 • पुणे- लोकसभा निवडणूक तोंडावरराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला तोंड फुटले आहे. माढा मतदार संघात येणाऱ्या फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे भाषण सुरु असताना शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांचे समर्थक आमने-सामने आले. या गोंधळामुळे शरद पवारांना आपले भाषण थांबवावे लागले. कविता म्हेत्रे यांना व्यासपीठावर स्थान देण्यावरून पेटला वाद.. मिळालेली माहिती अशी की, कविता म्हेत्रे यांना व्यासपीठावर स्थान देण्यावरून शेखर गोरे यांच्या समर्थकांनी कार्यक्रमात गोंधळ...
  February 22, 06:52 PM
 • पुणे- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित इयत्ता बारावीची परीक्षा गुरुवारपासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत आहे. यंदा १४ लाख, ९१ हजार, ३०६ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी बुधवारी दिली. ९ विभागीय केंद्रांच्या माध्यमातून २१ फेब्रुवारी ते २० मार्चदरम्यान परीक्षा होईल. परीक्षेला ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी, तर ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थिनी बसतील. गैरप्रकार होऊ...
  February 21, 08:53 AM
 • पुणे- किशोरवयीन प्रेमकहाणीचा वेगळा फॉर्म्यूला दाखवणाऱ्या प्रचंड गाजलेल्या सैराट या चित्रपटाची नायिका प्रेरणा राजगुरू उर्फ आर्ची यंदा बारावीची परीक्षा देणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्मी गावच्या जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आर्चीचे परीक्षा केंद्र आहे. त्यामुळे या परीक्षा केंद्रावर पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. तसे झाल्यास दहावीप्रमाणेच बारावीची परीक्षाही आर्चीला पोलिस संरक्षणात द्यावी लागणार आहे. सैराट प्रदर्शित...
  February 20, 05:30 PM
 • पुणे- शहरातील जंगली महाराज रोडवरील संभाजी महाराज उद्यानात मंगळवारी (ता.19) पहाटे अज्ञातांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. यावरून आता पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संभाजी महाराजांचा फायबरचा पुतळा हटविला आहे. या प्रकरणी पोलिसांनी डझणभर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी या उद्यानात प्रसिद्ध मराठी नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवण्यात आला होता. या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. या तोडफोडीची...
  February 20, 11:49 AM
 • पुणे- आगामी लोकसभा निवडणूक मी स्वत: आणि सुप्रिया सुळे लढवणार आहोत. याशिवाय पवार कुटुंबातील अन्य कुणीही लोकसभेच्या मैदानात उतरणार नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. पवार कुटुंबीयांवर घराणेशाहीचा केला जाणारा आरोप योग्य नाही. मी आणि सुशीलकुमार शिंदे, दोघेही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहोत, असेही त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार लोकसभेची निवडणूक लढवणार की नाही,...
  February 20, 11:44 AM
 • पुणे- सामान्य रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषित, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली असून त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्र पुढे जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिली. जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यानंतर मराठा सेवा संघाच्यावतीने शिवजन्मोत्सवाच्या निमित्त...
  February 19, 06:48 PM
 • पुणे - विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये युतीवर बैठका सुरू असतानाच काँग्रेसने धक्कादायक दावा केला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला ईडी आणि इतर चौकशी समित्यांची भीती दाखवली. त्यामुळे, हे दोन्ही पक्ष युती करणारच आहेत. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात बोलताना हे विधान केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करणार त्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी काँग्रेसची ही...
  February 18, 06:23 PM
 • बारामती- बारामतीत पोलिसांनी लष्करी जवानाला ठाण्यातच मारहाण केल्याची घटना घडली. अशोक इंगवले (सोनगाव, ता बारामती)असे जवानाचे नाव आहे. नुकतेच ते रजेवर गावी आले आहेत. दरम्यान, पुलवामात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांना सोनगावमध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे. त्याची परवानगी घेण्यास थोरला भाऊ व माजी सैनिक असलेले किशोर इंगवलेसह दुचाकीवरून बारामती पोलिस ठाण्यात गेले होते. परंतु, दुचाकीवरून तिघेजण आल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली....
  February 18, 08:26 AM
 • पुणे- न्यायालयात हजर होण्याच्या तारखेवेळी ते आपल्यासोबत वकील घेऊन जातात. जामिनासाठी ३ ते ५ हजार रुपये देणे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही. हे आपण कोणत्याही अट्टल गुन्हेगारांबद्दल नव्हे, तर भिकाऱ्यांबद्दल बोलत आहोत. हे भिकारी भीक मागणे सुरूच राहावे म्हणून ही धडपड करताहेत. महाराष्ट्र शासनातर्फे राज्य भिकारीमुक्त करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. त्याअंतर्गत पोलिस भिकाऱ्यांना पकडून न्यायालयात घेऊन जातात. तेथून त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवून समाजाच्या मूळ प्रवाहात आणणे, हा यामागील...
  February 17, 09:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात