जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 187 व्या जयंतीनिमित्त सावित्रीच्या लेकी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक भवन , कोरेगाव पार्क , पुणे येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महाराष्ट्रातील महिलांचा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शारदाताई बडोले, तसेच पुण्याचे समाज कल्याण आयुक्त मिंलीद शंभरकर यांची विशेष उपस्थिती होती. सदर उपक्रमा...
  January 4, 06:10 PM
 • पुणे- जातिव्यवस्थेविरोधात समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला यापुढे अडीच लाख रुपयांची मदत सरकारकडून दिली जाईल, अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील कोरेगाव पार्क येथे आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातिव्यवस्था तोडण्यासाठी आंतरजातीय विवाह हा प्रभावी उपाय सुचवला. पण, त्या प्रमाणात आंतरजातीय...
  January 4, 12:07 PM
 • पुणे- पुण्यात २० वर्षांपूर्वी रस्त्यावर आढळलेल्या दाेन लहान बहिणींना एका पाेलिसाने सामाजिक संस्थेकडे साेपवले हाेते. न्यूझीलंडच्या एका दांपत्याने दोघांचे पालकत्व घेत त्यांना सोबत नेले. आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या पाेलिस हवालदार एस. के. कांबळे यांचे आभार मानण्यासाठी झीनत (२४) व रिमा साजिया (२३) या बहिणी न्यूझीलंडवरून पुण्यात आल्या आहेत. सीमा हिने भारतनाट्यमचे शिक्षण घेतले असून ती न्यूझीलंडमध्ये शिक्षिका आहे, तर रिमा इंजिनिअर आहे. मात्र, कांबळे हे निवृत्त झाले आहेत. यामुळे...
  January 4, 09:54 AM
 • पुणे- पोलिसांनी हेल्मेट सक्ती लागू केल्यानंतर पुण्यात विविध मार्गांनी त्याचा विरोध होत आहे. गुरुवारी येथील एका वकिलाने डोक्यावर हेल्मेटच्या जागी पातेले ठेवून दुचाकीवरून प्रवास केला. वाजेद खान-बीडकर असे या वकिलाचे नाव आहे. आयएसआय मार्कचे चांगल्या प्रतीचे हेल्मेट विकत घेण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, अन्यथा घरातील पातेले डाेक्यावर वापरण्याची परवानगी मिळावी, असे निवेदन त्यांनी वाहतूक पाेलिस आयुक्तांना दिले आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभरत ९ हजार ५१९ जणांवर कारवाई करण्यात आली. बीडकर...
  January 4, 08:22 AM
 • पुणे- एका 35 वर्षीय विवाहित महिलेचे आपल्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामीची धमकी दिल्याने एका महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेचा पती विनोद वाघ (45) यांनी आरोपी आशिष वसंत धिवार (29) याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे 17 वर्षांपूर्वी लग्न झाले असून तिला 15 वर्षांचा एक मुलगा आहे. चार वर्षांपूर्वी तिचा मुलगा गणेशोत्सवाच्या काळात ढोल-ताशा शिकण्यासाठी जात होता. त्यावेळी मुलासोबत जात असलेल्या...
  January 3, 06:59 PM
 • पुणे- वर्गात आपली नक्कल केल्याने संतापलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्यास काठीने बेदम मारहाण करून त्यास डांबून ठेवल्याची घटना पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोषी शिक्षकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षकाविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंकर महादेव खोचरे (14) असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे. व्यंकटेश कळसाईत असे मारकुट्या शिक्षकाचे नाव आहे. शंकर हा पिंपरी-चिंचवड परिसरातील महापालिकेच्या...
  January 3, 06:28 PM
 • पुणे- दौंडमध्ये बुधवारी (ता.2) पार पडलेल्या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र चांगलीच रंगली आहे. नववधू बुलेटवून वरात घेऊन चक्क नवरदेवाच्या घरी पोहोचली आणि तिने संपूर्ण गावासमोर सप्तपदी घेतली. नववधूही शेतकरी कन्या आहे. वरात घेऊन येणे हा केवळ मुलांचाच हक्क नाही तर मुली काही कमी नाहीत, हाच उद्देश या मागे असल्याचे तिने सांगितले. दौंडमधील केडगावातील कोमल देशमुख हिने नव्या नवरीच्या वेशभूषेत चक्क बुलेटवरून निघाली, हे पाहून सगळ्यांनाच वाटले. एखाद्या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे, असा भासही अनेकांना...
  January 3, 04:41 PM
 • काेरेगाव भीमा- ब्रिटिश सरकारमधील महार रेजिमेंटच्या बहाद्दर सैनिकांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमाच्या स्मृतिप्रीत्यर्थ काेरेगाव भीमा येथे उभारण्यात आलेल्या जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या कानाकाेपऱ्यातून तब्बल ४ ते ५ लाख अनुयायी आले हाेते. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराचे सावट असल्यामुळे पुणे पाेलिसांनी या साेहळ्याच्या निमित्ताने तैनात करावयाच्या चाेख बंदाेबस्ताचे दाेन महिन्यांपासून नियाेजन केले हाेते. माेठा फाैजफाटा, सीसीटीव्ही,...
  January 2, 12:10 PM
 • delete
  January 2, 08:22 AM
 • पुणे/ ठाणे- माेबाइलचे वाढते वेड आणि त्यांचे होणारे सामाजिक दुष्परिणाम आता गंभीर रूप धारण करत आहेत. याची प्रचिती देणाऱ्या दोन घटना दोन दिवसांत राज्यात घडल्या. यात पहिली सुन्न करणारी घटना पुण्यात घडली. अभ्यास सोडून मोबाइलवर खेळू नकोस म्हणून आई रागावल्याने संतापलेल्या एका १३ वर्षाच्या मुलाने सोमवारी रात्री आत्महत्या केली. तर, दुसऱ्या एका घटनेत पालघरमध्ये सतत मोबाइलवर चॅटिंग करणाऱ्या स्वत:च्या मुलीस बापाने पेटवून दिले. मुलगी ७० टक्के भाजली आहे. अवघ्या तेरा वर्षांच्या दर्शनने मोबाइल...
  January 2, 08:22 AM
 • पुणे- तीन नराधमांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील विटा शहरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. काय आहे प्रकरण? विटा येथील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. पोलिस बेपत्ता मुलीचा शोध घेत होते. अखेर मुलगी पोलिसांना सापडली. तिने पोलिसांना आपबिती सांगितली. पीडितेने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी सत्यजित पवार, शुभम शिंदे आणि रितेश लोंढे...
  January 1, 06:55 PM
 • पुणे - एल्गार परिषदेशी संबंधित असल्याच्या संशयावरून पुणे पाेलिसांनी काही विचारवंतांना अटक केली. त्यांचा संबंध शहरी नक्षलवाद्यांशी असल्याचे सांगितले. मात्र केवळ गाेपनीय पत्राच्या अाधारे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या जिवाला धाेका अाहे असे सांगत विचारवंतांना माअाेवादी कटात सहभागाचा अाराेप करणे चुकीचे अाहे. खरे तर पंतप्रधानांच्या जिवाला धाेका असल्याचा केवळ प्रपाेगंडा केला जात अाहे. खरेच जिवाला धाेका असेल तर पंतप्रधानांनी विदेश यात्रा बंद करून घरीच बसावे, असा टाेला भीम अार्मीचे...
  January 1, 08:04 AM
 • पुणे- कोरेगाव-भीमा येथे मागील वर्षी एक जानेवारी रोजी दोन गटात दंगल उसळल्यानंतर, एका जमावाच्या हल्लयात सणसवाडी येथील तरुण राहुल फटांगडे याचा बेदम मारहाण झाल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आत्तापर्यंत पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अहमदनगर जिल्हयातून तीन आरोपी तर सीआयडीने एक आरोपी जेरबंद केला आहे. मात्र, या गंभीर खुनाच्या गुन्हयातील मुख्य दोन आरोपी अद्याप मोकाट असून त्यांना मुलाचे वर्षश्राद्ध आले तरी अटक करण्यात आली नाही ही तपास यंत्रणांच्या दृष्टीने शरमेची...
  December 31, 05:49 PM
 • काेरेगाव भीमा- काेरेगाव भीमा, वढू, सणसवाडी या ठिकाणी यंदा १ जानेवारीला दाेन गटांत हिंसाचार उफाळून अनेकांची घरे, दुकाने, हाॅटेल, वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली. मात्र, पीडितांनी आत्मविश्वासाने पुन्हा त्यांचे निवारे आणि व्यवसाय उभारत उमेदीने उठण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाने १०५ घरे व दुकानांना नुकसानीपोटी ७ काेटींची मदत केली. तर, २०० ते २२५ वाहनांच्या नुकसानीपोटी २ काेटींची मदत लवकरच केली जाणार आहे. पुणे-अहमदनगर रस्त्यावर काेरेगाव भीमा ते सणसवाडीदरम्यान चारचाकी आणि दुचाकीचे...
  December 31, 07:43 AM
 • पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांची 31 डिसेंबर रोजी सभा आयोजित करण्यासाठी भीम आर्मीतर्फे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबईत रावणची सभा होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. भिडे, एकबोटेंसह 58 जणांना कोरेगाव भीमा, वढूमध्ये बंदी पुणे ग्रामीण पोलिसांनी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवप्रतिष्ठानचे संभाजी ऊर्फ मनोहर भिडे,...
  December 29, 11:31 AM
 • पुणे- पुणे ग्रामीण पाेलिसांनी काेरेगाव भीमा येथे १ जानेवारी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवप्रतिष्ठानचे संभाजी ऊर्फ मनाेहर भिडे, समस्त हिंदू अाघाडीचे मिलिंद एकबाेटे, कबीर कला मंच कार्यकर्त्यांसह एकूण ५८ जणांना ३१ डिसेंबर व एक जानेवारी राेजी काेरेगाव भीमा, वढू, पेरणेफाटा व सणसवाडी परिसरात येण्यास प्रवेशबंदी केली अाहे. गेल्या वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती हाेऊ नये अाणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी पाेलिसांनी पावले उचलली अाहेत. पाेलिसांनी...
  December 29, 08:50 AM
 • पुणे- साखरेच्या किमती पडल्याने अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना इथेनॉलने यंदा दमदार हात दिला आहे. यंदाच्या १ डिसेंबर ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत महाराष्ट्रातून तब्बल ९३.५४ कोटी लिटर इथेनॉलची विक्री होणार आहे. या विक्रीतून महाराष्ट्राच्या साखर धंद्यात ४३ अब्ज रुपये येणार आहेत. एकाच राज्याकडून विक्री होणाऱ्या इथेनॉलच्या बाबतीत महाराष्ट्र देशातले क्रमांक एकचे राज्य ठरले. एवढेच नव्हे तर राज्याच्या इतिहासातली सर्वाधिक इथेनॉल विक्रीही यंदा होत आहे. गेल्या हंगामात...
  December 28, 08:13 AM
 • शिरूर- रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन युवकांना सकाळच्या वेळी टवाळखोर समजून सहायक पोलिस निरीक्षकाने कारमध्ये बसवत थेट पोलिस ठाण्यात नेऊन सुरुवातीला मारहाण व त्यानंतर त्यांना शंभर उठाबशाची शिक्षा दिली. दुपारी दोन वाजता दोन्ही तरुणांना सोडून देण्यात आले. मात्र घरी गेलेला दुसरा तरुण काही वेळातच हातात पेट्रोलचे कॅन घेऊन पोलिस ठाण्यात दाखल झाला.मला विनाकारण मारहाण का केली अशी पोलिसांना विचारणा करत त्याने अंगावर पेट्रोल आेतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला...
  December 28, 07:51 AM
 • पुणे- स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. पण, अशी आई कुणालाच नको, असे म्हणायला लावणारी घटना पुण्यात घडली आहे. अवघ्या एका दिवसाच्या मुलीला जन्मदात्रीनेच झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काय आहे हे प्रकरण? पिंपरीतील जगताप डेअरी क्षितिज कॉलनी परिसरात बुधवारी (ता.26) ही घटना समोर आली आहे स्थानिक नागरिकांन नवजात शिशु रडण्याचा आवाज येत होता. आवाजाच्या दिशेने त्यांनी जाऊन पाहिले असता झुडपात एक दिवसाचे बाळ रडताना त्यांना दिसले. याबाबत वाकड...
  December 28, 12:16 AM
 • पुणे- पुण्यातील एका पोलिस स्टेशनमधील मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका व्यक्तिने थेट पोलिस स्टेशनमध्ये शिरून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. साहेबगौडा पाटील (वय 49) असे आरोपीचे नाव आहे. सांगवी पोलिस स्टेशनमधील ही घटना आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाकाबंदी दरम्यान आरोपी साहेबगौडा पाटील याच्या अल्पवयीन मुलाने आपल्या दुचाकीने अनेकांना ठोकरले. स्थानिक लोकांनी मुलाला बकडू त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन...
  December 27, 06:18 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात