Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे- नालासोपारा स्फोटक साठाप्रकरणी एटीएसने शनिवारी पुण्यातील महेश इदलकर आणि विशाल खुटवड या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोघांकडेही एटीएसने सविस्तर चौकशी केली. महेश इदलकर आणि विशाल खुटवड हे पुण्यातील रहिवासी असून एका हिंदुत्ववादी संघटनेशी ते निगडित आहेत. एकाचे शिक्षण बारावीपर्यंत तर दुसऱ्याचे पदवीपर्यंत शिक्षण झाले असून सध्या ते बेरोजगार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सनातन संस्थेचे पदाधिकारी पराग गोखले यांनी सुधन्वा गोंधळेकर, महेश इदलकर आणि विशाल खुटवड...
  August 11, 08:28 PM
 • पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात 24 तासांत आत्महत्येच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. पहिल्या घटनेत संगणक अभियंत्याने आत्महत्या केली असून दुसऱ्या घटनेत नौकरीच्या शोधात आलेल्या युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये संगणक अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास चिंचवडच्या बिजली नगर येथे घडली. राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. अद्याप आत्महत्याचे कारण समजले नाही. अभिजित रामदास मुळे (वय-38,...
  August 11, 02:19 PM
 • पुणे- प्रेमा तुझाला रंग कसा..अशीच एक घटना विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडली आहे. दगाबाज प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी प्रियकराने तिच्या घराबाहेर स्फोट घडवून आणला. ही घटना पुण्यातील धायरी परिसरातील अलोक पार्क सोसायटीत बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. मिळालेली माहिती अशी की, धायरी परिसर बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एका मोठ्या स्फोटाने हादरला होता. भीषण आवाजाने एका घराच्या खिडकीची काचही फुटली होती. स्फोटप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी किशोर आत्माराम मोडक (20) आणि...
  August 11, 02:16 PM
 • पुणे- मराठा क्रांती मोर्चाने क्रांती दिनी (9 ऑगस्ट) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यात हिंक वळण लागले होते. बंद दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच डेक्कन आणि चांदणी चौक भागात धुडगुस घालणार्या185 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.सगळ्यांना 200 पोलिसांच्या बंदोबस्तात पुणे कोर्टात हजर करण्यात आले. दुसरीकडे, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे रोखून धरणाऱ्या आंदोलकांवर तळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आले. उर्से टोल नाक्यावर दोन्ही दिशेची वाहतूक तब्बल सहा तास ठप्प होती. याप्रकरणी 150 ते 175...
  August 11, 08:50 AM
 • पुणे-मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी झालेल्या अांदाेलनाच्या वेळी काही समाजकंटकांनी हिंसाचार घडवून अाणला. त्याचा अाम्ही निषेधच करताे. रस्त्यावरच्या आंदोलनांमधून महाराष्ट्राचे होणारे अपरिमित नुकसान थांबले पाहिजे, या भूमिकेतून यापुढे मराठा समाजातर्फे रस्त्यावरचे कोणतेही आंदोलन करणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घाेषणा पुण्यातल्या मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. हा निर्णय सध्या फक्त पुण्यापुरता असला तरी...
  August 11, 07:59 AM
 • पुणे- देशात अघोषित आणीबाणी आहे, संसदीय व्यवस्थांचे, संस्थांचे सरकारकडून अवमूल्यन केले गेले आहे, सर्वांना भीतीच्या वातावरणात ठेवण्यात येत आहे. राजकीय विरोधकांना बदनाम करून संपवण्यात येत आहे. या अघोषित आणीबाणीविरुद्ध लढले पाहिजे आणि देश जिवंत आहे हे दाखवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी गुरुवारी पुण्यात केले. मोदींवर बोलण्याऐवजी मुद्द्यांवर बोलले पाहिजे. पुण्याने देशाला दिशा द्यावी आणि बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करण्यात पुढाकार घ्यावा,...
  August 10, 08:14 AM
 • पुणे- आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने अायाेजित करण्यात अालेल्या बंदला राज्याच्या बहुतांश भागात चांगला प्रतिसाद मिळाला. पोलिसांना सुरक्षेसाठी सहकार्य करा, कायदा-सुव्यवस्था धोक्यात येईल, असे वर्तन करू नका, हिंसाचार करू नका, अशी अाचारसंहिता सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी माेर्चेकऱ्यांसाठी जाहीर केली हाेती. मात्र पुणे, अाैरंगाबाद, लातूरसह राज्याच्या अनेक भागांतील अांदाेलकांनी या आचारसंहितेला हरताळ फासला. पोलिसांवर दगडफेक, चप्पलफेक,...
  August 10, 07:57 AM
 • बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील घरासमोर गुरुवारी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. यात माजी उपमुख्यमंत्री व पवारांचे पुतणे अजित पवार हेही सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. मात्र, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना मात्र आंदोलकांनी पिटाळून लावले. शरद पवार यांनी मराठा आरक्षणाविषय़ी भूमिका स्पष्ट करावी,...
  August 10, 07:35 AM
 • पुणे - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी बारामतीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी अजित पवार यांनीही मराठा आरक्षणाचा भगवा हाती घेत या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी आंदोलकांसोबत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत गांभीर्याने विचार न केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. तसेच सर्व समाजाच्या प्रलंबित आरक्षणाच्या प्रश्नामागे सरकारची धरसोडवृत्ती आहे, असा आरोप करत...
  August 9, 08:01 PM
 • पुणे -गुजरातच्या भारुच येथील महिला गर्भाशय प्रत्यारोपणानंतर गर्भवती राहिली आहे. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये ही महिला उपचार घेत आहे. गर्भाशय प्रत्यारोपणाच्या माध्यमातून आई बनण्याचा आनंद तिला अनुभवता येत आहे. पण यात आणखी एक विशेष म्हणजे तिच्या आईने तिला हे गर्भाशय दिले आहे. माझा जन्म झाला त्या गर्भातूनच माझे बाळ जन्म घेणार या महिलेला तिच्या आईनेच गर्भाशय दान केले आहे. त्याच्या प्रत्यारोपणानंतर ती आता गर्भवती असल्याने अत्यंत आनंदी आहे. याबाबत बोलताना महिला म्हणाली की, ज्या गर्भाशयातून...
  August 9, 12:03 PM
 • पुणे- रेस्टॉरंटमध्ये शेजारच्या टेबलवर बसलेल्या युवकांनी मैत्रिणीला पाहून शेरेबाजी केल्याने युवकाने गोळीबार केल्याचा प्रकार मुंढवा परिसरात रविवारी रात्री घडला. गोळीबार करणाऱ्या तेजस प्रकाश गोंधळेला (२५, हडपसर) अटक केली आहे. मुंढवा परिसरात नाइट रायडर नामक रेस्टॉरंटमध्ये तेजस हा एका मैत्रिणीसह गेला होता. रात्री उशिरा दोघे जेवण करत असताना शेजारील टेबलवर बसलेल्या काही युवकांनी तेजसच्या मैत्रिणीस उद्देशून शेरेबाजी केली. त्यामुळे त्या युवकांसोबत वाद झाला. या वेळी तेजसने त्याच्याकडे...
  August 8, 07:24 AM
 • पुणे- राज्यभरात मराठा, धनगर समाजाकडून आरक्षणासाठी आंदोलने होत असतानाच, लिंगायत समाजानेही आरक्षणाची मागणी केली आहे. काही पोटजातींपुरते आरक्षण पुरेसे नसून, संपूर्ण लिंगायत समाजाला आरक्षण लागू करावे, मागणी मान्य न केल्यास 15 ऑगस्टनंतर लिंगायत समाजही रस्त्यावर उतरेल, असा इशारा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुदर्शन बिरादार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला. राज्यात लिंगायत समाजाची संख्या सुमारे एक कोटी आहे. त्यापैकी काही पोटजातींना सरकारने आरक्षण दिले आहे. मात्र ते...
  August 7, 06:02 PM
 • पुणे - शहरातील खडी मशीन चौकात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास एक थरकाप उडवणारा अपघात झाला. यामध्ये भरधाव ट्रेलरने 4 चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. अपघातामुळे डस्टर कार होंडासिटी कारच्या टपावर फेकली गेली होती. सुदैवाने या गंभीर अपघातात कारमधील एकाही व्यक्तीला दुखापत झाली नाही. हा अपघात कात्रज -कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमीच्या पुढे सकाळी अकराच्या सुमारास घडला. या अपघाताबाबत सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी सांगितले की, दुपारी अकराच्या सुमारास एक भरधाव ट्रेलर कोंढव्याकडून...
  August 7, 05:37 PM
 • सातारा- पोलादपूर येथील आंबेनळी घाटात महिला व मुलीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रताप गडापासून जवळच असलेल्या घाटात दोन अर्धवट जळालेले मृतदेह आढळले असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, 28 जुलैला महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघालेली दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस पोलादपूर येथील आंबेनळी घाटात 500 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला होता. एक कर्मचारी सुदैवाने या अपघातातून बचावला...
  August 7, 12:49 PM
 • पुणे- मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षणाच्या मागणीसह समूहाकडून होणाऱ्या हत्यांच्या विरोधात विविध मुस्लिम संघटनांतर्फे 9 सप्टेंबर रोजी मुस्लिम मूक महामोर्चा काढण्यात येणार आहे. गोळीबार मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती मुस्लिम मूक महामोर्चा समन्वय समितीने पत्रकार परिषदेत दिली. मुस्लिम समाजाला दिलेल्या 5 टक्के आरक्षणाची सरकारने अंमलबजावणी करावी. देशात मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये तब्बल 78 पेक्षा अधिक मुस्लिम समाजातील लोकांच्या हत्या झाल्या...
  August 6, 07:47 PM
 • शिर्डी- शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्त निवासातून एका भाविकाचे 52 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 40 हजार रुपये चोरीस गेल्याचे समोर आले आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
  August 6, 05:33 PM
 • पिंपरी चिंचवड -शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात एका रुग्णाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवारी) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. शंकर लक्ष्मण पात्रे (45) असे मृत रुग्णाचे नाव आहे. ते कुदळवादी येथील रहिवासी होते. पोटाच्या आजाराने त्रस्त असलेले शंकर पात्रे यांना तीन दिवसांपूर्वी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी अचानक शंकर पात्रे यांनी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये...
  August 6, 02:55 PM
 • पुणे - दौंड तालुक्यातील देलवडी येथे स्वप्नील ज्ञानदेव शेलार या 35 वर्षीय तरूणाचा रविवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही थरारक घटना देलवडी जवळील शेलार वस्तीमधील रस्त्यावर घडली. पोलिसांना घटना स्थळी एक पिस्तुल सापडले आहे. हल्ल्यानंतर अज्ञात मारेकरी फरार झाले आहेत. हल्ल्यामागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. एका हत्या प्रकरणात आरोपी होता स्वप्नील स्वप्नील शेलार हा एका खून प्रकरणातील आरोपी होता. एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप...
  August 6, 02:27 PM
 • पुणे- खासदार उदयनराजे भोसले पुण्यात म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या ३० वर्षांपासून चिघळत ठेवला आहे. कधी राजकारण, कधी कायद्याची भाषा, सुव्यवस्थेचा प्रश्न, असे मुद्दे पुढे करत राज्यकर्ते मराठा आरक्षणावर संगीत खुर्चीचा खेळ खेळत आहेत. आता आरक्षणाचा निर्णय त्वरित घेतला नाही तर उद्रेक होऊ शकतो. मग त्याची जबाबदारी राज्यकर्त्यांवर राहील, असा इशारा त्यांनी दिला. मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका. आरक्षणावर मार्ग काढा, अन्यथा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते...
  August 6, 07:01 AM
 • पुणे - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ३० जुलै रोजी खेड तालुका बंद पाळण्यात आला. या वेळी चाकण येथे दंगल उसळून अनेक वाहनांची जाळपोळ झाली आणि पोलिसांवर जीवघेणे हल्ला झाले होते. याप्रकरणी चाकण पोलिसांनी आणखी १२ जणांना अटक केली आहे. खेड न्यायालयात त्यांना पोलिसांनी हजर केले असता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यापूर्वी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने १८ जणांना अटक केली आहे. १५ जणांना पुणे न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश...
  August 5, 11:41 AM
 
जाहिरात

RECOMMENDED