Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे- मुंबईहून पुण्याकडे येणार्या गाडीचा भीषण अपघात होऊन दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (मंगळवार) सकाळी सहाच्या सुमारास ओझर्डे गावच्या हद्दीत आढेगावजवळ झाला. शशिकांत प्रीतम साळुंखे, राहुल राजगुरू अशी मृत तरुणांची नावे आहेत. प्रतिक अमरे हा तरुण जखमी झाला आहे. तिघेही पुण्यातील रहिवासी आहेत. प्रतिक अमरे याच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून सकाळी प्रवासी वाहतूक करणारी गाडी प्रवासी घेऊन...
  9 mins ago
 • पुणे- कौटुंबिक वादातून व्हॉट्सअॅपवर नातेवाईकांना निरोपाचा व्हिडिओ पाठवत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. काल (दि.23) दुपारी निगडीतील यमुनानगरात ही घटना घडली. प्रसन्न पाटील (वय -38, रा. यमुनानगर, निगडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसन्नचे मागील काही दिवसांपासून नातेवाईकांसोबत वाद सुरु होते. या वादाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीसह इतर...
  22 mins ago
 • पुणे - प्रसिद्ध चित्रपट निर्माता असल्याचा बहाणा करत महिलांना गंडा घालणार्या आर्किटेक्टला अटक करण्यात आली आहे. मूळचा कोल्हापूरचा असणार्या या आर्किटेक्टने पुणे, नाशिक, मुंबई, कोल्हापूरसह गोव्यातील 150 हून अधिक महिला व तरुणांकडून पैसे उकळले आहेत. संदीप महादेव व्हरांबळे ऊर्फ संदीप पाटील ऊर्फ सॅण्डी (वय- 32) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील हळदी येथील असून सध्या नवी मुंबईत राहतो. मालिका व चित्रपटांत काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून पोर्ट...
  11:59 AM
 • अकोला- रेल्वे विभागाने पुणे-काझीपेठ (गाडी क्रमांक २२१५१) ही नवीन सुपरफास्ट गाडी सुरू केली आहे. ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. या गाडीची भर पडल्याने प्रवाशांना मदत होणार आहे. शनिवारी अकोल्यात या गाडीचे स्वागत करण्यात आले. ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार असून तिला अकोल्यात थांबा देण्यात आला आहे. पुणे- काझीपेठ नवी रेल्वे गाडी विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातून धावणार आहे. या गाडीला १३ डबे आहेत. मोजकेच थांब्यात अकोल्याचा समावेश करण्यात आला आहे. १३ बोगींमध्ये दोन वातानुकुलीत...
  07:45 AM
 • पुणे- प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून एका तरुणीवर चाकूने वार करण्यात आले. ही घटना काल (दि.22) रात्री अकराच्या सुमारास पिंपरीतील गोकुळ हॉटेल जवळ घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी बबलू शिवप्रसाद (वय.30 रा पिंपरी, मूळ उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. या प्रकरणी जखमी तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीचे आरोपीशी प्रेमसंबंध.. या तरुणीचे आरोपी बबलूशी प्रेमसंबंध होते. तर बबलूचे तरुणी व तिची मैत्रीण दोघींशी प्रेमसंबंध होते. या दोघीही बबलूला भेटायला पिंपरी येथे आल्या...
  October 23, 03:27 PM
 • नाशिक / नगर -पाथर्डी फाट्याजवळ काही संशयित दहशतावद्यांना अटक करण्यात आली असे वृत्त सर्वत्र पसरले. पोलिसांनी या संशयितांकडून रायफल्स आणि जिवंत बॉम्ब देखील जप्त केले. सुरुवातीला पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. यानंतर अटक करण्यात आलेले सगळेच दहशतवादी नसून दरोडेखोर होते असा खुलासा पोलिसांनी केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे, की महामार्गावरील सिगारेट, पितळ, स्टील, गुटखा, आणि अन्य महागड्या वस्तूचे कन्साइन्मेंट हायजॅक करुन लूटमार करणाऱ्या राज्यातल्या कुख्यात बेग...
  October 23, 11:51 AM
 • कुर्डुवाडी- दीपावलीच्या सुट्यांमुळे सध्या सर्वच रेल्वेगाड्यांना प्रचंड गर्दी अाहे. याच गर्दीतून कुटुंबीय काही क्षण दुरावल्याचा अनुभव रविवारी सोलापूर - पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये अाला. दुपारी तीनच्या सुमारास पत्नी गाडीत चढली, तर दोन लहान मुलांसह पती कुर्डुवाडी स्थानकावरच राहिले. गाडी सुरू झाल्याने घाबरलेल्या पत्नीने प्रसंगावधान राखून रेल्वेची चेन ओढली. त्यानंतर सुमारे एक किलोमीटर अंतरावर गाडी थांबली. तेथून पत्नीला मोटरसायकलवर परत स्थानकावर आणण्यात आले. दरम्यान, वडील सोबत...
  October 23, 06:12 AM
 • पुणे-खालापूरजवळमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या असूनपुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने संध्याकाळपासूनच वाहतूक कोंडीला सुरवात झाली.दिवाळीच्या सुट्टीवरून परतणाऱ्याकोल्हापुर, सांगली, सातारा, पुणेकरांची वाहने या कोंडीत दिसून येत आहेत.अमृतांजन खंडाळा घाट टप्प्यातही वाहतूक कोंडी झाली आहे. ही कोंडी सुटण्यास कमीत कमी 4 ते 5 तास लागतील, असे महामार्ग वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पुढील स्लाईडवर व्हिडिओ
  October 22, 09:34 PM
 • पुणे-धायरी येथे अडीच वर्षांच्या मुलीचा अपहरणानंतर खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. श्रुती विजय शिवगणे असे मुलीचे नाव आहे. तिचे शनिवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास अपहरण झाले होते. श्रुतीच्या अपहरणानंतर तिच्या आई-वडिलांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरू केला होता. रविवारी सकाळीच प्रायोजा सिटीमागे मुलीचा मृतदेह सापडला. याबाबत स्थानिकांनी सिंहगड पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत...
  October 22, 03:05 PM
 • पुणे- मोशी टोलनाका येथे चिंबळी फाट्याजवळ महिंद्रा लॉजिस्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. पिंपरी-चिंचवड व चाकण येथून अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. ही आग आटोक्यात आणण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले. पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडिओ
  October 21, 06:53 PM
 • पुणे-देशभरात आज भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही बारामतीमध्ये आज भाऊबीज साजरी केली. भाऊबीजेचा फोटो सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर शेअर करुन सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. दीपोत्सवाच्या प्रकाशमयी उत्सवात बहीण-भावांतील नाते उजळवणारा सण भाऊबीज!! सर्वांना स्नेहमयी शुभेच्छा.!! अशी ओळ त्यांनी या छायाचित्राला दिली आहे. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एकुलती एक कन्या आहेत. तर अजित पवार...
  October 21, 05:12 PM
 • बारामती- नगरपरिषदेच्या वाहनतळ, गणेश मार्केटच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सरकारमधील कोणत्याही मंत्रीमहोद्यांना न बोलावल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षणमंत्री कार्यक्रमस्थळी काळे झेडे दाखवले. शरद पवारांना भाषणादरम्यान हे काळे झेंडे यांनी दाखवण्यात आले.काळे झेडे दाखवून आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नगरसेवकांकडून मारहाण करण्यात आली आहे. पुढील स्लाईडवर...
  October 20, 08:00 PM
 • पुणे- शिवसेनेचे वागणे दोन तोंडी गांडुळासारखे झाले आहे, या शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. बारामती येथे दिवाळीनिमित्त त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेला लोकांची सहानुभूती हवी आहे आणि सरकारची उबही हवीय. जनतेत काम करायचेय, तर सरकार सोडून बाहेर या. मात्र ते त्यांना जमत नाही. शिवसेनेचा डबल गेम चाललेला आहे. लोक काय इतकी दुधखुळी नाहीत. तुम्ही सरकारमध्ये आहात, तर तुम्हाला...
  October 20, 06:11 PM
 • पुणे- शास्त्रीनगर येथील महादेवभाई देसाई चौकात डंपरखाली येऊन युवतीला प्राण गमवावे लागल्यानंतर आता शहरात दररोज अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. या वर्षी केवळ 8 महिन्यातच अपघातात 242 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 492 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. मंगळवारी (दि. 17) एकाच दिवशी शहरातील विविध भागांत 3 जणांना प्राण गमवावे लागले. कोंढव्यात उंड्री चौकात कंटेनरने धडक दिल्याने 20 वर्षीय युवती, पीएमपीच्या धडकेत चंदननगरला 21 वर्षीय तरुण आाणि ट्रकच्या धडकेत एका ज्येष्ठ...
  October 20, 03:56 PM
 • पुणे- एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आरक्षित तिकिटांचा परतावा (रिफंड) मिळवण्यासाठी प्रवाशांची पुण्याच्या एसटी स्थानकावर रिघ लागली अाहे. एका दिवसात स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे रेल्वेस्थानक आणि वल्लभनगर (पिंपरी) येथील एसटी स्थानकांतून सुमारे ६५ हजार प्रवाशांनी आपले आरक्षण रद्द करून परतावा घेतल्याची माहिती मिळाली. त्याच वेळी प्रशासनाकडून ४०० खासगी बस तसेच स्कूल बसेस स्थानकात उतरवण्यात आल्याचीही माहिती मिळाली. एसटी कर्मचारी संघटनांनी सोमवारी...
  October 20, 07:07 AM
 • पुणे- दिवाळी सण हा प्रत्येकाच्या जीवनात अानंदाचे क्षण निर्माण करणारा असताे. शहरी भागात धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली जाते. मात्र, दुर्गम भागातील मुख्य प्रवाहापासून दुरावलेल्या काही लाेकांना परिस्थितीमुळे अाजही दिवाळी अानंदाने साजरी करता येत नाही. राेजगार, शिक्षणानिमित्त पुणे शहरात जाण्यासाठी लाेणावळा -पुणे या लाेकलने दरराेज प्रवास करणाऱ्या मध्यमवर्गीय तरुणांच्या शेअरिंग स्माईल या ग्रुपने सार्थक दिवाळीची खूणगाठ मनाशी बांधत, दिवाळीच्या निमित्ताने मागासलेल्या एका कातकरी...
  October 20, 03:00 AM
 • पु्णे- किवळे-सांगवी बीआरटी मार्गावर रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून ये-जा करणाऱ्या सुमारे 200 वाहनांना बुधवारी पीएमपीच्या सुरक्षा पथकाने अटकाव केला. संबंधित वाहनांवर कारवाई करण्यासाठी संबंधित वाहनांची छायाचित्रे काढून व क्रमांक नोंदवून घेण्यात आले आहेत. रावेत येथील महिलांनी बेशिस्त वाहनचालकांविरोधात आंदोलन केल्यानंतर त्याची दखल घेत पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवले. बीआरटी लेनमधून वारंवार खासगी वाहने ये-जा करीत असल्याने...
  October 19, 05:35 PM
 • पुणे- कौटुंबिक वादातून भोसरीत पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने उत्तर प्रदेशात जाऊन सासऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.आपल्या पत्नीचा खून करुन आरोपीने तिचा मृतदेह नेहरूनगर येथीलएका नाल्यात फेकला होता. या आरोपीला पिंपरी पोलिसांनी सापळा रचून उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.प्रमिला विनोद जैस्वाल (रा.पिंपरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणीविनोद मंगरूराम जैस्वाल, राजन मंगरूराम जैस्वाल यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस हवालदार शकिर...
  October 19, 04:49 PM
 • औरंगाबाद- संपूर्ण जगाला एका क्लिकवर एकत्र आणणार्या फेसबुकमध्ये बग (एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्राममधील त्रुटी किंवा चूक) असू शकतो, हे विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील एका महिलेने सिद्ध केले आहे. विजेता पिल्लई असे या महिलेचे नाव असून तिने वर्कप्लेस अॅपमध्ये त्रुटी शोधून काढल्याने तिला 65000 रुपयांचे (1000 डॉलर) बक्षिस जाहीर झाले आहे. सोशल मीडियातील दिग्गज वेबसाईट फेसबुकच्या वर्कप्लेसमध्ये त्रुटी शोधून काढणारी विजेता ही भारतातील पहिलीच महिला आहे. ती पुण्यातील रियल्ट्री प्रॉप कंपनीत...
  October 19, 04:31 PM
 • पुणे- लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून भोर एसटी आगारातून 8 बस सोडण्यात आल्या आहेत. सेवा सुरू झाली असली तरी राज्यात सुरु असणाऱ्या संपाला पाठिंबा कायम असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या केलेल्या बेमुदत संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी वाहतूक यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकीच्या बस आणि मालवाहू वाहने अशी 635 वाहने ताब्यात घेऊन त्यांना प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता देण्यात...
  October 19, 03:58 PM
 
जाहिरात

RECOMMENDED