जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे- येरवडा परिसरात मांत्रिकाने एका विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आजारी पतीवर उपचार करतो असे सांगून नराधम मांत्रिकाने महिलेल्या आपल्या घरी बोलवले होते. विवाहितेला गुंगीचे औषध देऊन मांत्रिकाने 45 वर्षीव महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी मांत्रिक शब्बीर युनूस शेख याला अटक केलील आहे. मिळालेली माहिती अशी की, पीडितेचा पती मागील काही दिवसांपासून आजारी आहे. पीडितेने पतीवर उपचार करण्यासाठी मांत्रिकाला घरी नेले होते. मांत्रिकाने पतीवरुन...
  January 11, 04:51 PM
 • पुणे- विमाननगरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. थाई तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. विमाननगर पोलिसांनी गुरुवारी रात्री ली व्हिक्टोरीया स्पा अॅण्ड सलून सेंटरवर छापा टाकला. थाईलंडहून आलेल्या पाच तरुणींची पोलिसांनी सूटका केली. या प्रकरणी पोलिसांनी एक महिलेसह दोघांना अटक केली आहे. बंटीकुमार कांतीभाई पटेल (27) असे महिला दलालाचे नाव आहे. विमाननगरात ली व्हिक्टोरीया स्पा सेंटरमध्ये...
  January 11, 04:35 PM
 • पुणे- दुबईहून पुणे विमानतळावर आलेल्या स्पाइस जेटच्या एका विमानाच्या शाैचालयात कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान तब्बल चार हजार ग्रॅम वजनाचे १ काेटी २९ लाख चार हजार रुपयांची साेन्याची बिस्किटे सापडली आहेत. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी साेन्याची बिस्किटे ताब्यात घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून संशयिताचा शाेध सुरू केला आहे. गुरुवारी पहाटे चार वाजून २५ मिनिटांनी स्पाइस जेटचे हे विमान दुबईहून पुणे विमानतळावर लँड झाले. आंतरराष्ट्रीय विमान पुणे विमानतळावर...
  January 11, 10:02 AM
 • delete
  January 11, 10:00 AM
 • पुणे- राज्य मुक्त शिक्षण विद्यालय मंडळाच्या प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ गुरुवारी (ता. १०) पुण्यात शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मुक्त विद्यालयाचे प्रमाणपत्र इतर मंडळांच्या समकक्ष असेल. या मंडळांमुळे खेळाडू- कलाकारांना बहिस्थ पद्धतीने ५ वी ते १० वीचे शिक्षण घेता येईल. तसेच दिवसाचे ८ ते १० तासाला आपल्या कलेच्या, खेळाच्या सरावासाठी मिळू शकतील, अशी अपेक्षा तावडे यांनी व्यक्त केली. मुक्त विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या स्वराली जोगळेकर, पाखी जैन आणि तावडे यांनी मिळून...
  January 11, 07:43 AM
 • रायगड- आरक्षण द्यायचेच होते तर ते गरिबांना द्यायला हवे होते. आयकर भरणाऱ्याला आरक्षण व ज्याची एक वेळ चूलही पेटत नाही अशांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. रायगडावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा शुभारंभ झाला. त्यानंतर महाडच्या चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून पहिल्या सभेची सुरुवात झाली. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील...
  January 11, 07:41 AM
 • पुणे- पत्नी नांदायला येत नाही, याचा राग येऊन पतीने तिचे नाक आणि ओठ कापल्याची धक्कादायक घटना सांगलीजवळच्या कागवाड (कर्नाटक) येथे घेडली आहे. आरोपी पत्नीला घ्यायला आला होता. परंतु पत्नीने येण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्याने पत्नीवर चाकूने वार केला. तिचे नाक आणि ओठ कापले. या हल्ल्यामुळे सुनीता नाईक ही गंभीर जखमी झाली आहे. रक्ताच्या थारोल्यात पडलेल्या सुनीताला कुटुंबीयांनी तात्काळ मिरज (जि.सांगली) येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुरेश नाईक असे आरोपीचे नाव असून कापलेले नाक...
  January 10, 06:25 PM
 • पुणे- पुणे विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी मोठी कारवाई केली आहे. दुबईहून आलेल्या स्पाईस जेट एअरवेजच्या विमानाच्या टॉयलेटमधून सुमारे 4 किलो सोने (एक किलोचे 4 बार) जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेले सोने तस्करी करुन आणल्याचे आढळून आले. या सोन्याची किंमत 1 कोटी 29 लाख 4 हजार रुपये आहे. मिळालेली माहिती अशी की, दुबईहून निघालेले स्पाईस जेट फ्लाईट एस जी 52 हे गुरुवारी (ता.10) पहाटे 4 वाजून 25 मिनिटांनी पुणे विमानतळावर आले. पुण्याहून ते बंगलुरुला जाते. कस्टम अधिकारी तपासणी करीत असताना विमानातील...
  January 10, 01:06 PM
 • पुणे/औरंगाबाद- औरंगाबादेत राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले. पुण्यात खेलो इंडिया २०१९ उद्घाटन सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली. दिव्य मराठीने २१ डिसेंबर २०१७ रोजीच याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. मुख्यमंत्री म्हणाले, शासनाने मैदानांसाठी अनुदानाची रक्कम वाढवली आहे. आता तालुका स्तरावर ४ कोटी, जिल्हा स्तरावर ८ कोटी व विभाग स्तरावर ४५ कोटी दिले जाणार आहेत. विद्यापीठासाठी ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक शक्य...
  January 10, 07:43 AM
 • पुणे- उतारावर ब्रेक निकामी झाल्याने बस उलटून पोद्दार इंटरनॅशनल या शाळेचे 20 विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात कात्रज देहूरोड बाह्य महामार्गाजवळ बुधवारी झाला. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना किरकोळ इजा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कात्रज देहूरोड महामार्गालगत आंबेगाव बुद्रुक परिसरात पोद्दार इंटरनॅशन शाळा आहे. या शाळेत पहिली ते चौथीत शिकणाऱ्या 25 ते 30 विद्यार्थ्यांना बुधवारी दुपारी स्कूलबस शाळेत घेऊन येत...
  January 9, 08:36 PM
 • नागपूर- स्वातंत्र्य व सहिष्णुता या मूल्यांची पाठराखण करणाऱ्या येष्ठ इंग्रजी साहित्यिका नयनतारा सहगल यांना आधी निमंत्रण देऊन नंतर नकार देण्यावरून उठलेल्या त्सुनामीने अखेर महामंडळ अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा बळी घेतला. महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांना पाठवलेल्या ई-मेल राजीनाम्यात जोशी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे लिहिले आहे. नयनतारा यांना नकार कळवण्याच्या चुकीची जबाबदारी कुणी स्वीकारो अथवा नाही पण महामंडळ अध्यक्ष म्हणून नैतिक...
  January 9, 04:57 PM
 • पुणे- औरंगाबादच्या प्रतिभावंत युवा जिम्नॅस्ट रिद्धी आणि सिद्धी या हत्तेकर भगिनींची यजमान महाराष्ट्र संघावर पहिल्याच दिवशी माेठी कृपा झाली. त्यामुळे यजमान महाराष्ट्राला खेलाे इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत सर्वाधिक पदकांच्या माेहिमेचा दमदार श्रीगणेशा करता आला. सिद्धी आणि रिद्धीने महाराष्ट्राच्या संघाला राैप्य व कांस्यपदकाचा बहुमान मिळवून दिला. या दाेघींनीही जिम्नॅस्टिकच्या १७ वर्षाखालील वयाेगटाच्या ऑल राउंड ऑर्स्टिस्टिक इव्हेंटमध्येही पदकाची कमाई केली आहे. या गटात बंगालची...
  January 9, 09:28 AM
 • पुणे- वेबसाईटवरून महिलेशी मैत्री करणे, तिच्यासोबत दोनदा शरीरसंबं प्रस्तापित करणे पुण्यातील एका बॅंक अधिकार्याला चांगलेच महागात पडले आहे. बॅंक अधिकार्याने महिलेला ठरलेले पैसे दिले. त्यानंतरही तिने या संबंधाची वाच्यता पत्नी आणि सासर्याकडे करण्याची धमकी देत 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. शेवटी 10 हजार रुपयांत तडजोड केल्यानंतर आता पीडित बॅंक अधिकार्याने पोलिसांत धाव घेतली आहे. काय आहे हे प्रकरण? पोलिसांनी सांगितले की, पीडित बँक अधिकारी हे चिंचवड येथील राहणारा आहे. एका वेबसाईटवर पीडित...
  January 9, 12:09 AM
 • पुणे- वाहतूक पोलिसांनी 1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेट सक्ती लागू केल्याने नागरिकांनी विविध प्रकारे हेल्मेट सक्ती विरोधात आंदोलने सुरू केली आहेत. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी पाच दिवसांपूर्वी कोंढवा परिसरात हेल्मेटचा अंत्यविधी करत निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर मंगळवारी पुण्यातील वैकुंठ सम्शानभूमीत हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने पुजाऱ्याच्या साक्षीने हेल्मेटचा दशक्रिया विधी कार्यक्रम पार पाडत यापुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी...
  January 8, 05:28 PM
 • पुणे- अनैतिक संबंध आणि हातउसण्या पैशावरून एका व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी पती-पत्नीला जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. चंद्रिकाप्रसाद मंगलप्रसाद यादव (40) मृताचे नाव आहे. उदलसिंग भवानीसिंग ठाकूर (32) आणि त्याची पत्नी पूनम उदलसिंग ठाकूर (26) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंद्रिकाप्रसाद याचे पूनम ठाकूरसोबत अनैतिक संबंध होते. यातूनच चंद्रिकाप्रसाद याने पूनमला 30 हजार रुपये हातउसणे दिले होते. काही दिवसांनंतर तो पूनमकडे वारंवार पैसे...
  January 8, 12:44 PM
 • मुंबई/पुणे/नाशिक- काही राजकीय संघटनांच्या विरोधामुळे ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे पाठवलेले निमंत्रण रद्द करणाऱ्या आयोजकांविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या कृतीच्या निषेधार्थ संमेलनावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा अनेक साहित्यिकांनी दिला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या पक्षाचा विरोध नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. इंग्रजी लेखिकेला मराठी संमेलनात बोलावल्याच्या मुद्द्यावरून मनसेच्या...
  January 7, 08:10 PM
 • पुणे- बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन प्रताप शिंदे (34, रा.पाटखळ,ता.सातारा) यांचे अपघाती निधन झाले. पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आणेवाडी (ता.वाई) जवळ शिंदे यांच्या कारला रविवारी रात्री भीषण अपघात झाला होता. कारचा टायर अचानक फटला होता. या अपघात इतर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सचिन शिंदे हे बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेडा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. वडिलांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ते मागील काही...
  January 7, 05:37 PM
 • पुणे- वडिलांनी क्रिकेट शिकण्यासाठी अकादमी लावून दिली नाही म्हणून पुण्यातील १४ वर्षीय मुलगा रागाच्या भरात रेल्वेने थेट विशाखापट्टणमला निघून गेला. मात्र, वाटेतच भीती वाटू लागल्याने त्याने अपहरणाचा बनाव रचला. सोबत नेलेल्या आईच्या मोबाइलवरून त्याने वडिलांना अगर तुम्हारा बेटा चाहिये ताे विशाखापट्टणम आ असा इंग्रजीत मेसेज पाठवला. त्याआधारे सहकारनगर पोलिसाचे पथक विशाखापट्टणमला रवाना झाले आणि त्यांनी तेथील पोलिसाच्या मदतीने मुलाला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले आहे. अफजल शेख...
  January 7, 08:55 AM
 • पुणे- जेजुरीचा खंडोबा हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते. मात्र, येथील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकावर सुविधांची वानवा होती. रेल्वे मंत्रालय व स्थानिक खासदारांच्या प्रयत्नांतून जेजुरीचे रेल्वे स्टेशन कात टाकणार आहे. येत्या ६ ते ८ महिन्यांत खंडोबाच्या भाविकांच्या स्वागतासाठी स्थानकाच्या दर्शनी बाजूला ६२ फूट लांबीचा मल्हारगड उभारला जाणार आहे. भाविकांसाठी नव्या वर्षाची ही भेट खास आकर्षण ठरणार आहे. जेजुरीला भेट देणाऱ्या भाविकांना रेल्वेची...
  January 7, 08:27 AM
 • पुणे- शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कोणी कार्यकर्ता तयार होत नसल्याचे पाहून संतापलेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चक्क पुळचट ठरवून टाकले. खासदार व्हा म्हटले तर आमदारच व्हायचे असे म्हणतात. हे काय कामाचे? या शब्दांत पवार रविवारी कार्यकर्त्यांवर डाफरले. शरद पवारांचा बालेकिल्ला असूनही शिरूरमधून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी राष्ट्रवादीवर मात करत तीनदा निवडणूक जिंकली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आढळराव यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे दिलीप...
  January 7, 08:22 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात