जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे- येथील पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक प्राणघातक हल्ल्याची घटना समोर आली आहे. तरुणीचे लग्न दुसऱ्यासोबत जमल्यामुळे प्रियकराने तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. डांगे चौकात ही थरारक घटनेत जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर वाकड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. वर्दळीच्या डांगे चौकात भर दिवसा हा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण ? हल्ला करणाऱ्या तरुणाचे पीडित तरुणीवर प्रेम होते. त्या तरुणीचे दुसऱ्या एका मुलाशी लग्न जमले,...
  June 26, 02:17 PM
 • पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणात एक मोठा आणि महत्त्वाचा खुलासा झाला आहे. डॉ. दाभोळकर प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने(सीबीआय) न्यायवैद्यकीय चाचणी केली, त्यात त्याने साथीदार सचिन अंदुरेनेसोबत मिळून दाभोळकरांवर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. सीबीआयने मंगळवारी न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार न्यायवैद्यकीय चाचणीद्वारे कळसकरने पुनाळेकरांच्या सल्ल्यानेच गुन्ह्यातील शस्त्रे नष्ट...
  June 26, 01:05 PM
 • पुणे - माहेर संतांचे, स्वामी केशवाचे...बरवे बरवे पंढरपूर,,विठोबारायाचे नगर...या ओढीने विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेला लाखो वारकऱ्यांचा मेळा, हरिनामाच्या घोषात, माउलींच्या रचनांना ओठी वागवत ज्येष्ठ वद्य अष्टमीच्या मुहूर्तावर पंढरीच्या दिशेने प्रस्थान करता झाला. नगरप्रदक्षिणेनंतर माउलींचा पालखी सोहळा परंपरेनुसार आजोळघरी पहिल्या मुक्कामासाठी दाखल झाला. माउलींच्या सोहळ्यासोबत वाटचाल करणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांनी केलेल्या विठुरायाच्या जयघोषाने अलंकापुरीतील इंद्रायणीचे दोन्ही...
  June 26, 10:17 AM
 • पुणे - लोकसभा आणि विधानसभा निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवर लढली जाते. मतदारही दोन्ही निवडणुकांसाठी मतदान करताना निरनिराळा विचार करतात. हे लक्षात घेऊन आता राज्य शासनाच्या सर्व योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोचवा. राज्यात ऑक्टोबरच्या १५ ते २० तारखांदरम्यान विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू होऊ शकते, असे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथे केले. विधानसभेसाठी भाजप-शिवसेना युती निश्चित आहे....
  June 26, 08:56 AM
 • पुणे - येथे भारतीय लष्कराच्या कर्नलसह 40 जवानांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका शेतकऱ्याने या सर्वांच्या विरोधात आपली शेती उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. तक्रारीनुसार, लष्कराच्या जवानांनी मुद्दाम उभ्या सोयाबीनच्या शेतीवरून वाहने चालवली. हे सर्व काही कर्नल विजय गायकवाड यांच्या आदेशांवरून घडले, यातूनच सोयाबीनची शेती उद्ध्वस्त झाली असाही आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, लष्करी अधिकाऱ्यांनी आपल्यावरील आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. कर्नल आणि शेतकऱ्यात जमीनीवरून...
  June 25, 06:04 PM
 • पुणे -जय हरी विठ्ठल, विठोबा रखुमाई..असा जयघोष करत, हजारो वारकऱ्यांचा भक्तिभाव जागृत करत सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास श्रीक्षेत्र देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे विधिवत प्रस्थान झाले. मुखी हरिनाम, हातात टाळ, गळ्यात तुळशीच्या माळा, डोईवर तुळशीवृंदावन आणि मनात भोळा भक्तिभाव जपत हजारो वारकऱ्यांनी तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेतले. क्षेत्र देहू येथील मुख्य मंदिरात सोमवारी पहाटे चार वाजता काकड आरती झाली. त्यानंतर पाच वाजल्यापासून मुख्य मंदिर, शिळा मंदिर,...
  June 25, 10:54 AM
 • पुणे- महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्रीपदी विराजमान झाल्यावर आशिष शेलारांच्या पुण्यातील पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ झाल्याचा प्रकार घडला आहे. आठवीपर्यंत मुलांना नापास न करण्याचा कायदा असतानाही पुण्यातील एका शाळेने मुलांना नापास केले. याच मुद्द्यावर शेलारांना बोलण्याची मागणी पालकांनी केली. पण, शेलार पालकांना वेळ न देताच कार्यक्रमातून निघून गेल्याने संतप्त पालकांनी गोंधळ घातला. पालक म्हणाले, संबंधित शाळेने आमच्या 6 वी आणि 7 वीच्या मुलांना नापास केले. या शाळा मनमानी करत आहेत,...
  June 23, 05:42 PM
 • पुणे- एका गुन्हेगाराशी प्रेमविवाह केल्यामुळे चुलत भावाने बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडच्या दळवीनगरमध्ये घडली आहे. खूनानंतर आरोपी संतोष भोंडवे स्वतः पोलिसांना शरण येऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ऋतुजा भोंडवे असे मृत मुलीचे नाव आहे. ऋतुजाने दीड वर्षांपूर्वी सराईत गुन्हेगार कांच्या वाघशी प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपासून ऋतुजाचा सासरी वाद सुरू असल्यामुळे माहेरी आली होती. यावेळी चुलत भाऊ संतोष आणि ऋतुजामध्ये तिच्या प्रेमविवाहावरून वाद झाला. यावेळी...
  June 23, 12:50 PM
 • पुणे -जम्मू-काश्मीरचा इतिहास हा भारताचा इतिहास आहे आणि भारताचा इतिहास हा काश्मीरचा आहे. दोन्ही इतिहास एकमेकांपासून वेगळे करता येणार नाहीत. या इतिहासात सांस्कृतिक जडणघडणीची बीजे रुजली आहेत. काश्मीर आणि भारताच्या इतिहासाला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ असल्याचे मत महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे प्रमुख सदानंद मोरे यांनी शनिवारी व्यक्त केले. सरहद पुणे आणि चिनार प्रकाशन संस्थेच्या वतीने काश्मीर इतिहासाचे अभ्यासक प्रशांत तळणीकर यांनी अनुवाद केलेल्या काश्मिरी राजांची...
  June 23, 09:17 AM
 • बारामती- शहरात एकाच आठवड्यात महिलेवर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना आहे. येथील एका महिलेवर सत्तूराने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्लोखोर आरोपी अरबाज उर्फ अबू कुरेशीला बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. बारामती शहरातील खाटीक गल्लीत लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला होता. त्यामुळे आरोपी अरबाजने तांदळवाडी येथे राहत असलेल्या जबीन गुलाब कुरेशी या महिलेच्या घरात...
  June 22, 04:07 PM
 • पुणे -बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनासंबंधी आम्ही फक्त पर्याय सुचवला आहे. पारंपरिक पद्धत चुकीची ठरवलेली नाही. जुनी पद्धत आहे तशीच लागू असेल. नव्या विद्यार्थ्यांना संख्यावाचन अधिक सोपे, सुलभ वाटावे, या हेतूने पर्याय दिला आहे. या पर्यायाची शिक्षक वा विद्यार्थ्यांवर सक्ती केलेली नाही, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ गणितज्ञ व बालभारतीच्या गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी केली. संख्यावाचनासंदर्भात निर्माण झालेले वाद निरर्थक आणि...
  June 22, 10:06 AM
 • पुणे - गळयात २५ ताेळे साेने व भरजरी साडी नेसलेली महिला व तिच्यासाेबत पांढऱ्या रंगाचा खादीचा शर्ट, जाकिट, महागडा गाॅगल व फेटा घातलेला व्यक्ती एखाद्या लग्न समारंभात कारमधून येत असेल तर ते वधू किंवा वराकडून आलेले वऱ्हाडी असल्याचे वाटेल. मात्र, पुणे जिल्ह्यातील विविध मंगल कार्यालयांत अशा प्रकारे नटूनथटून जात साेलापूरच्या एका दांपत्याने माेठ्या प्रमाणात साेन्याचे दागिने व राेकड चाेरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाेलिसांनी आराेपी दांपत्याकडून ९२ ताेळे साेन्याचे दागिने, पाच लाख २७...
  June 21, 10:13 AM
 • पुणे- पुण्यात बनवाट स्टॅम्प बनवण्याचे प्रकरण समोर आले आहे. तब्बल 86 लाख 38 हजारांचे बनावट स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले आहेत. यात बनावट सही-शिक्क्यांचा वापर करत स्टॅम्प पेपरची विक्री करण्यात आली. या प्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांना पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी अटक केली असून, तिघांनाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे शहरात देशपांडे स्टॅम्प व्हेंडर नावाचे दुकान आहे. या दुकानातूनच देशपांडे कुटुंब बनावट स्टॅम्प बनवत होते. पुणे शहरात दोन ठिकाणी देशपांडे स्टॅम्प व्हेंडर स्टॅम्पची...
  June 20, 01:22 PM
 • पुणे - राज्यातील विविध कारागृहांत माेठ्या प्रमाणात शिक्षा झालेले व शिक्षेची सुनावणी सुरू असलेले कच्चे आणि पक्के कैदी आहेत. त्यांच्या हालचालींवर देखरेख ठेऊन कारागृहातील सुरक्षा याेग्य राखण्याकरिता सुमारे पाच हजारपेक्षा अधिक कारागृहातील अधिकारी व कर्मचारी राज्यभरात कार्यरत आहेत. कैद्यांच्या वेगवेगळया कल्याणकारी याेजना दरवेळी प्रशासनाकडून राबवल्या जातात. परंतु यापुढील काळात वेगवेगळया आजाराने ग्रस्त, वजन वाढलेले आणि शारिरिक तंदुरुस्ती नसलेल्या कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांना...
  June 20, 09:39 AM
 • पुणे -महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची मोठी परंपरा आहे. मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणून कीर्तन या प्रकाराकडे बघितले जाते. महाराष्ट्रात वारकरी व नारदीय अशा दोन कीर्तन पद्धती महत्त्वाच्या मानल्या जातात. या कीर्तन पद्धतींचा अभ्यास अनेक विद्यार्थी करत असतात. परंतु विद्यापीठ पातळीवर अशी सोय फारशी उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात प्रथमच वारकरी व नारदीय अशा दोन कीर्तन पद्धतींचा एकत्रित पदविका कोर्स पुण्यात भारती विद्यापीठाने सुरू केला आहे. कीर्तन...
  June 20, 09:21 AM
 • पुणे - पुणे शहरातील औंध येथील पीएनजी ब्रदर्स या नामांकित सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करत तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेता मिलिंद दास्ताने व त्याच्या पत्नीस चतुःशृंगी पोलिसांनी मंगळवारी सकाळी पुण्यातील घरून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मागील आठवड्यात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दास्ताने व त्यांच्या पत्नीस न्यायालयात हजर करण्यात आले असता २१ जूनपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश...
  June 19, 10:03 AM
 • पुणे - दुचाकी चालवीत असताना पुणे शहरात पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली हेल्मेटसक्ती स्थगित करण्यात आली आहे. या संदर्भात स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सूचना केल्या असून यानंतर आता शहरी भागात हेल्मेट नसल्यास होणा-या कारवाईला स्थगिती मिळाली आहे. यासंदर्भात शहरातील आमदारांनी माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्त्वाखाली आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या. याबाबात अधिक माहिती देताना माधुरी मिसाळ म्हणाल्या...
  June 18, 02:24 PM
 • माढा - आपली मुले अंगणात खेळताहेत म्हणुन गाफिल न राहता त्यांच्या कडे लक्ष द्या कारण घराच्या बाहेर अंगणात खेळणाऱ्या दोघा चिमुरड्या भावंडाना पिक अपने चिरडले. दुधाचे पिकअप मागे घेत असताना दोन चिमुकल्यांचा गाडीच्या चाकाखाली चिरडुन मृत्यू झाल्याची हद्ययद्रावक घटना माढा तालुक्यातील मुंगशी गावात आज सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडली. आरवी तात्यासाहेब काळे (वय वर्षे 3) तर मुलगा जय तात्यासाहेब काळे (वय वर्ष दोन) अशी मृत्यु झालेल्या भावंडाची नावे आहेत. गावात शेतकर्याचे दुध घेऊन...
  June 18, 10:37 AM
 • पुणे- मागील शैक्षणिक वर्षात बालभारतीद्वारे इयत्ता पहिली, आठवी आणि दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. आता या शैक्षणिक वर्षापासून गणिताच्या अभ्यासक्रमातील संख्या वाचनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या नव्या बदलानुसार विद्यार्थ्यांना एकवीसऐवजी वीस एक, पासष्ठऐवजी साठ पाच, एनोनब्बदऐवदी ऐंशी नऊ अशा नव्या पद्धतीने संख्यावाचन करावे लागणार आहे. नुकतेच बालभारतीकडून इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रमात हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषयाचा अभ्यास करणे...
  June 17, 07:54 PM
 • पुणे- येथील आंतराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागातील एअर इंटेलिजंस युनिट(AIU)ने 1633 ग्राम वजनाचे 14 सोन्याचे बिस्कीट जप्त केले आहेत, ज्यांची किंमत 52.90 लाख आहे. दुबईवरून 16 जूनला पुण्यालीत आंतराष्ट्रीय विमान तळावर आलेल्या स्पाइस जेट कंपनीचे विमान एसजी-52 मधून हे सोने जप्त करण्यात आले. ही सोन्याची बिस्कीट विमानाची साफ सफाई करताना वॉश बेसिनच्या मागे एका कागदात गुंडाळलेले आढळली. या सर्व बिस्कीटांवर परदेशी कंपनीचे नाव असल्यामुळे ते परदेशी बनाटीचे असल्याचे सुधांशू खैरे आणि जयकुमार रामचंद्रन या...
  June 17, 05:20 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात