जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे- पुणे शहराच्या विकास आराखड्याला येत्या ऑगस्ट महिन्याअखेर मंजूरी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.सहकारनगरमधील शिवदर्शन येथे पालिकेने उभारलेल्या 'राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग' चे उदघाटन मुख्यमंत्री चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना चव्हाण यांनी वरील माहिती दिली.चव्हाण म्हणाले, पुणे शहराचा समाविष्ठ गावांच्या विकासाबाबतचा आराखडा २००५ पासून तसाच पडून आहे. कारण या आराखड्यात काही किचकट व भविष्यात अडचणीचे ठरु...
  August 22, 04:15 PM
 • पुणे - यंदा वेळेआधीच आलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून दडी मारल्याने राज्यभरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. हीच परिस्थिती अजून काही दिवस राहिल्यास खरीप हंगामावर त्याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मराठवाडा व विदर्भातील 13 जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून त्यामुळे बळीराजा चिंतित आहे. दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांत राज्यभरात पाऊस परतण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. जून महिन्यामध्ये सुमारे आठवडाभर आधीच वरुणराजाने...
  August 22, 01:39 AM
 • पुणे - महापालिकेसारख्या स्थानिक संस्थांनी पक्षीय राजकारण आड येऊ न देता शहराच्या विकासाचे कार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. पुणे महापालिकेच्या वतीने रविवारी सहकारनगर परिसरात उभारण्यात आलेल्या राजीव गांधी- अकॅडमी ऑफ ई - लर्निंगचे नामकरण व इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल तसेच जिल्ह्यातील आमदार, स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सर्वत्र...
  August 22, 01:31 AM
 • नगर - अण्णा हजारे यांची जन्मभूमी असलेल्या भिंगारपासून राळेगण या कर्मभूमीपर्यंत रविवारी तरुणांनी जनलोकपाल क्रांतिज्योत काढून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी अण्णांच्या कर्मभूमीमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढली असून राज्यातील विविध भागांतील आंदोलकांनी रविवारी हजारोंच्या संख्येने राळेगणसिद्धीत हजेरी लावली. रविवारी सकाळी विद्यार्थ्यांनी गावातून फेरी काढली. त्यामध्ये ग्रामस्थांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या. छत्रपती शिवाजी...
  August 22, 01:28 AM
 • पुणे - मावळ येथील आंदोलक शेतक-यांवर गोळीबार केल्यप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप कर्णिक आणि त्यांच्या सहका-यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारा खटला प्रथम वर्ग न्यादंडाधिकारी व्ही. डी. देशमुख यांच्या न्यायालयात दाखल झाला आहे. हा खटला दाखल करणा-या अॅड. रूपाली पाटील यांनी सांगितले की, निरपराध शेतक-यांवर गोळीबार करण्यात आल्याचे विविध माध्यमांतून निदशर्नास आले असतानाही कर्णिक वा त्यांचे सहकारी यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई अद्याप झाली नाही वा गुन्हाही दाखल झालेला...
  August 22, 01:22 AM
 • महिलांच्या आरक्षणाचे प्रमाण ३३ टक्क्यांवरून ५० टक्के झाल्याने उरलेल्या खुल्या प्रभागांमध्ये पुरुषांना प्राधान्य मिळावे, अशी सा-याच राजकीय पक्षाच्या इच्छुकांची अपेक्षा आहे. काही ज्येष्ठ नेत्यांनी तशा अर्थाची जाहीर व छुपी वक्तव्ये केली आहेत.महापालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. प्रत्येक पक्षाच्या विद्यमान, इच्छुक, बंडखोर, नाराज अशा विविध कॅटेगरीमधील नगरसेविका आणि नगरसेवकांमध्ये सध्या एकच विषय सुरू आहे आणि तो म्हणजे आरक्षण कसे पडेल. महिलांना पन्नास टक्के आरक्षण लागू...
  August 22, 12:57 AM
 • नगर. जनलोकपाल विधयेक आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांच्याबद्दलचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. यातूनच अण्णांच्या राळेगणसिद्धी या गावी राज्यभरातून रीघ लागली आहे. लोकांच्या वाढत्या मेळ्यामुळे राळेगणसिद्धी जणू भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे तीर्थक्षेत्र बनले आहे.शनिवारी राज्यभरातून सुमारे वीस हजार लोकांनी येथे हजेरी लावली. मुंबई, पुणे, औरंगाबादसह राज्याच्या जवळपास प्रत्येक शहरातून कुणी ना कुणी येथे दाखल झाले आहे.या ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसह बाहेरून आलेल्या आंदोलकांनी मानवी साखळी...
  August 21, 06:12 AM
 • नगर. शिर्डी येथील कुख्यात गुंड पाप्या शेख याच्या चौकशीमध्ये दिवसेंदिवस अधिक धक्कादायक माहिती बाहेर पडत आहे. रचित पाटणी व प्रमोद गोंदकर यांच्या दुहेरी हत्याकांडाचे मोबाइलने केलेले छायाचित्रण पोलिसांनी शनिवारी हस्तगत केले आहे्. त्यावरून काढलेली छायाचित्रे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहेत. पोलिस तपासात पाप्याचे शिर्डी येथील पाच महिलांशी अनैतिक संबंध असलेल्या महिलांची नावेही उघड झाली आहेत. याबरोबरच शिर्डीमधील बांधकाम व्यावसायिकांशीही त्याचे संबंध होते. खुनाच्या...
  August 21, 06:09 AM
 • नगर. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शुक्रवारी तिहार तुरुंगातून बाहेर आल्याचे कळताच त्यांचे गाव असलेल्या राळेगणसिद्धीत ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी ग्रामदैवत यादवबाबा यांच्या प्रतिमेची मिरवणूक व दिंडी काढली. सुमारे एक तास चाललेल्या या दिंडीमध्ये गावातील व बाहेरगावांहून आलेल्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह सुमारे तीन हजार लोकांनी सहभाग नोंदवला. जनलोकपाल विधेयक मंजूर करण्याच्या मागणीसाठी अण्णा हजारेंनी सुरू...
  August 20, 02:57 AM
 • नगर. शिर्डीत येणा-या साईभक्तांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे पोलिस आणि संस्थानच्या रक्षकांना खिसेकापूंकडून हप्ते पुरविले जात असल्याचा गौप्यस्फोट कुख्यात गुंड पाप्या शेखने पोलिसांच्या चौकशीत वरिष्ठ अधिका-यांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिर्डीतील रचित पाटणी व प्रमोद गोंदकर यांच्या हत्येप्रकरणी पाप्या शेख हा सध्या पोलिस कोठडीत आहे. या वेळी चौकशीत पाप्याने शिर्डीत होणा-या पाकिटमारीस सहकार्य करणा-यांबद्दल पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनील कडासने...
  August 20, 02:53 AM
 • नगर. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची तीव्रता आता वाढत असून नगर शहरात विविध संघटनांनी गुरुवारी एकत्रितपणे महारॅली व बंदद्वारे अण्णांच्या आंदोलनास आपला पाठिंबा दर्शविला. हजारोच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी, नागरिक व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते या महारॅलीत सहभागी झाले होते. नगरमध्ये शंभर टक्के बंद पाळण्यात आला. शहरातील वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महारॅलीस प्रारंभ झाला. जुने बसस्थानक, शिवाजी पुतळा चौक,...
  August 19, 06:45 AM
 • नगर. तिहार तुरुंगात अण्णा हजारे यांना मूलभूत सुविधा न पुरविल्याच्या निषेधार्थ राळेगणसिद्धीकरांनी गुरुवारी गावातून बादली मोर्चा काढून अभिनव आंदोलन केले. राज्यभरातील सुमारे दहा हजार समर्थकांनी गुरुवारी राळेगणसिद्धीत मोटारसायकल रॅली व पदयात्रेद्वारे येऊन अण्णांना पाठिंबा दिला. तिहार तुरुंगात असताना दोन दिवस हजारे यांना अंघोळीच्या पाण्यासह इतर मूलभूत सुविधा मिळाल्या नाही. ही बातमी बुधवारी रात्री उशिरा गावामध्ये समजली. त्या वेळी गावातील ज्येष्ठ मंडळींनी तातडीची बैठक बोलावून...
  August 19, 06:42 AM
 • पुणे- जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील बऊर येथे नऊ दिवसापूर्वी झालेल्या गोळीबारात तीन शेतकऱयांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी गुरुवारी येथील शेतकऱयांची गुपचुप दौरा करत भेट घेतली. पवना जलवाहिनीच्या विरोधात मावळातील शेतकऱयांनी पुणे-मुंबई एक्सप्रेस रोडवर 'रास्ता रोको' आंदोलन दहा दिवसापूर्वी केले होते. यावेळी स्थानिक पोलिस प्रशासनाने हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शेतकऱयांवर लाठीमार केला होता. तरीही शेतकऱयांनी दाद न दिल्याने गर्दी पांगविण्य़ासाठी पोलिसांनी...
  August 18, 11:06 AM
 • पुणे. निवडणूक आणि पॅनेलगिरी यांची बाधा शिक्षणक्षेत्रातही आता रुजत चालल्याचा प्रत्यय पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या निमित्ताने आला. सकाळी साडेअकरापासून सुरू झालेले अधिसभेचे कामकाज रात्री उशिरापर्यंत चालले पण फक्त व्यवस्थापन परिषदेवरील आठ नियुक्त्यांच्या निवडणुकीभोवतीच अधिसभा फिरत असल्याचे चित्र दिसले. एकता आणि प्रगती पॅनेलच्या मंडळींमुळे दिवसभरात विषयपत्रिकेवरील ४० पैकी फक्त पाच प्रश्नांवर चर्चा झाली....
  August 18, 03:02 AM
 • नगर. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बुधवारी विविध संघटनांनी शहरासह जिल्हाभर आंदोलने केली. त्यामध्ये वारकरी सांप्रदायासह शिक्षकांनीही सहभाग घेऊन सरकारचा निषेध केला. तरुणाईने तर हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून शहर दणाणून सोडले. दरम्यान, भ्रष्टाचार निर्मूलन जनआंदोलन समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हा बंदची हाक दिली आहे. नगर शहरातील न्यू आर्टस महाविद्यालयातील सुमारे पाच हजार...
  August 18, 02:56 AM
 • पुणे. नाटक आणि संगीत यांचा मिलाप घडवण्याच्या उद्देशाने थिएटर अॅकॅडमीतर्फे अभिनव प्रकारची रंगसंगीत एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धात्मक उपक्रमात महाराष्ट्र आणि गोव्यातील महाविद्यालये, स्वतंत्र गट व रंगभूमी संस्था सहभागी होऊ शकतील, अशी माहिती अॅकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेसाठी प्रवेशिका दहा ऑगस्टपासून उपलब्ध करण्यात येणार आहेत. शेवटची तारीख एक सप्टेंबर असेल....
  August 18, 02:54 AM
 • नगर. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धीत उपोषणास बसलेल्या आबालवृद्धांना राज्यभरातून मोटारसायकल रॅली व पदयात्रा काढून आलेल्या सुमारे सहा हजार जणांनी बुधवारी गावात येऊन पाठिंबा दिला. दरम्यान, बुधवारी राळेगणकरांनी दुस-या दिवशीही कडकडीत बंद पाळत सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. सरकारच्या आडमुठेपणामुळे चिडलेल्या आबालवृद्धांनी बुधवारी सकाळी भ्रष्टाचार व सरकारची तिरडी काढण्यात...
  August 18, 02:49 AM
 • पुणे - तंतुवाद्य निर्माते युसुफभाई मिरजकर यांचे बुधवारी सकाळी सातच्या सुमारास अपघाती निधन झाले. मिरजकर आणि त्यांचे एक सहकारी कात्रज - देहू रोड येथे सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गेले असतांना कात्रजच्या दिशेने जाणारा कंटेनर विरुद्ध दिशेला वळत असतांना उलटला आणि त्या कंटेनरखाली सापडून मिरजकर आणि त्यांच्या सहका-याचे जागेवरच निधन झाले. मिरजकर यांच्या पश्च्यात आई, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या सहाय्याने...
  August 17, 04:18 PM
 • पुणे. सतारवादक पं. चंद्रकांत सरदेशमुख (५८) यांचा सोमवारी पहाटे पळसखेडनजीक अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी पूजा, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. सरदेशमुख यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांच्या पुण्यतिथीसाठी ते भारतात आले होते. सोलापूरला निघाले असताना वाटेत एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना सरदेशमुख यांच्या चालकाचा अंदाज चुकला आणि समोरून येणा-या टँकरची धडक बसून हा दुर्दैवी अपघात झाला. ड्रायव्हरच्या शेजारी बसलेले सरदेशमुख...
  August 17, 05:14 AM
 • पुणे. वेगवेगळ्या प्रकल्पांना असलेला लोकांचा विरोध दूर करून त्यांच्या गैरसमजांचे निराकरण केले जात नाही तोवर कोणत्याही प्रकल्पाला मंजुरी दिली जाणार नाही. लोकभावनेचा आदर करूनच प्रकल्प उभारणी केली जाईल. तो लोकांच्या माथी मारला जाणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पुण्यात दिला. मावळ येथील गोळीबारात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुण्यात पाटबंधारे व पोलिस खात्याच्या अधिका-यांची बैठक घेतली. त्यानंतर...
  August 15, 07:41 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात