Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • नगर - शंभर कोटी रुपये खर्च करून पूर्णत्वास गेलेल्या जिल्ह्यातील सहा प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना केवळ हस्तांतरणाची प्रक्रिया रखडल्याने लोकांच्या उपयोगात येत नाहीत. जिल्ह्यातील दीडशे गावांना त्यामुळे पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. जीवन प्राधिकरण विभागाने चाचणी केली खरी, परंतु या योजनांसाठीची थकीत पाणीपट्टी व वीजबिलाची कोट्यवधींची रक्कम कोणी भरायची यावरून वाद निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेने या योजना ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त बुर्हाणनगर,...
  June 1, 04:08 AM
 • पुणे - मुंबईवरील हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेला बळकटी आणण्यासाठी नौदल, कोस्ट गार्ड यांच्या जोडीने आता स्थानिक मच्छीमारांचेही नेटवर्क प्रस्थापित करण्यात आल्याची माहिती नौदलप्रमुख अँडमिरल निर्मलकुमार वर्मा यांनी मंगळवारी येथे दिली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 120 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अँडमिरल वर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाकिस्तानात नुकताच नौदल बेसवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता, त्याचा संदर्भ देत वर्मा म्हणाले,...
  June 1, 03:59 AM
 • अहमदनगर- राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडल्यास इतर कोणत्याही पक्षात समाजाचा विकास करणारा 'माई का लाल' नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत केली. अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच समाजाचा विकास करण्याची ताकद आहे. राष्ट्रवादीने साखर कारखाने उभे करून शेतकऱ्यांचा विकास केला. तसेच अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्था उभारून समाजाची प्रगती केली. इतर पक्षांच्या कामगिरीविषयी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेने आतापर्यंत फक्त तरूणांचा वापर केला आहे, यापलीकडे...
  May 31, 06:53 PM
 • पुणे - मुंबई-बंगळूर महामार्गावर आंदोलन करणाऱ्या तीन आमदारांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. या तीन आमदारांमध्ये मनसेचे रमेश वांजळे, कॉंग्रेसचे संग्राम खोपटे आणि शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा समावेश आहे. खेड शिवापुर येथील टोल नाक्याविरोधात आज सर्वपक्षीय आंदोलन पुकारले होते. या टोल नाक्याविरोधात सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन पुकारले होते. त्यात मोठ्या संख्येने आमदारसमर्थक सहभागी झाले. आंदोलनकत्र्या आमदारांना नंतर अटक करण्यात आली.
  May 31, 02:36 PM
 • पुणे - आता देशातील डॉक्टर केवळ एका तासांत अगदी नाममात्र शुल्क स्वीकारून आपल्या शुक्राणूंचा दर्जा ठरवू शकतील. अर्थात याचे सर्व श्रेय मुंबईतील 'इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ' (एनआयआरआरएच) या संस्थेला जाते.येथील संशोधकांनी शुक्राणूंची क्षमता किंवा दर्जा अभ्यासणारी एक स्वस्त आणि विश्वासार्ह बायोकेमिकल चाचणी विकसित केली आहे.या संशोधनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आर्थिक साह्य केले आहे. या चाचणीचे नाव 'रिसेजुरिन रिडक्शन टेस्ट' (आरआरटी) असे असून...
  May 31, 04:43 AM
 • पुणे - तीस वर्षांपूर्वीपर्यंत पुण्याची ओळख सायकलींचे शहर अशी होती. जागतिकीकरणाच्या वार्याबरोबर ती दुचाकींचे शहर अशी बनली. आता तर शहरात भाड्यानेही बाइक मिळणार आहे. एक ते दीड रुपया मिनिट या दराने भाडे आकारले जाणार असून, दिवसाला शंभर कि.मी. फिरता येणार आहे.दुचाकी भाड्याने देण्याच्या सेवेचे नामकरण स्वीच असे करण्यात आले आहे. सोमवारी या सेवेचे उद्घाटन झाले. पहिल्या टप्प्यात वाहने कंपन्या, सरकारी व शैक्षणिक संस्थांना भाड्याने देण्यात येतील. मोबाइल ट्रॅकिंग उपकरण बसवल्याने वाहन कोठे आहे, हे...
  May 31, 04:34 AM
 • पुणे - आध्यात्म-प्रवचनाची आवड आहे आणि कीर्तनकार व्हायचंय, तर मग त्याचा अभ्यासक्रमच पूर्ण करा; पण प्रवेशप्रक्रिया सोपी नाही. त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. संतर्शेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या तेजाने पावन झालेल्या आळंदीमधील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने वारकर्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. संस्थेमध्ये 2010 मध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतून 298 विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली. यातील 77 जण उत्तीर्ण झाले. चार...
  May 30, 05:23 AM
 • पुणे - प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपतिपदाचा कार्यकाल संपल्यावर पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात लष्कराच्या खडकी येथील जागेत त्यांच्यासाठी आलिशान निवासस्थान सरकारतर्फे उभारण्यात येणार आहे. रविवारी (दि. 30) राष्ट्रपतींच्या उपस्थितीत या घराचा पायाभरणी समारंभही होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.29 व 30 मे असे दोन दिवस राष्ट्रपती पुणे दौर्यावर आल्या आहेत. त्यामध्ये 29 मे या दिवशी त्यांचा एकच जाहीर कार्यक्रम होता. दुसरा दिवस पूर्णपणे राखीव असून याच दिवशी त्या आपल्या...
  May 30, 05:03 AM
 • पुणे - प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपतिपदाचा कार्यकाल संपल्यावर पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात लष्कराच्या खडकी येथील जागेत त्यांच्यासाठी आलिशान निवासस्थान सरकारतर्फे उभारण्यात येणार आहे. रविवारी (दि. 30) राष्ट्रपतींच्या उपस्थितीत या घराचा पायाभरणी समारंभही होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.29 व 30 मे असे दोन दिवस राष्ट्रपती पुणे दौर्यावर आल्या आहेत. त्यामध्ये 29 मे या दिवशी त्यांचा एकच जाहीर कार्यक्रम होता. दुसरा दिवस पूर्णपणे राखीव असून याच दिवशी त्या आपल्या...
  May 30, 05:02 AM
 • पुणे - पोलिसी खाक्या दाखवला की अट्टल गुन्हेगारही पोपटासारखे बोलू लागतात, हे सर्वश्रुत आहे. एका प्रकरणात असेच अमानुष मारहाणीचे प्रकरण पुण्याच्या विश्रामबागवाडा पोलिस स्टेशनमध्ये घडल्याचे एका क्लिपिंगवरून जगजाहीर झाले होते. हे प्रकरण आता पोलिसांवर चांगलेच शेकले असून, एका पोलिस निरीक्षकासह सहा पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऑक्टोबर महिन्यात विश्रामबाग पोलिसांनी तीन संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले होते. त्यांना बोलते करण्यासाठी पोलिसी खाक्या...
  May 29, 01:43 AM
 • पुणे - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यात गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शीतयुद्धाचे पडसाद पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांमध्येही उमटू लागल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी गडकरी समर्थकाची वर्णी लागल्याने नाराज झालेल्या मुंडेंनी शनिवारी (ता. 28) पुण्यात आयोजित शिवशक्ती- भीमशक्तीच्या मेळाव्याकडे मुंडेंनी पाठ फिरविल्याची चर्चा आहे. मुंडे- ठाकरे वादाला पुण्यात आता नव्याने सुरुवात झाली ती पुणे...
  May 29, 01:41 AM
 • पुणे - शिक्षण मंडळाच्या 90 टक्क्यांहून अधिक शाळांमधील स्वच्छतागृह आणि पाण्याच्या टाक्यांच्या दुरवस्थेबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला. त्याची दखल घेत शाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छतागृह आणि टाक्यांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरवातीलाच "मनसे'च्या नगरसेवकांनी दुरवस्था झालेल्या स्वच्छतागृह आणि टाक्यांची छायाचित्रे असलेले फ्लेक्स सभागृहात महापौरांच्या आसनाजवळ येऊन...
  May 27, 11:52 PM
 • पुणे - बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला पुणे भाजप शहराध्यक्षाचा प्रश्र मार्गी लागला आहे. विकास मठकरी यांची यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली. योगेश घोगावले आणि विकास मठकरी यांच्यात शहराध्यक्षपदासाठी चुरस होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून निवडीबाबत निर्णय होत नव्हता. मठकरी हे भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरींच्या जवळचे मानले जातात. तर घोगावले हे भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कॅम्पमधील असल्याचे बोलले जाते.
  May 27, 07:27 PM
 • पुणे - संगणक अभियंता नयना पुजारी खून खटल्यात सरकार पक्षाने बुधवारी न्यायालयात साक्षीदारांची यादी सादर केली. जिल्हा मुख्य न्यायाधीश ए. एम. बदर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. पोलिसांनी नयनाच्या खूनप्रकरणी चार जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. चारपैकी एक आरोपी साक्षीदार झाला आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली. फिर्यादी आर. एस. चिकटे, अकरा पंच यांचा साक्षीदारांमध्ये समावेश आहे. या साक्षीदारांची सरतपासणी सात आणि...
  May 27, 03:33 PM
 • पुणे - राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रविवारी (२९ मे) पुण्याच्या दौ-यावर येत असून, वाघोली येथे भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या संशोधन प्रकल्पाच्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. ट्रस्टतर्फे वाघोली येथील केसनंद रस्त्यालगत आयुर्वेदिक महाविद्यालयात सुमारे एक लाख ५७ हजार चौरस...
  May 27, 03:31 PM
 • पुणे - शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत नगरपालिका क्षेत्रातील शाळांसाठी एकाच ठिकाणी खिचडी शिजविण्याचा (केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली) निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यामुळे सध्या हे काम करत असलेल्या महिला बचतगटावंवर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची चिन्हे आहेत. निर्णयाला विरोध करण्यासाठी सर्व बचतगटांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ६ ते १४ वयोगटांतील विद्यार्थी शाळेत उपस्थित राहावे व गळती थांबावी यासाठी राज्य शासनाने १६ मे २२ च्या निर्णयानुसार महिला बचतगटांना खिचडी शिजवून देण्याचे...
  May 27, 03:21 PM
 • पुणे - मद्यपान करून गोंधळ घातल्याने नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या अभिनेते मोहन जोशी यांचे भवितव्य २८ मे रोजी होणा-या परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ठरणार आहे. त्यामुळे यंदाच्या परिषदेचा वर्धापनदिन अध्यक्षांविनाच साजरा होणार.परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत जोशी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आणि हंगामी अध्यक्षपदी उपाध्यक्ष हेमंत टकले यांची निवड करण्यात आली होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्तीचा वर्धापनदिन सहा जून रोजी आहे....
  May 27, 02:43 PM
 • नगर - पद्मभूषण व रेमन मेगॅसेस पुरस्कार विजेते डॉ. रजनीकांत आरोळे यांच्या पार्थिवावर गुरुवारी (ता. 26) जामखेड (जि.नगर) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. आरोळे यांचे बुधवारी (ता. 24) मध्यरात्री पुणे येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जामखेड येथील त्यांच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या आवारात त्यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ख्रिश्चन धर्मगुरुंनी...
  May 27, 02:37 PM
 • राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल जाहिर झाला आहे. यावर्षी कोल्हापूर विभागाने निकालात बाजी मारली आहे. कोल्हापुरचा निकाल सर्वाधिक 82.55 टक्के लागला आहे. राज्याचा एकूण निकाल 70.69 टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनेच बाजी मारली आहे. राज्यात मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 76.30 तर मुलांची टक्केवारी 66.39 आहे. कोल्हापुर पाठोपाठ पुणे विभागाचा निकाल आहे. पुणे विभागाचा निकाल 79.32 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल अमरावती विभागाचा 48.80...
  May 27, 01:54 PM
 • पुणे: पुणे जिल्हा पोलीस अधिक्षकपदी संदीप कर्णिक यांची निवड झाली आहे.विद्यमान पोलीस अधिक्षक प्रताप दिघावकर यांची पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई येथे बदली झाली आहे. नूतन पोलीस अधिक्षक संदिप कर्णिक हे नांदेड येथे पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. संदिप कर्णिक हे २००४ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत.
  May 26, 08:36 PM
 
जाहिरात

RECOMMENDED