जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune

Pune News

  • पुणे- पुणे महानगरपालिकेच्या वतीने बाणेर येथे उभारण्यात येणा-या सचिन तेंडुलकर संग्रहालयाविषयी स्वत: सचिनने उत्सुकता दाखवली आहे. सचिनचे क्रिकेट साहित्य, त्याची छायाचित्रे, त्याने गाजवलेल्या सामन्यांची क्षणचित्रे, लेख असे एक संग्रहालय उभारण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला होता. त्यासाठी ४० कोटींचा निधी मिळणार असल्याचे समजते. एका कार्यक्रमासाठी आला असताना सचिनने याविषयी स्थायी समिती अध्यक्ष गणेश बिडकर यांच्याकडून माहिती घेतली.
    June 9, 02:02 AM
  • नगर- महापौर-उपमहापौर पदांसाठी १८ जून रोजी निवडणूक घेण्याचे आदेश नुकतेच विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाले आहेत. यंदाचे महापौरपद खुल्या महिला वर्गासाठी असल्याने भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या दोन्ही कन्या सत्ताधारी कॉँग्रेस आघाडीकडून या पदावर विराजमान होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर गेल्या वेळी जास्त संख्याबळ असूनही अपक्षांनी कौल न दिल्याने सत्ता गमवावी लागलेल्या शिवसेना-भाजप युतीनेही यंदा कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर युतीचीच सत्ता आणायची, असा निर्धार करून जोरदार...
    June 9, 01:51 AM
  • पुणे- नेहमीच्या वेळेआधीच दाखल झालेल्या पावसाने बुधवारी मात्र मृग नक्षत्राला हुलकावणी दिली आणि कोकणाचा अपवाद वगळता राज्यभरात मृगाचा पहिला दिवस कोरडाच राहिला. नित्यनेमाने बरसणा-या वरुणराजाने या वर्षी मृग नक्षत्राच्या सलामीला मात्र पाठ फिरवली. वाजतगाजत वेळेआधी आलेल्या पावसाने पहिले चार दिवस जोरदार वर्षाव केल्यावर गेल्या दोन दिवसांपासून दडी मारली आहे. दिवसाच्या तापमानातही वाढ झाली आहे. कोकणातील काही भाग वगळता इतरत्र मृगाच्या धारा आज बरसल्याच नाहीत. पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. मेधा...
    June 9, 01:39 AM
  • पुणे - स्वामी रामदेव बाबा यांनी केलेली 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा रद्द करण्याबद्दलची मागणी त्यांनी तीन वर्षांपूर्वी अर्थक्रांती प्रतिष्ठानच्या पाच प्रस्तावांमधून घेतली असून ती अर्धवट स्वरूपात मांडणे धोकादायक असल्याचे मत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल बोकील यांनी आज येथे दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केले.काळय़ा पैशाच्या निर्मूलनासाठी अर्थक्रांती प्रतिष्ठानने सुचविलेले पाच प्रस्ताव गेली 12 वर्षे चर्चेत असून त्यातील एकच मुद्दा घेतल्यास काळा पैसा आणि भ्रष्टाचारविरोधी लढा पुढे जाण्याऐवजी...
    June 8, 05:55 AM
  • पुणे- प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बिल 2005चा मसुदा तयार करताना केंद्र सरकारने केलेल्या अनुदानित शिक्षण संस्थांच्या व्याख्येची अंमलबजावणी केली, तर राज्यातील शिक्षणसम्राटांच्या बहुतांश संस्था अनुदानित ठरतील. तसे झाल्यास स्वतंत्रपणे शुल्क आकारण्याचा विनाअनुदानित संस्थांना मिळालेला अधिकारच गळून पडेल आणि बहुतांश खासगी संस्थांच्या शुल्कावर सरकार व संबंधित अधिकारी थेट नियंत्रण ठेवू शकतील. खासगी विनाअनुदानित शिक्षण संस्थांकडून होणारी नफेखोरी आणि शुल्करचनेमधील...
    June 8, 04:13 AM
  • पुणे- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नियामक मंडळावर डॉ. शोभना गोखले, डॉ. मोहन धडफळे, वा. ल. मंजूळ, पं. वसंतराव गाडगीळ, डॉ. सदानंद मोरे, हरी नरके यांच्यासह २५ जण विजयी झाले. पन्नास टक्क्यांहून अधिक मतदान हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. भांडारकर संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत २५ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये पुण्यातील ४०, तर बाहेरील ९ उमेदवार होते. १९३२ मतदारांपैकी १३९६ मतदार पुण्यातील, तर ६१६ मतदार पुण्याबाहेरचे होते. डॉ. शोभना गोखले या सर्वाधिक ६९२ मते मिळवून...
    June 8, 04:05 AM
  • पुणे: युध्दात जखमी झालेल्या सैनिकांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेल्या पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरमधील एका स्पर्धकाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मदतीचा हात दिला आहे. तिरंदाज अमोल बोरीवाले याचा इटलीत होणाया पॅरालिम्पक स्पर्धेचा संपूर्ण खर्च सचिनने उचलला आहे. सचिनने पॅराप्लेजिक सेंटरला भेट देऊन तेथील जखमी यौध्दांची भेट घेतली. सेंटरमधल्या बास्केटबॉल खेळाडूंशीही त्याने यावेळी संवाद साधला.
    June 7, 07:32 PM
  • प्रतिनिधी । पुणेनिगडी येथील उड्डाणपुलाजवळ विरुद्ध लेनमध्ये शिरलेला भरधाव वेगातील टँकर मर्सिडीज कारवर चढल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला. मंगळवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये कुमार प्रॉपर्टीचे मालक विमलकुमार जैन (वय ६२, नेवियार रोड, पुणे) यांचा समावेश आहे.मसिर्डीझचा चालक महेंद्र हिरानंद गवळी (वय ४३, राहणार - शांतिनगर, वानवडी), संपत भीमाजी इंगळे (वय ४८), दुचाकीचालक लक्ष्मण ठाकर (५१, मिलिंदनगर, पिंपरी), हौसाबाई ठाकर हेही या...
    June 7, 06:02 PM
  • पुणे - पुण्यामध्ये नक्षलवादी सापडतात ही पुण्याची नामुष्की आहे. त्याविरोधात तातडीने तपासणी मोहिम राबविण्याची गरज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. पुणे जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.या वेळी विभागीय आयुक्त दिलीप बंड, महापालिका आयुक्त महेश पाठक, आशिष शर्मा, विकास देशमुख, पोलिस अधीक्षक मीरा बोरवणकर, संदीप कर्णिक, वाहतूक पोलिसप्रमुख मनोज पाटील, आमदार अनिल भोसले, बापू पठारे, विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्षा वंदना चव्हाण, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे उपस्थित होते....
    June 6, 08:10 PM
  • पुणे - पुण्यातील स्कायवॉक रद्द झालेला नसून हे काम होणार आहेच. आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी स्कायवॉक संदर्भात चर्चा झाली असून, फेरनिविदा काढून हे काम सुरू केले जाईल, अशी माहिती महापौर मोहनसिंग राजपाल यांनी आज दिली. ते म्हणाले, की शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी स्कायवॉक प्रकल्प राबविला जाणार आहे. एमएमआरडीने मुंबईत स्वस्तात स्कायवॉक बांधले, या धर्तीवर पुण्यातही हा प्रकल्प होईल. सध्या ज्या दोन एजन्सीकडे 1500 कोटीची पालिकेची कंत्राटे...
    June 6, 07:38 PM
  • पुणे- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि जुना महामार्ग असे दोन्ही रस्ते मिळून आता तब्बल 14 पदरी वाहतूक शक्य होणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्नी अजित पवार यांनी रविवारी दिव्य मराठीशी बोलताना दिली.पुणे-मुंबई महामार्ग हा देशातील सर्वाधिक वाहतुकीचा मार्ग आहे. सर्वाधिक प्रवासी आणि मालवाहतूक या रस्त्यावरून दररोज होत असते. हा द्रुतगती महामार्ग सध्या सहा पदरी आहे आणि जुना महामार्ग चार पदरी आहे. एकूण दहा पदरी महामार्ग उपलब्ध असूनही वाहतुकीची समस्या कायम असते....
    June 6, 03:16 AM
  • पुणे: सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूरचा टोलनाका शिरवळ येथे नेण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दाखवली आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. तोपर्यंत स्थानिक म्हणजेच एमएच १२ची वाहने टोलमुक्त करण्यात येतील, अशी माहिती आमदार विजय शिवतारे आणि संग्राम थोपटे यांनी येथे दिली. खेड- शिवापूर टोलनाक्याचा विषय सध्या गाजतो आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस अणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्फे नुकतेच रास्ता रोको आंदोलन करण्यात...
    June 6, 01:53 AM
  • पुणे: महानगरपालिकेने सोने आणि चांदीवर लागू केलेली जकातवाढ अन्यायकारक असून ती रद्द करावी, या मागणीसाठी पुणे सराफ असोसिएशनने सात जूनपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच असोसिएशनचे सभासद महापालिका भवनासमोर उपोषणही करणार आहेत. राज्यातील इतर शहरांपेक्षा पुण्यात सोने-चांदीवर सर्वाधिक जकात आकारली जात असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. ही जकात प्रतिशेकडा ३५ पैसे अशी पूर्वीप्रमाणेच आकारली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, उपाध्यक्ष...
    June 6, 01:47 AM
  • पुणे: मातोश्रीच्या बाजूला रामदास आठवले यांनी चार मजली इमारत कोणत्या आरक्षणातून उभी केली? असा प्रश्न विचारणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी रविवारी प्रत्त्युत्तर दिले आहे. मी राज ठाकरे यांना अनेक विषयांत एक्स्पोज करू शकतो, अशा शब्दांत त्यांनी प्रतिआव्हानच दिले आहे.अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर राज ठाकरे यांनी अजित पवारांवर पत्रकार परिषदेत टीका केली होती. त्याच वेळी राज यांनी आठवले यांचाही समाचार घेतला होता....
    June 6, 01:44 AM
  • पुणे: केंद्र सरकारने योगगुरू बाबा रामदेव यांचे भ्रष्टाचारविरोधी सत्याग्रह, उपोषण ज्या पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ब्रिटिशांनी स्वातंत्र्यापूर्वी जालियनवाला बागेत केलेल्या अत्याचारांची पुनरावृत्ती झाली, असे मत वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांनी रविवारी भारत स्वाभिमानच्या निषेध सभेत व्यक्त केले. रामदेवबाबांचे दिल्लीतील आंदोलन दडपणाया प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी पुण्यात आज जोरदार निदर्शने व केंद्र सरकारविरोधी घोेषणा देण्यात आल्या. डेक्कन...
    June 6, 01:33 AM
  • प्रतिनिधी । पुणे: शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून भाजपमध्ये सुरू झालेला वाद रोज नवी वळणे घेत आहे. नूतन अध्यक्ष विकास मठकरी आणि योगेश गोगावले यांनी एकमेकांच्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन सुरू केलेले आपल्यालाच पाठिंबा असल्याचे दावे-प्रतिदावे आजही सुरूच होते. गोगावले यांनी अध्यक्षपदासाठी आपल्याला २२ जणांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. त्यापैकी २० मतदार त्यांनी पत्रकार परिषदेत हजर केले होते. तर शुक्रवारी गोगावले यांनी सादर केलेल्या मतदारांपैकी दोघे हे मतदारच नाहीत आणि एक मतदार...
    June 5, 01:14 AM
  • प्रतिनिधी । सांगली: कोंडुसकर ग्रुपच्या कामूद ड्रग्ज कंपनीच्या कुपवाड एमआयडीसीतील कारखान्यास केंद्रीय अबकारी विभाग व महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) टाळे ठोकल्याने ३०० कामगार काम नसल्यामुळे हवालदिल झाले आहेत. गेली १५ वर्षे हा कारखाना सुरू असून तेथे औषधासाठी लागणारा कच्चा माल, रसायने तयार केली जातात. केटामाइन उत्पादनावर सरकारने चार महिन्यांपूर्वी बंदी घातली तरीदेखील कारखान्यात राजरोसपणे उत्पादन सुरू होते. कुपवाड येथील कारखाना हेच केटामाइन बनवण्याचे मुख्य केंद्र होते असे...
    June 5, 01:13 AM
  • प्रतिनिधी। नगर अतिक्रमण हटविण्यास विरोध करून महापालिकेच्या अधिकायास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी सकाळी आमदार अनिल राठोड यांना अटक केली. येथील स्थानिक न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. दरम्यान, पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर त्यांची सुटकाही करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील अन्य तीन आरोपी पसार झाले आहेत. शहरातील चितळे रोडवर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान शुक्रवारी आमदार राठोड यांच्यासह त्यांचा मुलगा...
    June 5, 12:50 AM
  • प्रतिनिधी । पुणे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिका-यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनात शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे अंक जाळल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. याच वादातून दोन्ही गटांत धक्काबुकीही झाली होती. दरम्यान, अंक जाळणा-यांवर कारवाई करावी, ही मागणी पोलिसांनी मान्य केल्यानंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरील आंदोलन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, पोलिसांनी राष्ट्रवादीच्या...
    June 5, 12:48 AM
  • येथील लष्कराच्या एमआयआरसी या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेताना रणगाडा उलटून दोन प्रशिक्षणार्थी जवानांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेत रणगाडा चालविणारा जखमी झाला आहे. भूपेंद्रसिंग (वय २४), व्ही. पी. नायडू (वय २६) अशी मृत जवानांची नावे आहेत. लष्कराच्या एका तुकडीला रणगाड्याचे प्रशिक्षण देण्याचे काम एमआयआरसीच्या प्रशिक्षण केंद्रात सुरू होते. या वेळी अडथळे पार करत असताना एक रणगाडा पाणी असलेल्या खड्ड्यात उलटला. याच वेळी रणगाड्यात पाणी शिरले व त्यातून बाहेर निघता न...
    June 5, 12:45 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात