जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune

Pune News

  • पुणे- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि जुना महामार्ग असे दोन्ही रस्ते मिळून आता तब्बल 14 पदरी वाहतूक शक्य होणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्नी अजित पवार यांनी रविवारी दिव्य मराठीशी बोलताना दिली.पुणे-मुंबई महामार्ग हा देशातील सर्वाधिक वाहतुकीचा मार्ग आहे. सर्वाधिक प्रवासी आणि मालवाहतूक या रस्त्यावरून दररोज होत असते. हा द्रुतगती महामार्ग सध्या सहा पदरी आहे आणि जुना महामार्ग चार पदरी आहे. एकूण दहा पदरी महामार्ग उपलब्ध असूनही वाहतुकीची समस्या कायम असते....
    June 6, 03:16 AM
  • पुणे: सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूरचा टोलनाका शिरवळ येथे नेण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दाखवली आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. तोपर्यंत स्थानिक म्हणजेच एमएच १२ची वाहने टोलमुक्त करण्यात येतील, अशी माहिती आमदार विजय शिवतारे आणि संग्राम थोपटे यांनी येथे दिली. खेड- शिवापूर टोलनाक्याचा विषय सध्या गाजतो आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस अणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्फे नुकतेच रास्ता रोको आंदोलन करण्यात...
    June 6, 01:53 AM
  • पुणे: महानगरपालिकेने सोने आणि चांदीवर लागू केलेली जकातवाढ अन्यायकारक असून ती रद्द करावी, या मागणीसाठी पुणे सराफ असोसिएशनने सात जूनपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच असोसिएशनचे सभासद महापालिका भवनासमोर उपोषणही करणार आहेत. राज्यातील इतर शहरांपेक्षा पुण्यात सोने-चांदीवर सर्वाधिक जकात आकारली जात असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. ही जकात प्रतिशेकडा ३५ पैसे अशी पूर्वीप्रमाणेच आकारली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, उपाध्यक्ष...
    June 6, 01:47 AM
  • पुणे: मातोश्रीच्या बाजूला रामदास आठवले यांनी चार मजली इमारत कोणत्या आरक्षणातून उभी केली? असा प्रश्न विचारणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी रविवारी प्रत्त्युत्तर दिले आहे. मी राज ठाकरे यांना अनेक विषयांत एक्स्पोज करू शकतो, अशा शब्दांत त्यांनी प्रतिआव्हानच दिले आहे.अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर राज ठाकरे यांनी अजित पवारांवर पत्रकार परिषदेत टीका केली होती. त्याच वेळी राज यांनी आठवले यांचाही समाचार घेतला होता....
    June 6, 01:44 AM
  • पुणे: केंद्र सरकारने योगगुरू बाबा रामदेव यांचे भ्रष्टाचारविरोधी सत्याग्रह, उपोषण ज्या पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ब्रिटिशांनी स्वातंत्र्यापूर्वी जालियनवाला बागेत केलेल्या अत्याचारांची पुनरावृत्ती झाली, असे मत वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांनी रविवारी भारत स्वाभिमानच्या निषेध सभेत व्यक्त केले. रामदेवबाबांचे दिल्लीतील आंदोलन दडपणाया प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी पुण्यात आज जोरदार निदर्शने व केंद्र सरकारविरोधी घोेषणा देण्यात आल्या. डेक्कन...
    June 6, 01:33 AM
  • प्रतिनिधी । पुणे: शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून भाजपमध्ये सुरू झालेला वाद रोज नवी वळणे घेत आहे. नूतन अध्यक्ष विकास मठकरी आणि योगेश गोगावले यांनी एकमेकांच्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन सुरू केलेले आपल्यालाच पाठिंबा असल्याचे दावे-प्रतिदावे आजही सुरूच होते. गोगावले यांनी अध्यक्षपदासाठी आपल्याला २२ जणांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. त्यापैकी २० मतदार त्यांनी पत्रकार परिषदेत हजर केले होते. तर शुक्रवारी गोगावले यांनी सादर केलेल्या मतदारांपैकी दोघे हे मतदारच नाहीत आणि एक मतदार...
    June 5, 01:14 AM
  • प्रतिनिधी । सांगली: कोंडुसकर ग्रुपच्या कामूद ड्रग्ज कंपनीच्या कुपवाड एमआयडीसीतील कारखान्यास केंद्रीय अबकारी विभाग व महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) टाळे ठोकल्याने ३०० कामगार काम नसल्यामुळे हवालदिल झाले आहेत. गेली १५ वर्षे हा कारखाना सुरू असून तेथे औषधासाठी लागणारा कच्चा माल, रसायने तयार केली जातात. केटामाइन उत्पादनावर सरकारने चार महिन्यांपूर्वी बंदी घातली तरीदेखील कारखान्यात राजरोसपणे उत्पादन सुरू होते. कुपवाड येथील कारखाना हेच केटामाइन बनवण्याचे मुख्य केंद्र होते असे...
    June 5, 01:13 AM
  • प्रतिनिधी। नगर अतिक्रमण हटविण्यास विरोध करून महापालिकेच्या अधिकायास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी सकाळी आमदार अनिल राठोड यांना अटक केली. येथील स्थानिक न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. दरम्यान, पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर त्यांची सुटकाही करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील अन्य तीन आरोपी पसार झाले आहेत. शहरातील चितळे रोडवर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान शुक्रवारी आमदार राठोड यांच्यासह त्यांचा मुलगा...
    June 5, 12:50 AM
  • प्रतिनिधी । पुणे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिका-यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनात शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे अंक जाळल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. याच वादातून दोन्ही गटांत धक्काबुकीही झाली होती. दरम्यान, अंक जाळणा-यांवर कारवाई करावी, ही मागणी पोलिसांनी मान्य केल्यानंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरील आंदोलन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, पोलिसांनी राष्ट्रवादीच्या...
    June 5, 12:48 AM
  • येथील लष्कराच्या एमआयआरसी या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेताना रणगाडा उलटून दोन प्रशिक्षणार्थी जवानांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेत रणगाडा चालविणारा जखमी झाला आहे. भूपेंद्रसिंग (वय २४), व्ही. पी. नायडू (वय २६) अशी मृत जवानांची नावे आहेत. लष्कराच्या एका तुकडीला रणगाड्याचे प्रशिक्षण देण्याचे काम एमआयआरसीच्या प्रशिक्षण केंद्रात सुरू होते. या वेळी अडथळे पार करत असताना एक रणगाडा पाणी असलेल्या खड्ड्यात उलटला. याच वेळी रणगाड्यात पाणी शिरले व त्यातून बाहेर निघता न...
    June 5, 12:45 AM
  • पुणे- खासगी महाविद्यालयांतील व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (सीएपी) राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील ५२ खासगी महाविद्यालयांनी एकत्र येऊन कॉन्सर्टियम ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन (कम) या गटाची निर्मिती नुकतीच केली आहे, अशी माहिती या गटाच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ. अपूर्वा पालकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या खासगी महाविद्यालयात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्याला प्रत्येक महाविद्यालयात जाऊन करावी लागणारी प्रवेश प्रक्रिया...
    June 4, 03:44 AM
  • इंदापूर: इंदापूरसह तालुक्यात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे शेती आणि फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर या पावसाने एका 45 वर्षीय महिलेचा बळी घेतला असून अनेक जण जखमी झाले आहे. सोसाट्याच्या वा-याचा वेग इतका होता की, शेकडो घरांवरील पत्रे उडून गेली असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. झाडे उन्मळून पडली आहेत. झाड अंगावर पडल्याने राजाबाई नरुटे यांचा मृत्यु झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. शेती आणि फळबांगाचे लाखोंचे नुकसान:गुरुवारी रात्री झालेल्या पावसाचा सर्वाधिक...
    June 3, 12:56 PM
  • पुणे - अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीपासून खाली केरळपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात गुरुवारी जोरदार पाऊस झाल्याचे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. शहरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वातावरण झपाट्याने बदलले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. मेधा खोले म्हणाल्या, हा पाऊस मॉन्सूनचा नाही. मात्र द्रोणीय स्थिती टिकून राहिल्यास आगामी ४८ तास हा पाऊस टिकून राहू शकेल. मान्सून आता...
    June 3, 02:14 AM
  • पुणे - अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीपासून खाली केरळपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात गुरुवारी जोरदार पाऊस झाल्याचे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. शहरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वातावरण झपाट्याने बदलले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. मेधा खोले म्हणाल्या, हा पाऊस मॉन्सूनचा नाही. मात्र द्रोणीय स्थिती टिकून राहिल्यास आगामी ४८ तास हा पाऊस टिकून राहू शकेल. मान्सून आता...
    June 3, 01:49 AM
  • नगर - हवाला प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी बुधवारी रात्री सात जणांना ताब्यात घेतले होते. यातील चार आरोपींना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या आरोपींकडून पोलिसांनी 21 लाख रुपये व इतर ऐवज जप्त केला आहे. कृष्णा सीडी सेंटरचा मालक आनंद ओमप्रकाश खंडेलवाल (रा. रामचंद्र खुंट, नगर) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सहा लाख ३६ हजार ९६ रुपये जप्त केले. तसेच त्याच्याकडे व्यवहार करण्यासाठी आलेले श्रीराम हरिकिसन मुंदडा (रा. सांगळे...
    June 3, 01:31 AM
  • पुणे - भाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अहवाल वैकंय्या नायडू यांनी लोकशाही पद्धतीने जाहीर करावा. 43 पैकी 24 मतदारांचा पाठिंबा योगेश गोगावले यांना असताना दिलेली यादी तपासली जावी या मागणीसाठी पुण्यातील सर्व मतदारांची पाडे दिल्लीत 6 जूनला होईल, असे आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले. निवडक मतदारांशी बोलून प्रा. विकास मठकरी यांची शहराध्यपदी निवड करण्यात आली होती. 25 मते मठकरींना, 12 मते गोगवलेंना, तर 7 मते तटस्थ असा निकाल जाहीर करण्यात आला. मठकरी हे गडकरी समर्थक असल्यानेच त्यांची निवड...
    June 3, 01:19 AM
  • पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी जागोजागी अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी अजित पवारांवरही टीकेची झोड उठवली आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शिवसेनेच्या कार्यकत्र्यांमध्ये पुण्यात गुरुवारी...
    June 3, 01:11 AM
  • पुणे - मान्सूनची सध्याची आगेकूच समाधानकारक असून कर्नाटकपर्यंत पावसाचे आगमन झाले आहे. अचानक बदल न घडल्यास येत्या आठवडाभरात तो महाराष्ट्रात पोहोचेल, असे पुणे वेधशाळेतर्फे बुधवारी सांगण्यात आले. संपूर्ण अंदमान परिसर, केरळमध्ये सध्या मान्सूनचे आगमन झाले आाहे. तूर्त तरी हवामान अनुकूल असल्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक यांचा काही भागही सध्या मान्सूनच्या ढगांनी व्यापला आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरीही कोसळत आहेत. उन्हाची तीव्रताही कमी झाली आहे. महाराष्ट्राच्या...
    June 2, 04:20 AM
  • पुणे - जन्मदात्या आई- वडिलांनीच स्वत:च्या पोटच्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. सिमरन हिचे लग्न मुकेश साबळे यांच्यासोबत झालेले आहे, मात्र काही कारणामुळे सिमरन ही माहेरी राहत होती. दरम्यान आई- वडिलांनी पैशासाठी सिमरला घराबाहेरदेखील काढण्याचा प्रयत्न केला. राज सोंमुवेल आणि सुरेखा राज सोमुवेल अशी सिमरनच्या आई- वडिलांची नावे आहेत सिमरन हिचे 2002 मध्ये मुकेश साबळे याच्याबरोबर लग्न झाले त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. तिच्या आईवडिलांनी तिला 10 लाख रुपयांचे घर...
    June 2, 04:15 AM
  • पुणे - जन्मदात्या आई- वडिलांनीच स्वत:च्या पोटच्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. सिमरन हिचे लग्न मुकेश साबळे यांच्यासोबत झालेले आहे, मात्र काही कारणामुळे सिमरन ही माहेरी राहत होती. दरम्यान आई- वडिलांनी पैशासाठी सिमरला घराबाहेरदेखील काढण्याचा प्रयत्न केला. राज सोंमुवेल आणि सुरेखा राज सोमुवेल अशी सिमरनच्या आई- वडिलांची नावे आहेत सिमरन हिचे 2002 मध्ये मुकेश साबळे याच्याबरोबर लग्न झाले त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. तिच्या आईवडिलांनी तिला 10 लाख रुपयांचे घर...
    June 2, 04:13 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात