जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • अहमदनगर - शहरातील नरहरी नगरमध्ये तरुणीवर गोळीबार करण्यात आला. रविवारी रात्री 10.30 वाजता ही घटना घडली आहे. नरहरी नगरमध्ये तरुणीला तिच्या घरासमोर गोळ्या झाडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेला 12 तास उलटून गल्यानंतरही पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. नम्रता ढापसे (22) या तरुणीवर गोळीबार करण्यात आला. तिच्या पोटात तीन गोळ्या लागल्या आहेत. तिला नगरच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यामुळे रात्रीच तील सिटी केअर हॉस्पीटलमध्ये दाखल...
  June 13, 12:31 PM
 • पुणे- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तसेच या अपघातात तीन पोलिस सुदैवाने वाचले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मरण पावलेल्याचे नाव अनंता साठे असे आहे. ते 'आयआरबी'चे कर्मचारी होते. रात्री 12 नंतर खोपोली एक्झीटजवळ ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर काम करणाऱ्या साठे यांना जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ट्रक समोर सिमेंटच्या खांबाला धडकला. त्यात...
  June 13, 11:06 AM
 • भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नाराजीनंतर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी मुंडे आज दुपारी गेले होते. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. मुंडे यांची पक्षात घुसमट होत असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या शिवशक्ती-भीमशक्ती मेळाव्यात मुंडे अनुपस्थित राहिले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि गोपीनाथ...
  June 13, 03:46 AM
 • नगर: खतांचा अनधिकृत साठा व जादा दराने विक्री केल्याप्रकरणी माणिक दौंडी (ता. पाथर्डी) आणि नेवासा येथील कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.माणिक दौंडी येथील सुधाकर खुंटाळे यांच्या साक्षी कृषी सेवा केंद्राने जवळच असलेल्या कोकी सपीर या गावी आरसीएफच्या ३६४ आणि २०:२०:२० च्या ३७५ पोती बेकायदा साठविल्याचे निदर्शनास आले. यासाठी संबंधित ग्रामपंचायतीची परवानगीही घेतली नव्हती. साठ्याची नोंद नसणे, बिल बुक दुकानात उपलब्ध नाही, विक्री केंद्राच्या नावाचा फलक नाही, आदी कारणावरुन या...
  June 13, 02:04 AM
 • पुणे: वेळ नाही ही प्रत्येकाची सबब असते. नाट्यप्रेमी रसिकही त्याला अपवाद नाहीत. मात्र पुणेकर मंडळींनी या समस्येवर फोन बुकिंगच्या रूपाने शोधून काढलेला उपाय चांगलाच यशस्वी ठरला आहे. गेल्या सहा महिन्यांत फोन बुकिंग करून नाटकाला येणाया रसिकांच्या संख्येत तब्बल ५० टक्के वाढ झाली. फोन बुकिंगच्या या किमयागाराचे नाव आहे दीपक चंद्रकांत गुप्ते. ते स्वत: कलारंजन ही नाट्यसंस्था गेली २४ वर्षे चालवत आहेत. त्यामुळे रंगभूमीशी संबंधित सर्व घटक त्यांच्या परिचयाचे आहेत. प्रेक्षकांना कोणत्या प्रकारची...
  June 13, 01:56 AM
 • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार रमेश वांजळे यांच्यावर शनिवारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वांजळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो पुणेकर अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेते यावेळी उपस्थित होते.
  June 11, 05:54 PM
 • पुणे - पुणे-मुंबई एस्कप्रेस हायवेवर खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे. खंडाळा घाटात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे वाहने संथ गतीने चालत आहेत. त्यातच एका बसचे ब्रेक डाऊन झाल्याने समस्येत अधिकच भर पडली आहे. पुणे-मुंबई एस्कप्रेस हायवेवर आज सकाळपासूनच मोठी गर्दी होती. विकेंड असल्यामुळे रहदारीत भरच पडली आहे, त्यातच पावसाने जोर धरल्यामुळे ट्रॅफिक जाम झाला आहे. खंडाळा घाटातून अत्यंत संथ गतीने गाड्यांची ये - जा सुरु आहे. विकेंड साजरा करण्यासाठी बाहेर पडलेल्यांना या...
  June 11, 12:09 PM
 • नवी दिल्ली- बाबा रामदेव यांच्या आजारपणाचे कारण वेगळे असून, त्यांची तब्बेत उपोषणमुळे बिघडली नसून ट्रस्टच्या संपत्तीची चौकशी सुरु केल्याने त्यांची तब्बेत बिघडली असल्याची टीका लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.बाबा रामदेव यांच्यावर दिग्विजय सिंह यांनी आरोपाच्या फेऱया झाडल्यानंतर आता यात लालूप्रसाद यादव यांनी उडी मारली आहे.ते म्हणाले, बाबा रामदेव हे योगीगुरु नसून योगाचे एक प्रशिक्षक आहेत. बाबा रामदेव हे अष्टांग योग शिकवण्याचा दावा करतात. मग ४ जूनच्या रात्री बाबांनी उडी मारुन पळून जाणे...
  June 11, 08:25 AM
 • नवी दिल्ली - बहुचर्चित लवासा प्रकल्पावर अखेर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची कु-हाड पडली आहे. प्रकल्पाच्या उभारणीत पर्यावरणविषयक निकषांचा भंग झाल्याचा ठपका ठेवून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश शुक्रवारी मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम अनधिकृत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्याच्या पर्यावरण विभागाला यासंदर्भातील आदेश जारी केले आहे. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर शेतक-यांकडून जमीन घेण्यात आली आहे. या...
  June 11, 03:26 AM
 • पुणे- विज्ञान क्षेत्रातील उच्चशिक्षित मात्र गृहिणी बनलेल्या आणि नव्याने काही सकारात्मक करू पाहणा-या महिलांना संशोधनाच्या क्षेत्रात कृतिशील होण्याची संधी आता उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने वुमेन सायंटिस्ट फेलोशिप स्कीम - ब अशी विशेष योजना सादर केली आहे. त्या अंतर्गत १५ लाख रुपयांचे संशोधन अनुदान देण्यात येणार आहे. पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या जैवमिती आणि आहारशास्त्र विभागाकडे या प्रकल्पाच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे....
  June 11, 03:03 AM
 • पुणे- मान्सूनच्या आगमनानंतर दोन दिवस ब्रेक घेतलेला वरुणराजा गुरुवारपासून सलग दोन दिवस मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रत यथेच्छ बरसत आहे. येत्या दोन- तीन दिवसांत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ व मराठवाड्याला मात्र दमदार पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. अरबी समुद्रात कोकण किना-यापासून गोव्यापर्यंतच्या भागात ढगांचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. गुरुवारी डहाणू ते मंगलोरदरम्यान पसरलेला कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या...
  June 11, 02:57 AM
 • पुणे- माहिती अधिकारात काम करणा-या राज्यातील संस्था व व्यक्तींनी माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी प्रभावी करून कामास गती येण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राईट टू इन्फर्मेशन कौन्सिलची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे समन्वयक विजय कुंभार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. माहिती अधिकार कायदा कामात संवाद साधला जावा आणि अडीअडचणी समजावून घेऊन उपाय शोधावे यावर या कौन्सिलमध्ये चर्चा होणार आहे. या कौन्सिलचे कामकाज हे सामूहिक नेतृत्व व निर्णय प्रकिया या आधारे चालणार आहे...
  June 11, 02:38 AM
 • पुणे - मनसेचे आमदार रमेश वांजळे यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात व साश्रू नयनांनी निरोप देत अंत्यसंस्कार करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह, लोकसभेतील भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे, मनसेचे गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.शनिवारी सकाळी धायरीतील निवासस्थानापासून त्यांच्या अंत्ययात्रेस सुरवात झाली. या अंत्ययात्रेला मोठी जनसमुदाय लोटला होता. पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल, मनसे आमदार शिशिर...
  June 10, 11:26 PM
 • पुणे - खडकवासला विधानसभा मतदार संघाचे मनसेचे आमदार रमेश वांजळे यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना जहांगिर रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.वांजळे यांच्यावर उपचार सुरु असून, रुग्णालयाकडून अद्याप काही स्पष्ट करण्यात आलेले नाही. रमेश वांजळे हे महाराष्ट्रात गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध होते. वांजळे यांना शुक्रवारी सकाळपासून छातीत दुखण्याचा त्रास होत होता. त्यामुळे सकाळपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वांजळे यांच्या...
  June 10, 09:24 PM
 • पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे यंदाही दहावीच्या परीक्षेत झळकण-या गुणवंत विद्यार्थ्याला एक लाख रुपयांचे बक्षिस देऊन त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या 18 माध्यमिक विद्यालयातून दहावीच्या परीक्षेत झळकणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी महापालिकेतर्फे सत्कार केला जातो. यंदाही परंपरा कायम ठेवली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यासाठी 30 हजार रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. त्यास मंजूरी देण्याचा प्रस्ताव स् थायी समितीकडे पाठविण्यात आला असल्याचे सूत्रांनी...
  June 10, 01:02 PM
 • पुणे- भीमाशंकर अभयारण्याची ओळख असणा-या शेकरूंची (जायंट स्क्वारल) यावर्र्षी प्रथमच जीपीआरएसद्वारा गणना करण्यात आली. या गणनेनुसार या ठिकाणी सुमारे दोन हजार शेकरू असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक एम. के. राव यांनी दिव्य मराठीला दिली. बुद्धपौर्णिमेच्या आठवड्यात अभयारण्यातील वन्य प्राण्यांची गणना करण्यात येते. त्यानुसार भीमाशंकरमध्ये ही गणना करण्यात आली. त्यासाठी प्रथमच जीपीआरएसचा वापर करण्यात आला. २५ मेपासून शेकरूगणनेला सुरुवात करण्यात आली. एम. के. राव यांच्या...
  June 10, 02:18 AM
 • पुणे- अहिंसा या तत्त्वावर विश्वास आहे. मी त्याचा पाईक आहे. त्यामुळे बाबा रामदेव यांच्या सशस्त्र युवकांचे दल उभारण्याच्या भूमिकेला माझा पाठिंबा नाही. या मुद्याबाबत आमच्या भूमिका आणि आमचे मार्ग वेगळे आहेत, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शुक्रवारी पुण्यात दिले.बाबा रामदेव यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हजारे यांनी बुधवारी एक दिवसीय उपोषण केले होते. त्यानंतर एका पूर्वनियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आज सकाळी त्यांचे शुक्रवारी सकाळी...
  June 10, 02:00 AM
 • पुणे: अहिंसा या तत्त्वावर माझा विश्वास आहे. मी त्याचा पाईक आहे. त्यामुळे रामदेव बाबांच्या सशस्त्र युवकांचे दल उभारण्याच्या भूमिकेला आपला विरोध असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज, (गुरुवारी) पुणे विमानतळावर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या मुद्याबाबत बाबा आणि आमच्या भूमिका आणि मार्ग वेगळे आहेत, असेही अण्णा यावेळी म्हणाले.रामदेव बाबा यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी (ता. 8) दिल्लीतील राजघाटावर एक दिवसीय उपोषण केले होते. त्यानंतर एका पूर्व नियोजित...
  June 9, 06:09 PM
 • पुणे- जर्मन बेकरीत घडविलेल्या बाँबस्फोटाचा सूत्रधार हिमायत मिर्झा बेग (वय २९) याच्याविरुद्ध १८ जूनपासून आरोपनिश्चिती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे जिल्हा मुख्य न्यायाधीश ए. एम. बदर यांनी सांगितले. सरकार आणि बचाव पक्षाच्या वकिलांची सहमती यासाठी घेतली आहे. दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) सहायक पोलिस आयुक्त विनोद सातव यांनी मंगळवारी बेग याला न्यायालयात हजर केले. या खटल्याची सुनावणी मंगळवारी प्रथम सुरू झाली. एटीएस पथकाने बेगला चार डिसेंबरला अटक केली होती.
  June 9, 02:13 AM
 • पुणे- पुणे महानगरपालिकेच्या वतीने बाणेर येथे उभारण्यात येणा-या सचिन तेंडुलकर संग्रहालयाविषयी स्वत: सचिनने उत्सुकता दाखवली आहे. सचिनचे क्रिकेट साहित्य, त्याची छायाचित्रे, त्याने गाजवलेल्या सामन्यांची क्षणचित्रे, लेख असे एक संग्रहालय उभारण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला होता. त्यासाठी ४० कोटींचा निधी मिळणार असल्याचे समजते. एका कार्यक्रमासाठी आला असताना सचिनने याविषयी स्थायी समिती अध्यक्ष गणेश बिडकर यांच्याकडून माहिती घेतली.
  June 9, 02:07 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात