जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे- बिहारचे माजी राज्यपाल, ख्यातनाम शिक्षणसम्राट डी.वाय. पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. लवकरच ते शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील. पूर्वाश्रमीचे काँग्रेसमध्ये असलेले पाटील राज्यपाल झाल्यापासून राजकारणापासून दूरच हाेते. त्यांचे पुत्र सतेज काेल्हापुरातून काँग्रेसचे आमदार आहेत.
  December 24, 07:40 AM
 • पुणे- त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि काँग्रेस येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी रविवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले आहे. मुलाचा मुख्य विरोधक ज्या पक्षात आहेत, त्याच पक्षात डी. वाय. पाटील यांनी प्रवेश केल्याने कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. डी.वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे...
  December 23, 05:31 PM
 • पुणे- गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील एका शाळेत घडली आहे. शाळेत विद्यार्थिनीना मोबाईलवर अश्लील क्लिप दाखवून त्यांच्याशी अश्लील चाळे करत होता. गोटेवाडी (ता.तासगाव) जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली असून सहाय्यक शिक्षक उत्तम कांबळे (35, मूळ गाव: विसापूर, ता. तासगाव) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. अश्लील क्लिप दाखवून गैरवर्तन करत होता भामटा.. आरोपी शिक्षक काही विद्यार्थिनींना आपल्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ क्लिप दाखवून त्यांच्यासोबत...
  December 23, 02:40 PM
 • पुणे- पुण्याचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर आणि त्यांची सहकारी साधना वर्तक यांनी अदिती माधव दीक्षित व मेधा प्रभाकर दीक्षित यांच्या नावे कुलमुखत्यारपत्र 5463/2003 व 5614/2003 दस्तऐवज बनवून शिवाजीनगर येथील प्लॉट क्रमांक 529 वरील 20 हजार चौरस फूट जागा आपल्या ताब्यात असल्याचे भासवले. त्याआधारे रास्ता पेठ येथील मुकुंद दीक्षित यांच्याकडून 50 हजार चौरस फूट जागा दीड कोटी रुपयांना विकत घेऊन त्या जागेच्या बदल्यात शिवाजीनगर येथील जागा देणार असल्याचे सांगितले. तसेच 45 लाख 90 हजार रुपये कमी...
  December 22, 06:07 PM
 • पुणे- चित्रपट रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण करणाऱ्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रख्यात आसामी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक जानू बरूआ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानिमित्त देण्यात येणारा झेनिथ एशिया सन्मान यंदा ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आशय फिल्म क्लबचे प्रमुख आणि आशियाई चित्रपट महोत्सवाचे संयोजक सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव यांनी शनिवारी दिली. नवसिनेमाचे प्रणेते...
  December 22, 05:38 PM
 • पुणे- पोलिसाच्या पत्नीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. ही खळबळ जनक घटना मगरपट्टा, हडपसर येथे आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासुरवासला कंटाळून तिने मुलाचा खून करुन आत्महत्या केल्याची चर्चा संबंधित परिसरात आहे. हडपसर पोलिस ठाण्यातील तपास पथकात काम करणारा पोलीस कर्मचारी अमित दत्तात्रय कांबळे यांची पत्नी जान्हवी अमित कांबळे हिने आपल्या अवघ्या दोन वर्षांच्या कोवळ्या...
  December 22, 05:30 PM
 • पुणे- सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील भोजलिंगच्या भाविकांची जीप सुमारे 250 फूट दरीत कोसळली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. मिळालेली माहिती अशी की, माण तालुक्यातील डोंगरावर भोजलिंग हे देवस्थान आहे. सांगलीच्या आटपाडीतील विठलामपूर गावातील भाविक जीपने देवदर्शनाला जात होते. चालकाचा वाहनावरील ताबा सुटून जीप थेट दरीत कोसळली. या भीषण अपघातात 3 भाविक जागीच ठार झाले असून 12 जण जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सध्या सुरू असून...
  December 22, 02:32 PM
 • पुणे- कर्जत (जि. नगर) येथील दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ ताैसिफ शेख याने गुरुवारी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आत्मदहन केले. ताैसिफ याने प्रशासनाला आत्मदहनाची पूर्वकल्पना देऊनही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले, अशी खंत ताैसिफचे काका राजू कलिंदर शेख यांनी व्यक्त केली. ताैसिफ राॅकेल ओतून घेत पेटवून घेईपर्यंत आणि नंतर जळत असताना परिसरात उपस्थित असलेल्या शेकडाे लाेकांनी त्याचे फाेटाे, व्हिडिओ...
  December 22, 09:52 AM
 • पुणे- योगाचार्य बी.ए. अय्यंगार यांना त्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त सर्च इंजिन गुगलने आज त्यांना अनोखी आदरांजली अर्पण केली आहे. गुगलने डूडलच्या माध्यमातून अॅनिमेटेड योगासने दाखवली आहेत. विशेष म्हणजे ही आसनं G O O G L E या अक्षरात बसविली आहेत. अय्यंगार यांचा आजच्या दिवशी म्हणजे 14 डिसेंबर 1918 रोजी कर्नाटकमधील बेल्लूर येथे जन्म झाला होता. गेल्या वर्षी 20 ऑगस्ट 2014 रोजी त्यांचे पुण्यात वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले होते. लहान वयातच पुण्यात दाखल होत त्यांनी योगसाधनेला वाहून घेतले होते. योग ही भारताची...
  December 20, 04:42 PM
 • पुणे- खलिस्तानवादी चळवळीशी संबंध असल्याच्या कारणावरून दहशतवादविराेधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या हरपालिसंग प्रतापसिंग नाईक (४२,रा.बेल्लरु, कर्नाटक) याचा २० देशांतील लाेकांशी संपर्क तसेच त्यांचे क्रमांक त्याच्या माेबाइलमध्ये सापडल्याची माहिती एटीएसने न्यायालयात साेमवारी दिली. एटीएसने त्याला विशेष न्यायाधीश किशाेर वढणे यांचे न्यायालयात हजर केले असता त्याची पाेलिस काेठडीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. हरपालिसंग याने दहशतवादी टाेळी स्थापन करून खलिस्तानच्या...
  December 18, 08:47 AM
 • पुणे- रफाल विमान खरेदीप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाची दिशाभूल केली आहे. न्यायपालिकेचा अवमान केला आहे. यासंबंधी गांधींनी देशाची माफी मागावी. नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा देशभरच्या काँग्रेस कार्यालयांसमोर आंदोलन करेल, असा इशारा भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांनी साेमवारी दिला. रफाल विमान खरेदी प्रकरणात अनियमितता झाली नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतरही राहुल गांधी खोटी माहिती देऊन न्यायपालिकेचा अवमान करत आहेत. त्यांनी खुल्या...
  December 18, 08:43 AM
 • औरंगाबाद, नाशिक, पुणे- उत्तर भारतातून येणारे थंड वारे आणि महाराष्ट्रात वाढलेले हवेचे दाब यामुळे राज्य गारठले आहे. पश्चिम तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आठवडाभर थंडीचा मुक्काम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, कडाक्याच्या थंडीमुळे कोल्हापुरात रस्त्यावर झोपलेल्या दोन व्यक्तींचा गारठून मृत्यू झाला आहे. सोमवारी...
  December 18, 07:54 AM
 • पुणे- पतीचे शाळेतील एका तरुण शिक्षिकेसोबत अवैध संबंध होते. याबाबत पत्नीला कुणकुण लागते. पत्नी दोघांवर पाळत ठेवते. पाठलाग करून दोघांचे तसल्या अवस्थेतील फोटो काढते. नंतर पतीसह शिक्षिकेला तेच फोटो दाखवून 10 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करते, हे काही एखाद्या सिनेमाचे कथानक नाही तर पुण्यात अशीच एक घटना समोर आली आहे. तळेगाव दाभाडे येथे ही घटना घडली आहे. मिळालेली माहिती अशी की, आरोपी अमोल गायकवाड याने त्याच्या शाळेतील एका 29 वर्षीच्या शिक्षिका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेगवेगळ्या...
  December 18, 12:10 AM
 • बारामती- आघाडी सरकारमधील अधिक आक्रमक बनून काँग्रेसशी काडीमोड घेणार्या राष्ट्रवादी काँग्रेसने मागील विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवल्याने राज्यातील सत्ता गेली. त्यामुळे वेळीच सावध झालेल्या अजित पवारांनी अतिमहत्वाकांक्षी न बनण्याचा सूचत इशारा कार्यकर्त्यांना दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्यासाठी जिवाचे रान करणार्या कार्यकर्त्यांना खुद्द अजित पवारांनी मला भावी मुख्यमंत्री म्हणून नका, अथवा पवारसाहेबांना भावी पंतप्रधान संबोधू...
  December 17, 02:40 PM
 • बारामती- मदतीच्या बहाण्याने विश्वास संपादन करून महिलांवर अत्याचार करणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला बारामती पोलिसांनी अटक केली आहे. एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याच्याविरोधात अन्य एका महिलेनेही बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. मच्छिंद्र टिंगरे असे या आरोपीचे नाव अाहे. तक्रारीनुसार, संपत्तीच्या कारणावरून पीडितेच्या पतीने तिच्या वडिलांसह बहिणीची हत्या केली होती. या प्रकरणी तिचा पती तुरुंगात आहे. दरम्यान, मच्छिंद्रने तिचा विश्वास संपादन केला. तुरुंगातून...
  December 17, 12:23 PM
 • पुणे- शाळेत मुलांना शिक्षा केल्याने संतप्त पालकांनी बेदम मारहाण केल्याने मुख्याध्यापकाने कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी घडलेली ही घटना मृत मुख्याध्यापकाच्या पत्नीने सिंहगड पोलिसांत तक्रार दिल्यानंतर उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक कावरे (४९, रा. सिंहगड रस्ता) असे मृत मुख्याध्यापकाचे नाव आहे. कावरे यांच्या पत्नी वर्षा यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार नवनाथ पारगे, बाळासाहेब...
  December 16, 09:16 AM
 • पुणे- रफाल विमान खरेदीप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने किमतीबाबत काेणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. याप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयात चार स्वतंत्र याचिका दाखल करण्यात अाल्या हाेत्या. त्यामध्ये काँग्रेसचा समावेश नव्हता. मात्र, या विमान खरेदी गैरव्यवहाराबाबत देशभरात काँग्रेसने आघाडी उघडली असून सरकार विमान खरेदीची किंमत अजूनही स्पष्ट करत नाही. आगामी निवडणुकीत रफाल विमान घाेटाळा जनतेसमाेर मांडला जार्ई आणि ताे काँग्रेसच्या निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा असेल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री...
  December 16, 09:08 AM
 • पुणे- साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. उसाच्या हार्वेेस्टरसाठी राज्य शासनाने ४० लाखांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून एफआरपी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. मराठवाड्यात जालना येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची घोषणाही त्यांनी केली. मांजरी, पुणे येथे वसंतदादा शुगर...
  December 16, 07:53 AM
 • पुणे- पुण्यातील डोणजे येथील विद्या निकेतन माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने कॅनॉलमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली. अशोक कावरे असे आत्महत्या केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी वर्षा अशोक कावरे (वय-49, रा. रश्मी हाऊस, लगडमळा, सिंहगड रोड, वडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये 3 महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप वर्षा कावरे यांनी केला आहे. 9 वीच्या...
  December 15, 05:47 PM
 • पुणे- सांगली येथील शांती निकेतन ओपन युनिव्हर्सिटीमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. प्राध्यापकाने केलेली शरीर सुखाची मागणी पूर्ण न करणार्या विद्यार्थिनीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीचा मृतदेह क्लासरुममध्ये आढळून आला. भिंतीवर डोके आपटून विद्यार्थिनीची हत्या करण्यात आल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. प्राध्यापकाने केली होती शरीर सुखाची मागणी.. मिळालेली माहिती अशी की, आरोपी प्राध्यापक ऋषिकेश मोहन कुडाळकर हा मृत...
  December 15, 12:54 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात