Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे- पुण्याजवळच्या तळेगाव ढमढेरे येथे सातशे पाच वर्षे जुना शिलालेख सापडला आहे. यादव राजघराण्यातील रामदेवराय यादव यांचा हा शिलालेख असल्याची माहिती ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आणि डॉ. पद्माकर गोरे यांनी दिली. या शिलालेखामुळे बाराव्या - तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या आणि विशेषत: यादवांच्या इतिहासावर नवा प्रकाश पडण्याची शक्यता आहे, असे मत या संशोधकांनी व्यक्त केले. तळेगाव ढमढेरेचा परिसर अनेक जुन्या गढ्या, मंदिरे, वाडे यांनी युक्त आहे. येथील एका जुन्या गढीच्या खोदकामात हा...
  August 27, 06:49 AM
 • पुणे - वैद्यकीय व्हिसावर आलेल्या परदेशी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त करण्यात आल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. कोंढव्यातील एका सोसायटीत छापा टाकून पोलिसांनी दोघींची सुटका केली. याप्रकरणी दलालाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोंढव्यातील शालिमार सोसायटीत परदेशी तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून दोन परदेशी तरुणींची सुटका करून त्यांना सुधारगृहात पाठवले.
  August 26, 10:49 AM
 • पुणे- बारामती येथे रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून आकांक्षा दरेकर या अकरावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. यापार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी महिला सुरक्षेला प्राधान्य देत निर्भया पथक आणि दामिनी पथकांची संख्या दुप्पट केली आहे. तर प्रत्येक गावात महिला सुरक्षा समिती तयार करण्यात येणार असून त्यांची सदस्य संख्या 100 पर्यंत वाढविण्यात आली आहे. पुणे जिल्हयातील सर्व शाळा आणि महाविद्यालयात सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात येणार असून पुढील...
  August 25, 06:37 PM
 • पुणे- गणेशोत्सवाला माेठी परंपरा असून माेठ्या थाटामाटात हा उत्सव पार पाडला जाताे. मात्र, उत्सवादरम्यान काही कार्यकर्ते विसर्जन मिरवणुकीत मद्यपान करून धिंगाणा घालतात. त्यामुळे उत्सवाला गालबाेट लागते, याचे भान कार्यकर्त्यांनी बाळगले पाहिजे. गणेशोत्सवादरम्यान दारू प्याल तर ११ दिवस पाेलिस काेठडी दिली जाईल, असा सबुरीचा इशारा अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय...
  August 25, 08:14 AM
 • पुणे- फर्ग्युसन महाविद्यालयातील मुख्य इमारतीच्या कार्यालयात दरवर्षी श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेचे अायाेजन करण्यात येते. त्यानुसार शुक्रवारीही ही पूजा अायाेजित करून महाविद्यालयाच्या फळ्यावर सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे अावाहन करण्यात अाले हाेते. मात्र, यंदा काही विद्यार्थी संघटनांनी त्याला अाक्षेप घेतला. शैक्षणिक संस्थेत केवळ एकाच धर्माचे उदात्तीकरण व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासाठी सत्यनारायण पूजा केली जात अाहे, असा अाराेप करत त्यांनी प्राचार्यांच्या...
  August 25, 07:06 AM
 • पुणे- बारावीच्या फेरपरीक्षेचा राज्याचा निकाल २२.६५ टक्के लागला. या परीक्षेसाठी १ लाख दोन हजार १६० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २३,१४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जुलै-ऑगस्ट महिन्यात ही परीक्षा झाली हाेती. गुणपडताळणीसाठी २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत मुदत अाहे. २७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळेल. सहा विषयांसाठी पुनर्मूल्यांकन करता येईल. विभागनिहाय निकाल पुणे २०.७७% नागपूर २५.५१ औरंगाबाद २८.५० मुंबई १९.२७ अमरावती २१.४४ नाशिक २२.३२ लातूर ३१.४८ कोकण १९.७५...
  August 25, 06:21 AM
 • पुणे- लोणावळ्याजवळील मंकीहिल येथे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे गाडी समोरच भले मोठे दगड कोसळले. इंजिन ड्रायव्हरच्या सकर्ततेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी मार्गस्थ झाले. दरम्यान, मुंबई-पुणे रेल्वेमार्ग ब्रिटीशकालीन आहे. या परिसरात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. दुसरीकडे, खर्डी रेल्वे स्थानकाजवळ भुसावळ-पुणे एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला...
  August 24, 02:14 PM
 • पुणे- पुणे रेल्वेस्थानकातून १७ अाॅगस्ट राेजी झाेपलेल्या संगीता अानंद कंग (२५, रा. काेपार्डे, ता. करवीर, जि. काेल्हापूर) या महिलेचा चार महिन्यांचा मुलगा पळवून नेण्यात आला होता. याप्रकरणी पुणे लाेहमार्ग पोलिसांनी एका भिकारी खबऱ्यामार्फत माहिती काढली असता लहान मुलास पळवणारी महिला मुंबईतील जाेगेश्वरी येथे भीक मागत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार महिलेला अटक करून बाळाची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, लहान मूल कडेवर असल्यामुळे लाेक जास्त भीक देतात, त्यामुळे मुलगा पळवल्याची कबुली...
  August 24, 10:23 AM
 • पुणे- फळ बागायतदारांचे पैसे थकवणाऱ्यांमध्ये दिल्ली मार्केटचे नाव देशात मोठे आहे. दिल्लीत माझ्याकडे यासंदर्भातल्या खूप तक्रारी येत असतात. शेतकऱ्यांची पट्टी बुडवणाऱ्या अशा व्यापाऱ्यांविरोधात आणखी कडक कायदे केले पाहिजेत, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या ५८ व्या वार्षिक अधिवेशनाचे उद््घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार,...
  August 24, 09:29 AM
 • पुणे- जगभरातील लेखक, संपादक, साहित्यिक यांची प्रतिष्ठित संघटना असलेल्या पेन इंटरनॅशनलचे वार्षिक अधिवेशन पेन इंटरनॅशनल काँग्रेस हे यावर्षी पहिल्यांदाच भारतात भरणार आहे. 25 ते 29 सप्टेंबर या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने पुण्यात हे अधिवेशन होईल. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ज्ञ आणि या परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ. गणेश देवी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पेनची स्थापना 1921...
  August 23, 09:07 PM
 • पुणे- बारामतीत रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धम्मादायक घटना घडली आहे. आकांक्षा प्रदीप दरेकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आकांक्षाने गोचिड मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या केली. आकांक्षा ही दरेकर वस्तीत (सोनगाव) राहत होती. झारगडवाडी येथील काॅलेजात ती अकरावीत शिकत होती. मागील एक महिन्यापासून तिला काही रोड रोमिओ त्रास देत होते, या त्रासाला कंटाळून तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी बारामती...
  August 23, 02:42 PM
 • पुणे - कात्रज परिसरातील किनारा हाॅटेल येथे पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणारे रॅकेट उघडकीस अाणले अाहे. याप्रकरणी पाेलिसांनी हाॅटेलचा व्यवस्थापक अनिल श्रीधर पुजारी आणि चित्तरंजन दामाेदर शेट्टी यांना अटक केली. या छाप्यात पाेलिसांनी साेलापूर येथील ३० वर्षीय तरुणी व पुण्यातील हडपसर येथील २० वर्षीय तरुणीची वेश्याव्यवसायातून सुटका केली अाहे. याप्रकरणी अाराेपींविराेधात भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. किनारा लाॅजचे व्यवस्थापक...
  August 23, 02:00 AM
 • पुणे - कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणात डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल डाटा गोळा करण्यात आला आहे. या सायबर हल्ला तपासणीसाठी काही खासगी संस्थांचीदेखील मदत घेण्यात येत असल्याची माहिती सायबर शाखेचे विशेष पोलिस महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी बुधवारी दिली. ब्रिजेश सिंह म्हणाले, कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणात काही किरकोळ रिकव्हरी तपास पथकाकडून करण्यात आली आहे. जेव्हा सायबर हल्ला झाला तेेव्हा मालवेअर फंक्शनिग अॅक्टिव्हिटी असल्यामुळे बँक ग्राहक असलेल्या काही लोकांच्या खात्यांत पैसे जमा...
  August 23, 01:40 AM
 • पुणे- आजही समाजात महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. परिणामी, पुरुषासत्ताक व्यवस्थेत बहुतांश महिलांना हीन वागणूक मिळते. देहविक्रीच्या दलदलित अडकलेल्या महिलांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाश. दिवसा भरतो पुस्तकाचा बाजार, रात्री चालते देहविक्री पुणे येथील बुधवार पेठ. पुण्यातील पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ असलेला अप्पा बळवंत चौक येथेच आहे. या चौकात दिवसभर पुस्तके खरेदी करणाऱ्यांची गर्दी होते तर सूर्य मावळतीकडे जाताना या परिसरात वेश्या बाजार गजबजतो. सेक्स वर्कर्सच्या समस्या...
  August 22, 12:50 PM
 • पुणे- अंनिसचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांचा खून झाल्यानंतर पाेलिसांकडून काेणताच तपास तातडीने सुरू झालेला नव्हता. मात्र, अर्ध्या तासातच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी काहीच पुरावा हाती नसताना उजव्या विचारसणीच्या लाेकांचा यात सहभाग असल्याचे सांगत सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली. या वक्तव्यामुळे खरे मारेकरी पसार झाले व तपास यंत्रणाची दिशा भरकटत गेल्याचा आरोप सनातन संस्थेचे अधिवक्ता पराग गाेखले यांनी केला आहे. पुराेगाम्यांच्या हत्या झाल्यावर निष्पाप...
  August 22, 07:45 AM
 • पुणे - ठाणे-पुणे या महामार्गावरील माळशेज घाटात दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची घटना रात्री अडीच वाजेदरम्यान घडली. माळशेज घाटातल्या बोगद्याजवळ रात्री अडीच वाजेच्या सुमारास दरड कोसळून एक ट्रकचा चुराडा झाला आहे. यात ट्रकचालक अमोल दहिफळे गंभीर झाला असून आणखीही काही जण अडकलेले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या दरड हटवण्याचे काम सुरू आहे. परंतु, घाटात धुकं आणि पाऊस असल्याने या कामात अडथळे येत आहेत, अशी माहिती निवासी...
  August 21, 09:57 AM
 • पुणे- भाजप सरकारविराेधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेनंतर अाता काँग्रेसनेही स्वतंत्रपणे जनसंघर्ष यात्रा काढण्याची घाेषणा केली अाहे. त्याची सुरुवात ३१ ऑगस्टला कोल्हापुरातून होणार आहे. यात्रेचा पहिला टप्पा पश्चिम महाराष्ट्रातल्या ५ जिल्ह्यांत असेल. ८ सप्टेंबर राेजी पुण्यात समाराेप हाेईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. त्यानंतर गणेशोत्सवाचे दिवस असल्याने तो संपल्यावर जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा खान्देशात सुरू होईल, असेही ते...
  August 21, 09:27 AM
 • पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येला तब्बल पाच वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही त्याचे मारेकरी, सूत्रधार सापडत नसल्याने सामान्य माणसाच्या मनात अस्वस्थता अाहे. एक मारेकरी याप्रकरणी सापडणे ही तपासाची सुरुवात असून मागील पाच वर्षांत केवळ दाेन अाराेपींना अटक हाेत असेल तर या गतीने पुढे किती काळ तपास चालणार हा प्रश्नच अाहे. शासनाविराेधात काेणी काही बाेलले तर संबंधित लाेकांच्या विचारांची मुस्कटदाबी हाेते. मात्र, लाेकशाहीत विचार स्वातंत्र्य,...
  August 21, 09:20 AM
 • पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यांमागे सनातन संस्थेचा हात असल्याचा अाराेप करत या संघटनेवर देशव्यापी बंदी घालण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. मात्र या संस्थेला राजकीय पाठबळ मिळत असल्याचा संशयही काँग्रेसने व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांनीही सनातनवर बंदी घालण्याची आग्रही मागणी सोमवारी पुण्यात केली. हिंदुत्ववादी संघटना समाजविघातक, राष्ट्रविरोधी कृत्ये करत असतील...
  August 21, 09:07 AM
 • सांगली- काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि पूर्व मंत्री पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला असलेली सांगली- मिरज- कुपवाड महापालिकेवर भाजपने आपले कमळ फुलविले आहे. महापौरपदी भाजपच्या संगीत खोत यांची निवड झाली आहे. हात उंचावून झालेल्या मतदानात संगीता खोत यांना 42 मते तर काँग्रेस आणि आघाडीच्या उमेदवाराला 35 मते मिळाली. संगीता खोत यांचा 7 मतांनी विजय झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून वर्षा अमर निंबाळकर याना 35 मते मिळाली. उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. सूर्यवंशी यांना 42 तर...
  August 20, 06:07 PM
 
जाहिरात

RECOMMENDED