जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे - आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहू येथून पंढरीच्या दिशेने निघणाऱ्या लक्षावधी वारकरी बांधवांमध्ये अवयवदानाविषयी जागृती निर्माण करण्याचे विशेष अभियान यंदा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वारी सोहळ्यात राबवण्यात येणार आहे. तुकोबांच्या वारी सोहळ्याचे फेसबुक पेज दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून त्यावरही देह पंढरी अभियान चालवले जाणार आहे. आषाढी वारीसाठी देहू येथून संत तुकोबांचा पालखी सोहळा २४ जून रोजी प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळ्याचे हे ३३४ वे वर्ष आहे. पालखी सोहळ्यासाठी खास...
  June 13, 09:39 AM
 • पुणे - काॅसमाॅस बँकेचे मुख्यालय असलेल्या पुण्यातील शाखेतील एटीएम स्विच सर्व्हर सायबर भामट्यांनी हॅक करून बँकेच्या व्हिसा व रुपे डेबिट कार्डधारकांची माहिती आधी चाेरली. त्याआधारे व्हिसा डेबिट कार्डद्वारे ३० देशांत मिळून एकाच वेळी ९४ काेटी ४२ लाख रुपये काढून घेतल्याची घटना आॅगस्ट २०१८ मध्ये घडली हाेती. सायबर गुन्हे शाखेने आतापर्यंत १३ आराेपींना अटक करून त्यांच्याकडून केवळ १० लाख रुपयेच वसूल केले. वेगवेगळ्या देशांतील आंतरराष्ट्रीय हॅकर्सची टाेळी या गुन्ह्यात कार्यरत असल्याने...
  June 13, 09:34 AM
 • पुणे - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी झारखंडमध्ये फादर स्टॅन स्वामी यांच्या घरावर छापा टाकला. पुणे पोलिसांनी बुधवारी सकाळी ही कारवाई केली. पोलिस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम यांनी स्टॅन स्वामींच्या घरातून डिजिटल डिव्हाइस आणि इतर काही साहित्य जप्त केले अशी माहिती दिली. पुण्यातील एल्गार परिषदेवर बंदी नंतर माओवाद्यांशी संपर्क असल्याच्या संशयावरून 5 जणांना अटक केली. त्यावेळी सुद्धा पोलिसांनी स्टॅन यांच्या घरावर छापा टाकला होता. परंतु, तेव्हा स्टॅन स्वामींना...
  June 12, 12:19 PM
 • पुणे - पुण्यातील चंदन नगर परिसरात एका विद्यार्थिनीचा खून झाल्याची धक्कादायक माहिती बुधवारी सकाळी समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला तिचा प्रियकर सध्या फरार असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने चंदननगर येथे राहणाऱ्या तरुणीच्या घरात घुसून मंगळवारी रात्रीच तिचा खून केला. पीडित तरुणी मूळची गोंदिया येथील रहिवासी असून ती पुण्यात शिक्षण घेतानाच नोकरी सुद्धा करत होती. दुसऱ्या तरुणासोबत अफेअर असल्याचा होता संशय गोंदियातील असलेली...
  June 12, 11:48 AM
 • पुणे - पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला अनावर ओढीने जाणाऱ्या आषाढी वारीमध्ये यंदा हजारोंच्या संख्येने तरुणाईचा सहभाग असणार आहे. ही तरुणाई लक्षावधी वारकऱ्यांच्या साथीने वारीमार्गावर वाटचाल करणार असून स्वच्छतेपासून जनजागृतीपर्यंत अनेक उपक्रमांत सामील होणार आहे. यामध्ये महाविद्यालयीन युवा वर्गाचा सर्वाधिक वाटा असणार आहे. आषाढी वारीचे आगमन उंबरठ्यावर आहे. यंदा २४ जूनपासून वारीला प्रारंभ होत आहे. प्रशासकीय पातळीवर वारीसाठी विविध सोयी-सुविधांच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू झाले...
  June 12, 10:00 AM
 • मुंबई-लोकसभेचा निकाल ईव्हीएमचा होता की काय, याबाबत अनेक शंकाकुशंका आहेत. यासंदर्भात दिल्लीत लवकरच सर्व विरोधी पक्षांबरोबर संयुक्त बैठक घेण्याचे नियोजन असून या क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनही वस्तुस्थिती जाणून घेत आहोत, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी साेमवारी ईव्हीएमविरोधात राष्ट्रीय पातळीवर व्यापक आघाडी उघडण्याचे संकेत दिले. मात्र, याच कार्यक्रमात पवारांचे पुतणे व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र...
  June 11, 06:52 AM
 • पुणे -अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरात दगड फाेडण्याचे काम करणारे अल्पशिक्षित तरुण आता चीन, व्हिएतनाम, मलेशिया, मकाऊ, कंबाेडिया आणि अन्य देशांत याेग प्रशिक्षक म्हणून कार्यरत हाेऊ लागले आहेत. माेक्ष याेग संस्थेचे संस्थापक देवा म्हालू व त्यांची पत्नी वंदना म्हालू यांच्या प्रयत्नातून ही किमया साधली गेली आहे. दगड फाेडण्यासाठी हाताेड्यावर कठाेर घाव घालणारे या तरुणांचे हात आता विविध याेगमुद्रेत गुंतले गेले आहेत. नगरसह राज्याच्या अन्य भागांतून आलेले माेक्ष याेग संस्थेतील १०० युवक...
  June 11, 04:03 AM
 • पुणे -शहरातील एका नामांकित रूग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीची फेसबुकवरुन झालेल्या ओळखीतून नऊ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत २५ वर्षीय डॉक्टर युवतीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारादार युवती सध्या एरंडवणे भागात वास्तव्यास असून ती मूळची आंधप्रदेशातील काकीनाडा भागातील रहिवासी आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, हर्षा चेरकुरी उर्फ वामसी मनोहर जोगडा याच्यासह एक महिला तसेच बँक खातेदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
  June 10, 10:24 AM
 • पुणे -रत्नाकर गुट्टे यांनी ३२८ कोटी रुपयांची बेकायदेशीर बेनामी संपत्ती जमवल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची कागदपत्रे जप्त केली. या प्रकरणावर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान व मुख्यमंत्री हे कार्यक्षम असतील तर मी यादीत दिलेल्या साखर कारखानदारांची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी. घोटाळेबाज कारखानदारांना चौकशीची भीती दाखवून लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक कारखानदारांचा पक्षात राजकीय प्रवेश करून घेतला. रत्नाकर...
  June 9, 10:59 AM
 • पुणे -मारुंजी येथे हिंजवडी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, तर चार तरुणीचींची वेश्या व्यावसायतून सुटका करण्यात आली आहे. आर्यन उर्फ विश्वास बळिराम सावरगावकर (३४, रा. लाईफ रिपब्लिक, कोलते पाटील इस्टेट, मारूंजी आणि कोथरूड), नितीन शरद भालेराव (२५, रा.मारूंजी), अभय सज्जनराव शिंदे (२५ रा. मारूंजी), मयूर गणेश शर्मा (२८, मूळ रा. भोपाळ, सध्या...
  June 9, 10:52 AM
 • पुणे -पुण्यातील हडपसर भागातील एकाने समाजमाध्यमात आत्महत्या करत असल्याची माहिती प्रसारीत केली. राज्य सायबर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने या संदेशाची माहिती पोलिसांना दिली. अवघ्या तीस मिनिटांत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्या व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त केले. प्रकाश गोरे (३०) असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळ उस्मानाबादचा रहिवासी आहे. पुण्यात कॅबचालक म्हणून तो काम करत आहे. मुंबईतील सायबर...
  June 9, 10:01 AM
 • पुणे -दहावीचा निकाल जाहीर झाला.. त्यानंतर चर्चा सुरू झाली सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची. या सर्वांमध्ये पुण्याच्याही एका विद्यार्थ्याचे नाव चर्चेत आहे.. ताे म्हणजे श्रावण राजेश साळुंके.. हा पठ्ठ्या सर्वच्या सर्व विषयात प्रत्येकी ३५ गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. धनकवडी परिसरातील रोहन माध्यमिक विद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. निकालानंतर त्याच्या नावाची चर्चा सुरू आहे.. सर्वच विषयात १०० गुण मिळवणे जितकं अवघड तितकंच काहीसे सर्व विषयात ३५ गुण मिळवणे अवघड.. पण पुण्यातील श्रावण या...
  June 9, 09:40 AM
 • पुणे -राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीचा निकाल शनिवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. राज्याच्या नऊ विभागीय मंडळांतील सर्वच केंद्रांच्या निकालात यंदा मोठी घसरण झाली असून राज्याचा एकूण निकाल ७७.१० टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही घसरण बारा टक्क्यांची आहे. २००६ मध्ये दहावीचा निकाल ७२.७२ टक्के लागला होता. २००७ मध्ये ७८.६७ टक्के निकाल होता. त्यानंतर एका तपानंतर निकालात इतकी मोठी घसरण झाली आहे. दरवर्षीप्रमाणे सावित्रीच्या लेकींनी यंदाही...
  June 9, 08:28 AM
 • मुंबई / पुणे / औरंगाबाद - राज्यात एसएससी अर्थात दहाव्या वर्गाचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. यावर्षी 12 लाख विद्यार्थी पास झाले असून एकूणच उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींची आकडेवारी 77.10 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 12 टक्क्यांनी कमी लागला आहे. नेहमी प्रमाणेच यावेळी सुद्धा मुलींनी बाजी मारली. तर कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 88.38 टक्के लागला आहे. बोर्डानिहाय निकालाची टक्केवारी पाहिल्यास नेहमीप्रमाणेच कोकणचा निकाल 88.38 टक्क्यांसह टॉपवर आहे. तर नागपूरचा निकाल सर्वात कमी आला...
  June 8, 02:22 PM
 • पुणे- नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर दहावीचेविद्यार्थी आपल्या निकालाची प्रतिक्षा करत होते, पण त्यांची ही प्रतिक्षा आता संपणार आहे. दहावीच्या निकालाची तारीख आता ठरली आले. दहावीचा निकाल उद्या शनिवारी 8 जून रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. मागील काही दिवसांपासून दहावीच्या निकालासंबंधीत विविध तारखा फिरत होत्या. पण तो मेसेज चुकीचा असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले होत. त्यानंतर आज अखेर बोर्डाने उद्या 8 जून रोजी...
  June 7, 05:26 PM
 • पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(आरएसएस) कडून चिकाटी शिकण्याचा सल्ला दिला आहे. पवार गुरुवारी पिंपरी-चिंचवाडमध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत होते. पवार म्हणाले, मी असे म्हणत नाही की संघाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचे पालन करावे, पण मतदारांना भेटताना आपल्याला संघाप्रमाणे चिकाटी शिकायला हवी. पुढे ते म्हणाले,लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवामुळे निराश...
  June 7, 12:22 PM
 • पुणे -शिवराज्याभिषेकाला आज ३४५ वर्षे पूर्ण झाली. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांच्या आणि मराठेशाहीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची घटना होती. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक मोठ्या थाटात पार पडला. राज्याभिषेकापासून महाराज राजा शिवछत्रपती झाले. या राज्याभिषेकापासून महाराजांनी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे स्वचलन सुरू केले. तांब्याची शिवराई आणि सोन्याचा शिवराई होन ही नाणी महाराजांनी सुरू केली. शिवराई हे तांब्याचे...
  June 6, 12:55 PM
 • इंदापूर (जि. पुणे) -काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता यांनीही आता सक्रिय राजकारणाचा श्रीगणेशा केला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे अंकिता पाटील गुरुवारी अर्ज दाखल करत आहेत. इंग्लंडमधील प्रख्यात हार्वर्ड युनिव्हर्सिटीसह लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स विद्यापीठातून शिकलेल्या अंकिता यांनी अगदी गावपातळीवरील राजकारणापासून आपल्या राजकीय...
  June 6, 10:23 AM
 • पुणे -सन १८१८ मध्ये ब्रिटिशांनी दुर्गराज रायगड ताब्यात घेतला तेव्हा रायगड मोहिमेची इत्थंभूत माहिती कर्नल प्रॉथरने मुंबईतील वरिष्ठांना अहवालरूपाने पाठवली. कर्नल प्रॉथर अहवालाचे लेखन करून थांबला नाही, तर त्याने १८१८ मध्ये पाहिलेल्या रायगडाचे अनेक स्केचेस केले आणि तेदेखील अहवालासोबत जोडले. इतिहासप्रेमींनी कर्नल प्रॉथर लिखित अहवाल शोधण्यात यश मिळवले. मात्र, त्याने केलेले स्केचेस या अहवालापासून वेगळे करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हे स्केचेस शोधण्यात यश मिळाले तर...
  June 6, 09:58 AM
 • पुणे- पुण्यातील मुळशीमधील वन विभागाच्या कार्यालयात 70 ते 80 स्फोटकांचा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेत कोणीतीही जीवितहानी झाली नसून, कार्यालयाच्या इमारतीसह साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेली माहिती अशी की, मुळशीतील पौड येथे पुणे-कोलाड महामार्गाजवळ असलेल्या ताम्हिणी अभयारण्याच्या वनक्षेत्रपाल कार्यालयात हा स्फोट झाला. डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 70 ते 80 स्फोटके पहाटे 4 वाजता उडाली. या स्पोठात वन खात्याच्या इमारतीला मोठे तडे...
  June 5, 12:25 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात