जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे- रोमानिया येथे नुकत्याच झालेल्या 22 व्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवात (इंटरनॅशनल स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल) पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिज इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) दिग्दर्शन विभागाचा विद्यार्थी रमेश होलबोले याचा माहितीपट आगासवाडीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे रमेश होलबोले हा मूळचा नांदेड येथील आहे. रमेशने दुष्काळी भागातील जगण्याचा संघर्ष जवळून अनुभवला आहे. त्यामुळे त्याने आपल्या माहितीपटासाठी सातारा जिल्ह्यातील आगासवाडी या...
  December 25, 11:46 AM
 • पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आस्था, आदर आणि प्रेम बाळगणारे आंबेडकरप्रेमी आहेत, याचा शोध जर या निमित्ताने कोणाला लागला असेल तर त्याचे स्वागतच आहे, अशी खोचक प्रतिक्रिया राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ चरित्र साधने प्रकाशन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष विनोद तावडे यांनी दिली. राज्य शासनाने या समितीवर नव्याने केलेल्या नियुक्त्यांना विराेध हाेत करणाऱ्यांना तावडेंनी ही उत्तर दिले. शासकीय समित्यांवरील...
  December 25, 10:39 AM
 • पुणे - अनेक राष्ट्रीय- बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधने, साबण, चहा, शाम्पू, बिस्किटे, वॉशिंग पावडर आदी अनेक वस्तूंच्या आवरणांवर छापलेली वजने व प्रत्यक्षातली वजने यात तफावत आढळून आली आहे. याविराेधात ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडे तक्रार करून कायदेशीर लढा उभारण्याची तयारी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक यांनी सांगितले, ग्राहक पेठ व ग्राहक पंचायतीने दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमती व वजनाचे सर्वेक्षण केले. त्यात...
  December 25, 10:29 AM
 • पुणे- मुंबई एक्स्प्रेस हायवेवर उभ्या ट्रकवर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात तरुण-तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला. कारचा चक्काचूर झाला आहे. सोमवारी सकाळी खालापूरजवळ हा अपघात झाला. कारचा पत्रा कापूण बाहेर काढले मृतदेह.. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खालापूरजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर पुण्याहून मुंबईकडे जाणारी कार आदळली. कारचा चक्काचूर झाला आहे. कारचा पत्रा कापूण मृतदेह बाहेर काढण्यात आले. अद्याप मृतांची ओळख पटली नाही.
  December 24, 05:26 PM
 • मुंबई- मूळ पुणेकर असलेली वेदांगी कुलकर्णी ही भारतीय महिला जगभराची रपेट मारणारी आशिया खंडातील सर्वात जलद सायकलिस्ट बनली आहे. २० वर्षांच्या वेदांगीने १५९ दिवसांत २९ हजार किमी सायकल प्रवास केला आहे. त्यांनी या प्रवासात १४ देशांचा प्रवास केला. रविवारी काेलकातामध्ये सायकलिंग करून तिने २९ हजार किमीचा पल्ला गाठला. हा विक्रम केल्यानंतर वेदांगीने साेशल मीडियावर चहा पितानाचा फाेटाे शेअर केला आणि लिहिले- आता मी सांगू शकते, जगभरात २९ हजार किमी सायकलिंग करणे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. आता मी...
  December 24, 12:11 PM
 • पुणे- मनात येईल ते बिनधास्त बोलणारे भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या दोन दिवसांपासून खुलाशांचे पूल बांधण्यात व्यग्र आहेत. भाजपचे वरिष्ठ नेतृत्व व माझ्यात दरी निर्माण करू पाहण्याचा कट यशस्वी होणार नाही. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही. मोदीच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे स्पष्टीकरण त्यांनी रविवारी दिले. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमधले काही घटक व विरोधी पक्षांमधले काही लोक माझी आणि पक्षाची प्रतिमा मलिन करण्याच्या प्रयत्नात आहेत. माझ्या...
  December 24, 08:07 AM
 • पुणे- दिल्लीत सत्ताधारी पक्षाच्या फारसे मनात नसताना आणि तो पक्ष फारसा अनुकूल नसतानाही लोकशाहीच्या मंदिरात सरोगसी आणि तृतीयपंथी यासारखी बिले पारित करून घेतली. आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून एका तरी तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यासाठी मी आग्रही भूमिका घेईन. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बोलणार आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे. रविवारी साहित्यिक - कलावंत संमेलनाच्या व्यासपीठावर सुळेंचे भाषण चर्चेचा विषय बनले....
  December 24, 08:07 AM
 • पुणे- बिहारचे माजी राज्यपाल, ख्यातनाम शिक्षणसम्राट डी.वाय. पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. लवकरच ते शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील. पूर्वाश्रमीचे काँग्रेसमध्ये असलेले पाटील राज्यपाल झाल्यापासून राजकारणापासून दूरच हाेते. त्यांचे पुत्र सतेज काेल्हापुरातून काँग्रेसचे आमदार आहेत.
  December 24, 07:40 AM
 • पुणे- त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि काँग्रेस येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी रविवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले आहे. मुलाचा मुख्य विरोधक ज्या पक्षात आहेत, त्याच पक्षात डी. वाय. पाटील यांनी प्रवेश केल्याने कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. डी.वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे...
  December 23, 05:31 PM
 • पुणे- गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील एका शाळेत घडली आहे. शाळेत विद्यार्थिनीना मोबाईलवर अश्लील क्लिप दाखवून त्यांच्याशी अश्लील चाळे करत होता. गोटेवाडी (ता.तासगाव) जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली असून सहाय्यक शिक्षक उत्तम कांबळे (35, मूळ गाव: विसापूर, ता. तासगाव) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. अश्लील क्लिप दाखवून गैरवर्तन करत होता भामटा.. आरोपी शिक्षक काही विद्यार्थिनींना आपल्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ क्लिप दाखवून त्यांच्यासोबत...
  December 23, 02:40 PM
 • पुणे- पुण्याचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर आणि त्यांची सहकारी साधना वर्तक यांनी अदिती माधव दीक्षित व मेधा प्रभाकर दीक्षित यांच्या नावे कुलमुखत्यारपत्र 5463/2003 व 5614/2003 दस्तऐवज बनवून शिवाजीनगर येथील प्लॉट क्रमांक 529 वरील 20 हजार चौरस फूट जागा आपल्या ताब्यात असल्याचे भासवले. त्याआधारे रास्ता पेठ येथील मुकुंद दीक्षित यांच्याकडून 50 हजार चौरस फूट जागा दीड कोटी रुपयांना विकत घेऊन त्या जागेच्या बदल्यात शिवाजीनगर येथील जागा देणार असल्याचे सांगितले. तसेच 45 लाख 90 हजार रुपये कमी...
  December 22, 06:07 PM
 • पुणे- चित्रपट रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण करणाऱ्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रख्यात आसामी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक जानू बरूआ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानिमित्त देण्यात येणारा झेनिथ एशिया सन्मान यंदा ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आशय फिल्म क्लबचे प्रमुख आणि आशियाई चित्रपट महोत्सवाचे संयोजक सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव यांनी शनिवारी दिली. नवसिनेमाचे प्रणेते...
  December 22, 05:38 PM
 • पुणे- पोलिसाच्या पत्नीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. ही खळबळ जनक घटना मगरपट्टा, हडपसर येथे आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासुरवासला कंटाळून तिने मुलाचा खून करुन आत्महत्या केल्याची चर्चा संबंधित परिसरात आहे. हडपसर पोलिस ठाण्यातील तपास पथकात काम करणारा पोलीस कर्मचारी अमित दत्तात्रय कांबळे यांची पत्नी जान्हवी अमित कांबळे हिने आपल्या अवघ्या दोन वर्षांच्या कोवळ्या...
  December 22, 05:30 PM
 • पुणे- सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील भोजलिंगच्या भाविकांची जीप सुमारे 250 फूट दरीत कोसळली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. मिळालेली माहिती अशी की, माण तालुक्यातील डोंगरावर भोजलिंग हे देवस्थान आहे. सांगलीच्या आटपाडीतील विठलामपूर गावातील भाविक जीपने देवदर्शनाला जात होते. चालकाचा वाहनावरील ताबा सुटून जीप थेट दरीत कोसळली. या भीषण अपघातात 3 भाविक जागीच ठार झाले असून 12 जण जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सध्या सुरू असून...
  December 22, 02:32 PM
 • पुणे- कर्जत (जि. नगर) येथील दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ ताैसिफ शेख याने गुरुवारी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आत्मदहन केले. ताैसिफ याने प्रशासनाला आत्मदहनाची पूर्वकल्पना देऊनही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले, अशी खंत ताैसिफचे काका राजू कलिंदर शेख यांनी व्यक्त केली. ताैसिफ राॅकेल ओतून घेत पेटवून घेईपर्यंत आणि नंतर जळत असताना परिसरात उपस्थित असलेल्या शेकडाे लाेकांनी त्याचे फाेटाे, व्हिडिओ...
  December 22, 09:52 AM
 • पुणे- योगाचार्य बी.ए. अय्यंगार यांना त्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त सर्च इंजिन गुगलने आज त्यांना अनोखी आदरांजली अर्पण केली आहे. गुगलने डूडलच्या माध्यमातून अॅनिमेटेड योगासने दाखवली आहेत. विशेष म्हणजे ही आसनं G O O G L E या अक्षरात बसविली आहेत. अय्यंगार यांचा आजच्या दिवशी म्हणजे 14 डिसेंबर 1918 रोजी कर्नाटकमधील बेल्लूर येथे जन्म झाला होता. गेल्या वर्षी 20 ऑगस्ट 2014 रोजी त्यांचे पुण्यात वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले होते. लहान वयातच पुण्यात दाखल होत त्यांनी योगसाधनेला वाहून घेतले होते. योग ही भारताची...
  December 20, 04:42 PM
 • पुणे- खलिस्तानवादी चळवळीशी संबंध असल्याच्या कारणावरून दहशतवादविराेधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या हरपालिसंग प्रतापसिंग नाईक (४२,रा.बेल्लरु, कर्नाटक) याचा २० देशांतील लाेकांशी संपर्क तसेच त्यांचे क्रमांक त्याच्या माेबाइलमध्ये सापडल्याची माहिती एटीएसने न्यायालयात साेमवारी दिली. एटीएसने त्याला विशेष न्यायाधीश किशाेर वढणे यांचे न्यायालयात हजर केले असता त्याची पाेलिस काेठडीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. हरपालिसंग याने दहशतवादी टाेळी स्थापन करून खलिस्तानच्या...
  December 18, 08:47 AM
 • पुणे- रफाल विमान खरेदीप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाची दिशाभूल केली आहे. न्यायपालिकेचा अवमान केला आहे. यासंबंधी गांधींनी देशाची माफी मागावी. नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा देशभरच्या काँग्रेस कार्यालयांसमोर आंदोलन करेल, असा इशारा भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांनी साेमवारी दिला. रफाल विमान खरेदी प्रकरणात अनियमितता झाली नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतरही राहुल गांधी खोटी माहिती देऊन न्यायपालिकेचा अवमान करत आहेत. त्यांनी खुल्या...
  December 18, 08:43 AM
 • औरंगाबाद, नाशिक, पुणे- उत्तर भारतातून येणारे थंड वारे आणि महाराष्ट्रात वाढलेले हवेचे दाब यामुळे राज्य गारठले आहे. पश्चिम तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आठवडाभर थंडीचा मुक्काम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, कडाक्याच्या थंडीमुळे कोल्हापुरात रस्त्यावर झोपलेल्या दोन व्यक्तींचा गारठून मृत्यू झाला आहे. सोमवारी...
  December 18, 07:54 AM
 • पुणे- पतीचे शाळेतील एका तरुण शिक्षिकेसोबत अवैध संबंध होते. याबाबत पत्नीला कुणकुण लागते. पत्नी दोघांवर पाळत ठेवते. पाठलाग करून दोघांचे तसल्या अवस्थेतील फोटो काढते. नंतर पतीसह शिक्षिकेला तेच फोटो दाखवून 10 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करते, हे काही एखाद्या सिनेमाचे कथानक नाही तर पुण्यात अशीच एक घटना समोर आली आहे. तळेगाव दाभाडे येथे ही घटना घडली आहे. मिळालेली माहिती अशी की, आरोपी अमोल गायकवाड याने त्याच्या शाळेतील एका 29 वर्षीच्या शिक्षिका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेगवेगळ्या...
  December 18, 12:10 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात