जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे- निगडीतील २३ वर्षीय तरुणीला जिवे मारण्याची धमकी देत २ महिन्यांपासून बलात्कार करत असलेल्या सुरेंद्र ऊर्फ साेनू ओमप्रकाशला (३८, सारसर, रा. देहू गाव, पुणे) अटक करण्यात आली. तक्रारीनुसार, २८ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी पीडित निगडीत बसची वाट पाहत असताना सुरेंद्र आला व लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला कारमध्ये बसवले. दरम्यान, कॉफीत गुंगीचे औषध टाकून तिला बेशुद्ध केले आणि वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याच घटनेचा आधार घेत पीडितेला धमकावत त्याने दोन महिने तिच्यावर...
  February 14, 09:28 AM
 • पुणे- संरक्षणाच्या बाबतीत कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये. रफालविरोधात बोलणाऱ्या लोकांच्या कार्यकाळातील गोष्टी उघड केल्यास तोंडही दाखवता येणार नाही, असा टोला माजी लष्करप्रमुख व केंद्रीय परराष्ट्र धोरण राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी विरोधी पक्षांना लगावला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिंग म्हणाले, सध्या विरोधकांनी रफालवरून रान उठवले आहे. परंतु रफालसारखी लढाऊ विमाने आपल्या संरक्षण खात्यात येणे गरजेचे होते. कारण हवाई दलास आवश्यक असलेली क्षमता कमी झाली होती....
  February 14, 09:26 AM
 • पुणे- आधी लगीन कोंढाण्याचं असे म्हणत ज्या गडावर नरवीर तानाजी मालुसरे यांनी वीरमरण पत्करले त्या तानाजी मालुसरे यांची मूळ समाधी सिंहगडावर नुकतीच प्रकाशात आली आहे. पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने गडावर सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामादरम्यान समाधीचे हे मूळ बांधकाम उजेडात आले आहे. मालुसरे यांची ही देहसमाधी (युद्धात जिथे त्यांना वीरमरण आले ती जागा) असल्याचे निरीक्षण ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले. या नव्या उपलब्धीमुळे सिंहगडावर आता तानाजी मालुसरे यांचा...
  February 14, 09:06 AM
 • पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात हल्लेखोर सचिन अणदुरे आणि शरद कळसकर यांच्याविरोधात सीबीआयने बुधवारी विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात सुमारे ४५० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. अणदुरे आणि कळसकरविरोधात सीबीआयने पुरावे गोळा केले असून त्याबाबतची माहिती न्यायालयास देण्यात आली आहे. संबंधित दोषारोपपत्रात दोन प्रत्यक्षदर्शींसह ९ जणांचे जबाब नोंदवून ते न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. यापूर्वी या प्रकरणात...
  February 14, 08:54 AM
 • पुणे- शिवणे परिसरातील माहिती अधिकार कार्यकर्ता विनायक शिरसाट (३२) यांची अपहरण करून हत्या झाल्याचे मंगळवारी उघडकीस आले. ५ फेब्रुवारीपासून शिरसाट बेपत्ता होते. शिरसाट कुटुंबाचे राजकीय पक्ष आणि बांधकाम व्यावसायिकांशी संबंध होते. वडगाव धायरी, शिवणे आणि परिसरातील अवैध बांधकामांविरुद्ध शिरसाट यांनी आरटीआयच्या माध्यमातून आवाज उठवला होता. शिवणे येथील उत्तमनगर परिसरात शिरसाट वास्तव्यास होते. ५ फेब्रुवारीला काही जणांसोबत ते बाहेर पडले. मात्र, घरी परतलेच नाहीत. त्यांच्या बंधूंनी तशी...
  February 13, 08:00 AM
 • पुणे- साताऱ्यातून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात येऊन घरफोड्या करणाऱ्या अट्टल महिला गुन्हेगाराला पोलिसांनी स्वारगेट येथे अटक केली. तिच्या ताब्यातून घरफोडीच्या चार गुन्ह्यांतील एकूण २ लाख ३३ हजार रुपये किमतीचे ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी दिली. लक्ष्मी संतोष अवघडे ऊर्फ लक्ष्मी विक्रम भिसे (३१, रा. नावररस्ता, नाडे, ता. पाटण, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. लक्ष्मी काही वर्षांपूर्वी निगडी ओटास्किम...
  February 12, 08:45 AM
 • पुणे- प्रेयसींवर पैसे उधळण्यासाठी तसेच काही जणींना जाळ्यात ओढण्यासाठी एकाने शालेय मित्रांच्या मदतीने टोळी तयार करून दरोडा तसेच जबरी चोरी केल्याचे पुण्यात उघडकीस आले आहे. या टोळीने पुण्यात ३८ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहेत. या वेळी त्यांच्याकडून १७ लाख १६ हजार २१४ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. यामध्ये ४०२ ग्रॅम सोने, पाच ग्रॅम चांदी आणि ११ दुचाकींचा समावेश आहे. यातील मुख्य सूत्रधार हुक्या हा आलिशान गाड्या वापरून तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर पैसा उधळत असल्याचेही समोर...
  February 12, 08:15 AM
 • पुणे - केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी पुण्यातील एका कार्यक्रमात जातीयवाद करणाऱ्यांना गर्भित इशारा दिला आहे. माझ्या भागात कुणी जातीयवाद केल्यास चोप दिला जाईल अशा शब्दांत केंद्रीय मंत्र्यांनी ठणकावले आहे. एवढेच नव्हे, तर हीच गोष्ट आपण आपल्या कार्यकर्त्यांना देखील सांगितल्याचे गडकरींनी स्पष्ट केले आहे. पिंपरी चिंचवड परिसरात पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. समाजाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या एकत्रित आणायला हवे. यात जातीयवाद आणि धर्मवादाला जागा असूच...
  February 11, 11:56 AM
 • पुणे- बारामती जिंकून भाजप आगामी लोकसभेत राज्यात ४५ जागा जिंकेल, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी येथे व्यक्त केला. शहा यांच्या सुरात सूर मिसळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आमचे लक्ष्य बारामती असल्याचे जाहीर केले. अयोध्येत ठरलेल्या जागीच राम मंदिर होईल, असेही ते म्हणाले. पुणे शहर, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील शक्तिकेंद्रप्रमुख, बूथप्रमुखांच्या बैठकीचे शनिवारी पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या वेळी पदाधिकाऱ्यांना शहा यांनी मार्गदर्शन केले. या वेळी...
  February 10, 07:53 AM
 • पुणे- बारामतीत यंदा कमळ फुलणार आहे. मागील वेळेस थोडक्यात हुकलेला विजय यंदा भाजप मिळवणार आहे. यासाठी पूर्ण ताकद लावण्यात येईल. राज्यातील 48 जागावर मेहनत घेवून उमेदवार निवडून आणणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केला. पुण्यातील भाजपच्या बूथ प्रतिनिधी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांवर लढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या मेळाव्यास भाजपचे अध्यक्ष अमित शहा,...
  February 9, 04:23 PM
 • पुणे - पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यांच्या वेळांत बदल करण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी येथे दिली. बदललेल्या वेळानुसार ही परीक्षा २४ फेब्रुवारीला दुपारी १ ते ५ या वेळात होईल भारतीय सैनिकी शाळाप्रवेश पुनर्परीक्षा याच दिवशी होणार असल्याने हा बदल करण्यात आल्याचे ते म्हणाले. शिष्यवृत्ती परीक्षा आधी १७ फेब्रुवारीला होणार होती. मात्र, याच दिवशी राज्यसेवा पूर्वपरीक्षा असल्याने लोकसेवा आयोगाने...
  February 9, 09:15 AM
 • पुणे - माढा लाेकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत विचार करू, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने या मतदासंघातून कोणाला उमेदवारी मिळते याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्सुकता लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रवादीच्या इच्छुकांची शुक्रवारी पुण्यातल्या बारामती होस्टेलमध्ये बैठक घेण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनीही पवार यांनी माढ्यातून लाेकसभा लढवण्याबाबत आग्रह धरला. दरम्यान, पवारांच्या गुगलीमुळे विद्यमान...
  February 9, 09:13 AM
 • पुणे- विवाहित असल्याचे लपवून तरूणीवर बलात्कार करणाऱ्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी हा आदेश दिला आहे. अमोल रामदास गायकवाड (वय 30, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत हिंजवडी भागात राहणाऱ्या 29 वर्षीय तरूणीने तळेगाव दाभाडे पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 29 सप्टेंबर ते 13 डिसेंबर 2018 या कालावधीत तळेगाव येथे घडली. अमोल याचे लग्न झाले आहे. तरीही लग्नाचे अमिष दाखवून त्याने फिर्यादींवर बलात्कार केला. घरातील अडचणी...
  February 8, 07:17 PM
 • पुणे - पोलिस भरती प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांच्या विरोधात गुरुवारी पुण्यात उमेदवारांनी मोर्चा काढला. मुठा नदीच्या पात्रातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून हे उमेदवार ११ तारखेपर्यंत उपोषणाला बसणार आहेत. यातील ५० उमेदवार मुंबईपर्यंत धावत जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्यांचे हे आंदोलन चिरडून टाकले. शिवाय तब्बल तीन तासांपर्यंत त्यांना पोलिस ठाण्यातच बसवून ठेवत नंतर सोडून दिले. पोलिस भरतीसाठी आधी १००...
  February 8, 08:50 AM
 • पुणे - मुलगा व त्याचा मित्र घरफोडी, दुचाकी चोरीचे गुन्हे करू लागले म्हणून वडिलांनी दोघांना आळंदीतील संस्कार शिबिरात टाकले. सुधारण्याऐवजी वर्षभरात केलेल्या चोरीचा स्वत:चाच विक्रम त्यांनी मोडून काढला. वर्षभरात २० घरफोड्या केल्या होत्या. पण दोन महिन्यांत संस्कार शिबिरात गेल्यानंतर दिवसा भजन, कीर्तन, ध्यानधारणा करून रात्री मात्र २० पेक्षा अधिक चोऱ्या केल्याचे उघडकीस आले. मध्यरात्री पोलिसांनी पकडले तरी गळ्यातील माळ, संस्कार शिबिराचे ओळखपत्र दाखवून ते निसटून जात. अखेर आठवडाभर हडपसर...
  February 8, 08:35 AM
 • बारामती - इंजिनमध्ये आलेल्या अचानक बिघाडामुळे वैमानिकांना प्रशिक्षण देणारे एक विमान मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील रुई बाबीर या गावातील शाळेच्या मैदानावर कोसळले. यात वैमानिक किरकोळ जखमी झाला. बारामतीमध्ये कार्व्हर एव्हिएशन संस्थेकडून प्रशिक्षणार्थी वैमानिकांना उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जाते. या परिसरात राखीव वनक्षेत्र असल्याने सातत्याने विमानांचे उड्डाण सुरू असते. मंगळवारी वैमानिक सिद्धार्थ टायट यांनी विमानासह उड्डाण केले. साडेतीन हजार फूट...
  February 6, 09:18 AM
 • पुणे |प्रेमभंगातून प्रेयसीच्या वसतिगृहात प्रियकराने गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत:ही वसतिगृहाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पुण्यातील बालेवाडी येथे मंगळवारी घडली. सूरज महेंद्र साेनी (२४, रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) असे अाराेपीचे नाव आहे. सूरजने भारती विद्यापीठातून बीई केले अाहे. यादरम्यान त्याच्यासाेबत सासवड येथील एक तरुणी शिक्षण घेत हाेती. दोघांत...
  February 6, 08:22 AM
 • पुणे - बनवलेली भाजी न आवडल्याच्या वादातून मित्राने झोपेत असलेल्या मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे मुंबई- बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथे घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण काटकर (२९, रा.येवलेवाडी, पुणे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पप्पू पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण व पप्पू मित्र असून ते सेंट्रिंगची कामे करत होते. दोघेही पंधरा दिवसांपूर्वी सेंट्रिंगची कामे करण्यासाठी नऱ्हे येथे आले होते. या...
  February 6, 08:19 AM
 • पुणे - येथील इंदापूर तालुक्यात एक हल्के विमान कोसळले आहे. रुई गावातील श्री बाबीर विद्यालयाजवळ मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली. सुत्रांच्या माहितीनुसार, हे विमान बारामतीहून उड्डान भरून निघाले होते. मात्र, अचानक इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने हा अपघात घडला असा अंदाज लावला जात आहे. विमान कोसळले तेव्हा ते 3500 फुट उंचीवर होते. या अपघातात एक प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्या वैमानिकाचे नाव सिद्धार्थ टायटस असे आहे.
  February 5, 02:17 PM
 • पुणे- मुंढवा परिसरातील केशवनगर येथे नदीकिनाऱ्याजवळ असलेल्या देवी मंदिरामागून बिबट्याने थेट गजबजलेल्या वस्तीत शिरकाव केला आणि बिथरून जात अनेकांवर हल्ला केला. यामध्ये एका वन कर्मचाऱ्यासह सात जण जखमी झाले. वन विभाग, अग्निशमन दल आणि मनपा कर्मचारी पथकांच्या अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळाले. दरम्यान, देवी मंदिराजवळ राहणाऱ्या तारू कुटुंबीयांतील सुमित्रा सूर्यकांत तारू या रोजप्रमाणे सकाळी सातच्या सुमारास चूल पेटवण्यासाठी उठल्या. त्यांना...
  February 4, 07:04 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात