जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • उल्हासनगर - व्यापा-याचा गाळा ताब्यात घेतल्याच्या कारणावरून माजी आमदार पप्पू कलानी यांच्या समर्थकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना शुक्रवारी (ता.12) मारहाण केली. यात मनसेच्या कार्यालयामध्ये कलानीच्या समर्थकांनी विविध वस्तूंची नासधूस केली. शुक्रवारी रात्री पक्ष कार्यालयावर झेंडा लावण्यासाठी गेलेल्या मनसे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्यामुळे मनसे शहराध्यक्ष सचिन कदम,संजय आहुजा, यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
  April 14, 03:58 PM
 • डोंबिवली - राज्याच्या महसूल विभागाचे अप्पर सचिव वैद्यनाथ लटके यांच्याविरूध्द ठाणे जि. प. च्या विस्तार अधिकरी ( शिक्षण ) असणा-या विवाहित महिलेने लैंगिक शोषणाची फिर्याद मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. ठाणे जि.प मध्ये विस्तार अधिकारी असणा-या त्या महिलेचा लटकेने 19 वर्षे लैंगिक शोषण केले. आपले हे कृत्य उघडकीस येऊ नये यासाठी शरीरसंबंधाच्या चित्रफीतीची भीती दाखवली जात होती. पीडित महिलेने विवाहा करण्यासाठी विचारले असता, आरोपी लटके यांने तिला धमकवण्यास सुरूवात केले. पीडित महिलेने...
  April 13, 02:41 PM
 • ठाणे - अनधिकृत बांधकामांना लाच घेऊन संरक्षण देणा-या ठाणे मनपाच्या निलंबित कार्यालयीन अधीक्षक श्याम थोरबोले गुरूवारी ( ता.11 ) ठाणे पोलिसांनी अटक केले. या पूर्वी 74 निष्पाप जणांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या महापालिकेचे उपायुक्त दीपक चव्हाण, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब आंधळे, वरिष्ठ लिपिक किसन मडके, राष्ट्रवादीचे नगरसेवक हिरा पाटील, हवालदार जहांगीर सय्यद, कार्यकारी अभियंता सुभाष रावळ, उपअभियंता रमेश इनामदार यांच्यासह 13 जणांना अटक केली आहे. थोरबोले याच्यावर अनधिकृत बांधकामाला संरक्षण...
  April 12, 01:10 PM
 • डोंबिवली - नारळ काढण्यासाठी गेलेल्या नारळवाल्याची झाडावरून पडून मृत्यू झाला. ही घटना कल्याण पश्चिम भागातील नारायणवाडी येथे घडली. नारळवाला वसंत पुजारी (35) झाडावरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर जखमी झाली होती. पुजारी यांना श्रीदेवी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  April 11, 01:07 PM
 • ठाणे - ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा येथील इमारत दुर्घटना प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली. यामुळे आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे. अटक केलेल्या दोन आरोपींमध्ये मुंब्य्रातील एका पत्रकाराचा समावेश आहे. आर्किटेक्ट फारूक अब्दुल(59) व स्थानिक पत्रकार रफिक दाऊद कामदार(44) या आरोपींनी अधिकायांकडून काम करुन घेण्यासाठी मध्यस्थी केल्याचा आरोप आहे. ठाणे गुन्हे शाखेने त्यांना सोमवारी अटक केली. अटकेतील एका बिल्डरच्या डायरीत कामदारच्या नावाचा उल्लेख होता. याआधी अटक केलेल्यांमध्ये निलंबित मनपा...
  April 11, 01:04 PM
 • ठाणे - उल्हासनगर महानगरपालिकेतील अधिका-यांना मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार पप्पू कलानीला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसशी संबंधित बेकायदा बांधकाम पाडल्याबद्दल पप्पू कलानी व त्याच्या अंगरक्षकाने सोमवारी मनपा उपायुक्त शेखर भदाने व सहायक उपायुक्त सागर घोलप यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर सोमवारी रात्री त्याला अटक करण्यात आल्याचे उल्हासनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एम. ओ. चव्हाण यांनी सांगितले. कलानी व त्याच्या दहा अंगरक्षकांवर हल्ला व शासकीय कामात अडथळा...
  April 11, 01:03 PM
 • ठाणे- महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. पप्पू कलानींवर महापालिकेच्या दोन सहाय्यक आयुक्तांसह त्यांच्या साथीदारांना मारहाण केल्याचा आरोप आहे. उल्हासनगरमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई दरम्यान ही अटक करण्यात आली. दरम्या, मुंब्रा येथील शिळफाटा परिसरात गेल्या आठवडयात एक इमारत कोसळून 76 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईसह परिसरात अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरु झाली...
  April 9, 02:20 PM
 • ठाणे - शिळफाट्या येथे अनधिकृत सात मजली इमारत कोसळून 74 जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला आता जाग आली आहे. ठाण्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी ठाणे मनपाने 15 जणांची विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. उद्यापासून मनपा अनधिकृत बांधकामांविरूध्द मोहिम सुरू करणार आहे. अनधिकृत बांधकामप्रकरणी बिल्डरांना वाचवण्यासाठी लाखो रूपयांची लाच देण्यात आली असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. बेकायदेशीररित्या जमीन ताब्यात घेणे, ठाणे पालिकेची परवानगी न घेणे, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, लोकांना...
  April 8, 04:44 PM
 • ठाणे /मुंबई- मुंब्रा येथील शिळफाट्याजवळील इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या 74 वर पोहचली आहे. रविवारी सकाळी आणखी दोन जखमी व्यक्तींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 29 मुले, 25 पुरूष आणि 10 महिलांचा समावेश आहे. दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून न्यायालयाने सर्व आरोपींना 20 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उल्लेखनिय म्हणजे बेकायदा इमारत उभारण्यासाठी नगरसेवकासह अधिकार्यांनी लाच घेतल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असल्याचे ठाण्याचे पोलिस आयुक्त के.पी.रघुवंशी यांनी...
  April 7, 05:04 PM
 • ठाणे/मुंबई - ठाण्याच्या मुंब्रा भागात अवैध इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेल्या सलीम शेख व जमील शेख या बिल्डरना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या सातजमली इमारतीच्या ढिगार्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या संख्या 72 झाली असून शनिवारी सायंकाळी मदत व बचाव कार्य थांबवण्यात आले आहे. मृतांमध्ये बहुतांश मजुरांचा समावेश असून जखमी 62 जणांपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. ना नकाशा, ना अभियंता मदत व बचावकार्यादरम्यान दहा महिन्यांच्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. तिच्या कुटुंबातील 13...
  April 7, 09:46 AM
 • मुंबई/ठाणे - ठाण्याजवळ शिळफाटा परिसरात अनधिकृत इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या शनिवारी 72 झाली. तर 60 जणांना ढिगार्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशामक दलास यश आले. 36 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुर्घटनेस जबाबदार बिल्डर सलील आणि खलील जमादार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून सलील याला पोलिसांनी अटक केली. ठाणे महापालिकेचे उपायुक्त दीपक चव्हाण तसेच एका पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. शिळफाटा येथे जमादार यांच्या अनधिकृत लकी...
  April 6, 01:45 PM
 • मुंबई - मुंब्रा येथील अनधिकृत इमारत कोसळून 55 जण मृत झाल्याप्रकरणाचे शुक्रवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटले. बेकायदा व निकृष्ट बांधकामावर कारवाई करावी, त्याबाबत धोरण ठरवावे, अशी मागणी विरोधी आमदारांनी केली. या दुर्घटनेला जबाबदार धरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाणे महापालिकेचे उपायुक्त आणि पोलिस निरीक्षकांना निलंबित केल्याची घोषणा विधानसभेत केली. तसेच दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी अपर मुख्य सचिवांची एक समिती नेमण्यात आल्याचेही सांगितले. विरोधीपक्षनेते एकनाथ...
  April 6, 12:24 PM
 • ठाणे - ठाण्यातील शिळफाटा परिसरात एक सात मजली इमारत कोसळून नऊ जण ठार तर 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सायंकाळी इमारत कोसळल्याचे कळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी धाव घेऊन बचाव कार्य हाती घेतले. रात्रीपर्यंत नऊ मृतांना ढिगार्यातून बाहेर काढण्यात यश आले होते, आणखी 30 ते 35 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
  April 5, 08:34 AM
 • ठाणे - शिळफाटा - महापे रोडवरील भोलेनाथ तबेल्याजवळ एक सात मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव कार्यासाठी पोलिस व अग्निशामन दल घटनास्थळी पोहोचले असून, मदतीची काम सुरू करण्यात आले आहे.
  April 4, 07:11 PM
 • ठाणे - राज्यात भारनियमन वाढत आहे. विजेची बचत कशी होईल याबाबत अनेक उपक्रम आता राबवली जात आहे. ठाणे महापालिकेने अपारंपरिक उर्जा वापरायला 2001 पासून सुरूवात केली आहे. महापालिका आपल्या रूग्णालयांमध्ये सौरऊर्जेच्या मदतीने रूग्णांना गरम पाणी पुरवित आहे. पालिका विद्युत विभागाचे अभियंता सुनिल पोटे यांच्या संकल्पनेतून हा उर्जाबचतीचा प्रयोग राबविला जात आहे.सौरऊर्जेच्या माध्यमातून महापालिकेची 20 लाखांची बचत होत आहे. रूग्णालयांव्यतिरिक्त महापौर निवास, आयुक्त निवास, अग्निशामन दल निवास येथे...
  April 4, 01:40 PM
 • रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर टँकर व मंजिक मध्ये झालेल्या धडकेत दोघे ठार, तर दोघे जखमी झाले.रायगड जिल्ह्यातील दासगावजवळ ही घटना घडली आहे.अद्याप मृत व जखमींची नावे कळली नाहीत.
  April 2, 08:27 AM
 • खालापूर - भांगमिश्रित फालुद्या प्यायल्याने 15 जणांना अस्वस्थ वाटल्याने खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.यातील चौघांना खोपोली येथील जाखोटिया नर्सिंग होममध्ये हलवण्यात आले. खालापूर गावातील वाल्मिकी आदिवासीवाडी येथे मुलांनी पार्टी साजरा करण्यासाठी आईस्क्रीम विक्रेत्याकडून फालुदा खरेदी केले. फालुद्यात भांग मिसळून प्यायल्याने काही तासानंतर घसा कोरडा पडणे, पोटात जळजळ होत असल्याने मिलिंद जाधव, तुषार पवार, निवृत्ती वाघमारे , गणेश पवार यांना खोपोलीमधील दवाखान्यात दाखल...
  April 1, 12:33 PM
 • मुंबई- भाईंदरमध्ये स्कूल बसने गर्भवती महिलेसह पाच जणांना चिरडल्याची घडटना घडली. गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मनीषा पटवर्धन असेचे तिचे नाव आहे. दोन महिला आणि दोन मुले या अपघात जखमी झाले असून त्यांच्यावर कस्तुरी मेडिकेअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नॅशनल हायस्कूलची ही बस होती। भाईंदर पश्चिममध्ये आंबेडकर नगरात सोमवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक बस शिरली. बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटला होता. घटनेनंतर बसचालक आणि क्लिनर फरार झाले.
  March 26, 03:13 PM
 • ठाणे - ठाण्यात एटीएसच्या पोलिस उपायुक्ताने (डीसीपी) आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. स्वतःच्याच पिस्तुलाने गोळ्या झाडून डीसीपी संजय बॅनर्जी यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ठाणे पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बॅनर्जी यांनी शनिवारी दुपारी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आणि मुले देखील होते. दुपारी तीनच्या सुमारास डीसीपी बॅनर्जी...
  March 24, 12:26 PM
 • पनवेल - शिधापत्रिका अर्ज व सबसिडी खाते उघडण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना पुरवठा, बँक कार्यालयात हेलपाटे माराव्या लागत आहे.कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना कोणती कागदपत्रे जोडावे याबाबत अस्पष्टता असल्याने नागरिकांना संबंधित कार्यालयात ये जा करावी लागत आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी गेलेल्या नागरिकांना अर्ज मिळत नाही. एप्रिलपासून ती नागरिकांसाठी उपलब्ध्ा होणार असल्याचे बँकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
  March 23, 02:06 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात