जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • वसई - पैशाचे आमिष दाखवून गेले दोन वर्षे पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणा-या आरोपीला वालीव पोलिसांनी अटक केले. आरोपी रमेश गोपकर (40) पेल्हारातील रामशेत पाडा येथील रहिवाशी आहे. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी गोपकर पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार करत होता. 13 वर्षांच्या मुलीने आईला संबंधित प्रकरण सांगितल्यानंतर वालीव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. आरोपी गोपकर याला पोलिसांनी अटक केले.
  March 22, 12:52 PM
 • ओरोस - कसाल येथे एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांबरोबर एक्स्प्रेस खाली जाऊन आत्महत्या केली.ही घटना बुधवारी(ता.20)11.30 वाजता घडली. कसाल-कार्लेवाडी येथील सुचिता चव्हाण या महिलेने सुरेश आणि सानिका या आपल्या लहान मुलांबरोबर मांडवी एक्स्प्रेस खाली आत्महत्या केली.मांडवी एक्स्प्रेस ही मुंबईच्या दिशेने निघाली होती. कणकवली रेल्वेस्थानकात मोटरमनने या घटनेबाबत माहिती दिली.
  March 21, 01:21 PM
 • ठाणे - ठाणे परिवहन सेवेने आपल्या प्रवाशी भाड्यात 1 ते 7 रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या भाडे वाढीला नुकतीचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मंजुरी दिले आहे. ठाणे परिवहन सेवेला प्रतिदिनी आठ लाखांचा तोटा होत असल्याने ही भाडेवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.सध्या 19 ते 20 लाख उत्पन्न महापालिकेला यातून मिळत आहे.या भाववाढीमुळे परिवहन सेवेच्या खात्यात दर दिवशी पाच लाख हजार रूपयांची भर पडणार असल्याचे परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाडे यांनी सांगितले.
  March 20, 12:36 PM
 • ठाणे - दिव्यात एका युवकाला युवतीने लग्नास नकार दिल्याने युवकाने स्वत:वर हल्ला केला व नंतर युवतीवर हल्ला केला.एकतर्फी प्रकरणातून हे प्रकरण घडले आहे.याबाबत पोलिस ठाण्यात त्या युवका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले. आरोपी युवक मोहनलाल कुमावत (22) हा राजस्थान येथील पाली जिल्ह्यातील रहिवासी आहे.त्याच्या गावातील एका युवतीवर त्याचे प्रेम होते.तो युवतीला सतत त्रास देत असल्याने तिच्या भावाने तिला दिवा शिरोळ्यात राहण्यासाठी घेऊन गेला.मात्र तेथे ही या युवकाने त्या युवतीचा माग सोडला...
  March 19, 12:18 PM
 • उल्हासनगर - येथील कॅम्प क्रमांक 3 मध्ये रविवार सायंकाळी एका इमारतीच्या फ्लॅटला लागलेल्या आगीत मुलीचा मृत्यू झाला.गंभीर जखमी झालेल्या त्या मुलीच्या आईला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. कॅम्प क्रमांक 3 मध्ये मोतीलाल अपार्टमेंटच्या ग्राऊंड फ्लोवरच्या फ्लॅटमध्ये कविता सिधवानी ही महिला शीतल सिधवानी या आपल्या मुली बरोबर राहत होत्या .रविवारी सायंकाळी घरात लागलेल्या आगीत मुलगी शीतल हिचा मृत्यू झाला.गंभीर जखमी झालेल्या तिच्या आईला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आग कोणीतरी...
  March 18, 01:02 PM
 • ठाणे : महाराष्ट्र शासनाने दिलेल्या एलबीटी लागू करण्याच्या निर्णयाला ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीत विरोध करण्यात आला.जकात कर कायम ठेवण्याची मागणी समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे. समितीचे विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी जकात वसूलीबाबत विचारलेल्या प्रश्नाला प्रशासनाने जकात वसूली चालू असल्याचे उत्तर दिले.यानंतर जगदाळे यांनी एलबीटी विरोध सुरू केला. उल्हासनगर,सांगली ,औरंगाबाद,मीरा-भाईंदर महापालिकेत एलबीटीची स्थिती वाईट आहे,असे सांगून स्थायी समितीचे सभागृह नेते नरेश म्हस्के...
  March 17, 12:30 PM
 • उल्हासनगर- अंबरनाथ (पं) येथे दहावीचा बीजगणिताचा पेपर काल(ता.14) काही मिनिटांपूर्वीच फुटला.पेपर फातिमा हायस्कूल जवळ एक टोळी विकत असल्याचे पोलिसांना कळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित टोळीविरूध्द कारवाई केली. टोळीचा मुख्य सूत्रधार ब्रिलियंट क्लासेसचे संचालक फिराज अब्दुल माजीद खान यांना अटक करण्यात आली.अंबरनाथ(पं)मधील फातिमा शाळेजवळ हा प्रकार घडला.शाळेचे परीक्षा नियंत्रक ऑशियन डिसूजा यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी खानला अटक केले.पेपरफुटीचे धागेदोरे थेट मुंबईपर्यंत जात असल्याची...
  March 15, 01:12 PM
 • ठाणे - युपीएससीच्या परीक्षेतून मराठी भाषेला वगळू नये,तिच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी लढले पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ विजया वाड यांनी केले.वाड या आदर्श प्रतिष्ठानाने रंगयातन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ वाड व अशोक चिटणीस यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले.स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिलेच पाहिजे.हिंदी ही आपली भगिणी भाषा असली,तरी मराठी ही आपली मायबोली आहे.माणूस आपल्या...
  March 14, 01:10 PM
 • कचांड - भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावरील टोलनाक्यावर संतप्त जमावाने तोडफोड केली.या जमावाला पांगवण्यासाठी ठेकेदार जयेश चौधरी यांनी हवेत गोळीबार केली.सध्या या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे.सुप्रीम इन्फ्रा कंपनीने भिवंडी-मनोर महामार्गाचा केवळ 50 किमीचे काम पूर्ण केले आहे.उर्वरित 15 किमी रस्ता अपूर्ण असून ही 5 मार्चपासून टोल वसूली सुप्रीम इफ्राने सुरू केली आहे.याच्या विरूध्द संतप्त जमावाने टोलनाक्याची तोडफोड केली.जमावाला पांगवण्यासाठी ठेकेदार जयेश चौधरी यांनी हवेत गोळीबार केली....
  March 13, 12:50 PM
 • वसई - मुंबई -अहमदाबाद महामार्गावर दोन तोतया पोलिसांना रविवारी (ता.दहा) वाहन चालकाच्या दक्षतेमुळे अटक करण्यात आली आहे .वसईतून जाणा-या मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सतीश सिंग व महेश गायकवाड हे पोलिसांचे कपडे घालून वाहन चालकाकडून पैसे लूटण्याचा उद्योग करत होते. आपण आतंकवाद विरोधी पथकाचे अधिकारी आहोत असे ते वाहन चालकांना सांगत व कागदपत्रे नसलेल्या चालकाकडून पैसे घेत. गुजरातकडे निघालेल्या सॅन्ट्रो कारच्या चालकाला कागदपत्रांच्या तपासणीवरून सिंग व गायकवाड यांनी थांबवले व त्याच्याकडे...
  March 12, 12:35 PM
 • ठाणे - वास्तुरविराज डिझाइन्स, डॉ. रविराज वास्तु स्पिरिच्युअल सर्व्हिसेस, वास्तुशास्त्र एज्युकेशन रिसर्च फाउंडेशन आणि वास्तुरविराज ग्रुपच्या वतीने देण्यात येणारे पहिल्या विश्वकर्मा रिअल इस्टेट पुरस्कार नुकतेच वितरण करण्यात आले. पुरस्कारासाठी 1440 प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यातून 21 बिल्डर्स, डेव्हलपर्स, इंटेरिअर डिझायनर्स, आर्किटेक्ट यांचा सन्मान करण्यात आला. वास्तुरविराजचे अध्यक्ष डॉ. रविराज अहिरराव, एमडी डॉ. मंजुर्शी अहिरराव यांची भाषणे झाली. परीक्षक म्हणून जे. जे. स्कूल ऑफ...
  March 12, 03:36 AM
 • ठाणे - लग्नाचा सारखा तगादा लावणार्या प्रेयसीची विवाहित प्रियकराने गळा चिरून हत्या केल्याची घटना माथेरान येथे उघडकीस आली. बिनी अल्फाज असे हत्या करणार्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कांदिवली येथील एका तरुणीसोबत बिनीचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, बिनी हा विवाहित असल्याने त्याने तिला लग्नास नकार दिला होता. तरुणीने शनिवारी बिनीकडे पुन्हा लग्नाचा हट्ट धरला होता. त्यामुळे त्याने तरुणीला माथेरान येथे नेऊन तिची गळा चिरून हत्या केली. हत्या केल्यानंतर...
  March 11, 11:20 AM
 • अलिबाग - राज्य शासन कोकणच्या विकासनिधीतून माथेरानच्या विकासासाठी निधी दिला आहे.तसेच शासन माथेरानच्या सर्वांगीण विकासाठी कटिबध्द आहे.नागरिकांनी येणा-या पर्यटकाला उत्तम सेवा दिली पाहिजे,असे रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले. कर्जत तालुक्यातील माथेरान नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन तटकरे यांच्या हस्ते झाल्या नंतर ते बोलत होत.यावेळी आमदार सुरेश लाड,नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष अजय सावंत,उपनगराध्यक्ष प्रतिभा घावरे,प्रांता धिकारी सुदाम परदेशी उपस्िथत होते.या...
  March 10, 01:02 PM
 • मुंबई- शिवसेनेच्या ठाण्यातील काही कार्यकर्त्यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये केला. या कार्यक्रमात कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सेनेचे आणखी काही आमदार-खासदार आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी सेनेच्या नाशिकमधील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील प्रभाग क्रमांक 11 आणि 12चे शाखाप्रमुख संभाजी कुराडे, उपशाखाप्रमुख कृष्णकुमार सिंहसोडारी, सुरेश फोंडेकर आदींनी माणिकरावांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये...
  March 10, 12:28 AM
 • मुंबई - पालिका आयुक्तांनी ज्या राजकीय पक्षांची कार्यालये पाडण्यास मंजूरी दिलेली नाही ती पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी ( ता.आठ ) ठाणे महापालिकेला दिला.ठाण्यातील या बेकायदेशीर पक्षांच्या कार्यालये पाडण्यात यावी यासाठी अजित सवागवे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केले होते.या सुनावणीची काम न्या. ए.एम खानविलकर व ए पी भंगाळे यांच्या खंडपीठापुढे झाले.पालिकेने यापूर्वी 22 बेकायदेशीर राजकीय पक्ष कार्यालये पाडण्यात आले.अनधिकृत पक्ष कार्यालयांनी लवकर ती अधिकृत...
  March 9, 12:59 PM
 • ठाणे - पतीने पत्नीला गरम वाटीचे चटके व चावाने अमानुष छळवणूक केल्याची घटना उजाडात आली आहे.यात महिला जखमी झाली असून तिला छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. आरोपी रूपेश तांडेल,पत्नी भानुमती व तीन वर्षांच्या मुलासह कळव्यातील भूसार आळीत राहत आहे.रूपेश यांच्या नेहमीच्या भांडणांना कंटाळून पत्नीने दोन महिन्यापूर्वी विटावा या आपल्या माहेरी निघून गेल्या.घरी येण्याचे फोनवरून सांगून त्याला पत्नीकडून नकारच मिळत होता.यामुळे तो प्रत्यक्ष...
  March 8, 11:31 AM
 • ठाणे- मुळात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्यात राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या दौर्यातही चोरट्यांचा सुळसूळात झाल्याचे चित्र दिसत आहे. ठाणे शहराच्या दौर्यावर गृहमंत्री पाटील आले असता त्यांच्या बंदोबस्ताला ही चोरटे घाबरले नाहीत. मंगळवारी चोरट्यांनी शहरात अक्षरश: धुडगूस घालत दोन लाखाहून अधिक रुपयांचा ऐवज लूटून नेला. मंगळवारी भर दुपारी चिंतामणी चौकात चोरट्यांनी वृद्धाची बॅग लांबविली. त्यात बॅंकेचे पासबुक आणि 10 हजार रुपये रोख होते. तसेच चरईतील श्री स्वामी समर्थ...
  March 7, 12:35 PM
 • मुंबई/ठाणे- मागील वर्षी ठाणे शहरात बंद पुकारणा-या शिवसेना-भाजपकडून 4 कोटींची भरपाई वसूल करावी, या मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. महापौर निवडणुकीच्या मुद्द्यावरून हा बंद पुकारण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते शेखर भिसे यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अजय खानविलकर व न्यायमूर्ती ए. पी. भंगाळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने शिवसेनेला नोटीस बजावली. पक्षाचे तीन आमदार व भाजप यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. मागील...
  March 5, 02:04 PM
 • अलिबाग- रायगड जिल्ह्यातील वाशी (ता. पेण) येथे राहणार्या उमेश गणेश पाटील या व्यक्तीने आपली पत्नी व सव्वा वर्षाच्या चिमुकलीला जिवंत जाळल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. उमेश पाटील हा आपली पत्नी चैताली व छोट्या मुलीसोबत वाशी गावात राहत होता. मात्र, उमेश व चैतालीमध्ये काही कारणावरून नेहमीच वाद होत असे. याच वादातून उमेशने पंधरा दिवसांपूर्वीच चैतालीला जाळून टाकण्याची धमकी दिली होती. गुरुवारी रात्री चैताली घरात नसल्याचे पाहून तिच्या सासूने शोध...
  March 2, 03:56 AM
 • ठाणे - वाशी येथील सुनीलकुमार लोहारिया बिल्डर हत्याकांड ताजे असतानाच नालासोपारा येथे एका बांधकाम व्यावसायिकावर चार अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुधाकर सिंग असे हल्ला झालेल्या बिल्डरचे नाव आहे. शुक्रवारी रात्री सिंग हे काम आटोपून कारने रात्री घरी परतत होते. याच वेळी अचानकपणे अज्ञात चार जणांनी त्यांच्यावर गोळीबार करून तेथून पोबारा केला. घटनेनंतर परिसरतील नागरिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे...
  February 24, 02:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात