जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • पेण- पेण रेल्वे स्टेशनजवळ शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास एर्नाकुलम निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेसचे तीन डबे रूळावरून घसरले. अंतोरा फाटकाजवळ ही दुर्घटना घडली. त्यामुळे पाच तासांपासून कोकण रेल्वेचे वाहतूक ठप्प झाली आहे. पेण रेल्वे स्थानकाजवळ मंगला एक्स्प्रेस आली असता क्रॉसिंगजवळ मंगला एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे रुळावरून घसरले. हैदराबादेतील बॉम्बस्फोटाची घटना ताजी असताना ही दुर्घटना घडली. एक्स्प्रेस रुळावरून घसरताना जोरात आवाज झाला. बॉम्बस्फोट झाल्याची भीतीने काही प्रवाशानी...
  February 22, 06:34 PM
 • ठाणे- ठाण्यातील नालासोपारा भागात महिलेचे कापलेले शिर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावराई पाडा परिसरात एका प्लास्टिकच्या पिशवीत हे शिर गुंडाळून फेकले. हे शिर असलेल्या महिलेचे वय साधारण 30 च्या जवळपास असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे नालासोपारा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात मारेकर्यांनी या महिलेचा शिरच्छेद करून तिची निर्घृण हत्या केली असावी. परंतु तिचे शिर फेकून त्यांनी संबंधित महिलेल्या धडाची कुठे विल्हेवाट लावली, हे शोधणे पोलिसांसमोरील एक...
  February 21, 02:28 PM
 • ठाणे- अंबरनाथ स्टेशनजवळ बुधवारी सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे (सीएसटी) जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे चाकरमान्यांचा खोळंबाही झाला होता. परंतु वायर जोडणीचे काम झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. कामगार संघटनांनी आज आणि उद्या भारत बंद पुकारला आहे. त्यामुळे रेल्वे सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  February 20, 11:02 AM
 • ठाणे - मंगळसूत्र चोरांच्या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या फौजदारावर गुन्हेगारांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना भिवंडी येथे रविवारी मध्यरात्री घडली. अभिजित भुजबळ असे जखमी झालेल्या फौजदाराचे नाव आहे. रविवारी रात्री मंगळसूत्र चोरांना पकडण्यासाठी कासारवाडी येथील 20 पोलिसांचे पथक भिवंडी येथे गेले होते. या वेळी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. मात्र, यातील दोघांनी भुजबळ यांच्यावर चाकूने वार केले. त्यांना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  February 18, 02:58 PM
 • ठाणे - नुकताच विवाह झालेल्या महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी ठाण्यात पाच जणांना अटक केली. याप्रकरणी पती जब्बार खाटीक त्याची आई अफरेझा, भाऊ अस्लम आणि सलीम आणि बहीण शबाना यांना पोलिसांनी अटक केली आहे. वाशी येथील जब्बार खाटीक याचा आयेशा हिच्याशी नुकताच विवाह झाला होता. जब्बारच्या कुटुंबीयांनी काही महिन्यांपासून तिचा छळ सुरू केला होता. त्यामुळे तिने सततच्या छळाला कंटाळून रविवारी रात्री रॉकेलने पेटवून घेत आत्महत्या केली. त्यानंतर आयेशाच्या वडिलांनी जब्बार आणि त्याच्या...
  February 18, 02:55 PM
 • ठाणे - कल्याणजवळील उंबर्डे गावात गावक-यांनी चोर समजून एका २५ वर्षीय युवकाला जबर मारहाण केली, त्यात त्याचा मृत्य झाला. शुक्रवारी सकाळी बाजारपेठ पोलिसांनी गावक-यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी पहाटे शोभा वानखेडे यांच्या घराचे दार ठोठावण्यात आले. दार उघडल्यानंतर एक अनोळखी तरुण दारासमोर उभा होता. त्याला चोर समजून वानखेडे यांनी आरडोओरड सुरु केली. त्यांचा आवाज एकून शेजारी जमा झाले. गावक-यांनी त्याला विचारपूस केली मात्र, त्याने काहीच माहिती न दिल्यामुळे ग्रामस्थांनी...
  February 16, 12:32 PM
 • ठाणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डोंबिवली शहर शाखेने आयोजित केलेल्या चौथ्या मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास 900 ज्येष्ठांनी सहभाग नोंदविला. रविवारी फडके रोडवर ही स्पर्धा झाली. डोंबिवलीत आप्पा दातार चौकात मनसेचे आमदार रमेश पाटील, ज्येष्ठ नगरसेवक शरदतात्या गंभीरराव, राजेश कदम आणि मालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी मीनाक्षी ओक यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. 65 वर्षांच्या महिलांच्या गटात रतन सोमा यांनी प्रथम, पद्मजा दवडीकर द्वितीय तर उषा खेमानी यांनी तृतीय...
  February 11, 02:19 PM
 • डहाणू - वाणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष गायकावाड यांना ट्रकने उडविले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गायकवाड हे संशयास्पदरित्या जात असलेल्या ट्रकचा पाठलाग करीत होते, त्यावेळी ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड ठार झाले. (छायाचित्र:संग्रहित)
  February 8, 05:52 PM
 • पालघर (जि. ठाणे) - स्त्रियांचे आरोग्य सुधारले की त्यांच्या मुलांचेही आरोग्य सुधारेल आणि या मुलांमुळेच उद्याचा भारत घडेल, असा आशावाद कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी व्यक्त केला. महिलांच्या सामाजिक स्तरात बदल झाला नाही, तर केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणा-या योजनांचा त्यांना फायदा होणार नाही, हे सांगतानाच देशात अजूनही 40 टक्के मुले कुपोषणग्रस्त असल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. शून्य ते 18 वयोगटातील मुलांसाठी राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी पालघर...
  February 7, 08:05 AM
 • ठाणे - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज पालघरमध्ये येत आहेत. त्यांच्या हस्ते येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाचा प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, स्वागतापासून आभार प्रदर्शनापर्यंतहा संपूर्ण कार्यक्रम १५ विद्यार्थी करणार आहेत. या कार्यक्रमात एकाही मंत्र्याचे भाषण होणार नाही असे राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री गुलामनबी आझाद, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख...
  February 6, 01:27 PM
 • ठाणे - 27 कारसाठी 1.30 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन शताब्दी महिला सहकारी बॅँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींची शोधमोहीम सुरू केली आहे. आरोपी जॉन्सी कोसे व मुकुंद मिर्शा यांनी नोव्हेंबर 2011 मध्ये बॅँकेच्या नवपाडा शाखेतून 27 कारसाठी 1.30 कोटी रुपये कर्ज घेतले होते. आरोपींच्या आरसी बुक व अन्य कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर बॅँकेने कर्ज मंजूर केले. सुरुवातीचे काही महिने नियमित हप्ते भरल्यानंतर नंतर त्यांनी ते बंद केले. यामुळे बॅँक व्यवस्थापनाला...
  February 6, 11:16 AM
 • ठाणे - महाराष्ट्रात स्थायिक होणा-या परदेशी नागरिकांच्या संख्येत 2005 पासून वाढ हात आहे. यात कोकणातील रायगड आणि विदर्भातील नक्षलग्रस्त गडचिरोली हे जिल्हे आघाडीवर आहेत. माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही बाब उघड झाली आहे. भाजपचे माजी आमदार संजय केळकर यांनी रायगड पोलिसांकडून परदेशी नागरिकांच्या संख्येची माहिती मागवली होती. या आकडेवाडीनुसार रायगड जिल्ह्यात एकूण 700 परदेशी नागरिक 2005 पासून तळ ठोकून आहेत. यात सर्वधिक म्हणजे 211 कोरियन, त्याखालोखाल 204 पाकिस्तानी, तर 116 चीनचे नागरिक राहतात. नक्षलग्रस्त...
  February 4, 11:51 AM
 • ठाणे- दिवा वासियांना तीव्र पाणी टंचाईची झळ बसत असताना त्यांना एमआयडीसीमार्फत वाढीव 5 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने पालिका मुख्यालयावर शिवसेनेतर्फे भव्य पाणी मोर्चा काढण्यात आला. पालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना त्यांच्या माजी नगरसेवकाला हा मोर्चा काढावा लागत असल्यामुळे सत्ताधार्यांना हा घरचा आहेर असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे. जानेवारी 2012 मध्ये एमआयडीसीमार्फत वाढीव पाच एमएलडी पाणीपुरवठा करण्याची योजना मढवी यांनी मंजूर करून घेतली...
  February 2, 01:26 PM
 • ठाणे- उल्हासनगरातील कॅम्प 4 परिसरातील 26 सेक्शनमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास एक अनाधिकृत बांधकाम कोसळल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. अन्य दोन मजूरही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. उल्हासनगर सेक्शन 26 परिसरातील महालक्ष्मी हॉटेलच्या मागे गुरुमुखसींग गुरुनासिंघानी यांच्या घराचे अनाधिकृत बांधकाम सुरु होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास हे बांधकाम सुरु असताना ते अचानक कोसळले. या दुर्घटनेत भुजी राठोड आणि तुकाराम...
  January 30, 11:35 AM
 • ठाणे- डोंबिवलीत एका तरुणाने त्याच्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली आहे. घटनेनंतर फरार झालेला आरोपी रोशन घोरपडे पोलिसांच्या शरण आला आहे. ही घटना अहिरे रोडवर सोमवारी घडली. यापूर्वी आरोपी रोशन याने त्याची आईची हत्या केली होती. आता त्याने पत्नीच हत्या केली आहे. तरुणाने हे निर्घृण कृत्य का केले असावे, हे अद्याप कळू शकलेले नाही. रोशनचा काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर रोशनच्या पत्नीचे आणि त्याच्या आईचे भांडण होत होते. या भांडणामुळे रोशनची पत्नी...
  January 29, 10:55 AM
 • ठाणे- सलग तीन दिवसांची सुटी आल्यामुळे बाहेरगावी गेलेल्या लोकांमुळे ठाण्यात चोरांचा सुळसुळाट सुटला आहे. चोरट्यांनी शहरात एकाच दिवशी चार घरे फोडून सुमारे एक ते दीड लाखांचा ऐवज लांबविला आहे. मुंब्र्यात दोन तर कळवा आणि ठाण्यात प्रत्येकी एका घरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दिव्यातील श्रीकृष्ण अपार्टंमेंटमध्ये राहणारे केणी कुटूंब सलग तीन दिवसांच्या सुट्या आल्याने ते बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप बनावट चावीने उघडले. 15 हजार रूपयांची रोकड आणि मोटारसायकल चोरली....
  January 28, 12:39 PM
 • ठाणे- महापौर चषकाच्या आयोजनासाठी उधळपट्टी करण्यासाठी भिवंडी पालिकेकडे लाखो रुपये आहे. परंतु कर्मचार्यांना डिसेंबरचा पगार देण्यासाठी नाही. असा संतप्त सवाल कर्मचार्यांनी प्रशासनाला विचारला आहे. भिवंडी पालिकेचे मासिक उत्पन्न 16 कोटी 50 लाख रुपये असून त्यापैकी 14 कोटी रुपये जकातीपोटी मिळतात. साडेचार हजार कर्मचार्यांच्या पगाराकरता दरमहा सात कोटी रुपये लागतात. पालिकेचे विद्युत बील, पाटीपट्टी आदींसाठी नऊ कोटी रुपये उरतात. यातून कर्मचार्यांना पगार दिल्यानंतर दीड कोटी शिल्लक राहतात. यातून...
  January 25, 12:22 PM
 • ठाणे- रायगड जिह्यातील मोठी जुई प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाची कृष्णकृत्ये चव्हाट्यावर आली आहेत. या शिक्षकाच्या मोबाईलच्या मेमरीकार्डात विद्यार्थिनीचे नग्न छायाचित्रे आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या मोटी जुई प्राथमिक शाळेतील शिक्षक दत्ता जाधव याला विनयमंग प्रकरणात नुकताच जामीन मिळाला आहे. परंतु त्याचे आणखी कृष्णकृत्ये जगासमोर आली आहेत. या शिक्षकाच्या मोबाईलमधील मेमरीकार्डात याच शाळेतील आणखी एका विद्यार्थिनीचे नग्नावस्थेतील छायाचित्रे आढळून आले...
  January 21, 03:33 PM
 • ठाणे- कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या जुन्या इमारतीत असलेल्या गोडाऊनला गुरुवारी आग लागली. त्यात फवारणीसाठी ठेवलेली औषधे जळून खाक झाली. बदलापुरातील पाटीलपाडा, स्टेशनपाडा आणि संकल्पसिद्धी परिसरातील नागरीकांना आगीच्या धुरामुळे मळमळणे आणि उलट्यांचा त्रास झाला. गोडाऊनला आज लागल्याचे समजताच बदलापूर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेवून आग आटोक्यात आणली. पालिकेच मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांनी घटनास्थळी जाऊन आगाची आढावा घेतला. ही नेमकी कशामुळे लागली याचे कारण...
  January 18, 03:16 PM
 • ठाणे- देशासह राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. हे अत्याचार रोखायचे असतील तर कुणी येईल आणि मदत करेल या भ्रमात न राहता महिलांनी स्वत:हून विरोध करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. त्यासाठीच कल्याण-डोंबिवली महामालिका (केडीएमसी) प्रशासनाने एक उपक्रम हाती घेतला आहे. प्रशासनाकडून महिला कर्मचार्यांसाठी कराटेचे प्रशिक्षण सुरु केले जाणार आहे. येत्या 18 जानेवारी ते 4 फेब्रुबारी या कालावधीत कार्यालयीन वेळेतच कर्मचार्यांना प्रसिद्ध ज्युडो कराटेपटू लीना...
  January 16, 01:23 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात