जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • ठाणे- पाठीच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठी शैलेश भट्ट मुंबईत आले आहेत. त्यांनी घेतलेल्या ध्यासामुळे हा आजार मागे लागला आहे. ते पाच वर्षांपासून रात्रभर बाइक चालवतात. हायवेवरून जाणा-यांच्या सुरक्षेसाठी. त्यांना साथ देतात त्यांचे मित्र महेंद्र माने. 2007 च्या एका रात्री लूटमार करणा-या दोघांना या दोन मित्रांनी चोख उत्तर दिले; पण नंतर विचार केला, प्रत्येक व्यक्तीला असा मुकाबला करणे कठीण आहे. ठाण्याजवळील पालघर येथे राहणारे शैलेश लेबर काँट्रॅक्टर आणि महेंद्र यांचेही तेथेच फुटवेअरचे दुकान आहे....
  January 5, 11:17 PM
 • दिल्लीत सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर जनक्षोभ उसळला होता. परंतु, विकृत मनोवृत्ती अशा प्रकारचे कृत्य करण्यास परावृत्त झालेली नाही. दोन अशा घटना उघडकीस आल्या आहेत, त्यात स्वतःची अब्रू वाचविण्यासाठी एका गर्भवती महिलेने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. तर एका अल्पवयीन मुलीने ऑटोतून उडी मारून स्वतःला वाचविले. दुसरी घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यात मुंब्र्याजवळ एक 17 वर्षीय मुलगी ऑटोमध्ये बसली होती. या भागात शेअर ऑटोची पद्धत आहे. ऑटोमध्ये आधीच 2 जण बसले होते. परंतु, चालकाने ऑटो वेगळ्या दिशेने...
  January 4, 04:46 PM
 • ठाणे- सध्या कोणीही उठते अन् संस्था स्थापन करते. ती संस्था कुणाच्याही नावाने जीवनगौरव पुरस्कार सुरू करते. ज्यांना हा पुरस्कार जाहीर झाला तेही न लाजता पुरस्कार स्वीकारतात. एखाद्याच्या जीवनाचे मोल एक लाख... दोन लाख...पाच लाख कसे असू शकते, अशी झणझणीत टीका अभिनेते नाना पाटेकर यांनी केली. जीवनगौरव पुरस्काराची ही थेरं बंद व्हायला हवीत हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. ठाणे पोलिसांतर्फे आयोजित कार्यक्रमात नाना म्हणाले, कुणीही येरागबाळा उठतो अन् जीवनगौरव पुरस्कार सुरू करतो. हा गुन्हा नाही. मात्र...
  January 3, 04:46 AM
 • ठाणे - देशाला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्ष झाली तरी आदिवासींना मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत ही सध्याची परिस्थिती आहे. मुंबईपासून जवळच असलेल्या ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी पाडे आहेत तिथे अजूनही वीज पोहोचलेली नाही. ठाण्यातील डहाणू आणि पालघर तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीमधील २१३ पाडे आजही आंधारात आहेत. याची दखल घेत आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी आदिवासी पाड्यांवरील वीजेची समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश अधिका-यांना दिले आहेत. ठाण्यातील शासकीय...
  January 2, 12:44 PM
 • ठाणे- संपूर्ण देश नववर्षांच्या स्वागतासाठी सज्ज असताना ठाण्यात एका माथेफिरु तरुणाने तरुणीवर ब्लेडने वार केल्याची घटना घडली. ठाणे स्टेशनवर एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर हल्ला केला आणि त्यानंतर स्वत: विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी कामावरुन घराकडे परतत होती. यावेळी रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावर एका...
  January 1, 12:05 PM
 • ठाणे - महापालिकेच्या स्थायी समितीसाठी राजकारण्यांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेमुळॆ सामान्य जनतेचे हाल होत आहेत. निधी अभावी अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळं संतप्त ठाणेकरांनी नेत्यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे. ठाण्यात स्थायी समितीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. निवडणुका होऊन सहा महिने उलटल्यानंतरही स्थायी समिती स्थापन झालेली नाही. राजकारण्याच्या या सत्तासंघर्षात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. अनेक समस्यांबाबत जनतेकडून जाब विचारला असता निधी नसल्याचे नगरसेवकांकडून सांगितले जात...
  August 18, 11:02 AM
 • ठाणे - पैशाच्या हव्यासापोटी महाविद्यालयीन तरुणांनी मित्राचं अपहरण करुन खून केल्याची घटना ठाण्यातल्या काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. हत्या झालेल्या तरुणाचं नाव गणेश श्रीराम असे आहे.तारापूरचा रहिवासी असलेला हा तरुण कांदिवलीच्या ठाकूर कॉलेजमध्ये शिकत होता. काशिमीरा भागातल्या एका इमारतीत तो भाड्याने राहत होता. झटपट पैसा कमावण्याच्या उद्देशानं गणेशचे मित्र रविंद्र य़ादव आणि कल्पेश सरोज यांनी गणेशच्या अपहरणाचा कट रचला. गणेशला नायगावला बोलावून त्याची दगडानं ठेचून हत्या...
  August 17, 12:04 PM
 • मुंबई - ठाणे जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील एका गावात आई व मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी महावितरणच्या पाच कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी रस्त्यावर पडलेल्या इलेक्ट्रिक केबलचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याला बराच उशीर झाला तरी तो परत न आल्याने त्याची आई वनिता विनोदच्या शोधात शेताकडे गेल्या. त्यांनाही या इलेक्ट्रिक केबलचा शॉक लागून त्यांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी महावितरणच्या पाच...
  August 14, 02:31 AM
 • ठाणे- मीरा-भाईंदर शहराला 'सॅटेलाईट सिटी' बनविण्याचा विचार सरकार करत असून त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी सांगितले. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. शहरातील सामान्य जनतेला सक्षम बनविण्यासह अत्याधुनिक सेवा पुरविण्यासाठी काँग्रेस वचनबद्ध असून धोकादायकइमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग क्लस्टर रिडेव्हलपमेंटच्या...
  August 11, 04:35 PM
 • रायगड - मुंबई ठाण्यासह राज्यातल्या गोविंदा पथकाच्या उत्साहाला उधाण आले आहे. शहरातील विविध भागात संगीताच्या तालावर गोविंदा पथक हंडी फोडायला जातांना दिसत आहे, दिघी येथील एका दहीहंडी पथकातील थर कोसळल्याने एका गोविंदाच्या मृत्यूची बातमी समोर येत आहे. महिला पथकही सज्ज झाली आहेत. दरम्यान, दहीहंडीनिमित्त मुंबई पोलिसांकडून अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान पोलिसांची विशेष नजर राहणार असून, तब्बल १५ हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत.
  August 10, 12:18 PM
 • ठाणे- दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ठाण्याची नवी ओळखू होऊ पाहत आहे. दहीहंडी उत्सवासाठी यंदा ठाण्यातील शंभर ते दीडशे गोविंदा पथक सज्ज झाले आहे. मात्र पुण्यात झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील दहीहंडी उत्सवावर पोलिसांचा वॉच राहणार आहे. कोट्यावधींची बक्षिसे असल्याने या उत्सवात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणे शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच सर्व गोविंदा पथकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक 411 तर खाजगी...
  August 9, 02:56 PM
 • कल्याण- चारधाम तीर्थयात्रेला गेलेल्या कल्याण येथील मिलापकुंज सोसायटीतील रहिवासी बच्छुलाल चव्हाण (वय-47) या भाविकाचा उत्तराखंड येथील भूस्खलनात मृत्यू झाला.चव्हाण हे आपल्या चार मित्रांसोबत चारधाम यात्रेला उत्तराखंड येथे गेले होते. परंतु उत्तराखंडात ढगफुटी झाल्याने रस्ते, पूल तसेच गावे भूस्खलनात उद्ध्वस्त झाले. दरम्यान, चव्हाण हे चंदाली येथून हरिद्वारकडे पायी जात असताना अचानक भूस्खलन झाले आणि त्यामधील एक दगड त्यांच्या डोक्यावर लागला. त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू...
  August 7, 01:15 PM
 • ठाणे - डोंबिवलीत डेंग्यूने थैमान घातले असून अजूनही प्रशासन जागे झालेले नाही. रविवारपर्यंत डेंग्यूचे ९ बळी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेविका माधुरी काळे यांनाही डेंग्यू झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली विभाग अध्यक्ष सुधीर कदम यांचा रविवारी डेंग्यूने मृत्यू झाला. त्यांच्यावर आस्था हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्याआधी दोन दिवसांपूर्वी स्वामीनाथन अय्यर या बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. डोंबिवलीतील डेंग्यूचा तो आठवा बळी होता....
  August 6, 12:49 PM
 • ठाणॆ - सुप्रीम कोर्टानं विरोधी पक्षनेता काँग्रेसचा नाही तर दुस-या क्रमांकाचा पक्ष असलेला राष्ट्रवादीचा असावा असे निर्देश दिल्याने ठाण्यातील कॉंग्रेस पार्टीला धक्का बसला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीचा होणार हे नक्की झाल आहे.राष्ट्रवादीच्या उमेदवारास डावलून विरोधीपक्षनेतेपदी काँग्रेसच्या मनोज शिंदे यांची नियुक्ती महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी केली होती. मात्र उच्च न्यायालयानं ही नियुक्ती बेकायदा ठरवल्यानं शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र...
  August 4, 02:00 PM
 • ठाणे - देशात पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य माणूस त्यात भरडला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने पेट्रोलवरील जकात कमी करून वाहनचालकांना दिलासा दिला आहे. या शहरात आता वाहनचालकांना तीन रुपयांनी स्वस्त पेट्रोल मिळणार आहे. ठाण्यात आधीचा पेट्रोल दर प्रतिलिटर 78 रुपये 10 पैसे होता, परंतु महापालिकेने जकात कमी केल्याने आता वाहनचालकांना केवळ 75 रुपये 10 पैसेच मोजावे लागणार आहेत.
  August 4, 01:31 PM
 • ठाणॆ - संभाजी ब्रिगेडने काल हलवलेला शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा प्रशासनाने आज पुन्हा रायगडावर बसवला. इतिहासात वाघ्याचा कुठल्याच प्रकारचा उल्लेख नसल्याचे कारण सांगून हा पुतळा काल ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हलवला होता. या प्रकरणी पोलिसांनी ब्रिगेडच्या 73 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. कार्यकर्त्यांवर दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायगडावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी ब्रिगेडने सहा जूनपूर्वीच हा...
  August 2, 12:40 PM
 • ठाणॆ - रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज हटविला. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी दावा केला आहे की, इतिहासात वाघ्याचा कुठलाच उल्लेख नाही. संभाजी ब्रिगेडने 6 जूनपूर्वीच पुतळा हटवण्याची मागणी केली होती आणि ती मान्य न झाल्यास तो उद्ध्वस्त करण्याचा इशारा ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी दिला होता.शिवरायांच्या काळात वाघ्या कुत्रा अस्तित्वात होता याबद्दल कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. असे असताना शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाशेजारी या...
  August 1, 01:57 PM
 • कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एस्कॉर्ट वसुलीचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावला. 16 कोटी 91 लाखांच्या खासगी ठेका कार्योत्तर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. पालिका कर्मचार्यांकडूनच एस्कॉर्ट वसुली करण्यात यावी, अशी उपसूचनाही करण्यात आली होती. त्यानंतर त्यासाठी घेतलेल्या मतदानात उपसूचना १२ विरुद्ध ४ मताने मंजूर करण्यात आली. परंतु, एस्कार्टचा प्रस्ताव फेटाळल्याने पालिकेला एक कोटी 85 लाखांवर पाणी सोडावे लागले.१ जुलैपासून स्थानिक संस्था कर लागू झाला आहे. या कालावधीत...
  July 28, 01:21 PM
 • ठाणे- कोर्टाच्या दणक्यानंतर ठाणे महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये स्थानिक नेत्यांनी जमवून घेतले आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांची गुरुवारी झालेल्या बैठकीत दोन्ही कॉंग्रेस समेट आल्याचे जाहीर केले. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आम्ही शिवसेनेबरोबर कधीच नव्हतो, अशी सारवासारव काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. त्यामुळे आता ठाण्यात युतीला सत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्व वाद मिटले...
  July 27, 12:56 PM
 • ठाणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टोल वसुली विरोधातील आंदोलनानंतर मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर टोल वसुली केली जात आहे. विशेष म्हणजे हेच चित्र अवघ्या महाराष्ट्रातील टोल नाक्यांवरही दिसत असल्याने राज यांचे मनसैनि आहेत तरी कुठे असा सवाल वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे. राज ठाकरे यांनी टोल भरू नका असे आवाहन केले होते. परंतु टोल नाक्यावर वाहन चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यावेळी मनसेचा एकही कार्यकर्ता नसतो. त्यामुळे वाहन चालकांना टोल हा...
  July 25, 06:32 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात