जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • ठाणे- वसई येथे एका महिला इस्टेट एजेंटची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. कमरजॉं शेख असे या महिलेचे नाव असून त्या भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या उपाध्यक्षा असल्याचे बोलले जात आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कमरजॉं शेख या वसई येथील मीरारोड पूर्व नयानगर येथे गेल्या 10 दिवसांपासून एकट्या राहत होत्या. यापूर्वी शेख शिमिरा हद्दीत राहत होती. आईशी संपर्क होत नसल्याने त्यांनी मुलगी नाईदा खान शनिवारी शेख यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आली. घराचा दरवाजा उघडून पाहिला असता नाईदाला...
  July 25, 11:56 AM
 • ठाणे- बदलापूरहून सीएसटीकडे येत असलेल्या लोकलच्या पेंटोग्राफवर ओव्हरहेड वायर पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही घटना कल्याण स्थानकाजवळ सोमवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. त्यामुळे अनेक गाड्यांचा खोळंबा झाला. बदलापूरहून सीएसटीकडे जात असलेली जलद लोकल कल्याण स्थानकावरून सुटली आणि ट्रॅक बदलत असताना या गाडीच्या पेंटोग्राफवर ओव्हरहेड वायर तुटून पडली. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटना स्थळी रेल्वेचे कर्मचारी पोहचले असून...
  July 23, 04:27 PM
 • ठाणे- जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील नांदिवली आणि परिसरातील 27 गावांमधील शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे मान्य करू न सरकारने यासंदर्भात कारवाई सुरू केली असून 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांवर आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात दिली.आमदार सुभाष देसाई यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. याला उत्तर देताना थोरात यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवलीतील 27 गावांमध्ये बोगस कागदपत्रे आणि बनावट शासकीय...
  July 17, 05:00 AM
 • ठाणॆ - पोलिसांवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्याची घटना ठाण्यातील कळवा भागात उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोराला पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर चोराने आणि त्याच्या बायकोने धारधार चाकूने हल्ला केला. हल्यात दोन पोलिस जखमी झाले आहेत.जखमी पोलिसांना कळव्याच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हल्ला करणार्या चोराच्या बायकोला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
  July 16, 10:12 AM
 • कोपरी - ठाण्यामध्ये शिवसेनेचे उपविभाग प्रमुख राजेश घाडगे यांच्यावर कोपरी परिसरात शुक्रवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात राजेश घाडगे गंभीर जखमी झाले असून त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी राजेश घाडगे यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत दोन गोळ्याही झाडल्या. यातील एक गोळी घाडगेंच्या कमरेत लागली तर दुसरी गोळी त्यांच्या पायाला लागली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी वैयक्तिक कारणामुळे हा हल्ला झाला...
  July 15, 12:28 PM
 • मुंबई - एक कोटी १० लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्ह्याचे त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव शासनाने मांडला आहे. या त्रिभाजनाचा अभ्यास करण्यासाठी महसुल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मुंबई पासून जवळ असलेल्या ठाणे जिल्ह्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाला आणि नागरिकांनाही प्रशासकीय कामात आडचणींचा सामना करावा लागतो. मुंबईपासून जवळ असला तरी ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग आहे. हे आदिवासी मुलभूत सोयी...
  July 11, 07:59 PM
 • कल्याण- शहापूर तालुक्यातील गुंडे गावात जमिनीच्या वादातून झालेल्या हत्या प्रकरणात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने नऊ आरोपींपैकी दोघांना जन्मठेपेची शिक्षा, चार जणांना एक वर्षाची कैद तर तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे.गुंडे गावातील योगेश वारघडे या तरूणाची एक ऑगस्ट 2008 रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी बापू बडेराव, महेंद्र बडेराव, मोहन देशमुख, दशरथ बडेराव, अनिल बडेराव, एकनाथ बडेराव, भूषण बडेराव, रफिक शेख आणि अशोक विशे यांना मुरबाड पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कल्याण जिल्हा...
  July 10, 01:15 PM
 • ठाणे - कस्टम अधिकारी असल्याचे भासवत लोकांना लाखो रुपयांना गंडवणार्या आरोपीला भिवंडी पोलिसांनी अटक केली.महेश भास्कर म्हेत्रे या आरोपीला नवी मुंबईच्या कळंबोली भागातून अटक केली आणि त्याच्याकडून 16.57 लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रवीण पवार यांनी दिली. सेवानिवृत्त शिक्षक वसंत यशवंत वाघ यांच्या घरी म्हेत्रे कस्टम अधिकारी असल्याचे सांगून राहत होता. मुलीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपीने वाघ यांच्याकडून 7.50 लाख रुपये उकळले. याच पद्धतीने त्याने इतरांकडून 32.90 लाख...
  July 8, 05:59 AM
 • मुंबई - ठाणे मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची निवड करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. न्यायमूर्ती शरद बोबडे व न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने हा निकाल देत यासंदर्भातील याचिका निकाली काढली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे काँग्रेसचे मनोज शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी झालेली निवड रद्दबातल ठरली आहे. शिंदे यांच्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय भोईर यांनी आव्हान दिले होते. महापालिकेत राष्ट्रवादीचे 34 सदस्य असून पालिकेतील...
  July 7, 12:37 AM
 • कल्याण: पूर्व कल्याणमधील विजय नगरातील सम्राट अशोक विद्यालयाच्या छताचे पत्रे कोसळून झालेल्या अपघातात 12 विद्यार्थी जखमी झाले आहे. गुरुवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. दुपारच्या सत्रात वर्ग सुरू असताना पाचवी इयत्तेच्या वर्गाचे छत विद्यार्थ्यांच्या डोक्यावरच कोसळले. यावेळी वर्गात 15 विद्यार्थी होते. त्यातील 12 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. शाळेच्या छताचे पत्रे कुचके झाले होते. तसेच या पत्र्यांतून पावसाचे पाणी गळत असल्याने...
  July 6, 03:00 PM
 • ठाणे: ठाण्यातील कापुरबावडी परिसर दुहेरी हत्याकांडाने सोमवारी संध्याकाळी हादरला. भिवंडी येथील अण्णासाहेब जाधव विद्यालयातील एका शिक्षकाने आपल्या पत्नीसह नऊ वर्षांच्या मुलीची हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलाची हत्या करण्याचा प्रयत्न या शिक्षकाने केला होता. संजय उंबरकर (45) असे या आरोपीचे नाव असून स्वाती उंबरकर आणि अथर्वा उंबरकर अशी मृतांची नावे आहे. स्वाती भिवंडीच्या बी.एन.एन. महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संजय उंबरकर आणि...
  July 3, 03:36 PM
 • ठाणे: अवघ्या तीस हजारांसाठी साडेचार वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण करणार्या भामट्यांना पोलिसांनी 12 तासांच्या आत अटक केली. फुलकुमार राजमल गौतम (28) आणि राजेश छोटू राम सबदवर्मा (24) अशी आरोपींची नावे आहे. भाईंदर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.भाईंदर येथील जय अंबे नगर येथील रहिवासी दिलीप अयोध्या प्रसाद तिवारी यांचा मुलगा मोनुचे रविवारी अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी वडिलांकडे तीस हजारांची डिमांड केली होती. ती पूर्ण न केल्यास मोनूला जीवे मारण्याची धमकी...
  July 3, 03:08 PM
 • ठाणे - उल्हासनगर येथील भय्यासाहेब आंबेडकरनगरमध्ये राहाणा-या नराधमाने दारुच्या नशेत स्वतःच्याच पाचवर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. मंगळवारी दुपारच्या सुमारास शंकर देठे (३५) दारु पिऊन घरी आला. पत्नी लोकलट्रेनमध्ये फळविक्रीसाठी गेली होती. मोठी मुलगी शाळेत होती. याचा फायदा घेत या नराधमाने स्वतःच्याच पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केले. ती बचावासाठी आक्रोश करत असताना त्याने तिचे तोंड दाबून धरले. पीडित मुलीच्या आजीला तिची अवस्था पाहून घडला प्रकार लक्षात आला. तिने शंकरला...
  June 27, 03:15 PM
 • शहापूर - येथील एका महिलेला अलिबाग-शिरपूर एसटी बसमध्ये जवळच बसलेल्या महिलेने गुंगी देऊन दोन लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. नागोठाणा येथील मेघना मेने त्यांच्या आठवर्षांच्या मुलीसह अलिबाग-शिरपूर बसने नाशिकला निघाल्या होत्या. भिवंडी जकात नाका स्थानकावर एक महिला बस मध्ये चढली तिने मेने यांच्याकडे बसण्यासाठी जागा मागितली. त्याचवेळी त्या महिलेच्या साडीचा पदर मेने यांच्या तोंडावर पडला आणि त्यांना गुंगी आली. त्याचवेळी त्या महिलेने मेने यांची सुटकेस लांबवली आणि भिवंडी येथे उतरुन...
  June 25, 03:50 PM
 • ठाणे- काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कसलेही मतभेद नसल्याचा निर्वाळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. राज्यात आम्ही 1999 पासून एकत्र नांदतो आहोत. काही स्थानिक मुद्द्यांवरून मतभेद असले तरी ते फारसे गंभीर नाहीत. दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते तसेच जनतेने या संदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नये, असा सल्ला त्यांनी दिला. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
  June 21, 03:31 AM
 • ठाणे: जिह्यातील अंबरनाथ येथे जन्मदेत्या पित्यानेच आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीची हत्या केल्याचा अमानवी प्रकार घडला आहे. पोलिसांनी या नराधमास ताब्यात घेतले आहे. मुलीला बोलवल्यानंतर ती जवळ न आल्याने रागाच्या भरात आरोपीने त्याच्या मुलीला भींतीवर ढकरले. त्यात मुलीच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि तिने जागेवरच प्राण सोडले. पोलिस पुढील तपास करत आहे.नवजात बालिकेच्या तोंडात तंबाखू कोंबून पित्यानेच केली तिची हत्या!माता न तू वैरिणी : नवजात बालिकेची हत्या, पाच वर्षे फ्रिजरमध्ये ठेवले शव
  June 18, 03:15 PM
 • ठाणे - शिक्षण हक्क कायदा आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत आणण्याचे ध्येय गाठण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षण हक्क आणि पटनोंदणी जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २००९ मध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याच्या अंमलबजावणीची घोषणा केली. त्यानुसार ६ ते १४ वर्ष वयोगटातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच शाळेत कधीच न गेलेल्यांना शाळेत प्रवेश मिळवून द्यावा आणि कोणतेही बालक ८ वी पर्यंत नापास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. यासोबतच...
  June 14, 01:42 PM
 • अलिबाग- हरिहरेश्वर येथे समुद्रात रविवारी सकाळी तीन पर्यटक वाहून गेले. तिघांपैकी एका पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे. हरिहरेश्वर येथील एमटीडीसी गेस्ट हाऊसच्या सम्रुद किनारी ही घटना घडली. बेपत्ता असलेल्या दोन पर्यटकांचा शोध सुरू आहे. निखिल गोविंदराव काळे (रा. यवतमाळ) यांचा मृतदेह मिळाला आहे. कुशल सटाळे (लोणावळा), श्वेता वाटाणे (अमरावती) या दोघांचा शोध अद्याप लागलेला नाही. बुडालेले तिघेजण चिंचवड -पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. सहलीसाठी पुण्याहून आपल्या ग्रुपबरोबर ते आले होते....
  June 10, 04:10 PM
 • रायगड - ज्या किल्ल्यांवर एकही लढाई झाली नाही अशा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्रशासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, परंतु जिथे जिवंत इतिहास घडला त्या महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी निधी दिला जात नाही. म्हणूनच सरकार कुठल्याही पक्षाचे असले तरी शिवभक्तांच्या ताकदीच्या जोरावर ते वाकल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी दिला. किल्ले रायगडावर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी ते बोलत होते. अपूर्व उत्साह आणि जल्लोषी वातावरणात महाराष्ट्रासह विविध...
  June 7, 03:33 AM
 • रायगड- लहरणारे भगवे ध्वज, पावसाच्या बरसणा-या धारा आणि शिवरायांचा जयजयकार अशा जल्लोषी वातावरणामध्ये 33९ व्या सोहळ्याला मंगळवारी प्रारंभ झाला. बुधवारी सोहळ्याचा मुख्य दिवस असून सकाळी 10 वा. संभाजीराजे छत्रपती व अन्य मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे.गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर येथून अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगड येथे भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. यंदाही यासाठी किल्ल्यावर जय्यत तयारी...
  June 6, 12:33 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात