जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नवी दिल्लीत अटक करण्यात आल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी डोंबिवली, कल्याणमधील अण्णा हजारे यांच्या समर्थकांनी, अण्णा हजारे मंचचे कार्यकर्ते, भाजपच्या नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह विविध ठिकाणी उपोषणे केली. अण्णांना अटक झाल्याचे कळल्यानंतर डोंबिवलीतील सुमारे शंभर ते दीडशे नागरिकांनी पूर्व भागातील रेल्वे स्टेशन परिसरात एकत्र येऊन घोषणाबाजी केली. अण्णा हजारे मंचचे डॉ. अरुण पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे.
  August 17, 01:36 PM
 • कल्याण- केडीएमटीत झालेल्या सर्व घोटाळय़ांची एकत्रित चौकशी करून 30 सप्टेंबरपूर्वी सभेत अहवाल सादर करण्यात येणार आहे. डिझेल फिल्टर घोटाळा, तिकीट घोटाळा, इंजिन घोटाळा, तिकीट ट्रे घोटाळा, कर्मचारी घोटाळा अशा प्रकारचे बरेच घोटाळे केडीएमटीत निदर्शनास आले आहेत. या सर्व घोटाळ्यांची एकत्रित चौकशी करून तो अहवाल 30 सप्टेंबरपूर्वी सभेत सादर केला जाईल. आयुक्त सोनावणे यांनी सर्व घोटाळय़ाची चौकशी करण्याचे आश्वासन देऊन, परिवहन उपक्रमासाठी पूर्णवेळ व्यवस्थापक नेमण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात...
  August 17, 01:32 PM
 • कल्याण- कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील टिटवाळा प्रभागांमधील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्डय़ांमध्ये खडी टाकणे, माती टाकणे असे प्रकार ठेकेदाराकडून सुरू आहेत. मुसळधार पाऊस, सततची वाहतूक त्यामुळे केलेले काम पावसात वाहून जात आहे. खड्डय़ांचा सर्वाधिक त्रास भाविकांना होत आहे. पाऊस कमी झाल्यानंतर खड्डे भरणे, रस्ते डागडुजीची कामे पालिकेकडून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे अद्याप काही दिवस खड्डय़ांमधूनच नागरिकांना प्रवास करावा लागणार आहे. टिटवाळ्यातील एक जाणकार नागरिक...
  August 17, 01:17 PM
 • ठाणे - स्वातंत्र्य दिनानिमीत्त ठाणे पोलिस आयुक्तालयांतर्गत येणा-या ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी परिसरात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी ठाण्यातील संवेदनशिल ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. हॉटेल, लॉज येथे संशयितरित्या कोणी रहात आहेत का याची चौकशी पोलिसांनी केली असून...
  August 15, 03:59 PM
 • ठाणे - ठाणे महापालिकेमध्ये अजब कारभार सुरु आसल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील वृदांवन सोसायटीच्या भुयारी गटार योजनेच्या नावाखाली २ हजार ८२७ फ्लॅटधारकांकडून महापालिकेने १२ लाख ७२ हजार रुपयांची वसुली केली आहे. मात्र याच भुयारी गटाराच्या कामाच्या नावाखाली पालिका ठेकेदाराला या वर्षी दुस-यांदा जवळजवळ ३० लाख रुपये मोजणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी त्यांच्याकडून वसूल केलेली रक्कम परत देण्याची मागणी केली आहे. श्रीरंग सोसायटीच्या नाल्याजवळील जागा महापालिकेच्या पंपिंग स्टेशनसाठी देण्यात...
  August 15, 03:44 PM
 • ठाणे: चारित्र्यावरुन संशय घेऊन पत्नीची कु-हाडीने हत्या करणाया देवराम यशवंत वाघ (40) याला ठाणे सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गुन्हेगार देवधर वाघ हा वाडा तालुक्यातील रहिवासी आहे. जानेवारी 2008 मध्ये जामघर येथे देवधरने सुलभाच्या मानेवर कु-हाडीचा प्रहार करून तिची हत्या केली होती. जामघर हे देवघरचे सासरवाठी आहे. तेथे तो वीटभट्टीवर काम करीत होता. मात्र त्याचा सुलभाच्या चारित्र्यावर संशय होता.
  August 12, 12:17 PM
 • ठाणे: ठाण्यातील व्होल्टास कंपनीतील एका कामगाराने महागाईला कंटाळून बुधवारी आत्महत्या केल्याची घटना घडली. भीमराव भंडारे (60) रा. सावरकरनगर, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शेतक-यांच्या आत्महत्येच्या ब-याच घटना आजपर्यंत राज्यात घडल्या आहेत. परंतु, महागाईला कंटाळून आत्महत्या केल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.महागाईमुळे कुटुंबाचे पालन करणं अवघड होत असल्याने आपण आत्महत्या करत आहे, या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचे भंडारे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. भंडारे यांनी...
  August 11, 12:58 PM
 • ठाणे: जिल्हयातील नालासोपारा येथे मंगळवारी एका टीव्ही कराकाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आशिष कांबळे असे या कलाकाराचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अश्ीि की, आशिष कांबळे हा त्याचा मित्र आदित्य देशमुखसोबत चार महिन्यांपासून साईधाम अपार्टमेंटमधील एका फलॅटमध्ये राहात होता. सोमवारी रात्री दोघांनी सोबत जेवन केले आणि ते आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. मंगळवारी सकाळी आशिषने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आदित्यच्या निदर्शनास आले. आशिषने आत्महत्या...
  August 10, 03:47 PM
 • ठाणे - शाळकरी मुलांची वाहतूक करणा-या रिक्षाला पाण्याच्या टँकरने धडक दिल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सरस्वती इंग्लिश मिडीयम शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या रिक्षाला ठाणे महापालिकेजवळ भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरने समोरासमोर ठोस दिल्याने रिक्षा टँकर खाली आली. या अपघातात वैभव रामकृष्णन(१२) या विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर रिक्षातील इतर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे शाळकरी...
  August 9, 12:26 PM
 • ठाणे: ठाण्यातील दुध विक्रेत्यांनी शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी मध्यरात्रीपर्यंत एक दिवसीय संप पुकारला आहे. दुधाच्या पिशवीवरील छापील किमतीच्या दहा टक्के कमिशन मिळाले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. दुधाच्या दरात गेल्या सहा महिन्यात सतत वाढ झाली आहे. त्याचा ग्राहकांसह विक्रेत्यांनाही फटका बसला आहे. एक लिटर दूधामागे विक्रेत्यांना 80 पैसे कमिशन मिलते. दहा टक्के कमिशन मान्य न केल्यास, महाराष्ट्रात एकही दुधाची गाडी फिरकू देणार नाही, असा इशाराही ठाणे शहर दुध व्यावसायिक कल्याणकारी...
  August 6, 04:11 PM
 • ठाणे - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने खालापूरमधील एका पोल्ट्री फार्मवर छापा मारून लाखो रुपये किमतीचा अवैध दारूसाठा व अन्य सामग्री जप्त केली. तसेच एका हॉटेलवरही कारवाई करून दोघांना अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण दहा लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले. खालापूर तालुक्यातील टेंबरी गावात कुक्कुटपालन व्यवसायाच्या नावाखाली दारूसाठा केला जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागातील निरीक्षक मुकुंद बिलोलीकर यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार या फार्मवरून गोवा...
  August 6, 01:51 AM
 • ठाणे: मीरा-भाईदर महापालिकेतील वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी सचिन चवाथे यांना नुकतेच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. चवाथे यांच्या विरोधात मोठ्याप्रमाणात तक्रारी आल्या असल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. चवाथे हे यापूर्वी पालिकेत रखवालदार पदावर कार्यरत होते. जनसंपर्क अधिकारी भरती पदाची जाहिरात आल्यानंतर चवाथे यांनी पाटणा विद्यापीठाची जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन्सचे प्रमाणपत्र सादर केले होते. पाटणा विद्यापीठाची डिग्री...
  August 5, 06:52 PM
 • ठाणे - उल्हासनगर महापालिकेच्या प्रवेशद्वारातच आत्मदहन केलेल्या प्रशांत लहाने याला मृत्यूनंतरही न्याय मिळण्यास टाळाटाळ होत आहे. बहीण संगीता लहाने हिचा शिक्षण विभागात छळ होत आहे. तिच्यावर होणारा अन्याय दूर व्हावा या मागणीसाठी प्रशांतने मंगळवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारात आत्मदहन केले, त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी एस.बी.गायकवाड, चंद्रकांत बोडारे, पालिका उपायुक्तांचे सचिव गणेश शिंपी, शिक्षिका शुभांगी साळुंखे या चौघांविरुद्ध मध्यवर्ती पोलिस...
  August 4, 01:57 PM
 • ठाणे: येथील वागळे इस्टेट भागात एका 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळ्याचे खळबळ उडाली आहे. आरती ठाकूर असे या तरुणीचे नाव आहे. तिची हत्या करण्यात आली असल्याचा पोलिसांना संशय आहे. ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली असावी, असाही अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूला या तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिच्या तोंडातून फेस येत होता. अजय नामक एका तरूणाशी या मुलीचे प्रेमसंबंध होते, असे समजते. त्याचा पोलिस शोध घेत आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गेल्या तीन...
  August 3, 09:40 PM
 • ठाणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर खालापूर टोल नाक्याजवळ झालेल्या एका विचित्र अपघातात 3 जण ठार झाले. हा अपघात मध्यरात्रीनंतर 1 च्या सुमारास झाला. टोल नाक्याजवळील फूड-मॉलसमोर बंद कंटेनरला टँकरने धडक दिली. तर या अपघातग्रस्त गाड्यांवर पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी एक अल्टो कार धडकली. या विचित्र अपघातात अल्टो कारमधील 3 जण जागीच ठार झाले. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल येथील अष्टविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अल्टो गाडीचा नोंदणी क्रमांक MH १४ C C ४८०६ असा असून धडक...
  August 3, 10:39 AM
 • ठाणे - ठाण्यात आणखी एक मृतदेह आढळला आहे. मंगळवारी सकाळी मुंब्रा परिसरात शाहनाझ शेख या महिलेचा मृतदेह आढळला होता तर सायंकाळी ठाण्यातीलच वागळे इस्टेट भागात एका १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. आरती ठाकूर असे या तरुणीचे नाव असून, तीन महिन्यापासून ती बेपत्ता होती. मंगळवारी वागळे इस्टेट भागात आरतीचा मृतदेह आढळला, तिच्या तोंडातून फेस येत होता त्यामुळे तिला विष देऊन मारण्यात आले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाली असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला...
  August 2, 06:48 PM
 • ठाणे - उल्हासनगर महानगरपालिका परिसरात एका तरुणाने आत्मदहन केले त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. प्रशांत लहाने असे या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास प्रशांतने महापालिका परिसरात स्वत:ला पेटवून घेतले. आग्निशामक दलाने तात्काळ त्याला रुग्णालयात हलविले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रशांतची बहिण महानगरपालिकेत सर्व शिक्षा अभियानात नोकरीला होती. तिला सध्या कामावरुन कमी करण्यात आलेले आहे. आपल्या बहिणीला वरिष्ठ अधिका-यांकडून जाच होत असल्यामुळे प्रशांतने...
  August 2, 01:05 PM
 • ठाणे - कळंबोली येथून हरवलेली शाहनाझ शाकीर शेख या महिलेचा मृतदेह मुंब्रा परिसररातील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. कळंबोली पोलिस स्टेशनमध्ये शाहनाझ (२१) हरविल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी दाखल केलेली होती. शाहनाझचा मृतदेह सोमवारी सकाळीमुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात आढळला आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास स्थानिकांना खाडीत मृतदेह तरंगतांना दिसला. त्यांनी ही माहिती मुंब्रा पोलिसांना कळविली. पोलिसांनी फायरब्रिगेडच्या जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. कळंबोली पोलिस...
  August 2, 12:22 PM
 • ठाणे - अंबरनाथ-बदलापूर स्थानकादरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने मुंबई कडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल अडीत ते तीन तास मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद पडल्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, नेरळ आणि कर्जत स्थानकादरम्यान प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मध्य रल्वेची वाहतूक अडीच तासाहून अधिक काळ बंद पडल्याने अप आणि डाऊन मार्गावर याचा परिणाम झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक १ तास उशिराने धावत होती. नेमके संध्याकाळच्या वेळेस कार्यालय सुटण्याच्या काळात मध्य रेल्वे ठप्प झाल्याने...
  August 1, 08:36 PM
 • ठाणे- चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या एका कैद्याचा ठाणे तुरुंगात गुरुवारी मृत्यू झाला आहे. २४ वर्षीय मासूम शेख हा महिनाभरापासून ठाणे तुरुंगात होता. मुळचा बिहारचा असलेला मासूम शेखची विक्रोळी न्यायालयाने ठाणे तुरुंगात रवानगी केली होती. २५ जुलैपासून मासूमला थंडी-तापाचा त्रास होत होता. बुधवारी रात्री त्याला उलट्यांचा त्रास होत असल्याने ठाणे तुरुंगातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले मात्र गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठाणेनगर पालिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद...
  August 1, 06:26 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात