जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • अलिबाग- रायगड जिल्ह्यातील चौक फाट्याजवळ असलेल्या जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर एका रिक्षाला भरधाव वेगाने येणाऱ्या होंडा सिटी कारने जोरदार धडक दिली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाला मागून भरधाव येणाऱ्या कारने धडक दिली. यामुळे , रिक्षातील ४ प्रवासी आणि होंडा सिटी कारमधील १ प्रवासी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर, दोन जखमींचा रसायनीजवळच्या रुग्णालयात मृत्यू झाला. या...
  July 31, 11:14 PM
 • ठाणे: ठाणेसह परिसरात शनिवारी सकाळी वादळी वा-यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पाणी शिरले आहे. या भागात राहणा-यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मसवान पुलाजवळ पाणी साचल्याने पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. मुब्रा भागात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री एका इमारतीचे छत कोसळले. सुदैवाने मात्र कोणतीही जीवितहानी झाल्याने वृत्त नाही. भिवंडी, कल्याणसह आजूबाजूच्या भागात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही भागात रस्ते पाण्याखाली गेले आहे.
  July 30, 05:05 PM
 • ठाणे - मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातर्फे टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये मीरा रोड येथील सॅमटन लॉजमधील वेश्याव्यवसायासाठी पुरविण्यात येणार्या 17 युवतींना गुरुवारी अटक करण्यात आली. पोलीस पथकाने मीरा रोड-पेणकर पाडय़ातील म्हाडा कॉलनीत धाड घातली असता 17 युवती पोलिसांच्या हाती लागल्या. सर्व युवती कोलकाता येथील असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गोडबोले यांनी सांगितले. सॅमटन लॉजच्या व्यवस्थापकांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.
  July 29, 01:43 PM
 • कल्याण - क्रीडाशिक्षकांच्या मागणीची गंभीर दखल घेऊन महापौर वैजयंती गुजर यांनी १३ नोव्हेंबर रोजी मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्याचे जाहीर केले. महापौर गुजर यांनी सांगितले, अनेक खेळाडू, क्रीडाशिक्षकांनी ही स्पर्धा रद्द होऊ नये अशी यापूर्वीच मागणी केली होती. अनेक दर्दी खेळाडू, क्रीडाशिक्षक, पालिका पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत या स्पर्धेत खंड पडता कामा नये असे सांगितले होते. रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे या वर्षी वर्षां महापौर मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय महापौर वैजयंती...
  July 29, 01:34 PM
 • ठाणे- जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला सहा टक्के महागाई भत्ता राज्य शासनाने मे महिन्यापासून कर्मचाऱ्यांना लागू केला आहे. मात्र शासकीय उपक्रम असलेल्या एस.टी. महामंडळाचे कर्मचारी मात्र अद्याप या भत्त्यापासून वंचित राहिले आहेत. एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनाही नियमानुसार हा महागाई भत्ता देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनने केली आहे.
  July 29, 01:34 PM
 • कल्याण - विक्रमगड तालुक्यातील आदिवासी वाडय़ांवर अटगाव येथील पवार बुवांतर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गेले अनेक वर्षांपासून बुवा हा उपक्रम राबवित आहेत. डोंबिवली शहर परिसरातील दानशूरांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीमधून बुवा हा उपक्रम यशस्वी करीत आहेत.
  July 29, 01:32 PM
 • ठाणे - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना तसेच दलित महिलांना अपशब्द वापरल्याप्रकरणी संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या कार्यककर्त्यांनी सोमवारी सांयकाळी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात उपायुक्त बी. जी. पवार यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचे नेतृत्व शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केले परंतु काही दिवसांपूर्वी सरनाईक यांचा येऊरमधील बंगला तोडण्यात आल्याने त्याचा राग मनात धरून सरनाईक यांनी हे सर्व घडवून आणल्याचा आरोप बी. जी. पवार...
  July 26, 02:35 PM
 • ठाणे - विकलांग मुलांवर आयुर्वेदिक औषधांनी उपचार करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांना गंडा घालणार्या 9 जणांच्या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केला आहे. यात 9 जणांना अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून यात एका महिलेचाही समावेश आहे. सर्व आरोपी मुंबई, कल्याण व ठाण्यातील रहिवासी आहेत. कापूरबावडी परिसरात श्रमगट आयुर्वेदिक औषध या नावाने विकलांग मुलांवर उपचार करण्याच्या नावाखाली हे नऊ जन लोकांची फसवणूक करत होते.
  July 26, 02:33 PM
 • ठाणे: कल्याण स्टेशन परिसरातून हटविलेल्या फेरीवाल्यांचे बोरगावकरवाडी वाहनतळाजवळ तातडीने पुनर्वसन करावे, या मागणीसाठी भाजीपाला, फळे-फुले फेरीवाला कल्याणकारी संस्थेच्या कार्याकर्त्यांनी शिवाजी चौकात उपोषण केले. कल्याण स्टेशन परिसर ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या फेरीवाल्यांचे बोरगावकरवाडी वाहनतळावर पुर्नवसन करावे, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत माळी यांनी केली होती. या मागणीला महापौर वैजयंती...
  July 26, 11:41 AM
 • ठाणे: जिल्ह्यातील भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या छापेमारीत सुमारे एक लाख बोगस सिमकार्ड जप्त केले आहे. या प्रकरणी अन्वर अन्सारी या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्वरचे भिवंडी येथील राजीव नगरात एसटीडी आहे. खब-याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या एसटीडीवर छापा टाकला. त्याच्याकडे रिलायन्स, टाटा डोकोमो आणि अनेक कंपन्याची सुमारे एक लाख बोगस सिमकार्ड आढळून आले. या व्यतिरिक्त त्याच्या घरातून 70 टेलिफोन, 65 वायरलेस फोनही पोलिसांनी जप्त केले आहे. देशात तसेच परदेशात बोलण्यासाठी...
  July 24, 05:34 PM
 • ठाणे: कळवा कारशेडमधील लोकलच्या डब्यात सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलले असून त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिचा खून झाल्याची माहित ठाणे पोलिसांनी दिली आहे. 17 जून रोजी या तरुणीचा मृतदेह कळवा कारशेडमध्ये आढळला होता. या हत्येप्रकरणी पोलिसांना आठ जणांना अटक केली आहे. कल्याणहून आलेली लोकल ठाण्यातील कळवा कारशेडमध्ये 16 जूनच्या रात्री थांबली होती. 17 जूनला सकाळी लोकल निघण्याच्या वेळी या लोकलच्या एका डब्यात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक तपासानूसार या तरुणीच्या छातीवर...
  July 24, 11:49 AM
 • ठाणे: मध्य रेल्वेचा मुलुंड- माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर रविवारी (ता. 24) सकाळी 10. 50 ते दुपारी 3. 42 या कालावधीत तसेच सीएसटी -कुर्ला व वडाळा रोड- बांद्रा/ अंधेरी डाऊन मार्गादरम्यान सकाळी 10. 47 ते दुपारी 4.03 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकदरम्यान मुलुंड- माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद गती मार्गावरील वाहतूक धीम्या अप मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे गाड्या मुलुंड-शीव मार्गावर सर्व स्थानकांवर थांबतील. हार्बर मार्गावरील वाशी- बेलापूर मार्गादरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी...
  July 23, 09:53 AM
 • अंबरनाथ: शहरातील महत्त्वाच्या चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास येथील सहाय्यक पोलिस आयुक्त स्मिता पाठक यांनी परवानगी दिली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी येथील डी.जी. एबीसी केबलचे संचालक अनिल गायकवाढ यांनी महत्त्वाच्या चार ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची तयारी दर्शविली होती. शहरातील प्रमुख रहदारीच्या ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहे. यासंदर्भात अनिल गायकवाढ आणि किरण सासे यांनी पत्रान्वये सहा. पोलिस आयुक्त स्मिता पाठक यांना अनुमती मागितली होती. शहरात कॅमेरे...
  July 22, 12:55 PM
 • ठाणे - नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केल्याची घटना रहेमानी रुग्णालयात गुरुवारी घडली. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे.आफरीन सय्यद (9) या बालिकेला 7 जुलै रोजी उपचारार्थ मुंब्य्रातील रहेमानी रुग्णालयात दाखल केले होते. तीन दिवस तिच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू होते; परंतु तिची प्रकृती अधिकच खालावल्याने तिला ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तिला मोठय़ा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु सुरुवातीला तिच्यावर योग्यरित्या उपचार...
  July 22, 12:37 PM
 • ठाणे - बनावट नोटा चलनात आणू पाहणार्या तीन जणांना कळवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून हजाराच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. अटक केलेले तिघे मूळ कोलकाता येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी मार्केट परिसरात सापळा रचून समासद शेख (23), रहिद अली ऊर्फ मेहबूब अब्दुल जलील शेख (18) आणि अतिकुल शेख (24) या तिघांना अटक केली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सरडे पुढील तपास करीत आहेत.
  July 22, 12:31 PM
 • डोंबिवली - अट्टल गुंड विकी शेट्टी (28) याला बुधवारी रात्री विष्णू नगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र घोलप यांनी अटक केली. हा गुंड चिंचोडय़ाचा पाडा परिसरातील मुकुंद नारायण म्हात्रे इमारती मध्ये रहात आहे. परिमंडळ-3 च्या पोलीस उपायुक्तांनी 17 जानेवारी 2004 पासून 18 महिन्यांकरिता ठाणे, बृहन्मुंबई आणि उपनगरातून त्याला हद्दपार केले होते. तरीही त्याने शहरात प्रवेश केला होता.
  July 22, 12:28 PM
 • ठाण्यातील वागळे इस्टेटमधील एका सदनिकेमध्ये तीन व्यक्तींचे मृतदेह सापडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. आनंदीबाई हळणकर (वय ६५), शिवशंकर हळणकर (वय ४०) आणि वासंती हळणकर (वय ४३) अशी मृतांची नावे आहेत. वागळे इस्टेटमधील एका सोसायटीत चौथ्या मजल्यावर असलेल्या सदनिकेमध्ये हे मृतदेह आढळले. या तिघांसोबत आणखी एक व्यक्ती या सदनिकेमध्ये राहत होती. पोलीस तिचा शोध घेत आहेत. हे सर्व कुटुंबीय मनोरुग्ण असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिल्याचे पोलिसांनी...
  July 22, 03:05 AM
 • डोंबिवलीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात आंदोलन करणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना गुरुवारी दुपारी महानगरपालिकेच्या आवारात घडली. खड्ड्यांविरोधात मनसेने आंदोलनाचे आयोजन केले होते. या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी महापौरांविरोधात घोषणा दिल्या. दरम्यान, मनसेचे आंदोलन सुरू असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने येऊन त्यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली.
  July 22, 03:03 AM
 • ठाणे: येथील वागळे इस्टेटमधील एका हाऊसिंग सोसायटीमधील चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृतामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या फ्लॅटमध्ये चार जण राहत असल्याचे समजते. पोलिस आता त्या चौथ्या व्यक्तीची शोध घेत आहे. या पकरणी ठाणे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
  July 21, 04:28 PM
 • ठाणे - प्रेसिडंज रेसिडेन्सी, वाघबीळ येथील ए-विंग मधील बंद घर फोडून अज्ञात इसमांनी हजारो रुपयांचे दागिने चोरल्याची घटना ठाण्यात घडली. या घरातील लोक बाहेर गावी गेले होते. त्या वेळी अज्ञात चोरटय़ांनी घरातील 7 हजार रुपयांचे दागिने चोरून पोबारा केला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  July 21, 04:20 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात