जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • ठाणे - मोटारसायकलने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या 65 वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. संबंधित आरोपी मोटारसायकलस्वारास पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद अन्सारी असे मृत वृद्धाचे नाव असून ते झरीना अपार्टमेंट, चांदनगर, कौसा येथे राहणारे होते.याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर मोटारसायकलस्वार फरहाण पटेल (19) याला पोलिसांनी अटक केली.
  July 21, 04:16 PM
 • ठाणे: कोलशेतमधील प्रस्तावित क्रीडा विद्यापीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नगरसेवकाने ठेवला आहे. शिवसेना नगरसेवक मधुकर पावसे यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला असून २० जुलैला होणाया बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, विषयपत्रिकेमध्ये ठाकरे यांच्या नावे विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव वाचून धक्काच बसल्याची प्रतिक्रिया राष्टवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी दिली आहे. हा मुद्दा महापौरांसमोर उपस्थित केला जाईल, तसेच आगामी बैठकीत त्यावर चर्चा...
  July 20, 04:53 AM
 • कल्याण - मुसळधार पावसामुळे रविवारी कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला. किल्ले दुर्गाडीच्या कोसळलेल्या बुरुजाची तीन वेळा डागडुजी झाली आहे. बुरुज कोसळल्याचे कळताच कल्याण-डोंबिवली महापौर वैजयंती घोलप, आयुक्त रामनाथ सोनवणे, तहसीलदार नितीन चव्हाण, शिवसेनेचे शहरप्रमुख विजय साळवी आणि सहकार्यांनी घटनास्थळी जाऊन बुरुजाची पाहाणी करून शांततेचे आवाहन केले.याबाबत जिल्हाधिकार्यांनी बुरुज दुरुस्तीसंदर्भात मंजुरी घेऊन तत्काळ दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले.
  July 18, 02:06 PM
 • ठाणे - आतापर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई, ठाणेकरांना तात्पुरता का होईना, दिलासा दिला आहे.ठाणे जिल्ह्यातील प्रमुख जलाशयांच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पातळी वाढली आहे. भिवंडीत पावसाच्या संततधारेने सखल भागांत पाणी साचले असून बर्याच ठिकाणी गेल्या सहा महिन्यांत बनविलेले डांबरी रस्ते वाहून गेले आहेत.बदलापूर, कल्याण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात ६० टक्के पाण्याचा साठा जमा झाला आहे.महापालिका मुख्यालयासमोरील रस्ता पावसामुळे जलमय झाल्याने नालेसफाईचे पितळ पुन्हा...
  July 18, 02:04 PM
 • ठाणे - जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी असलेली दहा वर्षांची अट राज्य सरकारने शिथिल केली आहे.राज्य सरकारने एका अध्यादेशाद्वारे ही अट शिथिल केली आहे.ही अट शिथिल करण्यासाठी अनेक वेळा विनंती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.शिक्षणसेवक, कंत्राटी ग्रामसेवक, कंत्राटी वर्गात कार्यरत कर्मचाऱ्यांची बदली होणार नाही
  July 18, 01:58 PM
 • ठाणे - २००७ मध्ये लग्नास नकार देणा-या प्रेयसीची निर्घूण हत्या करणा-या प्रशांत पवार (२८) याला ठाणे जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २३जून २००७ रोजी प्रशांतने सुषमा निकम (२१) या तरुणीला खोपट येथील एसटी वर्कशॉपजवळ गाठून तिच्यावर चाकूचे २० वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला. एलआयसी एजंट असलेला प्रशांत आणि खोपट येथील इंडस्ट्रिअल इस्टेट मध्ये काम करणारी सुषमा यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र दोघे वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे सुषमाच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध...
  July 17, 12:53 PM
 • मुंबई : येथील कळवा कारशेडमधील लोकलमध्ये महिनाभरापूर्वी सापडलेल्या मृत तरुणीच्या हत्येचे गूढ उकलले असून, सहा जणांनी सामूहिक बलात्कार करून त्या तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या सहा जणांना नवी मुंबईच्या एपीएसी पोलिसांनी अटक केली आहे. हत्या झालेली तरुणी आणि तिचे मारेकरी तरुण हे कळव्यातील मफतलाल झोपडपट्टीत राहणारे आहेत. मुंबईतील चर्चगेट आणि सॅन्डहर्स्ट रोड स्टेशनपाठोपाठ मध्य रेल्वेच्या कळवा कारशेडमधील लोकलमध्ये एका २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह १८ जून रोजी...
  July 17, 06:31 AM
 • ठाणे - कळवा कारशेडमधील लोकलमध्ये सापडलेल्या तरुणीच्या प्रेताचे गुढ उकलले असून या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. १८ जून रोजी कळवा कारशेडमधील लोकलमध्ये एका तरुणीचे प्रेत रेल्वे पोलिसांना आढळले होते. पोलिसांना या मुलीची ओळख पटत नसल्यामुळे तिच्या मृत्यूचे गुढ वाढत चालले होते. मात्र एपीएमसी पोलिसांनी केलेल्या तपासानंतर मोहम्मद साजीद शेख (२२), मोहम्मद रफिक शेख (३५), बाबू नूर शेख (२८), आलम ताहिर खान (३२), अमितकुमार गोलू बागडे (२०), मोनीर मुकेश शेख (२२) या सहा...
  July 16, 12:00 PM
 • ठाणे - शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असतांना नियमांचा भंग करणा-या वाहनांवर कारवाईची मोहीम आरटीओ विभागाने सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यापूढेही ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे आरटीओ अधिकारी संदेश चव्हाण यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या घरांपासून दुर असलेल्या शाळा, शाळांकडून आकारले जाणारे अव्वाच्या सव्वा भाडे यामुळे पालकवर्गाने खाजगी रिक्षा-टॅक्सींचा पर्याय स्विकारला आहे. मात्र विद्यार्थी वाहतूक करणारे काही रिक्षा-टॅक्सी चालक आपल्या...
  July 16, 10:44 AM
 • वडाळा - केंद्र सरकारच्या नागरी हवाई वाहतूक खात्याने आक्षेप घेतल्यामुळे लोढा समूहाच्या माध्यमातून वडाळा येथे उभारण्यात येणार्या 110 मजली आयकॉनिक टॉवर बांधण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे स्वप्न पुर्ण होणार नाही अशी शक्यता आहे. प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल अस्थाना यांनी पत्रकारांशी बोलताना असे सांगितले. नवी मुंबईतील विमानतळामुळे या परिक्षेत्रातील 4 कि.मी. अंतरामध्ये उंच इमारतींना हवाई मंत्रालयाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. आयकॉनिक टॉवर प्रकल्पासाठी 2500 कोटींचा...
  July 13, 12:31 PM
 • कल्याण - रामबाग येथील व्यापारी चाळीतील एका खोलीमध्ये २० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. कुमार खंडागळे ( २० ) असे या तरूणाचे नाव आहे. रामदेव हॉटेल येथे वेटर म्हणून कुमार खंडागळे काम करत होता. हॉटेल कर्मचाऱ्यांनी महात्मा फुले पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. शारीरिक व्याधींनी त्रस्त झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी , असा अंदाज महात्मा फुले पोलिसांनी व्यक्त केला आहे .
  July 13, 12:27 PM
 • ठाणे - डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील देसई गावात पोलिसांनी छापा घालून सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. भारतीय हद्दीत बेकायदेशीररीत्या शिरून तेथे राहत असल्याबद्दल घुसखोरीचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत सुर्वे यांनी दिली.
  July 13, 12:25 PM
 • डोंबिवली एमआयडीसी परिसरात अॅसिडयुक्त वायू पसरल्याने एमआयडीसी परिसरातील रहिवासी हैराण झाले. मंगळवार सकाळपर्यंत ही दुर्गंधी येत होती. रात्री दहा वाजल्यापासून अॅसिडयुक्त वायू एमआयडीसी परिसरात पसरला होता असे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. शाळेला आलेल्या विद्यार्थ्यांनाही या दुर्गंधीचा त्रास झाला. सकाळी नऊ-दहा वाजल्यानंतर ही दुर्गंधी कमी होऊ लागली. ही दुर्गंधी टिळकनगर, गांधीनगर, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा येथपर्यंत पसरली होती, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
  July 13, 12:24 PM
 • कल्याण - नागरिकांना रस्ते सुवीधा व उत्कृष्ट रस्त्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे कल्याण-डोंबिवली महापालिकेला "नगररत्न' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. कल्याण - डोंबिवलीतील रस्त्यांची चाळण झालेली असताना महापालिका आयुक्त रामनाथ सोनवणे व महापौर वैजयंती घोलप यांनी पुरस्कार स्वीकारलाच कसा, असा सवाल शिवसेनेचे कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे. पुरस्कारावरून लोकांमध्ये उमटलेली प्रतिक्रिया पाहता लोकभावनेचा आदर करत पालिकेने तो तातडीने परत करावा ', अशी मागणीही...
  July 13, 12:21 PM
 • ठाणे - वाडा येथील पंचायत समिती परिसरात तहसीलदार संतोष शिंदे यांना आज (सोमवार) जीवंत जाळण्याचा प्रय़त्न करण्यात आला.मातीच्या रॉयल्टीवरून झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे, सांगण्यात येत आहे. या प्रकरणी मुकेश स्वामी या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. संतोष शिंदे हे वा़डा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. शिंदे यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी मुकेश स्वामी या व्यक्तीला अटक केली आहे आणि त्याची चौकशी...
  July 11, 05:35 PM
 • वाडा - तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणकाची माहिती मिळावी, या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषदेने शाळांमध्ये संगणक दिले. मात्र शिक्षकांचे संगणकाविषयीचे अपुरे ज्ञान आणि शाळांमध्ये वीज जोडणी नसल्यामुळे हे संगणक धूळ खात आहेतजिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांना दोन वर्षापूर्वी संगणकीय शिक्षण घेण्याची सक्ती होती. जेणेकरून विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण देता येईल. मात्र या शिक्षकांनाच संगणक हाताळण्याची माहिती नसल्याचे समोर आले आहे....
  July 11, 05:30 PM
 • ठाणे - माहेरुन हुंडा आणण्याचा तगादा लावणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून ३२ वर्षीय शनिवारी पहाटे ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमिनाच्या नातेवाईकांनी राबोडी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर रफिकला पोलिसांनी अटक केली .राबोडी येथील जनता बेकरी परिसरात राहणाऱ्या रफीक शेख आणि अमिना यांचा पाच वर्षांपूर्वी निकाह झाला होता. रफिक विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि छळवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोस्ट मॉर्टम रिपोर्टनंतर अमिनाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे उघडकीस येईल...
  July 11, 04:49 PM
 • ठाणे- गर्भजल तपासणी आणि बेकायदेशी गर्भपात करणाऱ्या दोन डॉक्टरांवर आरोग्य विभागाने कारवाई केली आहे. डॉक्टर उमेश लोंढे आणि डॉ. जवाहर यांचे ठाण्यात सोनोग्राफी सेंटर आहे. आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. याठिकाणी एक तोतया दांपत्य पाठविण्यात आले. गर्भजल तपासणी करुन मुलगी असल्यास गर्भपात करण्याचा त्यांचा डॉक्टरांसोबत सौदा झाला. यासाठी 30 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. सोनोग्राफी सेंटरमधील रेकॉर्ड पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याशिवाय...
  July 11, 09:48 AM
 • भिवंडी: तालुक्यातील पायगाव शिवसेना शाखाप्रमुखाची शनिवारी सकाळी भरस्त्यात निर्घृण हत्या झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. हत्या करुन हल्लेखोर पसार झाले आहेत. सदानंद देवळीकर(वय-45) असे मयत शाखाप्रमुखांचे नाव आहे. भिवंडी- वसईरोडवरील पायगाव बसस्टॉपजवळ ही घटना घडली. मोटारसायकलवर आलेल्या सहा हल्लेखोरांनी देवळीकरांवर पाठीमागून धारदार शस्त्रांने सपासप 19 वार केले. या हल्ल्यात देवळीकरांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर भिवंडीच्या दिशेने फरार झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले....
  July 10, 11:27 AM
 • कल्याण: कल्याण क्राइम ब्रान्चने शहरात टाकलेल्या धाडीत सुमारे 40 लाख रुपयांचा बनावट गुटखा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी चार गुटखामाफियांना अटक करण्यात आली आहे. या धाडीत 29 लाख 48 हजार रुपये किंमतीचा राज कोल्हापुरी गुटखाही जप्त करण्यात आला. किसनलाल जोशी, रवी लाच्छांनी, अंबू थोरात व नरेंद जोशी यांना ताब्यात घेतले आहे. कल्याण- शीळ मार्गावर दावडी नाका येथील कस्तुरी पार्कमधील ए विंगमध्ये एका गोडाऊनवर क्राईम ब्रान्चने छापा टाकला. बनावट गुटखासाठा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली...
  July 9, 01:06 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात